Wednesday 6 May 2020

करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश.

🔰सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले  आहे.हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे.

🔰औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.तसेच उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे.

🔰तर अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर औषधाचे पेटंट  आहे. पेटंट कायद्यानुसार व्यावसायिक वापरासाठी नव्हे, फक्त संशोधनासाठी या औषधाची निर्मिती करता येईल.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

🔰 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया…

🔰 डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा १

🔰अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनामध्ये वाढ करणे आणि जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकांचे प्रमाण वाढविणे, यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या आहारासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली.

🔰 यात अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेतून सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळेचा चौरस आहार देण्यात येत आहे. गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत तर स्तनदा मातांना प्रसूतीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या योजनेचा लाभ देण्यात आहे. त्यामुळेउष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

🔰 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-२०१५-१६) नागरी व ग्रामीण अशी वर्गवारी लक्षात घेता ग्रामीण भागातील स्त्रियांमधील ॲनोमियाचे प्रमाण ४९.९ टक्के तर निकषापेक्षा बीएमआय कमी असलेल्यांचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे.

🔰आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण अधिक असल्याने गरोदर स्त्रियांना शेवटचे तीन महिने एक वेळा सकस आहार देण्याऐवजी गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून आहार दिल्यास ॲनेमियाचे प्रमाण कमी होऊन बीएमआय वाढविणे शक्य होईल. या उद्देशाने डॅा. भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे.

🔰 गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळा चौरस आहार देण्याचा कालावधी वाढवून स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाळांतपणापर्यंत तसेच स्तनदा मातांना पहिले सहा महिने एकवेळा आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गरोदर असल्याचे निश्चित झालेल्या स्त्रियांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करतात.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम

🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी “नदी व्यवस्थापनाचे भविष्य” विषयक ‘आयडियाथॉन’ आयोजित केले. आयडियाथॉनमुळे नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.

🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सुमारे 500 जण सहभागी झाले होते. विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तज्ञ यात सहभागी झाले होते.

🔰कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदीमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झालेली दिसून आली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. मात्र ही परिस्थिती किती काळ टिकून राहणार याविषयी चिंता व्यक्त केली गेली. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने, आयडीयाथॉनमध्ये नद्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून अन्य समस्यांचे निराकरण कसे केले जाऊ शकते याची चाचपणी करण्यात आली.

🔰नदी व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी तसेच नदीशी शहरांची आंतरजोडणी अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

☘भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी----शिरपूर , महाराष्ट्रा.

☘भारतातील पाहिले इ टेम्पल ---शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)

☘भारतातील पाहिले खाजगी विमानतळ---कोची(केरळ)

☘भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा--कोट्टायम(केरळ)

☘भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय----गाझियाबाद(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले बायोटेक शहर--लखनौ(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले इ कोर्ट---- --- बिहार.

☘भारतातील पाहिले इ पोस्ट------- पाटणा(बिहार)

☘भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प--काकीनडा (आंध्र प्रदेश)

☘भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग---पोसिंत्रा (गुजरात)

☘भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र---कोलकाता (प. बंगाल)

☘भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.

☘भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

हिंदू व्यक्तीला पहिल्यांदाच पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट बनण्याचा मान.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी घटना घडली आहे. पाकिस्तानी एअर फोर्समध्ये एका हिंदु व्यक्तीला पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे.

✍राहुल देव असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपकार भागात राहणारा आहे. सिंध प्रांतातला हा भाग हिंदु वस्तीसाठी ओळखला जातो.

✍पाकिस्तानी एअर फोर्समध्ये काम करणारा राहुल देव हा पहिला हिंदु पायलट म्हणून ओळखला जाणार आहे. मात्र एअर फोर्समध्ये पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळालेला राहुल हा पहिलाच हिंदू व्यक्ती ठरणार आहे.

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚦पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा आज सुरू होत असलेल्या ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

🚦करोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि चेस डॉट कॉमने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

🚦जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत.

🚦तर चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली.

🚦तसेच पाचवे मानांकन लाभलेल्या भारतीय संघात  आनंदसह विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान, कोनेरू हम्पी आणि डी. हरिकाचा  समावेश आहे.

🚦माजी विश्वविजेता ब्लादिमिर क्रामनिक भारतीय संघाचा सल्लागार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या चीनच्या संघात डिग लीरेन, वांग हाओ, वेई यी आणि चारवेळेचा विश्व विजेता हाऊ यिफान याचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रात तिरुमूर्ती करणार भारताचं प्रतिनिधीत्व

• अनुभवी राजदूत म्हणून नावलौकीक मिळवलेले टी एस तिरुमूर्ती यांची निवड संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून करण्यात आलीय.

• टी एस तिरुमूर्ती हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेच्या (Indian Foreign Service) १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

• तिरुमूर्ती न्यूयॉर्कमध्ये सय्यद अकबरुद्दीन यांची जागा घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून काम हाताळलेले अकबरुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रात देशाचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.

• अनेक जागतिक मंचावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भारताची भूमिका चोखपणे मांडली. अकबरुद्दीन हे लवकरच निवृत्त होत आहेत.

• 'परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात आर्थिक प्रकरणांचे सचिव म्हणून कार्यरत असणारे तिरुमूर्ती यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून नियुक्त करण्यात आलंय' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

• तसंच सरकारकडून नम्रता एस कुमार यांची स्लोवेनियामध्ये देशाच्या पुढच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयदीप मजूमदार यांच्यावर ऑस्ट्रियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीय.

• संयुक्त सचिव दीपक मित्तल यांना कतारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर पीयूष श्रीवास्तव यांची बहरीनमध्ये भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलीय.

इराणने बदलले चलन

📌इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

📌बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे.

📌अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं. हीच घसरण थांबवण्यासाठी इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

📌इराणने  राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८ पासून सुरु होती.

दारुवर ७०% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय

🔶लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

🔶सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

🔶दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के करोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पेशल करोना फी’अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार ‘एमआरपी’वर 70% स्पेशल करोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल.

🔶दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी यापूर्वी दिला आहे. याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने संसद भावनाच्या शेजारी नवीन संसद भवनाची उभारणी करण्यास मंजूरी दिली आहे.

✴️हा प्रकल्प राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट पर्यंत 3 किलोमीटर लांबीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम प्रकल्पाला येणारा खर्च 922 कोटी रुपये एवढा आहे.

♒️भारतीय संसदेच्या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये:-

✴️इमारत 10.5 एकर भूखंडावर 65,000 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार. इमारतीची उंची 42 मीटर असणार.नव्या इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे. या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.

✴️इमारतीमध्ये 900 ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असणार. इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

✴️संसदेची नवी इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असणार. संसद भवनाच्या खिडक्या या भारतातली विविधता दर्शवतील.इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असणार. नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असणार.

✴️संसदेचे 75 वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचीही योजना आहे. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीच्या महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा येथे असणार.

✴️सध्याचे संसद भवन ही भारतीय संसदेची इमारत आहे. 1912-13 यावर्षी ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळाकार इमारतीची रचना केली. इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्छीस 257 ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपती भवन जवळ आहे.

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्यपालनियुक्त सदस्य

👉राज्यपाल नियुक्त सदस्याने मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये, असे संकेत असतात. तसा नियम नाही वा घटनेत तरतूदही नाही.

👉मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनदा करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती मान्य केली नाही.

👉राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त असल्या तरी त्यांची मुदत ५ जूनला संपुष्टात येईल.

👉लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेण्याची आवश्यकता नाही.

👉याआधी दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आले असता राज्यपालांनी ते मान्य केले नव्हते. याच मुद्यावर ठाकरे यांच्या नियुक्तीस राज्यपालांनी बहुधा मान्यता दिलेली नसावी.

👉देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

👉१९५२ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते राजगोपाळचारी ऊर्फ  राजाजी यांनी पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती, पण त्यांची राज्यपालांनी नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली होती.

👉१९६१मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभान गुप्ता यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

👉इतर मागासवर्गाला आरक्षणाचे लाभ मिळाले त्या मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १९६८मध्ये बिहार विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रिपदी अल्प काळासाठी निवड झाली होती.

👉१९७१ मध्ये टी. एन. सिंग यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. सिंग यांच्या निवडीस आव्हान देण्यात आले होते, पण न्यायालयाने सिंग यांना दिलासा दिला होता.

👉महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दत्ता मेघे, फौजिया खान या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य असताना मंत्रिपद भूषविले होते.

✅मुख्यमंत्रिपद भूषवलेले राज्यपाल नियुक्त सदस्य.

1.राजगोपाळचारी –  मद्रास राज्य – १९५२
2.चंद्रभान गुप्ता – – उत्तर प्रदेश – १९६१
3.बी. पी. मंडल –  – बिहार – १९६८
4.टी. एन. सिंग – उत्तर प्रदेश – १९७१

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

लॉकडाउनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

लॉकडाउनंतर गावातील लोकांचं शहराकडे येणं बंद झालं आहे आणि गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याची नोंद सीपीआर या संस्थेनं केली आहे.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात शहरातील लोकसंख्येत जवळपास ११ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे. तर गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. लॉकडाउनमुळे लोकांचं गावाकडून शहरात होणार अप-डाउन बंद झालं आहे, असंही या अहवालात समोर आलं आहे.

'लॉकडाउनमुळे लाखोंच्या संख्येनं गावाकडील लोक शहरात येणं आता बंद झालं आहे. यामुळे शहरानजिकच्या गावांमध्ये लोकसंख्येत वाढ झाली आहे. यात राजस्थानचा पश्चिम भाग, ओडिशा येथे सर्वाधिक स्थलांतरणाचं प्रमाण आढळून आलं आहे. प्रवासी मजुरांनी केलेलं पलायन हे यामागचं कारण असू शकतं', असं सीपीआर संस्थेचे वरीष्ठ अधिकारी पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितलं.

लक्षवेधी बाब अशी की जास्त लोकसंख्या असलेल्या आणि गरीब राज्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येत जास्त वाढ झालेली नाही. या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये जात असतात. लॉकडाउमुळे रेल्वेसेवा बंद आहे. त्यासोबतच राज्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखोंच्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याने येत्या काळात या आकडेवारी लक्षणीय बदल दिसू शकतो.

भारतीय चलन अवमूल्यन

📌 पहिले अवमूल्यन

◾️ 26 सप्टेंबर 1949
◾️अवमूल्यन प्रमाण 30.5 टक्के 
◾️वित्तमंत्री जॉन मथाई

📌 दुसरे अवमूल्यन

◾️ 6 जून 1966
◾️अवमूल्यन प्रमाण 36.5 टक्के
◾️ वित्तमंत्री सचिन चौधरी

📌 तिसरे अवमूल्यन

◾️ जुलै 1966
◾️अवमूल्यनाचे प्रमाण 20%
◾️ वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग

📌 तिसरे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये झाले
💰 1 जुलै 1991 ला 9.5% अवमूल्यन
💰 3 जुलै 1991ला 10 ते 10.78%
अवमूल्यन
💰 15 जुलै 1991 ला 2%

राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ उपकरण विकसित केले

- हैदराबादच्या राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB) येथील संशोधकांनी एक उपकरण विकसित केले, ज्याला त्यांनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) हे नाव दिले आहे.

▪️ठळक बाबी

- हे एक बायोसेन्सर (जैवसंवेदक) आहे, ज्यामुळे पशूच्या लाळेची तपासणी कोविड-19 रोगासाठी केली जाऊ शकते.

- हे उपकरण केवळ 20 मायक्रोलिटर एवढ्या प्रमाणात नमुन्याचा वापर 30 सेकंदात आपला अहवाल देते. हे उपकरण ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने संगणक किंवा दूरध्वनी संचाशी देखील जोडले जाऊ शकते आणि ज्यामुळे प्राप्त माहितीचा अभ्यास केला जाऊ शकतो.

- हे उपकरण साधारण सेल बॅटरीवर चालवले जाऊ शकतो कारण त्यात 1.3V-3V व्होल्टेजचा वापर केला जातो.

DRDOच्या प्रयोगशाळेनी अतिनील निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला

- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) याच्या दिल्लीतल्या लेजर सायंस अँड टेक्नॉलॉजी सेंटर (LASTEC) या प्रयोगशाळेनी अतिबाधित क्षेत्रांमध्ये वेगाने आणि रसायन-रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (UV) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. या उपकरणाला ‘UV ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.

- संस्थेनी न्यू एज इंस्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स प्रायवेट लिमिटेड (गुरुग्राम) या कंपनीच्या सहकार्याने उपकरणाचे आरेखन केले आहे आणि विकसित केले.

▪️उपकरणाची ठळक वैशिष्ट्ये  

- हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते. 

- या उपकरणात चौफेर किरणोत्सर्ग होण्यासाठी ‘254 nm’ लहरींवर सहा दिवे बसवले आहेत. प्रत्येक दिव्याची ऊर्जा क्षमता 43 UV-C वॅट एवढी आहे.

- खोलीत विविध ठिकाणी हे उपकरण बसवता येते. त्यानुसार अंदाजे 12x12 फुट आकाराची एक खोली 10 मिनिट आणि 400 वर्ग फुटाची खोली 30 मिनिटांमध्ये निर्जंतुक केली जाऊ शकते.

- प्रयोगशाळा, कार्यालय, विमानतळ, मॉल, उपहारगृह, कारखाने अशा महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

- अतिनील किरणांवर आधारित निर्जंतुकीकरणासाठी वायफायचा वापर करुन मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही दूर ठिकाणी ही प्रक्रीया करता येऊ शकते.
------------------------------------------------

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...