Saturday 28 September 2019

शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2019

● नवी दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2019 या वर्षासाठी ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.

● वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) या संस्थेच्यावतीने दिल्या जाणार्‍या या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-👇👇

• जैवशास्त्र : डॉ. कायारत साई कृष्णन
(IISER, पुणे); डॉ. सौमेन बसक
(NII, नवी दिल्ली)

• रसायनशास्त्र : डॉ. राघवन बी. सुनोज
(IIT, मुंबई); डॉ. तपस कुमार माजी (JNCASR, बेंगळुरू)

• भु-शास्त्र, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र : डॉ. सुबिमल घोष (IIT, मुंबई)

• अभियांत्रिकी विज्ञान : माणिक वर्मा (मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडिया, बेंगळुरू)

• गणितीशास्त्र : डॉ. दिशांत मयूर भाई
पंचोली (IMS, चेन्नई);
डॉ. नीना गुप्ता (ISI, कोलकाता)

• वैद्यकीयशास्त्र : डॉ. धीरज कुमार
(ICGEB, नवी दिल्ली); डॉ. मोहम्मद जावेद अली (एल.व्ही. प्रसाद आय इंस्टीट्यूट, हैदराबाद)

• भौतिकशास्त्र : डॉ. अनिंदा सिन्हा (IISc, बेंगळुरू);  डॉ. शंकर घोष (TIFR, मुंबई)

● पुरस्काराविषयी :-

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संस्थापक डॉ. शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारतीय व्यक्तींना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. 1958 साली पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला.

• वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिला जाणारा हा पुरस्कार जैवशास्त्र, रसायनशास्त्र, भुमी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, गणितशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, भौतिकशास्त्र या विभागांमध्ये दिला जातो

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...