Tuesday, 21 September 2021

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे.

🔹भारताचे माजी पंतप्रधान  अटलबिहारी  वाजपेयी  ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. 

🔸भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे.

🔹ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे  दिल्ली,  मुंबई,  कोलकाता  आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे जोडली गेली आहेत.✅

🔸ही महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.

🔹ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकुण लांबी ५,८४६ किमी आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.



🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.


🔰‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.


🔰विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.


🔰२०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .



🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.


🔰२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. 


🔰यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.


🔰माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे


१. सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न

२. सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र

३. सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी)

४. सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी)

५. सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)खारट पाण्याचा 

६. सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा)

७. सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण)

८. सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी)

९. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई आकाराने 

१०. सर्वात मोठे राज्य - राजस्थान

१०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश

११. सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक)

१२. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)त्रिभुज प्रदेश नसणारी

१३. सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापीनदीवरील 

१४. सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी)

१५. सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा

१६. सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड   

१७. सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये)

१८. सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली)

१९. सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा, 

२०. ५३. मी (फत्तेहपुर सिक्री)

२१. सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - भारतीय स्टेट बँक

२२. सर्वात लांब कनाल - इंदिरा गांधी कनाल (राजस्थान)

२३. सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (बीजापुर)

२४. सर्वात मोठे प्राणी संग्रहालय- झूलॉजिकल गार्डन (अलीपुर, कोलकाता)

२५. सर्वात मोठे म्यूजियम - इंडिया म्यूजियम (कोलकाता)

२६. सर्वात उंच धरण - तेहरी धरण,२६० मी

२६. सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट (राजस्थान)

२८. सर्वात मोठा जिल्हा - कुच्छ (गुजरात)

२९. सर्वात जलद ट्रैन - शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली-भोपाळ)

३०. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य - गुजरात, १६६० किमी

३१. सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे दक्षिण भारतातील राज्य - आंध्र प्रदेश, ९७२ किमी

३२.सर्वात लांब रेल्वे मार्ग - आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी

३३.सर्वात मोठा प्लॅटफॉर्म - खरगपुर,८३३ मी (पश्चिम बंगाल)

३४.सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक - घूम (पश्चिम बंगाल)

३५. क्यूबा – जगातील साखरेचे कोठार.

३६. क्रांतीसिंह– नाना पाटील यांची उपाधी.

३७. क्लोरोफिल – झाडाची पाने या घटकामूळे हिरवी असतात.

३८. क्षत्रिय – हिंदूंच्या चार वर्णांपैकी दुसरा वर्ण.

३९. क्षय – बीसीजी लस ही या रोगाच्या प्रतिबंधतेसाठी वापरतात.

४०. खंडी – २० मणाचे माप.

४१. खंडेदाअमृत – गुरु गोविंदसिंग यांनी सुरु केलेला शीख दीक्षाविधी.

४२. खंबायत – भारतात सर्वप्रथम क्रिकेट येथे खेळले गेले.

४३. खडकवासला – नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे आहे.

४४. खालसा – गुरु गोविंदसिंग यांनी स्थापन केलेला पंथ.

४५. खैर – या झाडापासून कात मिळतो.

४६. खोपोली – महाराष्ट्रातील पहिले जलविद्युतकेंद्र.

४७. खोरासान – मध्ययुगात अफगाणिस्तानला या नावाने ओळखलं जाई.

४८. ख्रिश्चन – सर्वाधिक लोकसंख्या असलेला धर्म.

४९. गंगटोक – सिक्कीमची राजधानी.

५०. गंगा – गंगोत्री येथे उगम स्थान असणारी हि नदी उ.प्रदेश, बिहार, प.बंगाल या राज्यातून एकुण २५१० किमी चा प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते.

५१. गंगा – भारताची राष्ट्रीय नदी.

५२. गंगा – भारतातील सर्वात लांब नदी.

५३. गंगाखेड – परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठी असलेले संत जनाबाईचे समाधी स्थळ.

५४. गंगापूर – महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण.

५५. गंगोत्री – गंगा नदीचे उगम स्थान.

५६. गणेश – महाभारत लिहीणारा व्यासांचा लेखणिक.

५७. गतिशास्त्र – गती व प्रेरणा यांचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राचीएक उपशाखा.

५८. गरमसूर – वर्धा जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर.

५९. गरूड – पक्ष्यांचा राजा, विष्णुचे वाहन.

६०. गलगंड – आयोडीन या घटका अभावी होणारा रोग.

६१. गांडिव – महाभारतातील अर्जुनाचे धनुष्य.

६२. गांधार – कौरवांचा मामा शकुनी हा य़ा देशाचा राजकुमार होता.

६३. गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यातील जन्मगाव.

६४. गाडगेबाबा –डेबूजी झिंगराज जाणोरकर यांचे टोपण नाव.

६५. गिजुभाई बधेका – भारतातील पहिल्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक.

६६. गिरसप्पा – कर्नाटकातील प्रसिद्ध धबधबा.

६७. गीतगोविंद – जागतीक रसकाव्यातील पहिलं रसकाव्य.

६८. गीतांजली – रवींद्रनाथ टागोर यांना या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.

६९. गुगामल – मेळघाट (अमरावती) येथील राष्ट्रीय उद्यान.

७०. गुजरात – हे राज्य भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य आहे.

७१. गुरु – या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यास १० तास लागतात.

७२. गुरु – लाल रक्तरंजी ठिपका या ग्रहावर आहे.

७३. गुरु – सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह.

७४. गुरुग्रंथ साहेब – शिखांचा पवित्र आद्यग्रंथ.

७५. गुरुनानक – शिखांचे पहिले गुरु.

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


अढल : हुशार ,वाकबगार


अन्नगुरु : खादाड


अपट : पडदा, आडोसा


अपलाप : सत्य लपविणे


अपुत : अशुध्द ,अपवित्र


अपेत : दूर गेलेला


अबू : बाप


अबाब : सरकारी कर


आंदोली  :  हेलकावा, झोका


आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


आपगा  :  नदी


आभु  :  ब्रम्हा


आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


आयतन  :  जागा ,स्थळ


आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...