Sunday 24 October 2021

संख्या व स्थानिक किंमत यांच्या विषयी संपूर्ण माहिती


 नमूना पहिला –

उदा . 795421 ऊया संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?

9,000

900

90,000

9,00,000

उत्तर : 90,000

स्पष्टीकरण :-अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्या अंकापुढे जेवढे अंक येतात. तेवढे शून्य त्या अंकापुढे लिहिणे.यानुसार 9 च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 90,000.

नमूना दूसरा –

उदा . 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

330

270

170

280

उत्तर : 270

स्पष्टीकरण :-समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 9 च्या पटीत असतो.
43322 9 ×3 = 27
 270

नमूना तिसरा –

उदा . 8**3 या चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता?

7

8

9

4

उत्तर : 8

स्पष्टीकरण :-स्थानिक किमतीतील फरक हा संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो.
उदा. 720 7 च्या पुढील अंक 8 येईल.

नमूना चौथा-

उदा . 35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्‍या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?

10

1000

100

10000

उत्तर : 100

स्पष्टीकरण :-पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो.हे मोजून 1 वर तेवढे शून्य देणे.

नमूना पाचवा –

उदा . 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

1000

100

10000

10

उत्तर : 100

स्पष्टीकरण :-5 अंकी लहानात लहान संख्या 10000 आहे.
3 अंकी लहानात लहान संख्या = 100
:: 10000÷100=100 किंवा 5-3=2 फरकाएवढे शून्य 1 वर देणे  100

नमूना सहावा-

उदा . खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ?

2354

21753

54213

62301

उत्तर : 54213

स्पष्टीकरण :-ज्या संख्येतील दिलेल्या अंकापुढे सर्वात जास्त अंक येतील त्या अंकाची त्या संख्येतील स्थानिक किंमत सर्वात जास्त असते.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...