Friday 27 September 2019

राणी रामपालकडे हॉकीचे नेतृत्व

.

स्टार फॉरवर्ड राणी रामपाल हिच्याकडे इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाºया या दौºयात पाच सामने खेळविले जातील.

४ ऑक्टोबरपर्यंत चालणाºया या दौºयात उपकर्णधार गोलकिपर सविता असेल. सविता आणि रजनी इतिमारपू यांनी स्वत:चे स्थान पक्के केले. बचावफळीत दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निरा खोखर आणि सलिमा टेटे, नमिता टोप्पो, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ यांना स्थान देण्यात आले आहे

मुख्य कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘आम्ही टोकियो आलिम्पिकसाठी पात्रता गाठण्यात महत्त्वाच्या वळणावर आहोत. या दौºयाचा लाभ ओडिशात होणाºया एफआयएच हॉकी आॅलिम्पिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध खेळताना निश्चित होणार आहे.’

महिला हॉकी संघ :

सविता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू बचावफळी : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, रिना

खोखर, सलिमा टेटे.मधली फळी : सुशीला चानू पुखराम्बाम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल,

लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो आक्रमक फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर व शर्मिला देवी.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...