संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


📕 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे    

2) पंचप्राण धारण करणे    

3) खूप भयभीत होणे    

4) ऐसपैस बसणे


उत्तर :- 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण    

2) पंचांग      

3) पंचशील    

4) पंचीकृती


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती    

2) मनस्थिति:    

3) मन्हस्थिती    

4) मन:स्थिती


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................आहेत.

1) तालव्य    

2) अनुनासिक    

3) दन्त्य      

4) मूर्धन्य


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी    

2) पररुप संधी    

3) व्यंजन संधी    

4) विसर्ग संधी


उत्तर :- 4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या    

2) कुत्रा      

3) कुत्र्याने    

4) कुत्र्याचा


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार      

2) पाच      

3) सहा      

4) सात


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली    

2) पुढची गल्ली    

3) कापड – दुकान    

4) माझे – पुस्तक


उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद    

2) धातू      

3) कर्म      

4) कर्ता


उत्तर :- 1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.


तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक    

2) कारणदर्शक    

3) रीतिदर्शक    

4) कालदर्शक


उत्तर :- 2


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Headlines Of The Day From The Hindu


• भारत अँग्रीकल्चर इनोव्हेशन मिशनमध्ये सामील झाला. 


•पिलग्रिमने त्याची पहिली ESOP योजना जाहीर केली.


• आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्थ ईस्टच्या पहिल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचे अनावरण केले


• 2022-23 मध्ये आउटबाउंड शिपमेंट USD 300 अब्ज पार करेल.


• वित्तीय वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत एकूण रु. 5.5 ट्रिलियन थेट लाभ हस्तांतरित झाले आहेत.


•शैलेश पाठक यांची FICCI सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


•पेप्सीने रणवीर सिंगला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले


• जपान उत्तर प्रदेशमध्ये ₹7,200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 


•लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंट जर्मेनच्या मार्सेलीवर 3-0 असा विजय मिळवत कारकिर्दीतील 700 वा क्लब गोल केला आहे.


•अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला 2022 चा सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.


•इंडिया टुडे टुरिझम सर्हेने सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन पुरस्कारासाठी जम्मू आणि काश्मीर पर्यटनाची निवड केली आहे.


•राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


• संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती 26 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.


• पाकिस्तान सरकारने IMF बेलआउटसाठी धोरणात्मक व्याजदर 200 bps ने वाढवले.

सयाजीराव खंडेराव गायकवाड


◾️स्मृतिदिन: 6 फेब्रुवारी 1939


◾️जन्म: 11 मार्च 1863 कौळाणे मालेगांव नाशिक


◾️1875 ते 1939 दरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते


◾️1893सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू, 1906 साली संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले राज्य ठरले


◾️औद्योगिक कलाशिक्षणासाठी ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली


◾️सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली


◾️भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते


◾️पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह सुधारणा अंमलात आणल्या घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच जारी केला


◾️लडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही हजर होते. टिळक, अरविंद घोष नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा


◾️"हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा" या शब्दांत त्यांचे वर्णन पं मदनमोहन मालवीय यांनी केले


राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


 👉 सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


📌1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


📌2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


📌3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


📌4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


📌5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


📌6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


📌7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


📌8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


📌9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


📌10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.       


Online Test Series

पोलीस भरती प्रश्नसंच

 ♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे. 

· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.1. नेमणूक

· महालेखापरीक्षकाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात. 

· महालेखापरीक्षकाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते. 

· राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महालेखापालासाठी केली जाते.2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही. 

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.3. वेतन व भत्ते


· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. 

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो. 

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते. 

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.4. अधिकार व कार्ये


1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका🎯सवरूप -


जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -


जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -


स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

राज्यसेवा प्रश्नसंच

Ques. आगराच्या जामा मस्जिदिचे निर्माण कोणी केले आहे? 

A. अकबर ने

B. शाहजांह ने

C. जहाँआरा ने ✅

D. जहांगीर ने


 Ques. कोणत्या शिख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहला आहे? 

A. यापैकी कोणीच नाही

B. गुरू नानक

C. गुरू अंगद देव 

D. गुरु गोविंद सिंह✅ Ques. गुरु नानक चा जीवन परिचय कोणत्या शिख गुरु ने लिहला आहे? 

A. गुरू तेग बहादुर सिंह ने

B. गुरू अंगद देव ने

C. गुरु अर्जुन देव ने ✅

D. गुरू गोविंद सिंह ने


 Ques. औरंगजेब च्या शाशन काळात बंगाल चा नवाब कोण होता? 

A. मुर्शीद कुली खाँ   ✅

B. मंसुर अली खान

C. मीर कासीम

D. अलवर्दी खान


१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.

ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे

क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.

ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.

   1) अ, क 

   2) ब    

   3) ड   

   4) सर्व 


उत्तर :- 4


२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

1) मंत्रीमंडळ    

2) जनता      

3) प्रतिनिधी    

4) सर्वोच्च न्यायालय


उत्तर :- 2


३) योग्य क्रम निवडा.

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

ड) संविधानाचा सन्मान करणे


1) अ, ड, क, ब    

2) ड, अ, क, ब    

3) ड, ब, अ, क    

4) ड, अ, ब, कउत्तर :- 2


४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?


1) देशाचे संरक्षण करणे                

2) नियमित कर भरणे 

3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे

4) एकही नाही


उत्तर :- 2


५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?

अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.

ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.

क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.

ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.

 वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?


1) अ      

2) ब, क     

3) अ, ब, क

 4) सर्व


उत्तर :- 4६) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

1) 45 वी घटना दुरुस्ती      

2) 46 वी घटना दुरुस्ती

3) 42 वी घटना दुरुस्ती      

4) 44 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


७) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?

1) मूलभूत कर्तव्ये    

2) मूलभूत हक्क    

3) मार्गदर्शक तत्त्वे    

4) राष्ट्रपती


उत्तर :- 1


८) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.

1) वल्लभभाई पटेल समिती  

2) कृपलानी समिती  

3) सरकारिया आयोग  

4) स्वर्ण सिंग समिती


उत्तर :- 4


९) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

1) फ्रान्स      

2) यु.एस.ए.    

3) यु.एस.एस.आर    

4) यु.के.


उत्तर :- 3


१०) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.

ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.

क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.

ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.

         वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?


1) अ, क      

2) ब, ड      

3) ब, क, ड    

4) ड


उत्तर :- 4


१) इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड काँझर्वेशन स्ट्रॅटेजीत 

     ब्रंटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते ?

 

   1) आपले उत्तम भवितव्य   

   2) आपले अंधारलेले भवितव्य

   3) आपले सामुदायिक भवितव्य   

   4) आपले असाधारण भवितव्य


उत्तर :- 3


२) आंतरराष्ट्रीय विकास संस्था ............................... करते.

   अ) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा 

   ब) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा

   क) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा    

   ड) निर्यातीकरिता वित्तपुरवठा


  1) अ, क   

  2) अ, ब आणि क     

  3) अ, ड    

  4) ब 


उत्तर :- 1


३) BPO सेवा या ....................... सेवांच्या उपघटक आहेत.


   1) व्यापारी    

    2) संगणक उत्पादन    

   3) माहिती व तंत्रज्ञान संबंधित  

   4) संशोधन व अभियांत्रिकी


उत्तर :- 3


४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यांमधील संबंध दर्शविणा-या प्रमेयाचे नाव काय ?

   1) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक 

   2) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक

   3) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक     

   4) पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहितक


उत्तर :- 4


५) स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय ?

   1) स्त्रियांची सामाजिक – आर्थिक स्थिती सुधारणे.   

   2) स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारणे.

   3) स्त्रियांना रोजगारसंधी पुरविणे. 

   4) स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविणे.


उत्तर :- 1


६) निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

   1) वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रेटेजी   

   2) रियो वसुंधरा परिषद

   3) क्वेटो परिषद   

   4) वरीलपैकी  नाही


उत्तर :- 1


७) 2000 साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे :

   अ) दारिद्रय आणि उपासमारीचे निर्मूलन.    

   ब) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.

   क) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल.  

  ड) पर्यावरण निरंतता


   1) अ फक्त  

  2) अ, ब, ड   

  3) क फक्त  

  4) वरील सर्व


उत्तर :- 2


८) चलन संख्यामान सिध्दांतातील समीकरण :

     MV = PT ........................... म्हणून संबोधले जाते.


   1) रॉबर्टचे समीकरण  

  2) मार्शलचे समीकरण

  3) केनेसियनचे समीकरण    

  4) फिशरचे समीकरण


उत्तर :- 3


९) प्राथमिक सहकारी पतसंस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :

   अ) त्या त्या खेडयातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.

   ब) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरूपात असावे.

   क) या पतसंस्था शेतक-यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात.    

   ड) या पतसंस्था फक्त लहान शेतक-यांना कर्ज देतात.


   1) अ, ड    

  2) ब, क व ड  

  3) अ, ब व क   

  4) वरील सर्व


उत्तर :- 1


१०) भारताच्या बी.पी.ओ. सेवांचे दोन मुख्य ग्राहक ............................. आहेत.

अ) अमेरिका   ब) जपान      क) जर्मनी    ड) पश्चिम युरोप

   1) अ आणि ड  

  2) अ आणि क    

   3) ब आणि ड  

  4) क आणि ड


उत्तर :- 3


१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य

   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क


उत्तर :- 3


२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद 

     आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

   1) अ, ब आणि क   

   2) ब, क आणि ड   

   3) अ, ब, क आणि ड 

   4) अ, ब आणि ड


उत्तर :- 4


१९८३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

   1) तिस-या भागात   

   2) पहिल्या भागात  

   3) चौथ्या भागात   

   4) दुस-या भागात

उत्तर :- 3


१९८४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क    

  2) मार्गदर्शक तत्त्वे  

  3) मूलभूत कर्तव्ये   

  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2


५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

 1) फक्त अ    

2) फक्त ब आणि क   

3) फक्त अ आणि क    

4) वरील सर्व


उत्तर :- ४६) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ  

    2) ब   

   3) दोन्ही    

  4) एकही नाही


उत्तर :- 4


७) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा  

   ब) न्यायालयांचा अवमान

   क) बदनामी     

   ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता


   1) फक्त अ, ब, क  

   2) फक्त अ, क, ड 

   3) फक्त अ, ब, ड 

   4) वरील सर्व


उत्तर :- 4


८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत 

1) 92 व्या   

2) 93 व्या    

3) 94 व्या  

4) 95 व्या


उत्तर :- 2


९) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने  करण्यात आला.

   1) 97   

   2) 96    

  3) 95     

  4) 94

उत्तर :- 1


१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

 ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे मार्गदर्शक तत्त्व आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?


   1) अ आणि ब    

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) वरील सर्व


उत्तर :- 4१) केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर ........................... दर्शवते.


   अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण   

   ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन

   क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष

   1) अ, ब आणि क 

   2) अ आणि ब    

   3) ब आणि क   

   4) फक्त क


उत्तर :- 2


२) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली :

   1) कृषी पुनर्रचीत पतपुरवठा विकास मंडळाचा (ARDC) पतपुरवठयातील सहभाग कार्यक्षम नव्हता.

   2) राष्ट्रीय सहकारी विकास मंडळास (NRDC) निर्धारित उद्देश साध्य करता आले नाहीत.

   3) कृषी पतपुरवठा विभाग(ACD)   वाढीवर मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थ होता.

   4) वरीलपैकी नाही.    

उत्तर :- 1


३) देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्याही समितीला करावे लागते ?


   अ) लोकलेखा समिती     

   ब) अंदाज समिती    

   क) सार्वजनिक उद्योग समिती    

   ड) वरील सर्व

   वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे ?

   1) फक्त अ   

  2) अ आणि ब फक्त  

  3) ब आणि क फक्त   

  4) ड फक्त


उत्तर :- 4


४) मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते  ?

   1) जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर – स्थूलशिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन

   2) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणातील खर्च

   3)दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या, दारिद्रय रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था.

   4) सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न

उत्तर :- 1


५) उच्च शक्ती पैसा म्हणजे काय ?

   अ) मध्यवर्ती बँकेकडील बँकाचा राखीव निधी    

   ब) बँकांची सर्व कर्जे आणि उचल

   क) बँकांनी धारण केलेला पैसा        

   ड) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकाकडील अतिरीक्त राखीव निधी. 


   1) अ आणि ब  

  2) ब फक्त   

  3) क आणि ड    

  4) ड फक्त


उत्तर :- 4


६) सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

   1) उद्योगांना वित्तीय मदत पुरविणे.     

   2) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तीकरण करणे.

   3) शेतीला पतपुरवठा करणे.   

   4) ग्राहकांचे हितसंबंध जोपासणे.


उत्तर :- 2


७) खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?

   1) दक्षिण पूर्व आशियातील लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे.

   2) प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे.

   3) दक्षिण आशियातील देशांच्या एकत्रित स्वावलंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे.

   4) एकमेकांचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे.


उत्तर :- 1


२०८८) जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

   1) प्रसुतीकाळातील मृत्यू आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखणे.    

   2) जन्मदर कमी करणे.

   3) मातांची काळजी घेणे.         

   4) नवजात बालकांचे मृत्यूदर रोखणे.


उत्तर :- 1


९) 1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते ?

   1) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी बीज भांडवलाचा पुरवठा करणे.

   2) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरविणे.

   3) ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे.

   4) सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत करणे.


उत्तर :- 3


१०) 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्ष्ररतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा.

   अ) नागपूर  

   ब) मुंबई शहर    

  क) मुंबई उपनगर   

  ड) अकोला


  1) अ, ब, ड, क    

 2) क, अ, ब, ड   

 3) ब, क, ड, अ   

 4) ब, क, अ, ड


उत्तर :- 2


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


मुद्रा बँक योजना1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.


2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.


3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.


4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.


5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.


6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.


7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.


8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :


शिशु गट

10,000 ते रु. 50,000

किशोर गट


50,000ते 5 लक्ष

तरुण गट


5 लक्ष ते 10 लक्ष


9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.

10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

______________________________________

दयक बँका (Payment Banks)

२० ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने विविध ११ उद्योग, कंपन्यांना देयक बँका स्थापन करून बँकिंग व्यवहार करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देयक बँकांसंबंधी काही महत्वाची माहिती............


 --    डॉ. नचिकेत मोर समिती 


२३ सप्टेंबर २०१३ रोजी रिझर्व्ह बँकेकडून आरबीआयचे संचालक डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाउसहोल्ड्स या समितीची स्थापना करण्यात आली होती.

७ जानेवारी २०१४ रोजी या समितीने देयक बँक (पेमेंट बँक) स्थापन करण्याची शिफारस केली होती.

याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये सादर करण्यात आली होती. त्यानुसार देयक बँक (पेमेंट बँक) म्हणून मर्यादित बँकिंग व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे एकूण ४१ अर्ज आले होते. 

त्यानुसार डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या अर्जांची छाननी करून बैठकीत पात्र अर्जदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.


--    देयक बँक अथवा पेमेंट बँक म्हणजे काय? 


सध्या विविध व्यवहार ऑनलाईन होत आहेत अथवा कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढीस लागत आहेत. अशावेळी अधिकाधिक कॅश लेस व्यवहारांच्या माध्यमातून व्यवस्थेत पैसा यावा या हेतूने पेमेंट बँकेची संकल्पना मांडण्यात आली.

यानुसार, ऑनलाईन अथवा कार्डावरून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी जी तांत्रिक उभारणी अथवा व्यवस्था लागते त्याची उभारणी खाजगी कंपन्यांतर्फे केली जाते.

ग्राहकाला स्वत:च्या नियमित बँकेतील पैसे या पेमेंट बँकेच्या खात्यात भरून त्याद्वारे ऑनलाईन अथवा कार्डावरून व्यवहार करता येतात.

या व्यवहारांकडे ‘प्रीपेड’ व्यवहाराचे एक माध्यम म्हणून देखील बघता येईल. या बँका कोणलाही कर्जाऊ रक्कम देऊ शकत नाहीत.


 --   देयक बँकेसाठी निकष 


 

किमान भांडवल १०० कोटी रुपये.

पहिली पाच वर्षे प्रवर्तकाचा हिस्सा किमान ४० टक्के पाहिजे. 

खासगी बँकांसाठी एफडीआयच्या असलेल्या नियमांनुसारच पेमेंट बँकांमध्ये एफडीआयला परवानगी. 

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट,१९४९ नुसार भागधारकांना मिळणार मतदानाचा हक्क. 

प्रथमपासूनच बँकेचे शाखा-जाळे असणे बंधनकारक. 

एकूण शाखांपैकी २५ टक्के बँकिंग सेवा न पोहोचलेल्या ग्रामीण भागात हव्यात.


--   ‘देयक बँकां’साठी कार्यमर्यादा 


देयक बँकांना कर्ज व्यवहार करता येणार नाहीत.

अशा बँकांना एटीएम/डेबिट कार्ड त्यांच्या ग्राहकांना देता येईल, पण क्रेडिट कार्ड देता येणार नाही

पेमेंट बँका प्रति खातेदार एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी स्वीकारू शकणार नाहीत.

इंटरनेट बँकिंगसारख्या तंत्रज्ञानाधारीत विविध सेवा त्या देऊ शकतात.

म्युच्युअल फंड, विमा उत्पादने आदी वित्तीय योजना या बँका विकू शकतात.

अनिवासी भारतीयांना या बँकांमध्ये खाते उघडता येणार नाही.

बचत खात्यावरील व्याजदराप्रमाणे व्याज देणार.

मोबाइल फोनच्या साह्याने पैसे हस्तांतरण शक्य. 

बिल भरणा, विनारोकड खरेदी व फोनच्या साह्याने चेकविना व्यवहार शक्य. 

बँक खात्यात पैसा जमा करताना त्यासाठी शुल्क आकारणार नाहीत. 

प्रवाशांना बँकांपेक्षा कमी दरात फॉरेक्स सेवा/कार्ड देणार.


रिझर्व्ह बँकेने देयक बँका स्थापण्यास परवानगी दिलेल्या ११ उद्योग व कंपन्या

आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लि.

चोलामंडलम डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस भारतीय टपाल विभाग

फिनो पेटेक लिमिटेड नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड टेक महिंद्र लि.

व्होडाफोन एम-पैसा लिमिटेड विजय शेखर शर्मा

दिलीप शांतीलाल संघवी

रिझर्व्ह बँकेने दिलेली प्राथमिक मंजुरी ही पात्र अर्जदारांसाठी येत्या १८ महिन्यांसाठी असेल. या कालावधीत या कंपन्यांना मध्यवर्ती बँकेने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल. त्यानंतरच त्यांना प्रत्यक्षात बँक व्यवसाय करण्याची अंतिम मंजुरी मिळेल.


 --   महत्वाचे 


एप्रिल २०१४ मध्ये परिपूर्ण बँकिंग व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आयडीएफसी व बंधन या दोन वित्तसंस्थांनाच परवानगी दिली आहे.

यापैकी बंधन बँकेचे कार्यान्वयन २३ ऑगस्टपासून, तर आयडीएफसी बँकेचे १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 

भारतात आजमितीस २७ सार्वजनिक, २० खासगी, ४४ विदेशी, तर ५६ विभागीय ग्रामीण बँका कार्यरत आहेत.  

नरसिंघम समिती.🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या 1991 च्या आर्थिक संकटानंतर जून 1991 मध्ये समितीची स्थापना केली.

🅾️भारतीय अर्थव्यवस्थेच्या १९९१ च्या आर्थिक संकटाच्या नंतर, जून  1991  मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय क्षेत्रीय सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

🅾️नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्हबँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्याचा सल्लाही नरसिंहम समितीला देण्यात आला.

💠💠1998  मध्ये स्थापन झालेल्या नरसिंहम समितीच्या मुख्य.💠💠

🧩शिफारसी खालीलप्रमाणेः

1. मजबूत व्यावसायिक बँकांचे मजबूत विलीनीकरण जास्तीत जास्त आर्थिक आणि व्यावसायिक वातावरण निर्माण करेल आणि उद्योगांच्या विकासास कारणीभूत ठरेल.

२. मजबूत व्यावसायिक बँक कमकुवत व्यावसायिक बँकांमध्ये विलीन होऊ नयेत.

🅾️The. देशातील मोठ्या बँकांना आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यात यावे.

🅾️2000. धोकादायक मालमत्तेचे भांडवलाचे गुणोत्तर २००० पर्यंत percent टक्के आणि २००२ पर्यंत दहा टक्क्यांपर्यंत खाली आणले पाहिजे.

🅾️Government. सरकारी सिक्युरिटीजद्वारे कव्हर केलेल्या अपुष्ट कर्जांना नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता समजले पाहिजे

🅾️2,. २,००,००० लाख रुपयांपेक्षा कमी कर्जावरील व्याज नियंत्रित करण्यासाठी बँकांना सक्षम केले पाहिजे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.


🧩सवरूप -

🅾️जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🧩कार्ये -

🅾️जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🧩भांडवल उभारणी -

🅾️सवस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🧩विस्तार -

🅾️भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.


Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...