Wednesday 21 April 2021

COVID -19 Apps Campaigns

◾️ कोरोना कवच - भारत सरकार


◾️आरोग्य सेतु - भारत सरकार


 ◾️ महाकवच - महाराष्ट्र


◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली 


◾️ 5T - दिल्ली


◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी


◾️ COVA PUNJAB - पंजाब 


◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी


◾️ कवारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू


◾️ कवारंटाईन वाच अँप - कर्नाटक


◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

 

◾️ बरेक द चेन - केरल


◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस 


◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री


◾️ कोरोना सहायता अँप - बिहार


◾️ टीम 11- उत्तर प्रदेश


◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड


◾️ सल्फ deceleration अॅप - नागालैंड


◾️V-सेफ टनल - तेलंगाना


◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा


◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक


औषध महानियंत्रकांची ‘स्पुटनिक व्ही’ला मंजुरी


🌼करोनाप्रतिबंधासाठी देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर तिसरी लस


🌼नवी दिल्ली : रशियन बनावटीच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंगळवारी तज्ज्ञ समितीच्या शिफारशी तपासून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता करोना विरोधातील लढय़ात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लशीनंतर तिसऱ्या लशीची भर पडली आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती . ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.


🌼महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व दिल्ली या तीन राज्यांसह एकूण दहा राज्यांत कोविड १९ विषाणूचे एकूण ८०.८० टक्के रुग्ण आढळून आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १ लाख ६१ हजार ७३६ रुग्ण २४ तासांत सापडले आहेत. जास्त रुग्ण सापडलेल्या इतर राज्यांत छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान व केरळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात ५१,७५१, उत्तर प्रदेशात १३,६०४, छत्तीसगडमध्ये १३,५७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

स्पुटनिक व्ही लस


🌼 चाचण्या- भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हेनेझुएला, बेलारस.


🌼 वार्षिक उत्पादन क्षमता- रेड्डीज- २० कोटी मात्रा, स्टेलिस बायोफार्मा २०कोटी मात्रा, पॅनाशिया बायोटेक- १० कोटी मात्रा.


⭕️ साठवण तापमान मर्यादा- २ ते ८ अंश सेल्सियस.


🌼‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या ८५ कोटी मात्रा भारत दरवर्षी उत्पादित करणार आहे, या लशीला मान्यता देणारा भारत हा ६० वा देश ठरला आहे, असे रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने म्हटले आहे. भारत हा स्पुटनिक व्ही लशीला मान्यता देणारा पन्नासावा देश ठरला आहे. भारत हा लोकसंख्येची जास्त घनता असलेला देश असून तेथेही आता या लशीला मान्यता देण्यात आली आहे.

ज्येष्ठ सनदी अधिकारी अच्युत गोखले यांचे निधनज्येष्ठ सनदी अधिकारी, नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.


गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ‘नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पीपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती. १९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.


नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

पूर्ण लॉकडाउन अशक्य’; न्यायालयाने आदेश देऊनही योगी सरकारचा लॉकडाउनसाठी नकार.


🔰अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन लागू करण्यास नकार दिला आहे.


🔰करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता.


🔰उत्तर प्रदेश सरकारने सध्या तरी लॉकडाउन अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

सह्याद्रीतील प्रमुख घाट


✔️ घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे


▪️आबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

▪️आबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

▪️फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

▪️राम घाट ( ७ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️अबोली घाट ( १२ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️हनुमंते घाट ( १० km )कोल्हापुर – कुडाळ

▪️करूळ घाट ( ८ km )कोल्हापुर – विजयदुर्ग

▪️उत्तर तिवरा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️कभार्ली घाट()सातारा – रत्नागिरी

▪️हातलोट घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पार घाट ( १० km )सातारा – रत्नागिरी

▪️कळघरचा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पसरणीचा घाट ( ५ km )सातारा – वाई

▪️फिटस् जिराल्डाचा घाट ( ५ km )महाबळेश्वर – अलिबाग

▪️पांचगणी घाट ( ४ km )पोलादपुर – वाई

▪️बोरघाट ( १५ km )पुणे – कुलाबा

▪️खडाळा घाट ( १० km )पुणे – पनवेल

▪️कसुर घाट ( ५ km )पुणे – पनवेल

▪️वरंधा घाट ( ५ Km )पुणे – महाड

▪️रपत्या घाट ( ७ km )पुणे – महाड

▪️भीमाशंकर घाट ( ६ km)पुणे – महाड

▪️कसारा घाट ( ८ km )नाशिक – मुंबई

▪️नाणे घाट ( १२ Km )अहमदनगर – मुंबई

▪️थळ घाट ( ७ Km )नाशिक – मुंबई

▪️माळशेज घाट ( ९ km )नाशिक – मुंबई

▪️सारसा घाट ( km )सिरोंचा – चंद्रपुर

जगातील विविध निर्देशांक/अहवाल


१. मानव विकास निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १३१


२. भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड  डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ८० 


३. सर्वसमावेशक इंटरनेट अहवाल २०२० :-

प्रथम क्रमांक :-  स्विडन

भारतचा क्रमांक :- ४६ 


४. जागतिक लोकशाही निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- ५१


५. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड 

भारतचा क्रमांक :- ७२ 


६. जागतिक लौगिंक असमानता निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- ११२


७. जागतिक स्पर्धात्मता निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- ६८


८. जागतिक उपासमार निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- १७ देश प्रथमस्थानी (शेवटचा देश :- छाद)

भारतचा क्रमांक :- ९४


९. इझी ऑफ डोइंग २०२० :-

प्रथम क्रमांक :- न्युजीलंड

भारतचा क्रमांक :- ६३


१०. मानवी भांडवल निर्देशांक२०२० :-

प्रथम क्रमांक :- सिंगापूर 

भारतचा क्रमांक :- ११६


११. हेन्त्री पारपत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- न्युझीलंड

भारतचा क्रमांक :- ८४


१२. SDG लौंगिक समानता निर्देशांक२०१९

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क

भारतचा क्रमांक :- ९५


१३. जागतिक उर्जा निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


१४. जागतिक नाविन्यता नवोन्मेष निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वित्झर्लंड

भारतचा क्रमांक :-४८


१५. जागतिक आनंद अहवाल २०२० 

प्रथम क्रमांक :- फिनलंड 

भारतचा क्रमांक :- १४४


१६. जागतिक शांतता निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- आईसलॅड

भारतचा क्रमांक :- १३९


१७. जागतिक स्वातंत्र निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- सिंगापूर

भारतचा क्रमांक :- १२०


१८. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२० :-

प्रथम क्रमांक :- अमेरिका 

भारतचा क्रमांक :- ४० 


१९. शाश्वत विकास निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ११७


२०. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- नॉर्वे

भारतचा क्रमांक :- १४२


२१. उर्जा संक्रमण निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :- स्वीडन

भारतचा क्रमांक :- ७४


२२. जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :-स्पेन

भारतचा क्रमांक :- ३४


२३. सुरक्षित शहरे निर्देशांक २०१९:-

प्रथम क्रमांक :- टोकीयो

भारतचा क्रमांक :- ६० शहरांत भारतातील मुंबई व नवी दिल्ली ही दोन शहरे


२४. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२० 

प्रथम क्रमांक :-अफगणिस्थान

भारतचा क्रमांक :- ८


२५. हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०:-

प्रथम क्रमांक :- पहिले ३ क्रमांक रिक्त ४ था स्वीडन

भारतचा क्रमांक :- १० 


२६. हवामान कामगिरी निर्देशांक २०२०

प्रथम क्रमांक :- डेन्मार्क 

भारतचा क्रमांक :- १६८

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ

कोरोना मुक्त इस्राईल🎯इस्रायलने व्यापक प्रमाणावर कोरोना लसीकरण मोहीम राबवणे सुरू केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची अट मागे घेतली आणि शिक्षण संस्था पूर्णपणे खुल्या केल्या. 


🎯 सगळ्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांचे विद्यार्थी रविवारी शाळेत येऊ लागले आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची गेल्या वर्षभरापासून लागू असलेली अट आरोग्य अधिकाऱ्यांनी मागे घेतली.


🎯इस्रायलने खूप वेगाने लोकसंख्येतील बहुसंख्यांना मोहिमेत लस दिली.


🎯9.3 दशलक्ष नागरिकांपैकी

53 टक्क्यांपेक्षा जास्त जणांची फायझर, बायोएनटेक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाली.


🎯इस्रायलने गेल्या डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू केल्यापासून कोरोनाचे गंभीर रुग्ण आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण🧮नासाचे इनजेन्युइटी हेलिकॉप्टर सोमवारी मंगळावरील विरल वातावरणात यशस्वीरीत्या झेपावले. कुठल्याही परग्रहावर हेलिकॉप्टरचे हे पहिले नियंत्रित उड्डाण होते. ही एक मोठी कामगिरी मानली जात असून या कामगिरीला ‘राइट बंधू क्षण’ असे संबोधण्यात आले आहे.


🧮चार पौंड म्हणजे १.८ किलो वजनाच्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरमध्ये १९०३ मधील राइट बंधूंच्या विमानाचे काही अवशेष ठेवण्यात आले होते. त्या काळात उत्तर कॅरोलिनात किटी हॉक येथे असाच इतिहास घडला होता. प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग यांनी सांगितले की, परग्रहावर आम्ही रोटो क्राफ्ट फिरवण्यात यश मिळवले आहे.


🧮कलिफोर्नियातून हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नियंत्रण करणाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर उडी मारावी तसे सुरुवातीला वर उचलले गेले. नंतर ते परसिव्हरन्स या रोव्हर गाडीपासून २०० फूट म्हणजे ६५ मीटर अंतरावर गेले. प्रत्यक्षात ते रोव्हर गाडीशी जोडलेले होते. त्यामुळे परत आल्यानंतर ते प्राचीन नदीच्या त्रिभुज प्रदेशात असलेल्या मूळ यानापासून फार दूर नाही. सदर हेलिकॉप्टर ८.५० कोटी डॉलर्सचे आहे.


🧮शरीमती मिमी आँग यांनी म्हटले आहे की, हे माझे खरे स्वप्न होते ते साकार झाले. आँग व त्यांच्या चमूने पृथ्वीपासून १.७८ कोटी मैल म्हणजे २.८७ कोटी किलोमीटर अंतरावरील हेलिकॉप्टर यशस्वी उडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. एक आठवड्यापूर्वी आज्ञावलीतील चुकीमुळे  हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकले नव्हते. त्यानंतर तो दोष दुरुस्त करण्यात आला. 


🧮हलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. सुरुवातीला या हेलिकॉप्टरची सावली असलेले कृष्णधवल छायाचित्र सामोरे आले नंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उतरत असतानाची रंगीत छायाचित्रे आली. नासाला यात ४० सेकंदांचे उड्डाण अपेक्षित होते त्यात ते १० फूट म्हणजे ३ मीटर उंच उडावे, ३० सेकंद त्याने घिरट्या माराव्यात असे अपेक्षित होते. या सर्व अपेक्षा या हेलिकॉप्टरने पूर्ण केल्या.

DRDO ने पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली.डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अलीकडेच पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली विकसित केली आहे.  हे High aptitude भागात तैनात केलेल्या सैनिकांसाठी वापरले जाईल.


🌞परणालीबद्दल थोडक्यात...

👉 बेंगळुरूमध्ये स्थित डिफेन्स बायो-अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रो मेडिकल *प्रयोगशाळा (डीईबीईएल) द्वारे ही यंत्रणा विकसित केली गेली.  हे डीआरडीओ अंतर्गत कार्यरत आहे


👉ही सिस्टीम रक्तातील संतृप्ति पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन वितरीत करते.  हे सैनिकांना हायपोक्सियाच्या राज्यात बुडण्यापासून मदत करेल.  हायपोक्सिया अनेक प्रकरणांमध्ये प्राणघातक आहे.


👉कोविड -१९ मध्ये पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली, कोविड -१९ रूग्णांना वैद्यकीय ऑक्सिजन देण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग केला जाईल.  कोविड -१९ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर वाढत असून, आता भारताला वैद्यकीय ऑक्सिजनची जास्त मागणी आहे.  भारत सरकार १६२ ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प स्थापन करणार आहे जे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवतील विशेषकरुन ग्रामीण भागातील रूग्णालयांना.  यापैकी १०० जणांना PM-Cares फंडद्वारे वित्तपुरवठा करायचा आहे.  तसेच, भारत ५०,००० टन ऑक्सिजन आयात करणार आहे*.


🌞 हायपोक्सिया म्हणजे काय?

👉हायपोक्सिया एक अशी अवस्था आहे जिथे ऊतींपर्यंत पोहोचलेला ऑक्सिजन अपुरा पडतो.  कोविड -१९ मध्ये अशीच स्थिती उद्भवते.


🌞परक ऑक्सिजन वितरण प्रणाली बद्दल.. 

👉सिस्टमचे इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर अत्यंत कमी तापमान, कमी आर्द्रता आणि कमी बॅरोमेट्रिक दबावांवर काम करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. हे मनगटाने परिधान केलेल्या नाडीच्या ऑक्सिमीटरद्वारे व्यक्तीच्या एसपीओ 2 पातळी वाचते.  हा स्तर वायरलेस इंटरफेसद्वारे वाचले जातात. एसपीओ 2 च्या पातळीवर आधारित, सोलेनॉइड वाल्व्हला त्या व्यक्तीस ऑक्सिजन पुरवण्यासाठी समायोजित केले जाते. ही प्रणाली अनुनासिक नाकाद्वारे ऑक्सिजन पुरवते, हे प्रति लिटर दोन लिटरच्या दराने 750 मिनिटे ऑक्सिजन पुरवतो. हे कमी वजनाचे आहे. डिझाइन मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी पाठविले गेले आहे.


🌞 फायदे... 

👉 ऑक्सिमीटर पूर्णपणे स्वयंचलित आहे आणि अशा प्रकारे ते घरात तैनात केले जाऊ शकतात.  असे आहे कारण ते कमी एसपीओ 2 पातळीसाठी गजर देते.


Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...