Thursday 4 January 2024

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते ?

- भगूर.(नाशिक) 


०२) भंडारदरा प्रकल्प कोणतया जिल्ह्यातआहे ?

- अहमदनगर.


०३) येवला हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे ?

- पैठणी.


०४) अंजिरांकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

- राजेवाडी.


०५) नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा वध कोणी केला ?

- अनंत लक्ष्मण कान्हेरे.


०१) महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन कोठे असते ?

- मुंबई.


०२) महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे असते ?

- नागपूर.


०३) कोणाच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरूवात झाली ?

- येशू ख्रीस्त.


०४) संगणकीय भाषेत www याचा अर्थ काय होतो ?

- वर्ल्ड वाईड वेब.


०५) जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- नाथ सागर.


०१) कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान असलेला घाट कोणता ?

- आंबा घाट.


०२) उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- बुलढाणा.


०३) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे ?

- दुसरा.


०४) महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०१) 'अमृत महोत्सव' किती वर्षांनी साजरा करतात ?

- ७५ वर्षांनी.


०२) 'सुवर्ण महोत्सव' किती वर्षांनी साजरी करतात ?

- ५० वर्षांनी.


०३) 'हिरक महोत्सव' किती वर्षांनी साजरा करतात ?

- ६० वर्षांनी.


०४) 'शताब्दी महोत्सव' किती वर्षांनी साजरा करतात ?

- १०० वर्षांनी.


०५) रौप्यमहोत्सव / रजत महोत्सव किती वर्षांनी साजरा करतात ?

- २५ वर्षांनी.


०१) नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) लॅटीन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय ?

- मानव.


०३) नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे ?

- मध्यप्रदेश.


०४) कोणत्या प्राण्याला "वाळवंटातील जहाज"असे म्हणतात ?

- उंट.


०५) "सारे जहाँ से अच्छा" हे गीत कोणी लिहिले आहे ?

- मोहम्मद इकबाल.


०१) "बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो" हे गीत कोणी रचलेले आहे ?

- साने गुरुजी.


०२) ३ जानेवारी,बालिका दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ?

- सावित्रीबाई फुले.


०३) स्काऊट गाईड चळवळ कोणी सुरू केली ?

- लॉर्ड बेडन पॉवेल.


०४) ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो ?

- महात्मा गांधी.


०५) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

- अरगाॅन.


०१) हत्तीरोग हा कोणता डास चावल्यामुळे होतो ?

- क्युलेक्स.


०२) साने गुरुजी यांनी तुरुंगात असताना कोणते पुस्तक लिहिले ?

- श्यामची आई.


०३) वि.वा.शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे ?

 - कुसुमाग्रज.


०४) राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो ?

- २८ फेब्रुवारी.


०५) भारताचा पहिला अवकाश यात्री कोण आहे ?

- राकेश शर्मा.


०१) शीख धर्माचे संस्थापक कोण आहे ?

- गुरु नानक.


०२) भारताचा पहिला उपग्रह कोणता ?

- आर्यभट्ट..


०३) डेंग्यू ताप हा कोणता डास चावल्या- मुळे होतो  ?

- एडिस इजिप्ती.


०४) कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

- १ मे.


०५) मानवी शरीरात किती हाडे असतात ?

- २०६.


०१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?

- अहमदनगर.


०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?

- १ मे १९६०.


०३) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०४) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली आहे ?

- सहा.


०५) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ?

- ७२० किलोमीटर.


०१) महाराष्ट्र राज्य गीत लिहिणा-या कवीचे नाव काय आहे ?

- राजा बढे.


०२) गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- केशव गंगाधर टिळक.


०३) सर्वात मोठी जामा मशीद कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०४) प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे ?

- विजापूर.(कर्नाटक)


०५) महाराष्ट्र राज्यात विधानसभा सदस्य संख्या किती आहे ?

- २८८.


०१) भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते आहे ?

 - केरळ.


०२)  प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?

- मदुराई.(तामिळनाडू)


०३) ख्रिश्चन धर्मग्रंथाचे नाव काय आहे ?

- बायबल.


०४) राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान कोठे आहे ?

- सिंदखेड राजा,जि.बुलढाणा.(महाराष्ट्र)


०५) राष्ट्रपती भवन कोठे आहे ?

- दिल्ली. 


०१) महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कोठे आहे ?

- नाशिक.


०२) महानुभव पंथाचे प्रणेते कोण होते ?

 - चक्रधर स्वामी.


०३) महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते ?

- पोलीस महासंचालक.


०४) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

- नैऋत्य मोसमी वारे.


०५) बीबी का मकबरा कोठे आहे ?

- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024

◆ ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन’ दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ◆ केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहारीन, मॉरिश...