Friday 5 January 2024

चालू घडामोडी :- 05 जानेवारी 2024

◆ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. माधव कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सुखविंदर सिंग यांनी हिमाचल प्रदेशमध्ये राष्ट्राच्या पहिल्या-वहिल्या रिपोर्ट आणि मीटिंग व्यवस्थापन पोर्टलचे उद्घाटन केले.

◆ CCRAS आणि NCISM ने आयुर्वेद संशोधन पुढे नेण्यासाठी 'SMART 2.0' चे अनावरण केले.

◆ राम मंदिराच्या सन्मानार्थ छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला.

◆ मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी दरमहा रु. 3,000 ची वर्धित YSR पेन्शन कनुका वितरित केली.

◆ जम्मू-काश्मीर सरकारने मदरसा बोर्डाच्या स्थापनेचा प्रस्ताव देण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यास मान्यता दिली.

◆ NHAI आणि NRSC, ISRO अंतर्गत, विस्तृत टराष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी "ग्रीन कव्हर इंडेक्स" तयार करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी 3 वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.[NRSC मुख्यालय :- हैद्राबाद]

◆ दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मैदनावर कसोटी क्रिकेट चा सामना जिंकणारा रोहित शर्मा पाहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

◆ भारत देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे.

◆ केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशा सोबत खेळवण्यात आलेला कसोटी क्रिकेट सामना इतिहासातील सर्वात कमी चेंडूचा सामना ठरला आहे.

◆ रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रश्मी शुक्ला(1988 IPS Batch) या महाराष्ट्र राज्याच्या पाहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या आहेत.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झालेल्या रश्मी शुक्ला यांना 2005 साली उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले होते.

◆ रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने 2021-22 ते 2025-26 कालावधीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेश या राज्यात सुरु होणार आहे.

◆ उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे राजनाथ सिंह यांच्या हस्ते देशांतील पाहिल्या मुलीच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन झाले आहे.

◆ सध्या देशात 33 सैनिकी शाळा असून केंद्र सरकारने देशभरात 100 नविन सैनिकी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ राष्ट्रिय जिमन्यास्टिक स्पर्धा भुवनेश्वर येथे पार पडली.

◆ महाराष्ट्र राज्यातील शिवडी न्हावासेवा सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.

◆ शिवडी-न्हावासेवा देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे.

◆ डेव्हिड चसक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये पाकिस्तान या देशात होणार आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन उर्जा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहिती नुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे.

◆ केंद्र सरकारने 2030 सालापर्यंत 500 GW वीजनिर्मिती अपारंपारिक स्रोता पासून करण्याची घोषणा केली आहे.

◆ इंडीया रेटिंग आणि रिसर्च  ने भारताचा 2024 मध्ये GDP वाढीचा अंदाज 6.7 टक्के वर्तविला आहे.

◆ हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समुदयाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ विराट कोहली, गिल, मोहम्मद शमी ICC वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 साठी नामांकित करण्यात आले.

◆ जालन्यातील निकेश मदारे या दृष्टीहीन शिक्षकाने महात्मा गांधींवर पीएचडी मिळवली आहे.

◆ ओडिशातील सात उत्पादनांना 'जीआय' मानांकन :- 1] लांजिया सौरा चित्रशैली, 2] डोंगरिया कौंध नक्षीदार शाल, 3] खजूर गूळ यांसह, 4] ढेंकनाल येथील मगजी हा खाद्यपदार्थ, 5] मयूरभंज येथील काई चटणी, 6] नयागड कांतेईमुडी वांगी, 7] कालाजीरा तांदूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...