दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1882 मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळे, आजचा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्राथमिक शिक्षण पोंभुर्ले या गावी झाले. त्यानंतर, ते मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर जांभेकरांनी बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून अध्ययन सुरू केले.
- बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान मिळवले.
- 1834 मध्ये मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
- 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात जांभेकरांनी केली आणि या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
- अवघ्या 20 व्या वर्षी त्यांनी दर्पणच्या संपादकपदाची मोठी जबाबदारी पेलली.
- बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.
- जांभेकरांनी समाजातील वर्णव्यवस्था, स्त्री दास्य, अस्पृश्यता, बालविवाह, जातीभेद इत्यादी गोष्टींवर त्यांनी आवाज उठवला, वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यामुळे, त्यांना आद्य समाजसुधारक ही म्हटले जाऊ लागले.
- मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या तब्बल 10 भाषांचे ज्ञान बाळशास्त्री जांभेकरांना होते.
- या भाषांसोबतच, विज्ञान, भूगोल, गणित आणि सामान्य ज्ञान या विषयांचे त्यांना खोलवर ज्ञान होते.
- बाळशास्त्री यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.
- मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच पहिल्यांदा वाचकांच्या हाती दिली होती.
- बाळशास्त्री यांनी सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र साडेआठ वर्षे चालले. त्यानंतर, 1840 मध्ये जुलै महिन्यात या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला.
- 1840 मध्ये जांभेकरांनीच 'दिग्दर्शन' या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरूवात केली होती. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास 5 वर्षे काम पाहिले होते.

● ग्रंथसंपदा
शून्यलाब्दी, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, लोकहितवादी, लक्ष्मीज्ञान, जातीभेद, भिक्षुक, गीतातत्व, भरतखंडपर्व, कलियुग, ऐतिहासिक गोष्टी पानिपत लढाई, लंकेचा इतिहास

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.

🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर...