21 August 2020

वाचा :- भारत सरकारच्या केंद्रीय योजना



1) स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया

▪️परारंभ - १६ जानेवारी २०१६

▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.
______

2) दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]

▪️परारंभ - २५ सप्टेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.
______

3) प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]

▪️परारंभ - ९ मार्च २०१५

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.
______

4) उडाण योजना

▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.
______

5) प्रधानमंत्री उज्वला योजना

▪️परारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.
______

6) नमामि गंगे प्रकल्प

▪️परारंभ - १० जुलै २०१४

▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
______

7) सेतू भारतम प्रकल्प

▪️परारंभ - ४ मार्च २०१६

▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.


वाचा :- 10 सराव प्रश्न व उत्तरे



Q1) कोणत्या भारतीय कार्यकर्त्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या सल्लागार गटात निवड केली गेली?

➡️उत्तर :- अर्चना सोरेंग

Q2) 2020 साली जागतिक व्याघ्र दिनाची घोषणा काय आहे?

➡️उत्तर :- देअर सर्व्हायव्हल इज इन अवर हॅंड्स

Q3) भारताच्या पहिल्या ‘कोविड-19 ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म’चे नाव काय आहे?

➡️उत्तर :-  BelYo

Q4) कोणत्या संस्थेनी “रीपोर्ट ऑफ द अनॅलिटिकल सपोर्ट अँड सॅंक्शन्स मॉनिटरिंग टीम कंसर्निंग इसिस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे?

➡️उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघ

Q5) कोण “क्वेस्ट फॉर रीस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत?

➡️उत्तर :- विरल आचार्य

Q6) कोणत्या संस्थेनी ‘आश्रय’ या नावाने विलगीकरणाची वैद्यकीय सुविधा तयार केली?

➡️उत्तर :-  प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (DIAT)

Q7) कोण ‘प्रीमियर लीग गोल्डन बूट’ हा सन्मान जिंकणारा सर्वात वरिष्ठ खेळाडू ठरला?

➡️उत्तर :-  जेमी वर्डी

Q8) कोणत्या व्यक्तीची सोमालिया देशाचे कार्यवाह पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली?

➡️उत्तर :- महदी मोहम्मद गुलाईड

Q9) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया रिपोर्ट ऑन डिजिटल एज्युकेशन, 2020” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?

➡️उत्तर :- मनुष्यबळ विकास मंत्रालय

Q10) कोणत्या बँकेनी को-ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड सुविधा देण्यासाठी IRCTC सोबत भागीदारी केली?

➡️उत्तर :- भारतीय स्टेट बँक

Online Test Series

हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास.



🌼हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत.

🍁ठळक बाबी...

🌼वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), भारतीय सुदूर संवेदी संस्था (IIRS) आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.

🌼आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करणाऱ्या चातक पक्षीचा मार्गक्रम शोधण्याविषयीचा भारतातला हा पहिलाच अभ्यास आहे.परंपरेनी हिमालयाच्या पायथ्याशी चातक पक्षीचे आगमन ही वर्षाऋतुची चाहूल देते. पावसाळ्याच्या आगमनाच्या वेळेत भारतात दाखल होणारा हा पक्षी ‘वर्षाऋतुचा अग्रदूत’ मानला जातो.

🍁वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) विषयी...

🌼ही भारत सरकारच्या पर्यावरण, वने व हवामानातले बदल मंत्रालयच्या अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1982 साली झाली. ही संस्था जैवविविधता, धोकादायक प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्य, स्थानिक पद्धती, पर्यावरण विकास, वास्तव्य, हवामानातले बदल इत्यादी सारख्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करते.

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे



1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) 2016.



🅾️ राज्यातील अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी (मापिसा) - 2016 या नव्या कायद्याचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर 19 ऑगस्ट रोजी टाकण्यात आला. त्यानुसार 100 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग असलेला समारंभ, मेळावा, सार्वजनिक सभा इत्यादींसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

🧩मसुद्यातील काही प्रमुख बाबी -

🅾️अतर्गत सुरक्षेशी संबंधित संस्था/आस्थापना/प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात येणार.

🅾️ मॉल, रेल्वे स्थानके, विविध सार्वजनिक ठिकाणे, विमानतळे, एसटी बस स्थानके, तलाव व पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या इ. सर्व सार्वजनिक ठिकाणांवर सुरक्षा तपासणी सक्तीची करण्यात येणार.

🅾️ सरक्षेचा धोका पोचविणार्‍या/कुचराई करणार्‍यास कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात येणार.

🅾️या कायद्यामुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा व्यवस्था या कायद्यामुळे वाढणार आहे.

🅾️ राज्यातील धरणे, संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची स्थळे, मोठे प्रकल्प, सागरी किनारे अशा ठिकाणांना विशेष सुरक्षा विभाग म्हणून जाहीर करून तेथे अधिक व्यापक सुरक्षा पुरविणे.

🅾️ नागरी सुरक्षेत जनसहभाग वाढविणे, सीसीटीव्ही सारख्या सुविधा तेथे उभारणे.

 🅾️या कायद्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. गृहमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत गृह राज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयकुत आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सदस्य असतील. राज्यात आज एक लाख नागरिकांच्या मागे केवळ 120 पोलीस कर्मचारी आहेत.

 🅾️ एकीकडे नागरीकरण वाढत असताना पोलीस दलावरील ताण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, या सकारात्मक हेतूने हा कायदा आणला जात असल्याचे के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले. मकोका कायद्याला 1999 मध्ये विरोध झाला होता. नागरिकांच्या विशेषाधिकारावर गंडांतर आणणारा आणि पोलिसांना अमर्याद अधिकार बहाल करणार्‍या या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर टीका होत आहे.

🅾️भारतातील घरबांधणी व्यवसाय

 🅾️द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाने भारतातील घरबांधणी व्यवसायाचा आढावा घेतला आहे.

 🅾️ अमेरिकी गृहबांधणी क्षेत्राप्रमाणे भारतीय घरबांधणी क्षेत्रदेखील गंभीर आर्थिक अवस्थेतून जात असून ती संपण्याची चिन्हे नाहीत.

 🅾️भारतात हा व्यवसाय अमेरिकेइतका पारदर्शीपणे केला जात नाही आणि त्यामुळे या व्यवसायातील भांडवलाची व्यवहार्यता व वैधता तपासण्याचा मार्ग उपलब्ध नाही.

 🅾️या व्यवसायातील वाईटाचा परिणाम मात्र सर्वसामान्य ग्राहकांवर होतो. आपल्याकडे ग्राहक घेऊ इच्छितात ते घर जरी वैधावैधतेच्या सीमारेषेवरील भांडवलातून उभे राहिले असले तरी ते विकत घेणारा हा बर्‍याच अंशी करपात्र उत्पन्नातून घरखरेदी करीत असतो.

 🅾️ जवळपास 6 लाख कोटी रुपयांची बुडीत खात्यात निघालेली कर्जे ही अनेक बँकांच्या मुळावर आलेली असताना, महामुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या शहरांत 1.50 लाख घरे पडून आहेत.

🅾️ घरबांधणी या उद्योगात पोलाद, सिमेंट, वाळू, जमीन आणि श्रमशक्ती एकाच वेळी कामास येत असल्याने अर्थव्यवस्थेसाठी या उद्योगाचे महत्त्व विशेष आहे. तसेच हा उद्योग मानवाच्या किमान गरजा भागवण्यासाठी आवश्यक असल्याने त्या दृष्टीनेही त्याची ख्यालीखुशाली एकंदर अर्थव्यवस्थेसाठी गरजेची आहे..


सरोगसी (नियमन) विधेयक 2016.



 🅾️  मातृत्वाचा व्यवसाय मांडणार्‍या व्यावसायिक सरोगसीवर पूर्णपणे बंदी घालणार्‍यासरोगसी (नियमन) विधेयक 2016चा मसुदा 24 ऑगस्ट 2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. गेल्या काही वर्षांत भारत सरोगसीचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनत चालला होता. या अनैतिक व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले. भारतीय नागरिक असलेल्या ज्या जोडप्यांना मूलबाळ नाही, अशांनाच फक्त सरोगसीच्या सुविधेचा आधार घेता येईल. हा अधिकार अनिवासी भारतीय अथवा ओव्हरसिज इंडियन कार्ड होल्डरनादेखील मिळणार नाही.

🅾️ दरवर्षी 2000 हजार विदेशी अपत्यांना भारतीय माता सरोगसीद्वारे जन्म देतात. सरोगेट आई व या प्रकारे जन्मलेल्या मुलास कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद विधेयकात आहे. मात्र, सरोगसीच्या सर्रास व्यवसायाला मान्यता देण्यास केंद्र सरकार तयार नाही. युरोपीय व अन्य देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात सरोगसी उपलब्ध असल्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून अनेक परदेशी नागरिक केवळ यासाठी भारतात येत.

🅾️भारतातला आदिवासी तथा ग्रामीण भाग जणू या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनला होता. पैसे मोजून गरीब महिलांचे गर्भाशय भाड्याने घेणे गुन्हा आहे. गरजेतून निर्माण झालेली ही सोय कालांतराने लोकांच्या हौसेची बाब बनली आहे. अनेक लोकप्रिय व्यक्ती ज्यांना अगोदरच एक मुलगा अथवा कन्या आहे, तेदेखील सरोगसीचा वापर करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन महिलांचे शोषण रोखण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने हे विधेयक मंजूर केले.

🧩विधेयकाची ठळक वैशिष्ट्ये -

🅾️ कायदेशीर विवाह झालेले भारतीय दाम्पत्यच फक्त भाडोत्री मातृत्वाने अपत्य जन्माला घालू शकेल. मात्र, त्यासाठी दोघांपैकी एकाचे वंध्यत्व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असणे बंधनकारक. विवाहाला 5 वर्षे झाली आहेत पण मूल नाही अशांनाच सरोगेट मदरद्वारे मूल घेता येईल.

🅾️परकीय नागरिकास किंवा परदेशस्थ अनिवासी भारतीयास कोणाही भारतीय स्त्रीकडून भाडोत्री माता म्हणून सेवा घेता येणार नाही. ज्या दांपत्याला मूल नाही अशानाच आणि फक्त भारतीयांनाच सरोगसी करण्याची परवानगी. एनआरआय, विदेशी नागरिक, सिंगल पॅरेंटस्, समलैंगिक दांपत्य, लिव्ह इन कपल यांना सरोगसीद्वारे मूल घेता येणार नाही.

🅾️अविवाहित दाम्पत्य, एकटे पालक, लिव्ह-इन पद्धतीने एकत्र राहणारे अथवा समलिंगी दाम्पत्य भाडोत्री मातृत्वाचा वापर करू शकणार नाहीत.

🅾️ कोणाही स्त्रीला केवळ दयाळू भावनेतून इतर कोणाच्या तरी मुलाची भाडोत्री माता होता येईल. त्यासाठी तिला वैद्यकीय खर्चाखेरीज अन्य कोणताही मोबदला मिळणार नाही.

 🅾️25, 000 कोटींचा वर्षाला भारतात भाडोत्री मातृत्व हा धंदा भाडोत्री मातृत्वाच्या नावाखाली ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांचे शोषण होऊ नये, म्हणून खास तरतुदी.

🅾️ भाडोत्री मातृत्वाच्या व्यवहारांचे नियमन करण्यासाठी केंद्र व राज्यांच्या पातळीवर स्वतंत्र मंडळे स्थापन करणार.

🅾️राष्ट्रीय सरोगसी मंडळ केंद्र सरकार स्थापन करणार असून केंद्रीय आरोग्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. प्रत्येक राज्यामध्ये असे सरोगसी मंडळ तेथील आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार आहे.

🅾️सरोगेट मदरही केवळ जवळची नातेवाईकच पाहिजे. त्या महिलेला फक्त एकदाच सरोगेट मदर होता येईल. ती महिला विवाहित हवी.

🅾️सरोगेट मूल घेणार्‍या महिलेचे वय 23 ते 50 वर्षांदरम्यान हवे. पुरुषाचे वय 26 ते 55 वर्षांदरम्यान पाहिजे.

🅾️ दशात 2000 सरोगसी क्लिनिक आहेत. क्लिनिकने 25 वर्षांचे सरोगसी रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे.

🅾️सरोगेट मुलगा किंवा मुलीला संबंधित दांपत्याच्या मालमत्तेत इतर मुलांप्रमाणेच वाटा मिळेल.

🅾️ सवतःचे मूल असलेल्यांना किंवा दत्तक मूल असलेल्यांना सरोगसीचा पर्याय वापरण्याची परवानगी नसेल. एक महिला फक्त एकदाच सरोगेट माता होऊ शकेल. त्यासाठीही ती विवाहित व निरोगी बाळाची माता असणे बंधनकारक असेल.

🅾️सरोगसी क्लिनिकची नोंदणी बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे या उपायातून जन्माला येणार्‍या बाळाचे संपूर्ण तपशील 25 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवणे या क्लिनिकवर बंधनकारक असेल. अशा क्लिनिकने किंवा संबंधित दांपत्याने सरोगेट मातेकडे दुर्लक्ष केले किंवा बाळाचा त्याग केला तर दहा लाख रुपयांचा दंड आणि 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल.

🅾️दहीहंडीची उंची 20 फुटांची

 🅾️ महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या दहीहंडी उत्सवात दहीहंडीचा थर वीस फुटांच्या वर नेण्यात येऊ नये, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अनिल आर. दवे, न्या. उदय ललित व न्या. एल. नागेश्‍वर राव यांच्या पीठाने अधोरेखित केला. या निर्बंधा

🅾️निर्बंधांच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल


मनोरुग्ण सुरक्षा विधेयक मंजूर.



🅾️ मनोरूग्णावस्थेत आत्महत्येचा प्रयत्न करणे यापुढे गुन्हा ठरणार नाही..

🅾️अशा प्रकरणात मानसिक रूग्णावस्थेने ग्रस्त व्यक्तिवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही, हा महत्वपूर्ण आशय अधोरेखित करणारे तसेच मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकारांवर भर देणारे, मनोरूग्ण सुरक्षा व अधिकार दुरूस्ती विधेयक राज्यसभेत १३४ दुरूस्त्यांसह मंजूर झाले..

🅾️ आरोग्यमंत्री.. :-
जे.पी. नड्डा..

🅾️ विधेयकातील तरतूदींनुसार मनोरूग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातील..

🅾️महिला व लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. मानसिक दृष्टया आजारी रूग्णाला रूग्णालयात ३0 दिवस ठेवता येईल..

🅾️ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ९0 दिवसांपर्यंत ही मुदत वाढवताही येईल..

🅾️ मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी देशात सुयोग्य डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब लक्षात घेउन वैद्यकीय अभ्यासक्रमात मनोरूग्ण चिकि त्सा अभ्यासक्रमाच्या जागाही वाढवण्यात आल्या आहेत..

🅾️  दशात मानसिक रूग्णांची संख्या नेमकी किती याचा शोध घेण्यासाठी बंगलुरूच्या निमहान्स संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे..

🅾️ या सर्वेक्षणासाठी देशाची विभागणी ६ प्रभागांमधे करण्यात आली आहे..

🅾️ पराथमिक अंदाजानुसार देशात एकुण लोकसंख्येपैकी ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजाराने कमी अधिक प्रमाणात ग्रस्त असल्याचा अंदाज आहे..

🅾️ यापैकी २ टक्के रूग्ण गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहेत..


भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोन आधारित टेहळणी प्रणालीचा वापर.



🔰कमीत कमी मनुष्यबळामध्ये खूप मोठ्या जागेवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन टेहळणी प्रणाली एक अतिशय महत्त्वाची आणि किफायतशीर प्रणाली म्हणून उदयाला येत आहे. रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला आणखी पाठबळ पुरवणे हा ड्रोन प्रणाली तैनात करण्याचा उद्देश आहे.

🔴ठळक बाबी..

🔰मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकाची संकुले, रेल्वे ट्रॅक सेक्शन यार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वेच्या जागांची अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याकरीता आणि त्यावर लक्ष ठेवण्याकरीता दोन ‘निन्जा’ मानव-रहीत हवाई वाहनांची खरेदी केली आहे. वास्तविक वेळेत शोध, चलचित्रपट तयार करण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि स्वयंचलित फॉल सेफ मोडमध्ये देखील त्यांचे परिचालन करता येते.

🔰रल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) चार कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला ड्रोन उड्डाणाचे, त्याद्वारे लक्ष ठेवण्याचे आणि देखभालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

🔰रल्वेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा व्यापक प्रमाणावर वापर करण्याचे RPF दलाने ठरवले असून आतापर्यंत 31.87 लक्ष रुपये खर्चून दक्षिण पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, मॉडर्न कोचिंग फॅक्टरी, रायबरेली आणि दक्षिण पश्चिम रेल्वे येथे नऊ ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत.

🔰तसेच 97.52 लक्ष रुपये खर्चाने आणखी 17 ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत RPFच्या 19 कर्मचाऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यापैकी चार जणांना ड्रोन उड्डाणाचा परवाना प्राप्त झाला आहे.

🔴ड्रोन प्रणालीचे उपयोग...

🔰रल्वेच्या संकुलात जुगार, कचरा फेकणे, फेरीने विक्री करणे यांसारख्या गुन्हेगारी तत्वांवर लक्ष ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे.

🔰याचा वापर विविध प्रकारच्या माहितीचे संकलन आणि विश्लेषणासाठी होणार आहे. या माहितीचा उपयोग रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित परिचालनासाठी आणि संवेदनशील भागांमध्ये होऊ शकतो.

🔰आपत्ती घडलेल्या ठिकाणी मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी तसेच विविध संस्थांमध्ये समन्वयासाठी देखील ड्रोन तैनात केली जाऊ शकतात.

🔰रल्वेच्या मालमत्तांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी या मालमत्तांचा नकाशा तयार करण्यासाठी देखील ड्रोन उपयुक्त आहेत.

🔰खप जास्त प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करताना जास्त गर्दी होणारी ठिकाणे, गर्दीची वेळ आणि गर्दी पांगवण्यासाठी आवश्यक असलेले उपाय याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती ही प्रणाली उपलब्ध करू शकते आणि त्यानुसार गर्दी नियंत्रणाच्या योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करता येणार.

🔰डरोनच्या एका कॅमेऱ्याने आठ ते दहा कर्मचाऱ्यांची गरज असलेल्या खूप मोठ्या भागावर लक्ष ठेवता येऊ शकते. त्यामुळे मनुष्यबळाची टंचाई असताना अतिशय कमी मनुष्यबळामध्ये कामे करता येतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे आर्थिक शिक्षणाविषयी पंचवार्षिक ‘राष्ट्रीय धोरण’.



🔰आर्थिकदृष्ट्या जागृत आणि सशक्त भारत तयार करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवून, येत्या पाच वर्षांत आर्थिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याविषयीचे ‘राष्ट्रीय धोरण’ भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जाहीर केले आहे.

🔴उद्दिष्टे..

🔰लोकसंख्येच्या विविध स्तरांमध्ये आर्थिक शिक्षणाद्वारे आर्थिक साक्षरता संकल्पनांचा प्रचार करणे.

🔰सक्रिय बचतीच्या वर्तनाला प्रोत्साहन देणे.वृद्धपकाळ आणि निवृत्तीसाठी असणाऱ्या उत्पादनांच्या व्यतिरिक्त संबंधित व योग्य विमा संरक्षणाद्वारे आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील जोखमीचे व्यवस्थापन करणे.

🔴धोरणाविषयी...

🔰धोरण पाच ‘C’ स्तंभांवर तयार करण्यात आले आहेत – सामुग्री (Content) याचा विकास, क्षमता (Capacity) निर्मिती, समुदाय (Community) केंद्रीत पद्धती, योग्य संपर्क (Communication) धोरण, आणि शेवटी भागीदारांमध्ये समन्वय (Collaboration).

🔰धोरणामुळे पतविषयी शिस्तीचा विकास होणार आणि औपचारिक वित्तीय संस्थांकडून आवश्यकतेनुसार कर्ज घेण्याला प्रोत्साहन मिळणार. याशिवाय डिजिटल वित्तीय सेवांच्या वापराच्या सुरक्षित पद्धती सुधारणार.

🔰हक्क, कर्तव्ये आणि तक्रारीच्या निवारणासाठीच्या मार्गांविषयीचे ज्ञान दिले जाणार.आर्थिक शिक्षणामधील प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधन व मूल्यांकन पद्धती सुधारणार.

🔰धोरणात केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी एक सक्षम संनियंत्रण व मूल्यांकन कार्यचौकट अवलंबण्याचाही सल्ला दिला गेला आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी नोकरीसाठी सामायिक परीक्षा.



🔰सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.

🔰सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले, “युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

🔰आज कॅबिनेट मिटिंगमध्ये राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याखेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या सहा विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. विमान प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने हे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय भरतीसाठी राष्ट्रीय संस्था.



🔰कद्र सरकारमधील बिगर राजपत्रित कर्मचारी, रेल्वे आणि सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी ‘राष्ट्रीय भरती संस्था’ स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ही संस्था भरती प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत सामायिक पात्रता परीक्षा घेईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

🔰सध्या वेगवेगळ्या २० भरती संस्था केंद्रीय मंत्रालय आणि विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पार पाडतात. त्यासाठी स्वतंत्रपणे विविध पात्रता परीक्षा घेण्यात येतात. केंद्र सरकारी विभागातील ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील १.२५ लाख रिक्त पदांसाठी दरवर्षी सुमारे ३ कोटी उमेदवार विविध परीक्षा देतात. त्यातून वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होतो.

🔰भरती करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वय नसल्याने एकाच दिवशी अनेक पात्रता परीक्षा होतात. त्यामुळे उमेदवारांना कुठली तरी एकच परीक्षा देण्याची संधी मिळते.  हा गोंधळ कमी करण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची भरती कर्मचारी निवड आयोग, रेल्वेसाठी रेल्वे भरती मंडळ  व बँकेतील भरती बँक कर्मचारी निवड संस्था ‘आयबीपीएस’द्वारे केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात या तीन संस्थांसाठी एकत्रित सामायिक पात्रता परीक्षा घेतली जाईल.

🔰दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामायिक पात्रता परीक्षा देता येईल. ती ऑनलाइन असेल आणि गुण तात्काळ जाहीर होतील.  ही परीक्षा १२ भाषांमध्ये घेतली जाईल. या निर्णयासह जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम हे आणखी तीन विमानतळ विकास व व्यवस्थापनासाठी अदानी ग्रुप या खासगी कंपनीकडे ५० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. लखनऊ,  अहमदाबाद आणि मंगळुरू या विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाकडे सोपवण्यात आली आहे.