Thursday 9 November 2023

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- छत्रपती संभाजीनगर 


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


1) देशाचे नवीन 12 वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत

उत्तर :- हिरालाल समरिया


2)37 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे?

उत्तर :- गोवा


3) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे?

उत्तर :- ’मेरा युवा भारत’


4) जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान?

उत्तर :-111


5) नुकताच ‘आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर:- १३ ऑक्टोबर



1) 'डॉ. पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना' कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे?

✅ कर्नाटक


2) महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे?

✅ वेरूळ


3) श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ निर्मला सीतारामन


4) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात  कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

✅ गुजरात


5) भारताने कोणत्या देशाकडून 'S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स' खरेदी केले आहे?

✅ रशिया


6) दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हां साजरा करण्यात येतो?

✅ 5 नोव्हेंबर


7) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या जमराणी धरण प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

✅ उत्तराखंड*


8) भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणते राज्यात स्थापन करण्यात आला आहे?

✅हिमाचल प्रदेश


9) 'व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अशोक गाडगीळ


Q.1) SBI बँकेचे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 

✅ महेंद्रसिंग धोनी

   

Q.2) 2023 साठीच्या बॅलन डी’ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? 

✅ लिओनेल मेस्सी

  

Q.3) नुकतेच भारतीय नौदलाद्वारे अनावरण करण्यात आलेल्या 25T बोलार्ड पूल डग जहाजाला काय नाव देण्यात आले आहे? 

✅ महाबली

   

Q4) जगातील पहिल्या एआय सेफ्टी समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? 

✅ राजीव चंद्रशेखर

 

Q.5) नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या अखोरा-अगरताळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक लाईनची एकूण लांबी किती आहे? 

✅ 12.24 किमी

  

Q.6) वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर (WPI) स्पर्धेत सर्वोच्च पारदर्शक कोणी पटकावले आहे? 

✅ विहान तल्या विकास

  

Q.7) कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे भारतातील तरुणांना समर्पित ‘मेरा युवा भारत’ व्यासपीठ सुरू केले? 

✅ *31 ऑक्टोबर 2023

   

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्याने वन्यजीव संरक्षणासाठी  होस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्णेल सिस्टीम लॉन्च केली आहे? 

✅ कर्नाटक

   

Q.9) कोणत्या देशाने इसराइल-हमास युद्धादरम्यान गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता? 

✅ जॉर्डन

  

Q.10) जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ दीप नारायण नायक


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० वे पदक कोणत्या खेळात जिंकले?

Ans- महिला कबड्डी


वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे पार पडली?

Ans- ५२


नवी दिल्ली येथे ५२ वी GST परिषद कोणाच्या अध्यक्ष खाली पार पडली?

Ans- निर्मला सीतारामन


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- रौप्य


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पुरुष टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाने कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण


आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कब्बडी संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला?

Ans- इराण


1) ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ दिनानाथ राजपूत


2) क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर  कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले?

✅ एकनाथ शिंदे


3) मायक्रोन भारतातील पहिला अर्ध संवाहक कारखाना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?

✅ गुजरात


4) अगरतळा-अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे?

✅ बांगलादेश


5) राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ गुजरात


6) सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार केंद्र उघडणारी भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

✅ केरळ


7) 2034 चा फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?

✅ सौदी अरेबिया

जिल्हा परिषद


जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:


जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.


रचना :- 

प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.


सभासद संख्या - 

प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.


सभासदांची निवडणूक - 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.


पात्रता (सभासदांची) - 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.


आरक्षण : 

1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.


कार्यकाल : 

5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.


अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

 जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.


कार्यकाल :

अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.


राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे


मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.


बैठक : 

जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.


मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

राज्यघटना -



1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?


१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.


अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.


ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.


क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.


ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड

गटविकास अधिकारी (B.D.O)


पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.


गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बहमनी साम्राज्य 1347- 1538



 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली

◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347).

◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण

◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता.

◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.

◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता

◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली.

◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.

🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही

◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.

◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.

◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.

◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.

◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या

◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.

◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे
माहिती संकलन:- सचिन गुळीग सर

महत्वाचे प्रश्नसंच

 1. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

B. बँक ऑफ इंडीया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया

उत्तर 

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

------------------------------------------------------------------------------------------

2. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

A. नाबार्ड

B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. आय.सी.आय.सी.आय

उत्तर

A. नाबार्ड

------------------------------------------------------------------------------------------

3. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

A. बडोदा

------------------------------------------------------------------------------------------

4. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

C. मुंबई

------------------------------------------------------------------------------------------

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ?

A. नाशिक

B. देवास

C. साल्बोनी

D. नवी दिल्ली

उत्तर 

D. नवी दिल्ली

------------------------------------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?

A. उषा थोरात

B. जे.के.उदेशी

C. चंदा कोचर

D. किरण मुजूमदार शॉ

उत्तर 

B. जे.के.उदेशी

------------------------------------------------------------------------------------------

7. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?

A. पुणे , महाराष्ट्र

B. इचलकरंजी, महाराष्ट्र

C. हुबळी, कर्नाटक

D. झांग , पंजाब

उत्तर 

D. झांग , पंजाब

------------------------------------------------------------------------------------------

8. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 10 डिसेंबर

B. 1 डिसेंबर

C. 31 ऑक्टोबर

D. 1 मे

उत्तर 

A. 10 डिसेंबर

------------------------------------------------------------------------------------------

1

9. 'मी का नाही ?' ह्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. पारू नाईक

B. लक्ष्मीनारायण त्रिपाठी

C. राजन गवस

D. द.भि.कुलकर्णी

उत्तर 

A. पारू नाईक

------------------------------------------------------------------------------------------

10. T-20 हे औषध कोणत्या आजाराशी संदर्भित आहे ?

A. टी.बी.

B. मधुमेह

C. कुष्ठरोग

D. एड्स

उत्तर 

D. एड्स

------------------------------------------------------------------------------------------

11. _____ हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते.

A. गुलाब

B. कमळ

C. मोगरा

D. पांढरी लिली

उत्तर 

B. कमळ

------------------------------------------------------------------------------------------

12. ____ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

A. अमेझॉन

B. नाईल

C. सिंधू

D. ब्रम्हपुत्रा

उत्तर 

B. नाईल

------------------------------------------------------------------------------------------

13. भारतातील सर्वाधिक पाऊसाचे मावसिनराम हे ठिकाण _ ह्या राज्यात आहे.

A. मेघालय

B. सिक्किम

C. मणिपूर

D. अरुणाचल प्रदेश

उत्तर 

A. मेघालय

------------------------------------------------------------------------------------------

14. आगाखान कप _ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी

B. फुटबॉल

C. क्रिकेट

D. लॉन टेनिस

उत्तर 

A. हॉकी

------------------------------------------------------------------------------------------

15. _____ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

A. नाशिक

B. रत्नागिरी

C. औरंगाबाद

D. पोर्ट ब्लेअर

उत्तर 

D. पोर्ट ब्लेअर

------------------------------------------------------------------------------------------

16. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष _ हे होते.

A. मनमोहन सिंग

B. मोरारजी देसाई

C. वीरप्पा मोईली

D. आर.के.लक्ष्मणन

उत्तर

C. वीरप्पा मोईली

------------------------------------------------------------------------------------------

17. खालीलपैकी कोणती पर्वत रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते ?

A. लुशाई

B. गोरो

C. खासी

D. जैतीया

उत्तर 

A. लुशाई

------------------------------------------------------------------------------------------

18. तामिळनाडू राज्यात ____ महिन्यात पाऊस पडतो.

A. जून

B. ऑगस्ट

C. ऑक्टोबर

D. डिसेंबर

उत्तर 

D. डिसेंबर

-----------


लॉर्ड कॉनविलिसाने खालीलपैकी कोनत्य ठकानी 'प्राांतीक न्यायालयची (Circuit Court) स्थपना केली होती?

१) ढाका

 २) कलकत्ता

 ३)मुरशीदाबाद 

४) मद्रास

१) अ व ब 

२) फक्त क 

३) अ, ब, क ✔️

४) वरील सवण उत्तर पयाणय


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय विकास संस्था स्थपणा कधी झाली(IDA)

5 )1945

4) 1954

3)1932

2)1960✔️

1)1962


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था (IAEA) स्थपणा मुख्यालय कुठे  आहे

@ टोकीयो

#   व्हिएन्ना ✔️

$  रोम

% पॅरिस

&  लंडन


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


भारत  संयुक्त राष्ट्र संघटनेचा  सभासद केव्हा झाला

1 )30 ऑक्टोम्बर 1946

2 ) 30 ऑक्टोम्बर 1945✔️

3) 22 ऑगस्ट 1947

4) 15 ऑगस्ट 1947

5) 16 ऑगस्ट 1947


🏏🏏🏏🏏🏏🏏🏏


जागतिक हवामान संघटना कुठे झाली (WMO)

Z) लंडन

Y) वाशिंग्टन

X) नौरोबी

W) जिनिव्हा✔️

V) पॅरिस


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

           

संयुक्त राष्ट्र संघटनेची किती प्रकरणात विभागली असून त्यात किती कलमे आहे

+ 20 प्रकरणे व 450 कलमे

× 19 प्रकरणे व 229 कलमे

÷ 19 प्रकरणे व 119 कलमे✔️

-  20 प्रकरणे व 229 कलमे

=  19 प्रकरणे व 450 कलमे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


कोणाच्या काळात राष्ट्रीय नियोजन कॉन्सिल स्थापन करून नवा प्रयोग केला गेला

1) indira gandhi

2) राजीव गांधी

9) संजय गांधी

8) मोरारजी देसाई

7) लालबहादूर   शास्त्री ✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


नियोजन आयोगाची पहिली बैठक कधी झाली

A ) 15  मार्च 1948

B ) 15 मार्च 1949

C)  15 मार्च 1950✔️

D)  15 मार्च 1951

E)   15 मार्च 1965


📗📗📗📗📗📗📗


रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरु झाली 

99) सांगली✔️

98) सातारा

97) रत्नागिरी

96) रायगड

95 पुणे


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶


अंत्योदय योजना सुरु करणारे पहिले राज्य 

Z) महाराष्ट्र

X) गुजरात

Y) आसाम

C) मणिपूर

V) राज्यस्थान✔️


🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶🌶

JP

खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये .....या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भारताला कांस्य पदक  मिळवून दिले होते

  उत्तर हेलसिंकी फिनलॅंड

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

महत्त्वाची माहिती आहे नक्की वाचा


♻️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम♻️🔰



1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके



🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके


2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके


3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके


🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :


1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा


2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास



3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल


4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव


5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल


महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)


🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):


1.गोदावरी - 69000

2. भीमा - 46184

3. वर्धा - 46182

4. वैनगंगा - 38000

5. तापी - 31200

6. कृष्णा - 28700



🔰लांबीनुसार(किमी) : 

1. गोदावरी - 668

2. पैनगंगा - 495

3. वर्धा - 455

4. भीमा - 451

5. वैनगंगा - 295

6. कृष्णा - 282

7. तापी - 208 


🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :


1. कृष्णा - 769

2. वैनगंगा - 719

3. गोदावरी - 404

4. भीमा - 309

5. तापी - 229


महेंद्रगिरी.


🅾️महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.


🅾️पराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.


🅾️बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.


🅾️महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.


🅾️बरिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.


🅾️या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.


भारतातील प्रमुख नद्या, उपनदया लांबी


नदी:-उगम:-लांबी:-उपनदया:-कोठे मिळते


गंगा:-गंगोत्री:-2510:-यमुना, गोमती, शोण:-बंगालच्या उपसागरास


यमुना:-यमुनोत्री:-1435:-चंबळ, सिंध, केण, बेटवा:-गंगा नदिस अलाहाबाद जवळ


गोमती:-पिलिभीत जवळ:-800:-साई:-गंगा नदिस


घाघ्रा:-गंगोत्रीच्या पूर्वेस:-912:-शारदा, राप्ती:-गंगा नदिस


गंडक:-मध्य हिमालय (नेपाळ):-675:-त्रिशूला:-गंगा नदिस पटण्याजवळ


दामोदर:-तोरी (छोटा नागपूर पठार):-541:-गोमिया, कोनार, बाराकर:-हुगळी नदिस


ब्रम्हपुत्रा:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-मानस, चंपावती, दिबांग:-गंगा नदिस बांग्लादेशामध्ये


सिंधु:-मानस सरोवराजवळ (तिबेट):-2900:-झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास:-अरबीसमुद्रास


झेलम:-वैरीनाग:-725:-पुंछ, किशनगंगा:-सिंधु नदिस


रावी:-कुलू टेकडयामध्ये (हिमाचल प्रदेश):-725:-दीग:-सिंधु नदिस


सतलज:-राकस सरोवर:-1360:-बियास:-सिंधु नदिस


नर्मदा:-अमरकंटक (एम.पी):-1310:-तवा:-अरबी समुद्रास


तापी:-मुलताई टेकडयामध्ये (म.प्रदेश):-702:-पूर्णा, गिरणा, पांझरा:-अरबी समुद्रास


साबरमती:-अरवली पर्वत:-415:-हायमती, माझम, मेखो:-अरबी समुद्रास


चंबळ:-मध्य प्रदेशामध्ये:-1040:-क्षिप्रा, पार्वती:-यमुना नदिस


महानदी:-सिहाव (छत्तीसगड):-858:-सेवनाथ, ओंग, तेल:-बंगालच्या उपसागरास


गोदावरी:-त्र्यंबकेश्वर:-1498:-सिंदफणा, दूधना, पैनगंगा, प्राणहीता, वर्धा, मांजरा, वैनगंगा, इंद्रावती:-प्रदेशात राजमहेद्रीजवळ


कृष्णा:-महाबळेश्वर:-1280:-कोयना, वारणा, भीमा, वेन्ना, पंचगंगा, तुंगभद्रा:-बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात


भीमा:-भीमाशंकर:-867:-इंद्रायणी, मुळा-मुठा, घोड, निरा, सिना, मान:-कृष्णा नदिस


कावेरी:-ब्रम्हगिरी (कर्नाटक):-760:-भवानी, सुवर्णवती, कर्नावती:-बंगालच्या उपसागरास (तामिळनाडु)


तुंगभ्रद्रा:-गंगामूळ (कर्नाटक):-640:-वेदावती, हरिद्रा, वरद:-कृष्णा नदिस


विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य



● विटामिन - 'A'

》रासायनिक नाम : रेटिनाॅल

》कमी से रोग: रतौंधी

》स्त्रोत (Source):  गाजर, दूध, अण्डा, फल


● विटामिन - 'B1'

》रासायनिक नाम: थायमिन

》कमी से रोग: बेरी-बेरी

》स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ


● विटामिन - 'B2'

》रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन

》कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग

》स्त्रोत (Source):  अण्डा, दूध, हरी सब्जियाँ


● विटामिन - 'B3'

》रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल

》कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद

》स्त्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मंूगफली


● विटामिन - 'B5'

》रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)

》कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)

》स्त्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू


●विटामिन - 'B6'

》रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन

》कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग

》स्त्रोत (Source): दूध, मांस, सब्जी


● विटामिन - 'H  / B7'

》रासायनिक नाम: बायोटिन

》कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग

》स्त्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा


● विटामिन - 'B12'

》रासायनिक नाम: सायनोकोबालमिन

》कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग

》स्त्रोत (Source): मांस, कजेली, दूध


● विटामिन - 'C'

》रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड

》कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना

》स्त्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी


● विटामिन - 'D'

》रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल

》कमी से रोग: रिकेट्स

》स्त्रोत (Source):  सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा


● विटामिन - 'E'

》रासायनिक नाम: टेकोफेराॅल

》कमी से रोग: जनन शक्ति का कम  होना

》स्त्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध


● विटामिन - 'K'

》रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन

》कमी से रोग: रक्त का थक्का न बनना

》स्त्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...