Saturday 28 September 2019

ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संसदेत पुन्हा पराभव

✍ पक्षाच्या वार्षिक परिषदेसाठी संसदेचे कामकाज तीन दिवसांसाठी स्थगित करावे हा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा प्रस्ताव गुरुवारी खासदारांनी फेटाळल्याने जॉन्सन यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे ब्रेग्झिटपूर्वी जॉन्सन यांना संसदेत किती विरोध आहे हे स्पष्ट झाले आहे.

✍ पुढील आठवडय़ात जॉन्सन यांच्या कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाची वार्षिक परिषद होणार असून त्यासाठी संसदेचे कामकाज अल्पावधीसाठी स्थगित करावे ही जॉन्सन यांची सूचना खासदारांनी फेटाळली.

✍ जॉन्सन यांचा संसदेतील हा सातवा पराभव आहे.

✍ सर्व प्रमुख पक्षांच्या परिषदांच्या वेळी संसद अल्पावधीसाठी स्थगित केली जाते, मात्र ब्रेग्झिटमुळे खासदारांच्या मनात असलेल्या तणावाने आता परिसीमा गाठली आहे, त्यामुळेच विरोधी मतदान झाले आहे.

✍ जॉन्सन यांचा संसद पाच आठवडय़ांसाठी स्थगित करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...