08 December 2025

राज्य वित्त आयोग

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



💠 स्थापना व घटनात्मक तरतूद

🔹 स्थापना : 23 एप्रिल 1994

🔹 घटनात्मक तरतूद :

◆ कलम 243(I) — राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे राज्य सरकारवर बंधनकारक

◆ 73 वी घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत, आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन करणे आवश्यक

◆ राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे आयोगाची रचना, सदस्यांची पात्रता व निवड पद्धत निश्चित करेल

◆ कलम 243(I) — पंचायतींसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो

◆ कलम 243(Y) — नगरपालिकांसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो


💠 रचना

🔹 आयोगामध्ये 1 अध्यक्ष + 4 सदस्य

◆ अध्यक्ष : विद्यमान / सेवानिवृत्त सनदी सेवक (प्रशासन व वित्त यामध्ये विशेष ज्ञान)


🔹 सदस्यांना आवश्यक ज्ञान / अनुभव 

◆ शासनाच्या वित्त व लेखा विभागाचे विशेष ज्ञान

◆ वित्तीय बाबी व प्रशासनाचा परिपूर्ण अनुभव

◆ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान

◆ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान


🔹 सदस्य सचिव : 

◆ किमान भारतीय प्रशासकीय सेवेतला कनिष्ठ प्रशासनिक दर्जाचा अधिकारी


💠 कार्यकाल व नियुक्ती

🔹 कार्यकाल : अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल राज्यपाल निश्चित करतो

🔹 पुनर्नियुक्ती : अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्ती पात्र

🔹 राजीनामा :

◆ अध्यक्ष व सदस्य — राज्यपालांना राजीनामा सादर करतात

No comments:

Post a Comment