Tuesday 21 September 2021

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.


🔰२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. 


🔰यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.


🔰माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...