Thursday 4 January 2024

आयोध्येतील राम मंदिराची वैशिष्ट्ये


- राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे.

- मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रूंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.

- मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. 

- मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असतील.

- मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल.

- मंदिरात 5 मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत.

- खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

- सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल.

- दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.

- मंदिराच्या चारही बाजूंना आयातकार तटबंदी असणार आहे. 

- चारही दिशांना याची एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असणार आहे.

- तटबंदीच्या चारही कोनांना सूर्यदेव, आई भगवती, गणपती, भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहे. 

- उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे.

- मंदिराजवळ पौराणिक सीताकूप असणार आहे.

- मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत.

- दक्षिण-पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे.

- मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही. 

- जमिनीवर काँक्रीटीकरणही करण्यात आलेलं नाही.

- मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे.

मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे.

- मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित्व राहील.

- 25 हजार क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र बांधले जात आहे, जेथे यात्रेकरूंचे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील.

- मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळ आदी सुविधाही असतील.

- मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. 

- पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण 70 एकर क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र कायम हिरवेगार राहील.


No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...