Sunday 24 October 2021

भारताचा भूगोल

भारताचा भौगोलिक नकाशा.

🍀भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात

🍀 भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

🍀भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.

🍀पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. 

🍀भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.

🍀आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.  गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. 

 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते

. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. 

दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.

दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी
वर्षांपेक्षाही अधिक आहे.

 भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

♦️बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. 

♦️गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते.

♦️दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्.

♦️ मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात.

♦️ गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात.

♦️ दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. 

🍂भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे.

⭐️हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत.

⭐️थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात.

🍂जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. 

🍂हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते.

🍂अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. 

 🍂ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. 

♦️भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

♦️भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 

♦️भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.

♦️भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 

♦️भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

♦️भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.

♦️भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.

♦️जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

♦️21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

♦️जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

♦️के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

♦️कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळच्या
सीमेवार आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

♦️देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

♦️भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

♦️क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

♦️लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

♦️चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.

♦️देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 

♦️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

♦️राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.

♦️भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

♦️भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.

♦️भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.

♦️भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.

♦️देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

♦️देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

♦️देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

♦️सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...