Friday 5 January 2024

राज्यघटना प्रश्नसंच

1). देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय ?

1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

*3) संसद ✅*

4) न्यायमंडळ


2).   योग्य विधान ओळखा?

 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे


1)1 बरोबर 

2) 2 बरोबर 

*3) दोन्ही बरोबर ✅*

4) दोन्ही चूक


 3).....…याला सहकाराचा जनक मानतात?

*1)रॉबर्ट ओवेन*✅

2)रॉबर्ट हूक

3)मायकेल ओवेन

4)यापैकी नाही


4).आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

1)हिंद स्वराज संघ

2)हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

*3)हिंद स्वराज✅*.

4)यापैकी नाही


 5).भारतातून .....हे वृत्त जाते?

*1)कर्कवृत्त*✅

2)मकरवृत्त

3)विषुववृत्त

4)कोणतेही जात नाही


 6).महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? 

1)औरंगाबाद

2)नाशिक

3)पुणे

*4)मुंबई✅*


 7).भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? 

1)नागपूर

*2)आर्वी✅*

3)अहमदाबाद

4)चंद्रपूर


 8).अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

1)सरस्वती

2)यमुना

*3)शरयू*✅

4)घंडक


9).भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? 

 *1) सरदार वल्लभभाई पटेल✅*

 2)जी. बी. पंत

 3) जी. एल. नंदा

 4)लाल बहादूर शास्त्री


 10).लोकसभेचे पिता ..... यांना म्हणतात? 

 1)अनंतसांणम

 2) झिकीर हुसैन

 3) बासमम

 *4) मावळणकर*✅

पठाराची स्थानिक नावे


खानापूरचे पठार – सांगली


पाचगणीचे पठार – सातारा


औंधचे पठार – सातारा


सासवडचे पठार – पुणे


मालेगावचे पठार – नाशिक


अहमदनगरचे पठार – नगर


तोरणमाळचे पठार – नंदुरबार


तळेगावचे पठार – वर्धा


गाविलगडचे पठार – अमरावती


बुलढाण्याचे पठार – बुलढाणा


यवतमाळचे पठार – यवतमाळ


कान्हूरचे पठार – अहमदनगर


कास पठार – सातारा


मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद


काठी धडगाव पठार – नंदुरबार


जतचे पठार – सांगली


आर्वी पठार – वर्धा, नागपुर


चिखलदरा पठार – अमरावती.


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

प्रश्न सराव


 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात

 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व

 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
1.  ग्वाल्हेर
2. इंदौर
3.  दिल्ली
4.  या पैकी नाही

 मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

 पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

अ. सर्वच बरोबर 
ब. 1, 2बरोबर
क. 3, 4बरोबर
ड. सर्वच चूक

  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 
2. तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई

 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड

 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा

*पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला*
*1) बँरिस्टर जीना*
*2) सर सय्यद अहमद*
*3) मुहम्मद इकबाल*
*4) रहमत खान*✅
*खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता*
*1) दामोदर चाफेकर*
*2) विनायक सावरकर*
*3) अरविंद घोष*
*4) भगतसिंग*✅
:
*दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.*
1)80%
2)90%
3)100%✔✔
4)1000%
*:
*दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?*
1)वस्तूभिंग
2)संयुक्त नेत्रभिंग✔✔✔
3)विशालक
4)वरीलपैकी एकही नाही
:
*कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.*
1)जीवनसत्व
2)कॅल्शियम✔✔✔
3)मॅग्नेशियम
4)लोह
:
*19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.*
1)जागतिक मानसिक आरोग्य दिन
2)जागतिक पशु दिन
3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन
4)यापैकी नाही✔✔✔
*
*19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो*
[
*1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.*
1)कोलकाता✔✔✔
2)वाराणसी
3)नार्वे
4)बेंगळुरू
:
*वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*
1)अमेरिका
2)जर्मनी
3)नार्वे
4)भारत✔✔✔:


*...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*
1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔✔
2)जगदिश्चंद्र बोस
3)मेघनाद साहा
4) पी सी रे
:
*वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.*
1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती
2)आकारमानाशि व्यस्तानुपाती
3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती
4)वस्तुमानाशी समानूपाती✔✔
*:
*उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........*
1)त्याचे तापमान कमी होते
2)त्याचे तापमान वाढत जाते
3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔✔✔
4)यापैकी नाही:

सराव प्रश्न


 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🚩

2. सिक्किम

3. आसाम

4. महाराष्ट्र



भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🚩🚩

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🚩

3. सिक्किम

4. गुजरात


4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🚩

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🚩


 6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_



 ज) ग्वाल्हेर_📚✍🏻


ग) इंदौर


ता) दिल्ली


प) या पैकी नाही


 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1)अमर शेख

2)अण्णाभाऊ साठे✅

3)प्र. के.अत्रे

4)द.ना.गव्हाणकर


 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 


1)धुळे -गाळणा डोंगर 


2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 


3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर 


4)हिंगोली -हिंगोली डोंगर 



1)सर्वच बरोबर ✅✅



2)1, 2बरोबर 



3)3, 4बरोबर 



4)सर्वच चूक


 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?


(1)  महाराष्ट्र ✌️🚩


(2)  तामिळनाडु 


(3)  आंध्रप्रदेश 


(4)  पश्चिमप्रदेश


 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?


१) नर्मदा व तापी🚩🚩

२) तापी व गोदावरी

३) कृष्णा व गोदावरी

४) कृष्णा व पंचगंगा


 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🚩🚩

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🚩🚩

3. चंदिगड

4. मुंबई


 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🚩🚩

4. नांदेड


 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🚩🚩


 नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर पक्षी

महत्वाचे प्रश्नसंच

 पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला

1) बँरिस्टर जीना

2) सर सय्यद अहमद

3) मुहम्मद इकबाल

4) रहमत खान✅


खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता

1) दामोदर चाफेकर

2) विनायक सावरकर

3) अरविंद घोष

4) भगतसिंग✅

:

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.

1)80%

2)90%

3)100%✔️✔️

4)1000%

:

दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

1)वस्तूभिंग

2)संयुक्त नेत्रभिंग✔️✔️✔️

3)विशालक

4)वरीलपैकी एकही नाही

:

कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.

1)जीवनसत्व

2)कॅल्शियम✔️✔️✔️

3)मॅग्नेशियम

4)लोह

:

19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.

1)जागतिक मानसिक आरोग्य दिन

2)जागतिक पशु दिन

3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन

4)यापैकी नाही✔️✔️✔️


19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो


1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.

1)कोलकाता✔️✔️✔️

2)वाराणसी

3)नार्वे

4)बेंगळुरू

:

वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*

1)अमेरिका

2)जर्मनी

3)नार्वे

4)भारत✔️✔️✔️:


...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*

1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔️✔️

2)जगदिश्चंद्र बोस

3)मेघनाद साहा

4) पी सी रे

:

वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.

1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती

2)आकारमानाशि व्यस्तानुपाती

3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती

4)वस्तुमानाशी समानूपाती✔️✔️


उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........

1)त्याचे तापमान कमी होते

2)त्याचे तापमान वाढत जाते

3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔️✔️✔️

4)यापैकी नाही:


टेस्ट ट्यूब बेबी technique चा विकास........या शास्त्रज्ञांनी केला.

1)मॅक्स डेलब्रक आणि सॉलव्हेडर

2)दुवे ख्रिश्चन आणि जॉर्ज एमिल

3)रॉबर्ट एडवर्ड आणि सेपटो✔️✔️✔️

4)यापैकी नाही


राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1)"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई


उत्तर : लालबहादूर

शास्त्री


2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)


A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942

उत्तर : 1942


3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि

तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)


A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक

D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक



5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल

B. लालबहादूर शास्त्री

C. जवाहरलाल नेहरू

D. विनोबा भावे


उत्तर : लालबहादूर शास्त्री


7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930

B. 1919

C. 1942

D. 1945


उत्तर : 1942


8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले

B. दयानंद सरस्वती

C. मुळ शंकर

D. एम. जी. रानडे


उत्तर : दयानंद सरस्वती


Q.1 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.


1. 4

2. 5

3. 6 ✅

4. 8



Q2) वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?

1.म्युच्युअल फड  

2.वस्तू विनिमय  ✅

3.भागभांडवल बाजार

4.परकीय चलन बाजार



Q3.12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?


1.आरबीआय 

 2.नाबार्ड  ✅

3. एक्झिम बँक

4. वरीलपैकी काहीही नाही



Q4)एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?


1.पेपल

2.मास्टरकार्ड  ✅

3.व्हिसा

4.मेझॉन



Q5.ऑपरेशन ट्विस्ट कोणत्या बँकेची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणे व विकणे हे आहे?


1.आरबीचा  ✅

2.एसबीआय

 3.एचडीएफसी

 4.BoB



Q6.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?


1. 25%

2.29%  ✅

3.32%

4. 36%



Q7)भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?


1.2 ऑक्टोबर 1958  ✅

2.2 ऑक्टोबर 1968

3.2 ऑक्टोबर 1978

4.2 ऑक्टोबर 1988



Q.8 राज्य सरकारांचा महसूल वगळता खालील स्त्रोतांकडून महसूल उठविला जातो?


1. करमणूक कर

2. खर्च कर

3.कृषी होय  ✅

4.जमीन महसूल



Q9. वित्तीय तूट म्हणजे काय?


1.नवीन चलन नोटा छापणे

2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे

3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅

4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न


Q10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:

1.1 मार्च, 1944 

2.1 मार्च, 1945

3.1 मार्च, 1946

4.1 मार्च, 1947 ✅



Q11.भांडवळाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना............ याने मांडली.

1.मार्शल  

2.जे.एस.मिल 

3.कार्ल मार्क्स  ✅

4.अॅडम स्मिथ 



Q12.भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?

1.उत्तरप्रदेश 

2.बिहार 

3.राजस्थान 

4.मध्यप्रदेश ✅



Q13) 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते:

1.एक औंस सोने  

2.एक पौंड सोने

3.एक यू.एस. डॉलर  ✅

4.एक ब्रिटिश पौंड 



Q14)न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून के.व्ही. कामथ यांची जागा कोण घेणार?


1.मिशेल टेमर

2.मार्कोस प्रडो ट्रोयझो  ✅

3. सर्जिओ मोरो

4. दिलमा 



Q15) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) नंदुरबार ✅


 १) पुढे दिलेल्या पदांचा उतरता क्रम लावा? 

अ) राष्ट्रपती    
ब) भारतरत्न सन्मान मिळालेल्या व्यक्ती      
क) उपपंतप्रधान                    ड) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१) अकबड   ✅✅
२) डअकब    
३) अडबक   
४) अ ब क ड

 २. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? 

 एलफीन्स्टन
 एस.एन.डी.टी.
 फर्ग्युसन ✅✅
 विलिंग्टन

 ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे? 

 १)  ISRO✅✅
 २)  GSI
 ३)  DAE
 ४)  CSIR

 ४) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा. 

          प्रकल्प                     राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार    ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा        ड) राजस्थान
                               इ) उत्तर प्रदेश
 1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ ✅✅           2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

 ५)  तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?  

 A) जळगाव 
 B) नाशिक  
 C) नंदूरबार ✅✅
 D) धुळे 

 ६) भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ? 

अ. बिहार
ब. कर्नाटक
क, तेलंगणा
ड. मध्यप्रदेश

 A) फक्त अ, ब, क  ✅✅
 B) फक्त अ, ब, ड  
 C) फक्त ब, क, ड  
 D) फक्त अ, क, ड

 ७)योग्य कथन/कथने ओळखा. 

अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात. * 

 A) फक्त अ  
 B) फक्त अ, ब  ✅✅
 C) फक्त अ, क 
 D) वरील सर्व 

 ८) खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल ? 

अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून
ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर
क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव
ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

 A) फक्त अ 
 B) वरील सर्व  
 C) क आणि ड 
 D) ब आणि क ✅✅

 ९) महाराष्ट्रातील प्रसिद्ध ' यावलीचा संग्राम '  पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आणि कुठल्या राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होता? 

१) वऱ्हाड -सविनय कायदेभंग 

२) मराठवाडा -चले जाव 

३) पश्चिम महाराष्ट्र - चले जाव 

४) वऱ्हाड - चले जाव ✅✅


 10) ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत. 

 1) आंबे
 2) चिकू ✅✅
 3) द्राक्ष
 4) नारळ

 ११) 1916 राष्ट्रीय काँग्रेस चे   अधिवेशन खालीलपैकी कोठे पार पडले? 

१) लाहोर

२) पुणे 

३) कोलकाता

४) यापैकी नाही -लखनौ ✅✅

 12) कोणत्या राज्यात कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी ‘मिशन फतेह’ अभियान चालविले जात आहे? 

(A) गुजरात
(B) पंजाब ✅✅
(C) जम्मू व काश्मीर
(D) राजस्थान

 १३) अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

A. रक्त गोठलेले असते
B. रक्त थंड असते
C. शरीराचे तापमान बाहेरच्य तापमानानुसार बदलत राहते✅✅
D. शरीराचे तापमान स्थिर असते

 14) ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला कारण :, 

(a) त्यांना ताग उद्येग गाबद्दल आकर्षण होते 
(b)भारतीय उद्योग धंध्यांचा विकास करणे 
(c) भारतीयांना रोजगार मिळवून देणे .
(d) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे .

A. (a) फक्त
B. (a) आणि (b)फक्त
C. (a)' (b) आणि (c) फक्त
D. (a) आणि (d) फक्त ✅✅


 15) . दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ? 

A. चिनाब ✅✅
B. कृष्णा
C. पेन्नार
D. कावेरी


* 16) जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक 2020 नुसार भारताचे स्थान कितवे आहे?** 

  ✅भारताचा क्रमांक 142 वा 


इतिहास सरावप्रश्न

 📌भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

⚪️ 1953

⚫️ 1955

🔴 1954 ✅✅✅

🔵 1957




📌 खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?

⚪️ हिंदू महासभा

⚫️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ✅✅✅

🔴 शड्यूल्ड कास्ट्स पक्ष

🔵 जनसंघ



📌 कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

⚪️ दादाभाई नौरोजी

⚫️ बकिमचंद्र चटर्जी

🔴 लाला लजपतराय

🔵 ऍनी बेझंट ✅✅✅



📌26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?

⚪️ मबई

⚫️ कोलकाता

🔴 अलाहाबाद ✅✅✅

🔵 मद्रास



📌 वत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

⚪️ लॉर्ड लिटन ✅✅✅

⚫️ लॉर्ड रिपन

🔴 लॉर्ड कर्झन 

🔵 लॉर्ड डफरीन


📌 राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

⚪️ वयोमेशचंद्र बॅनर्जी

⚫️ पी. आनंद चार्लु ✅✅✅

🔴 लोकमान्य टिळक

🔵 फिरोजशहा मेहता



📌 विनायक दामोदर सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" ही उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती?

⚪️परल्हाद केशव अत्रे✅✅✅अचूक उत्तर

⚫️महात्मा गांधी

🔴सनापती बापट

🔵शकरराव चव्हाण

राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

दामोदर नदी

✔️ बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी.


✔️  ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. 


✔️ तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो.


✔️  सरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते.


✔️ बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. 


✔️जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात.

पहिली पंचवार्षिक योजना




कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान:- हेरॉड डोमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

वृद्धी दर

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्राथमिक शिक्षण पोंभुर्ले या गावी झाले. त्यानंतर, ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर जांभेकरांनी बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून अध्ययन सुरू केले.
- बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान मिळवले.
- 1834 मध्ये मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
- 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
- अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली.
- बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.
- जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य समाजसुधारक ही म्हटले जाऊ लागले.
- मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल 10 भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते.
- या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते.
- बाळशास्त्री यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.
- मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली होती.
- बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले. त्यानंतर, 1840 मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.
- 1840 मध्ये जांभेकरांनीच 'दिग्दर्शन' या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवात केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास 5 वर्षे काम पाहिले होते.

● ग्रंथसंपदा
शून्यलाब्दी, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, लोकहितवादी, लक्ष्मीज्ञान, जातीभेद, भिक्षुक, गीतातत्व, भरतखंडपर्व, कलियुग, ऐतिहासिक गोष्टी पानिपत लढाई, लंकेचा इतिहास

चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2024

◆ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सुखविंदर सिंग यांनी हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्राच्या पहिल्या-वहिल्या रिपोर्ट आणि मीटिंग व्यवस्थापन पोर्टलचे उद्घाटन केले.

◆ CCRAS आणि NCISM ने आयुर्वेद संशोधन पुढे नेण्यासाठी 'SMART 2.0' चे अनावरण केले.

◆ राम मंदिराच्या सन्मानार्थ छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला.

◆ मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दरमहा रु. 3,000 ची वर्धित YSR पेन्शन कनुका वितरित केली.

◆ जम्मू-काश्मीर सरकारने मदरसा बोर्डाच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यास मान्यता दिली.

◆ NHAI आणि NRSC, ISRO अंतर्गत, विस्तृत टराष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी "ग्रीन कव्हर इंडेक्स" तयार करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी 3 वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.[NRSC मुख्यालय :- हैद्राबाद]

◆ दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा रोहित शर्मा पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

◆ भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे.

◆ केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे.

◆ रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रश्मी शुक्ला(1988 IPS Batch) या महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते.

◆ रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने 2021-22 ते 2025-26 कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेश या राज्यात सुरु होणार आहे.

◆ उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे.

◆ सध्या देशात 33 सैनिकी शाळा असून केंद्र सरकारने देशभरात 100 नविन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ राष्ट्रिय जिमन्यास्टिक स्पर्धा भुवनेश्वर येथे पार पडली.

◆ महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ शिवडी-न्हावासेवा देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे.

◆ डेव्हिड चसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहिती नुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत 500 GW वीजनिर्मिती अपारंपारिक स्रोता पासून करण्याची घोषणा केली आहे.

◆ इंडीया रेटिंग आणि रिसर्च  ने भारताचा 2024 मध्ये GDP वाढीचा अंदाज 6.7 टक्के वर्तविला आहे.

◆ हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदयाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ विराट कोहली, गिल, मोहम्मद शमी ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 साठी नामांकित करण्यात आले.

◆ जालन्यातील निकेश मदारे या दृष्टीहीन शिक्षकाने महात्मा गांधींवर पीएचडी मिळवली आहे.

◆ ओडिशातील सात उत्पादनांना 'जीआय' मानांकन :- 1] लांजिया सौरा चित्रशैली, 2] डोंगरिया कौंध नक्षीदार शाल, 3] खजूर गूळ यांसह, 4] ढेंकनाल येथील मगजी हा खाद्यपदार्थ, 5] मयूरभंज येथील काई चटणी, 6] नयागड कांतेईमुडी वांगी, 7] कालाजीरा तांदूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...