21 September 2021

आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...

विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.

No comments:

Post a Comment