Sunday 24 October 2021

दुसरे कर्नाटक युद्ध (१७४८-१७५४)

◆ युद्धाचे कारणः

√ डुप्लेची महत्वकांक्षा आणि हैद्राबाद व कर्नाटक राज्यातील वारसाहक्काच्या विवादामुळे (disputed succession) प्राप्त झालेली संधी, ही या युद्धाची महत्वाची करणे सांगता येतील.

√ सन १७४८ मध्ये निजाम-उल-मुल्कच्या निधनानंतर वारसापदासाठी त्याचा मुलगा नासीरजंग व त्याच्या मुलीचा मुलगा मुजफ्फरजंग यांच्यात कलह सुरू झाला. याच वेळी कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याची गादी आपणास मिळावी म्हणून चंदासाहेबदेखील प्रयत्नशील होता.

√ या विवादांचा फायदा डुप्लेने करून घेतला. त्याने मुजफ्फरजंग व चंदासाहेब यांची बाजू घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

√ त्यामुळे इंग्रजांनी देखील नासिरजंगला निझामपद मिळवून देण्याची व अन्वरूद्दीनचे कर्नाटकचे नवाबपद सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली.

√ यातूनच इंग्रज व फ्रेंचांचे दुसरे कर्नाटक युद्ध घडून आले.

◆ महत्वाच्या घटना:

√ या युद्धात फ्रेंचांना सुरुवातीला यश मिळत गेले. ऑगस्ट १७४९ मध्ये अंबूरच्या लढाईत अन्वरूद्दीन मारला गेला व १७५० मध्ये नासीरजंग मारला गेला. फ्रेंचांच्या मदतीने मुजफ्फरजंग निझाम बनला. हैद्राबादच्या दरबारात फ्रेंचांचे हितसंबंध जपण्यासाठी जनरल बसी (General Bussy) याच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवण्यात आले....

√ मात्र हा विजय अल्पकाळच ठरला. अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अली याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात शरण घेतली होती. त्याला पकडण्यासाठी चंदा साहेब व फ्रेंच यांच्या सैन्यांनी त्रिचनापल्लीला वेढा घातला.

√ हा वेढा ढिला करण्याच्या उद्देशाने रॉबर्ट क्लाईव्हने कर्नाटकच्या राजधानीवर म्हणजे अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती केली.

√ त्यानुसार क्लाईव्हने ऑगस्ट १७५१ मध्ये केवळ २१० सैनिकांच्या साहाय्याने अरकॉट जिंकून घेतले. आपल्या राजधानीचे संरक्षण करण्यासाठी चंदासाहेबने त्रिचनापल्लीहून ४००० सैनिक अरकॉटकडे पाठविले. मात्र ते अरकॉट पुन्हा प्राप्त करूं शकले. पुढे जून १७५२ मध्ये त्रिचनापल्ली येथून फ्रेंचांना माघार घ्यावी लागली. चंदासाहेब तंजावरला पळून गेला, मात्र तंजावरच्या राज्याने चंदासाहेबचा खून घडवून आणला.

√ रॉबर्ट क्लाईव्हच्या अरकॉटवर हल्ला करण्याची युक्ती या युद्धाचा एक प्रकारे अॅन्टी-क्लायमॅक्स ठरला. मात्र त्रिचनापल्लीच्या पराभवाचे खापर फ्रेंच कंपनीने डुप्लेवर फोडले.

√ १७५४ मध्ये त्याला फ्रान्सला परत बोलविण्यात आले व त्याच्याजागी गॉडेव्हू (Godehu) यास नवीन गर्व्हनर म्हणून पाठविण्यात' आले.

√ गॉडेव्हूने १७५४ मध्ये इंग्रजांशी पाँडिचेरीचा तह करून युद्धबंदी केली.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबपदी मुहम्मद अली यास बसविले. मात्र, हैद्राबाद दरबारात फ्रेंच जनरल बसी याचा प्रभाव अजूनही प्रबळ होताच. त्याने १७५१ मध्ये मुजफ्फरजंग च्या मृत्यूनंतर सलबतजंग यास निझाम बनविले.

√ पाँडिचेरीच्या तहाने इंग्रजांनी फ्रेंचांवर राजकीय विजय मिळविला, तसेच बंगालमध्ये आपले साम्राज्यवादी धोरण राबवायला त्यांना भरपूर अवधी मिळाला.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...