02 January 2026

Combine पूर्व परीक्षा Polity

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Revision साठी Important Topics 


घटना निर्मिती : पार्श्वभूमी (कायदे), घटनासमिती, सरनामा, संघराज्य 

मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ,

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ

संसद, विधिमंडळ, न्यायालये,

विविध आयोग + घटनात्मक पदे जसे CAG, महान्यायवादी etc घटनादुरुस्ती, आणीबाणी

सूची - विषय,

घटनेतील महत्वाची कलमे, भाग, परिशिष्टे

संसदीय समित्या 


Polity चा अभ्यास करताना काही नियम & अपवादात्मक काही गोष्टी असतात त्यावर थोडं focus. For ex - काही गोष्टी घटनेत नमूद असतात & काही गोष्टी संकेतानुसार असतात, या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, वाचत असताना लक्षपूर्वक वाचा


पंचायतराज

यावर Generally 1-2 प्रश्न विचारले जातात

मागच्या वर्षी ग्रामपंचायत + ग्रामसभेवर 2 प्रश्न होते + 1 प्रश्न अभियान वर विचारला होता.


पंचायत राज वाचताना तुलनात्मक chart / table format मध्ये notes किंवा पुस्तकात असेल तर या पद्धतीने वाचा. कारण 2 प्रश्नांसाठी 200 पानं वाचणं थोडं धोकादायक आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत + पंचायत समिती + zp

महानगरपालिका + नगरपरिषद + पालिका

यांचं comparison chart format मध्ये असेल तर ते revise करा + PYQS

पंचायराज विषयी समित्या - imp शिफारशी,

73rd + 74th घ. दु.

11 वी, 12 वी अनुसूची - विषय 



2020 मध्ये polity चे questions as compared to previous papers थोडे अवघड होते. 

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

प्रश्नमंजुषा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते. 


· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. 


· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो. 


· पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत. 


· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.


· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो. 


· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो. 


· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते. 


· गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो. 


· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो. 


· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

महाराष्ट्रातील पंचायतराज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक