Friday 27 September 2019

दिवीज शरणला सेंट पीटर्सबर्ग स्पर्धेचे विजेतेपद


✍भारताचा दिवीज शरण आणि स्लोव्हेकियाचा इगोर झेलेने या जोडीने सेंट पीटर्सबर्ग एटीपी टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

✍अंतिम सामन्यात रविवारी त्यांनी इटालियन जोडी मॅट्टियो बेरेंटीनी व सिमोन बोलेल्ली यांना ६-३, ३-६, १०-८ अशी मात दिली.

✍या विजेतेपदाने दिवीज व इगोर जोडीला २५० एटीपी गुणांची कमाई झाली आहे.

✍३३ वर्षीय दिवीजचे हे दुहेरीचे पाचवे विजेतेपद असून त्याने यंदा रोहन बोपन्नाच्या जोडीने पुण्यात महाराष्ट्र ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावून यंदाची सुरूवात यशस्वी केली होती.

✍यंदा त्याने महाराष् ओपनशिवाय निंगबो चॅलेंजर स्पर्धासुद्धा जिंकली आहे.

✍उपांत्य फेरीत दिवीज व इगोर या जोडीने अग्रमानांकित निकोला मेक्तीक व फ्रँको स्कुगोर या क्रोएशियन जोडीला ७-५, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...