अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
🔹 स्थापना : 16 जानेवारी 1957
🔹 अध्यक्ष : बलवंतराय मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री)
🔹 सदस्य :
➤ फुलसिंग ठाकूर
➤ बी. जी. राव
➤ डी. पी. सिंग
🔹 अहवाल सादर : 24 नोव्हेंबर 1957
🔹 शिफारशी लागू : 12 जानेवारी 1958
🔹 स्थापना उद्देश :
➤ समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा योजनांचे परीक्षण
➤ अमलबजावणीमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचविणे
💠 महत्त्वाच्या शिफारशी
🔹️त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था
➤ जिल्हा, गट (मध्य), गाव
➤ जिल्हा स्तर – जिल्हा परिषद
➤ मध्य स्तर – पंचायत समिती
➤ गाव स्तर – ग्रामपंचायत
🔹️पंचायत समिती विकासाचा प्रमुख घटक
➤ पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व
➤ लोकसंख्या 80,000 पेक्षा जास्त नसावी
🔹️अध्यक्षीय व सदस्य रचना
➤ जिल्हाधिकारी – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष
➤ ग्रामपंचायत – थेट निवड
➤ पंचायत समिती व जिल्हा परिषद – अप्रत्यक्ष निवड
🔹️संस्थांची भूमिका
➤ पंचायत समिती – कार्यकारी संस्था
➤ जिल्हा परिषद – सल्लादायी, समन्वयक व पर्यवेक्षक संस्था
🔹️प्रशासनिक तरतुदी
➤ ग्रामसेवक – ग्रामपंचायतीचा विकास सचिव
🔹️आर्थिक तरतुदी
➤ संपत्ती कर
➤ बाजार कर
➤ सरकारी अनुदाने
🔹️निवडणूक व समाज प्रतिनिधित्व
➤ कर न देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाही
➤ दोन स्त्रिया व एससी-एसटी मधील प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य
➤ दोन किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायतीची स्थापना
🔹️इतर शिफारशी
➤ पंचायत समितीचे गठन ग्रामपंचायतद्वारे अप्रत्यक्ष निवड
➤ जिल्हा परिषदेमध्ये लोकसभा, विधानसभा सदस्य व पंचायत समिती सभापती यांचे सदस्यत्व
➤ आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना प्राधान्य
➤ 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापना
➤ लोकशाहीचे विकेंद्रीकरण
No comments:
Post a Comment