Sunday 24 October 2021

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर
(B) 28 सप्टेंबर ✅✅
(C) 27 सप्टेंबर
(D) 26 सप्टेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने “ह्वासोंग-8” नामक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले?

(A) जपान
(B) दक्षिण कोरिया
(C) चीन
(D) उत्तर कोरिया ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘झोजीला खिंड बोगदा’ बांधण्यात येत आहे?

(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) लडाख ✅✅
(D) सिक्कीम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ साजरा करतात?

(A) 28 सप्टेंबर
(B) 29 सप्टेंबर
(C) 30 सप्टेंबर
(D) 01 ऑक्टोबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी “जागतिक कृषि पशुधन दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर
(B) 30 सप्टेंबर
(C) 01 ऑक्टोबर
(D) 02 ऑक्टोबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?

(A) व्हाइस अॅडमिरल विनय बधवार
(B) व्हाइस अॅडमिरल अधीर अरोरा ✅✅
(C) व्हाइस अॅडमिरल करमबीर सिंग
(D) व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?

(A) 04 ऑक्टोबर ✅✅
(B) 03 ऑक्टोबर
(C) 02 ऑक्टोबर
(D) 01 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे 100 टक्के भागभांडवल विकत घेतले?

(A) व्हॉट्सअॅप
(B) फोनपे
(C) गुगल पे
(D) पेटीएम ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला 2021 या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?

(A) उर्मिला शर्मा
(B) हरदेव सिंह
(C) व्ही. एस. नटराजन ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?

(A) राजीव बन्सल ✅✅
(B) अजय कुमार
(C) विवेक कुमार देवांगन
(D) मृत्युंजय कुमार नारायण

काहि महत्वाची कलमे(स्पेशल PSI)

काहि महत्वाची कलमे(स्पेशल PSI)
1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग:- 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

१) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे  
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे    
   4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

२) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

३) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   ४३४) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

4) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे  
  2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे  
4) फजल अली आयोगामुळे

उत्तर :- 1

५) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या    2) दुस-या   
3) तिस-या    4) चौथ्या

उत्तर  :- 3

६) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  

   ब) सरकारीया आयोग   

   क) इंद्रजित गुप्ता समिती 

   ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड    3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

७) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   
3) अ आणि ब    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1

८) . नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क  
2) फक्त अ, क, ड  
3) फक्त क, ड, ब  
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 4

९)  भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      2) 1955   
  3) 1935      4) 1951

उत्तर :- 2

१०) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1

◆ इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.

◆ इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी ‘स्वराज्य’ हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून ‘स्वराज्य’ या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.

◆ 1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.

◆ व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.

◆ भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.

◆ हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली.

◆ भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रीपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात वैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.

◆ 1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रौलेट अॅक्ट लागू केला.

◆ 13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.

◆ लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मॉर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.

◆ होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.

◆ होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.

◆ 1 सप्टेंबर 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली. एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.

★ राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

◆ टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष – बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव: न.ची. केळकर

◆ ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली.

◆ अॅनी बेझंट यांनी ‘कॉमनविल’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे दैनिक सुरू केले.

◆ 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली.

◆ 1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ रौलेट अॅक्ट – राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला.

◆ जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या.

◆ जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले.

◆ खिलाफत चळवळ – 1919 (अलीबंधूंनी सुरू केली) 24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले.

◆ या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते.

◆ तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्‍या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते.

◆ 20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला.

◆ 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.

Forward Bloc : फॉर्वर्ड ब्लाॕक

सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की,

"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."

या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.

पक्षाचे उद्दीष्ट -

कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते.

अध्यक्ष -उपाध्यक्ष

बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.

जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला.

जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.

त्यात
अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,
उपाध्यक्ष- एस.एस. कविशर
सरचिटणीस- लाल शंकरलाल
सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .

आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना
मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते.

मुखपत्र-फार्वड ब्लॉक

"नागपुर-पहिली परिषद "

२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.
परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली.

ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.


🅾1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.

🅾1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.

🅾संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.

🅾या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

🅾1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.

🅾भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.

🅾मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.

🅾1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.

🅾1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

दुसरे कर्नाटक युद्ध (१७४८-१७५४)

◆ युद्धाचे कारणः

√ डुप्लेची महत्वकांक्षा आणि हैद्राबाद व कर्नाटक राज्यातील वारसाहक्काच्या विवादामुळे (disputed succession) प्राप्त झालेली संधी, ही या युद्धाची महत्वाची करणे सांगता येतील.

√ सन १७४८ मध्ये निजाम-उल-मुल्कच्या निधनानंतर वारसापदासाठी त्याचा मुलगा नासीरजंग व त्याच्या मुलीचा मुलगा मुजफ्फरजंग यांच्यात कलह सुरू झाला. याच वेळी कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याची गादी आपणास मिळावी म्हणून चंदासाहेबदेखील प्रयत्नशील होता.

√ या विवादांचा फायदा डुप्लेने करून घेतला. त्याने मुजफ्फरजंग व चंदासाहेब यांची बाजू घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

√ त्यामुळे इंग्रजांनी देखील नासिरजंगला निझामपद मिळवून देण्याची व अन्वरूद्दीनचे कर्नाटकचे नवाबपद सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.

√ यातूनच इंग्रज व फ्रेंचांचे दुसरे कर्नाटक युद्ध घडून आले.

◆ महत्वाच्या घटना:

√ या युद्धात फ्रेंचांना सुरुवातीला यश मिळत गेले. ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूरच्या लढाईत अन्वरूद्दीन मारला गेला व १७५० मध्ये नासीरजंग मारला गेला. फ्रेंचांच्या मदतीने मुजफ्फरजंग निझाम बनला. हैद्राबादच्या दरबारात फ्रेंचांचे हितसंबंध जपण्यासाठी जनरल बसी (General Bussy) याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवण्यात आले....

√ मात्र हा विजय अल्पकाळच ठरला. अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अली याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात शरण घेतली होती. त्याला पकडण्यासाठी चंदा साहेब व फ्रेंच यांच्या सैन्यांनी त्रिचनापल्लीला वेढा घातला.

√ हा वेढा ढिला करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाईव्हने कर्नाटकच्या राजधानीवर म्हणजे अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती केली.

√ त्यानुसार क्लाईव्हने ऑगस्ट १७५१ मध्ये केवळ २१० सैनिकांच्या साहाय्याने अरकॉट जिंकून घेतले. आपल्या राजधानीचे संरक्षण करण्यासाठी चंदासाहेबने त्रिचनापल्लीहून ४००० सैनिक अरकॉटकडे पाठविले. मात्र ते अरकॉट पुन्हा प्राप्त करूं शकले. पुढे जून १७५२ मध्ये त्रिचनापल्ली येथून फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. चंदासाहेब तंजावरला पळून गेला, मात्र तंजावरच्या राज्याने चंदासाहेबचा खून घडवून आणला.

√ रॉबर्ट क्लाईव्हच्या अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती या युद्धाचा एक प्रकारे अॅन्टी-क्लायमॅक्स ठरला. मात्र त्रिचनापल्लीच्या पराभवाचे खापर फ्रेंच कंपनीने डुप्लेवर फोडले.

√ १७५४ मध्ये त्याला फ्रान्सला परत बोलविण्यात आले व त्याच्याजागी गॉडेव्हू (Godehu) यास नवीन गर्व्हनर म्हणून पाठविण्यात' आले.

√ गॉडेव्हूने १७५४ मध्ये इंग्रजांशी पाँडिचेरीचा तह करून युद्धबंदी केली.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबपदी मुहम्मद अली यास बसविले. मात्र, हैद्राबाद दरबारात फ्रेंच जनरल बसी याचा प्रभाव अजूनही प्रबळ होताच. त्याने १७५१ मध्ये मुजफ्फरजंग च्या मृत्यूनंतर सलबतजंग यास निझाम बनविले.

√ पाँडिचेरीच्या तहाने इंग्रजांनी फ्रेंचांवर राजकीय विजय मिळविला, तसेच बंगालमध्ये आपले साम्राज्यवादी धोरण राबवायला त्यांना भरपूर अवधी मिळाला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

महाराष्ट्रातील अभयारण्ये

नरनाळा - अकोला
टिपेश्वर -यवतमाळ 
येडशी रामलिंग - उस्मानाबाद
अनेर - धुळे, नंदुरबार
अंधेरी - चंद्रपूर

औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - नांदेड,यवतमाळ

कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चपराला - गडचिरोली

जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर

पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे

मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती

यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

वातावरणाचे थर

● पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात.

◆ वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

◆ भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो.

◆ या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

◆ समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.

★ या थरामधील हवेत खालील वायु आढळतात.

■ हवेतील घटक  घटकाचे  प्रमाण

◆ नायट्रोजन 78.03%

◆ ऑक्सीजन 20.99%

◆ कार्बडायक्साईड 00.03%

◆ ऑरगॉन वायु 00.94%

◆ हॅड्रोजनवायु 00.01%

◆ पाण्याची वाफ, धुळ व इतर घटक 0.01%

◆ एकूण हवा 100.00%.

2. तपस्तब्धी

◆ भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते.

◆ त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

◆ तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे.

◆ या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते.

★ स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

◆ मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

◆ मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे.

◆ सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

◆ इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो.

◆ या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

◆ एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो.

◆ या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर

◆ आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात.

◆ या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

मातीचे प्रकार व स्थान

1) गाळाची मृदा

◆ सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

2) काळी मृदा

◆ दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

3) तांबडी मृदा

◆ तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

4) वाळवंटी मृदा

◆ राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

5) गाळाची मृदा

◆ नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

राज्यतील सर्व प्रदेशिक परिवहन कार्यालय क्रमांक

◾️आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.

◾️ या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो.

◾️उदाहर्णार्थ रायगडमधील प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या गाड्यांचा क्रमांक MH-06 ने सुरु होतो. या क्रमांकाने सुरु होणारी गाडी ही महाराष्ट्रातील (MH) सहाव्या प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे असा अर्थ होतो.

◾️दिवसोंदिवस गाड्यांची संख्या वाढत असल्याने अनेक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्रमांकाची यादी आता ५६ वर जाऊन पोहचली आहे.

◾️अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात आता MH-56 पर्यंतच्या गाड्या पहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या शहरातील गाड्यांसाठी कोणता क्रमांक वापरला जातो…

MH-01 – मुंबई (दक्षिण)
MH-02 – मुंबई (पश्चिम)
MH-03 – मुंबई (पूर्व)
MH-04 – ठाणे
MH-05 – कल्याण
MH-06 – रायगड
MH-07 – सिंधुदूर्ग
MH-08 – रत्नागिरी
MH-09 – कोल्हापूर
MH-10 – सांगली
MH-11 – सातारा
MH-12 – पुणे
MH-13 – सोलापूर
MH-14 – पिंपरी चिंचवड
MH-15 – नाशिक
MH-16 – अहमदनगर
MH-17 – श्रीरामपूर (अहमदनगर)
MH-18 – धुळे
MH-19 – जळगाव
MH-20 – औरंगाबाद
MH-21 – जालना
MH-22 – परभणी
MH-23 – बीड
MH-24 – लातूर
MH-25 – उस्मानाबाद
MH-26 – नांदेड
MH-27 – अमरावती
MH-28 – बुलढाणा
MH-29 – यवतमाळ
MH-30 – अकोला
MH-31 – नागपूर
MH-32 – वर्धा
MH-33 – गडचिरोली
MH-34 – चंद्रपूर
MH-35 – गोंदिया
MH-36 – बुलढाणा
MH-37 – वाशिम
MH-38 – हिंगोली
MH-39 – नंदूरबार
MH-40 – वाडी (नागपूर)
MH-41 – मालेगाव (नाशिक)
MH-42 – बारामती (पुणे)
MH-43 – वाशी (सानपाडा)
MH-44 – अंबेजोगाई (बीड)
MH-45 – आकलूज (सोलापूर)
MH-46 – पनवेल
MH-47 – बोरिवली
MH-48 – वसई
MH-49 – नागपूर (पूर्व) भंडारा रोड
MH-50 – कराड
MH-51 – संगमनेर (अहमदनगर)
MH-52 – परभणी (ग्रामीण)
MH-53 – पुणे (दक्षिण)
MH-54 – पुणे (उत्तर)
MH-55 – मुंबई (मध्य)
MH-56 – ठाणे (ग्रामीण)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...