पद्म पुरस्कार 2022 जाहीर

🔰 2022 वर्षासाठी 128 पद्म पुरस्कार जाहीर (34 महिला , 13 मरणोत्तर , 10 विदेशी)

📝 4 पद्मविभूषण , 17 पद्मभूषण व 107 पद्मश्री असे एकुण 128 पद्म पुरस्कार जाहीर

📌 महाराष्ट्रातील 8 व्यक्तींना पद्म पुरस्कार

◾️ पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते  पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.
◾️ कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार , विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखांमधील / क्षेत्रातील योगदानासाठी हे  पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
◾️ असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला जातो.
◾️ दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते.
◾️ दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या आसपास हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केले जातात.

🎖 महत्वाचे पद्म पुरस्कार मिळवणारे व्यक्ती* 🎖
🔅 जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) - पद्मविभूषण
🔅 प्रभा अत्रे - पद्मविभूषण
🔅 गुलाम नबी आझाद - पद्मभूषण
🔅 देवेंद्र झांझरिया - पद्मभूषण
🔅 सत्य नडेला - पद्मभूषण
🔅 सुंदर पिचाई - पद्मभूषण
🔅 सायरस पूनावाला - पद्मभूषण
🔅 प्रमोद भगत - पद्मश्री
🔅 सुमित अंतील -पद्मश्री
🔅 नीरज चोपरा - पद्मश्री
🔅 अवनी लेखरा - पद्मश्री
🔅 वंदना कटारिया - पद्मश्री
🔅 सोनू निगम - पद्मश्री

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘हाय अलर्ट’

🔰प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

🔰फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे.

🔰काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, २०२१ या वर्षात दलाने विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा ९ एमएम पिस्तूल, दारूगोळा, २० ग्रेनेड, दोन आयईडी आणि १७.३ किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 851 

सकन्या समृद्धी योजना* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.


* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.


* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.


* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.


* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.


* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.


* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

लोकसंख्याविषयक महत्वाचे1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत

2. जनगणना प्रारंभ - 1872

3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881

4. जनगणना अधिनियम - 1948

5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952


6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969


7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993


8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976


9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000


🔶 लोकसंख्या विषयक सिद्धांत


1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत

- प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population


लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.


राष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड.

🔰देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये  त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.

🔰वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.

🔰त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शाळा सुरू करण्याचा निर्णय.

🔰राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली.

🔰राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.

🔰“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

🔰लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.

पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✅ राष्ट्रपती  - 5 वर्ष

✅ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

✅ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

✅ पंतप्रधान - 5 वर्ष 

✅ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

✅ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल - 6 वर्ष  

✅ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

✅ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

✅ विधानसभा - 5 वर्ष 

✅ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

✅ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

✅ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

✅ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

✅ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✅ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2022

• 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 पुद्दुचेरी येथे 12-13 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.
• या उत्सवाची थीम "साक्षर युवा - सशक्त युवा" ही होती
•  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि पुद्दुचेरी सरकार यांनी संयुक्तपणे हा महोत्सव आयोजित केला होता.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महोत्सवाचे उद्घाटन केले. यादरम्यान राष्ट्रीय युवा परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते.
• स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
• देशातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना विविध उपक्रमांतून त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळू शकेल. विशेष म्हणजे केंद्र सरकार 1995 पासून या महोत्सवाचे आयोजन करत आहे.
• भोपाळ (M.P.) येथे 1995 मध्ये पहिल्यांदा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

लोकअंदाज समिती

▪️ स्थापना- 1950 (जॉन मथाईं समितीच्या शिफारशी नुसार)

▪️ सदस्य-30.

▪️ सर्व सदस्य लोकसभेतून.

▪️ लोकसभा अध्यक्ष 30 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड करतात.

▪️कार्यकाळ 1 वर्ष.

♦️कार्ये:

1)अर्थसंकल्पीय अंदाजाचे वेळोवेळी परीक्षण.

2) काटकसर, कार्यक्षमता, प्रशासकीय व संस्थात्मक सुधारणा या विषयी अहवाल देणे

3)धोरणे व अर्थ संकल्पीय तरतूद यांचे परीक्षण करणे.

🔴 लोकलेखा समिती.

▪️स्थापना-1921

▪️ सदस्य-22-
(राज्यसभा-7,लोकसभा-15).

▪️22 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड लोकसभा सभापतीद्वारा

▪️ 1966-67 पासून अध्यक्ष विरोधी पक्षाचा.

▪️कार्यकाळ- 1 वर्ष
.

♦️कार्ये:

1)CAG च्या अहवालांची तपासणी करणे.

2महालेखा परिक्षकाला या समितीचे कान वडोळे म्हणतात.

🔵सार्वजनिक उपक्रम समिती.

🔸स्थापना-1964

▪️ कृष्ण मेनन समिती शिफारशीवरून.

▪️सदस्य- 22- (राज्यसभा-7,लोकसभा-15).

♦️कार्ये:

1)सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.

2)सार्वजनिक उपक्र मांवरील महालेखापालाचे अहवाल तपासणे.

वाचा :- प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू

राष्ट्रीय संरक्षण निधी


🚶‍♂ उददे्श = राष्ट्र संरक्षणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख अथवा अन्य स्वरुपात प्राप्ति झालेल्या स्वेच्छा देणग्यांची जबाबदारी व त्यांचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली.

🚶‍♂निधीचा वापर = सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता हा निधी वापरला जातो.

🚶‍♂व्यवस्थापन =  पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमार्फत या निधीचे व्यवस्थापन केले जाते. या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच वित्तमंत्री आदी सदस्य असतात. वित्तमंत्री या निधीचे खजिनदार असून पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव या समितीचे सचिव म्हणून काम बघतात.

🚶‍♂साठा = रिझर्व बँकेतील खात्यात हा निधी जमा करण्यात येतो. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असतो. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते. या निधीसाठी आपले योगदान देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करता येतात.

जगातील सर्वात मोठा स्कायवॉक होणार अमरावतीत...

जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे.
     मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.
   
      मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.

केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत.

जय भीम’ आणि ‘मरक्कर’चा ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश

      टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ आणि प्रियदर्शन दिग्दर्शित मरक्कर’ या दाक्षिणात्य चित्रपटांचा ९४ व्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे.
     जगभरातील २७६ चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ चित्रपटांचाही समावेश आहे.

    मरक्कर’त २ नोव्हेंबर २०२१ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे कथानक ९० च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.
     दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते. तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे.  

      प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे.
     
       खुल्या विभागात निवड झालेल्या २७६ चित्रपटांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

       यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी ८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान मोदी जगात भारी… सर्वाधिक Approval Rating सहीत ठरले सर्वात लोकप्रिय नेते.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे.

पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अ‍ॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे.

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...