Thursday 4 January 2024

मानवी रक्त

रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.

▫️ रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.

▫️लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.

▫️प्रतिजन दोन प्रकारचे असतात. ‘A’ आणि  ‘B’ तसेच प्रतिद्रव्येही दोन प्रकारची असतात. Anti ‘A’ किंवा ‘a’ आणि Anti ‘B’ किंवा ‘b’.
A प्रतिजन a प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये, तसेच B प्रतिजन b प्रतिद्रव्याच्या उपस्थितीमध्ये परस्परांना चिकटतात आणि त्यामुळे तांबडया रक्तपेशींचे clumping किंवा agglutinisation होते. म्हणजेच A प्रतिजन आणि a प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.

▫️ तसेच B प्रतिजन आणि b प्रतिद्रव्य एकत्र राहू शकत नाही.
यावरून, प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट पुढीलप्रमाणे केले जातात.

Rh फॅक्टर

▫️१९४० साली Karl Landsteiner व  A. S. Weiner यांना Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला त्यांनी Rh फॅक्टर असे नाव दिले.

▫️रक्तात Rh factor उपलब्ध नसल्यास रक्ताला Rh- म्हणतात. जगात 85% लोक Rh+ve, 15% लोक Rh-ve आहेत. भारतात 93%  लोक Rh+ve, तर 7% लोक Rh-ve आहेत.

▫️सामान्यतः Rh अँटीजेनशी प्रतिक्रिया करण्यासाठी शरीरात कोणतेही अँटीबॉडी नसते. मात्र जर Rh+ve चे रक्त Rh-ve  च्या शरीरात पोहोचले तर Rh-ve च्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात.  मात्र असे एकदा झाल्यास Rh-ve व्यक्तीस धोका होत नाही. परंतु दुसऱ्यांदा त्यास Rh+ve रक्त दिले तर अँटीबॉडीजची संख्या वाढून त्या Rh-ve व्यक्तीचा मृत्यू होईल.

▫️जर Rh-ve स्त्रीचा विवाह Rh+ve पुरुषाशी झाला व त्यांच्या अपत्याचा गर्भ (मुलगा किंवा मुलगी) Rh+ve असल्यास पहिले अपत्य साधारण असते. मात्र, दुसऱ्या अपत्याच्या रक्तातील RBCs  च्या गुठळ्या होऊन त्याचा मृत्यू होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...