Thursday, 16 January 2025

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025


◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे.

◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले.[INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशिर]

◆ अखिल मराठा फेडरेशन चा ‘द ग्रेट मराठा’ पुरस्कार नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.

◆ अखिल मराठा फेडरेशन ची स्थापना 2015 मध्ये झाली होती.

◆ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी दक्षिण सुदान हा देश आहे.

◆ केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती झाली आहे.

◆ भारतीय रिझर्व बँकेने आपला रेपोदर 6.5 टक्के वर कायम ठेवला आहे.

◆ भारताने 2025 -26 या आर्थिक वर्षात 7.5 टक्के जीडीपी वाढीचे लक्ष ठेवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद याठिकाणी साजरा करण्यात आला आहे.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य ओडिसा आहे.

◆ नोव्हाक जोकोविच(सर्बिया) हा खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

◆ मध्य प्रदेश राज्याने ‘स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन’ सुरू केले आहे.


Wednesday, 15 January 2025

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2025


◆ भारतीय सेना दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[2025 :- 77वा]

◆ PM मोदींनी "युवा शक्तीचे व्हिजन फॉर विकसित भारत @2047" या पुस्तकाचे प्रकाशन केले.

◆ पल्ले गंगा रेड्डी यांची राष्ट्रीय हळद मंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ICC चा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात नाबेल सदरलँड(ऑस्ट्रेलिया) मिळाला आहे.(डिसेंबर 2024)

◆ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने(भारत) डिसेंबर 2024 या महिन्यासाठी आयसीसीच्या मंथ ऑफ प्लेअर हा पुरस्कार पटकावला.

◆ जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे ज्याने वर्षभरात दोनदा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे.

◆ भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात "मिशन मौसम" या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

◆ मिशन मौसम ला केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2024 मध्ये मंजुरी दिली होती.

◆ टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर बारंक्विंला हे आहे.

◆ टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार पहिल्या दहा स्लो शहरांमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश आहे.

◆ जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बारंक्विंला हे कोलंबिया या देशात आहे.

◆ आयसीसी चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत.

◆ राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पियुष गोयल यांच्या हस्ते झाले आहे.

◆ जगात हळद उत्पादन, वापर व निर्यात मध्ये अव्वलस्थानी भारत देश आहे.

◆ जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतात 80% टक्के हळद उत्पादन आहे.

◆ खो-खो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना भारत देशाने जिंकला आहे.

 

Monday, 13 January 2025

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025



◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी]

◆ भारतीय हवामान विभाग (IMD) ची स्थापना 1875 साली झाली.[यावर्षी भारतीय हवामान विभागाचा 150वा वर्धापन दिन आहे.]

◆ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत देश जास्त नोकरदारांचा वाटा असणारा आणि कमी पगार असणारा देश आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली आहे.

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी प्रभतेज सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

◆ राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[15 जानेवारी हा खाशाबा जाधव या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात.]

◆ यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा 457वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे.[12 जानेवारी]

◆ लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली.

◆ राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ 2035 या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

◆ भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

◆ देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 01 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार आहे.

◆ अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत.

◆ शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील 19 देवस्थानांना जोडणार आहे.[शक्तिपीठ महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे.]

Friday, 10 January 2025

🔷 चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2025


◆ हिंदीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.

◆ 1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ 2006 मध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय हिंदी दिवस :- 14 सप्टेंबर]

◆ जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम "एक जागतिक आवाज: एकता आणि सांस्कृतिक अभिमान" ही आहे.

◆ Henley Passport Index 2025 मध्ये भारत 85व्या स्थानी असून भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.

◆ अयोध्येत 11 ते 13 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव आयोजित केला जाईल, जो रामलल्लाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आहे.

◆ मायक्रोसॉफ्ट या संस्थेने भारताच्या AI मिशनसोबत AI-सक्षम भागीदारीची घोषणा केली आहे. [मायक्रोसॉफ्टचे सीईओ :- सत्या नडेला]

◆ युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस शहरात अलीकडेच जंगलात लागलेल्या आगीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली.

◆ वित्त मंत्रालयात महसूल सचिव म्हणून तुइन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जानेवारी 2025 मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक रूग्णालय नोंदणी केली आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी केली.

◆ इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.

◆ गोव्याने विमा सखी योजना सुरू केली आणि ती लागू करणारे हरियाणा नंतर दुसरे राज्य बनले. [ही योजना पंतप्रधान मोदींच्या "सर्वांसाठी विमा" या व्हिजन अंतर्गत आहे आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 70 वयोगटातील महिलांना सक्षम करते.]

◆ NITI Aayog च्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) ने अवॉर्ड टू रिवॉर्ड (ATR) कार्यक्रमांतर्गत न्यू शॉपसोबत भागीदारीत "EmpowHER Biz सपना की उडान" लाँच केले.

◆ पुंटसांगचुह हा चर्चेत असलेला जलविद्युत प्रकल्प (PHEP-II) भूतान देशात आहे.

◆ लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स ही संस्था ॲनिमियाफोन तंत्रज्ञान विकसित करते.

◆ भारतातील पहिली व्यावसायिक उपयुक्तता-स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) किलोकारी, दक्षिण दिल्ली या ठिकाणी आहे.

◆ फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) संस्थेने फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 जारी केला.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट p:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त,     खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट :- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट :- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट :- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट :- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट :- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट :- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट :- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष

Poverty Measurements

✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 
 
  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  
- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 
-
  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात



✅ वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 
 
  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- राज्य-विशिष्ट गरीबीरेषा:
 
  - प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या गरीबीरेषा
  - 
- कॅलरी आवश्यकता:
  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन



✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 
  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:
  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन
  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

 2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%



✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती

- मासिक किमान खर्च (2011-2012):
  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती
  - 
- कॅलरी आवश्यकता: 
  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत

2004-2005

- संपूर्ण गरीबी: 37.2%
2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%




✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती
  
- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती
  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

- कॅलरी आवश्यकता:
  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर

2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%

#Economy #Poverty

Thursday, 9 January 2025

Combine Group B पूर्व 2 Feb च्या दृष्टीकोनातून ....

1. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा.

2. इथून पुढे 2 Feb पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(focus point ) 

3. पाठीमागील पेपर मध्ये केलेल्या चूकांवर जोरदार काम या 20 ते 21 दिवसात झालं पाहिजे.

4. Combine group B आणि group C चे 2017 ते 2023 Combine Prelims चे पेपर सतत Solve करा.

5. दररोज दिवसात आयोगाचा पेपर सोडून आभ्यास नको...! आयोगाचे सर्व पेपरचे बारकाईने स्वतः Analysis करा.

6. Elemination method आणि Logic या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत.कारण त्या परिपूर्ण अभ्यास आणि जास्तीत जास्त MCQ Solve करून आपोआप समजत असतात.

7. Elemination ने तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते पण logic ने तुमचा प्रश्न चूकण्याची शक्यता जास्त असते. ( त्याच्यामुळे तुक्के मारायचे नाहीत.)

8. कोणतीही एखादी method use करताना विचारपूर्वक use करा ... शक्यतो logic वाचण्यात न आलेल्या प्रश्नांनाच apply करा.

9.आपली exam Combine पूर्व ची आहे... त्याच्यामुळे One liner प्रश्नात marks गेले नाही पाहिजेत.लक्षात असूद्या. नुसतं लक्षात नाही तर राहिलेल्या दिवसात चांगली तयारी करा.

10. Current आणि Math +reasoning च्या बाबतीत इथून पुढे आयोगाच्या Selective Points वरती Focus करा.

11. इथून पुढे जास्तीत जास्त revision अपेक्षित आहेत.(Focus area)

12. जूने लोकं इथून पुढे तुम्हाला खूप काहीही सूचत असतं ( हा शेवटचा Chance आहे..या वेळी तरी होईल का माझं..) एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc मध्ये फक्त मनगटात धमक लागते ... बाकी माझा तरी इतर कारणांवरती विश्वास नाही..

13. शेवटी आयोगाचा पूर्व चा कोणताही पेपर हा syllabus आणि exam चा विचार करूनच सेट होत असतो हे इथे लक्षात घ्या.

14. जास्त Form आले म्हणून राज्यसेवा पूर्व सारखा पेपर येणे अपेक्षित आहे का तर कधीच नाही... त्याच्यामुळे आपल्याला एक तास वेळ आणि त्या एका तासाच्या दृष्टिकोनातूनच पेपर सेट होत असतो.

 15. म्हणून कितीही अर्ज आले तरी चमकणारे हिरे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

इथून पुढे एकदम शांततेत स्वतःच काम करा .


Wednesday, 8 January 2025

चालू घडामोडी :- 08 जानेवारी 2025

◆ "नेट-झिरो बँकिंग अलायन्स" संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थेद्वारे आयोजित केले जाते.

◆ गुजरात राज्य 74व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे.

◆ मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजना झारखंड राज्य सरकारने सुरू केली.

◆ जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत भारताचा क्रमांक तिसरा आहे.

◆ दरवर्षी 6 जानेवारी हा जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ जानेवारी 2025 मध्ये इंडोनेशिया देश अधिकृतपणे BRICS मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे.

◆ 14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा अंदाजे GDP वाढीचा दर 6.4% आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अवकाळी पावसाला नैसर्गिक आपत्ती घोषित केले.

◆ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी आसाम सरकारने सुरू केलेल्या गुणोत्सव 2025 ची थीम "दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे" ही आहे.

◆ जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या भारतातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचे नाव "अंजी खड्डा पूल" आहे.

◆ "मकरविलक्कू" हा केरळमधील सबरीमाला मंदिरात मकर संक्रांतीला साजरा होणारा वार्षिक उत्सव आहे.

◆ केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी 8 जानेवारी रोजी ग्रेटर नोएडा येथे IndusFood 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

◆ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील सिंहाचलम मंदिरात 13व्या शतकातील संत नरहरी तीर्थ यांची तीन फूट उंचीची मूर्ती सापडली आहे.

◆ सशस्त्र सेना न्यायाधिकरण (एएफटी) संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

◆ IIT मद्रासने थायूर येथील डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये आशियातील सर्वात मोठी शॅलो वेव्ह बेसिन संशोधन सुविधा सुरू केली आहे.

◆ पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयाने स्पेशालिटी स्टीलसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना (PLI स्कीम 1.1) सुरू केली.

Thursday, 2 January 2025

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठेचा सन्मान लाभला आहे.

◆ भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे.

◆ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा न्युयॉर्क येथे पार पडली.

◆ यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची संकल्पना मधाचे गाव ही असणार आहे.

◆ ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह ने विक्रमी 907 रेटिंग गुण मिळवून आर अश्विन चा विक्रम मोडला आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 स्पर्धेचे विजेतेपद पश्चिम बंगाल ने केरळ(उपविजेता) राज्याचा पराभव करून पटकावले आहे.

◆ संतोष ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना तेलंगणा राज्यात खेळवण्यात आला.

◆ SAIL भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क Certificate देण्यात आले आहे.

◆ वितूल कुमार यांची CRPF संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ RBI ने 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्के वर्तविला आहे.

◆ येमेन देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया ला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे.

◆ वाव थराद नावाचा नविन जिल्हा गुजरात राज्यात होणार आहे.

◆ केंद्रिय संरक्षण मंत्रालयाने 2025 हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे
.

Wednesday, 1 January 2025

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत.

2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅनर्जी या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे.

3) स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट (स्पेडेक्स) या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या देशाच्या पहिल्या मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. (रॉकेट: PSLV C60]

4) ISRO या संस्थेने स्पेडेक्स मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

5) Space Docking Experiment Mission Launch करणारा भारत चौथा देश ठरला आहे.

6) चीन ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण CR450 असे करण्यात आले आहे. ताशी वेग 450/Kmh]

7) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने AICTE 2025 हे वर्षे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

8) सौर पंप योजनेत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

9) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले असून ते अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. [भारतातील हरियाणा राज्यातील एका गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.]

10) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना 2002 या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. [100 व्या वर्षी निधन & राष्ट्राध्यक्ष (1977-81)]

11) STUMPED नावाने सय्यद किरमानी या भारतीय क्रिकेट खेळाडूने आपले आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे.

12) गुजरात राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी SWAR प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

13) 53वी सिनियर राष्ट्रीय पुरूष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद केरळ ने पटकावले आहे.

14) पुण्यात स्थापित केलेल्या भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया सर्जिकल रोबोटचे नाव "SSI मंत्र" आहे.

15) हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाराच्या पुजाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव "पुजारी ग्रंथी सन्मान योजना" आहे. Vidyarthipoint

16) AAP प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 'पुजारी ग्रंथी सन्मान योजने'चे उद्दिष्ट हिंदू मंदिरातील पुजारी आणि दिल्लीतील गुरुद्वारा ग्रंथींना 18,000 रुपयांची मासिक मदत देण्याचे आहे.

17) कवच 4.0 ही भारतीय रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँड स्टैंडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केलेली प्रगत स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे.

18) 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत पोखरा, नेपाळ येथे पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव आयोजित केला जात आहे. (हा कार्यक्रम सुंदर पाल्मे प्रदेशात होत आहे.]

19) "SAAR Initiative" हे "स्मार्ट सिटी मिशन (SCM)" शी संबंधित आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे. ◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...