Friday 24 February 2023

MPSC : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध; 673 पदांकरीता भरती

✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 

राज्यसेवा गट अ गट ब  = 295 जागा

महाराष्ट्र शासन स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ गट ब = 130 जागा

महाराष्ट्र वैधमान शास्त्र गट ब = 15 जागा

विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब निरीक्षक = 39 जागा

अन्न व औषध प्रशासन सेवा गट ब = 194

👉Total_673 जागा


 ✅राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येईल..




स्वतःच्या प्रवर्गाला जागा नाहीत म्हणून open मधून फॉर्म भरण्याची चूक करू नका, याआधी ज्यांनी अशा चुका केल्यात त्यांना नंतर पश्चाताप झाला.


👉कारण नंतर स्वतःच्या प्रवर्गाला खूप जागा वाढल्या.


म्हणून प्रत्येक मागासवर्गातील उमेदवाराने स्वतःचा प्रवर्ग कायम ठेवून अर्ज करा. 


👉Caste ला जागा नसली तरीही open च्या जागा मिळण्यास तुम्ही पात्र असता...

आलेल्या जाहिरातीत जागा वाढ होवू शकते..

एका वर्षात एकच परीक्षा होणार असल्यामुळे Mains पर्यंत काही ना काही जागा ह्या वाढणारच...


राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२३ ऑनलाईन पद्धतीने होईल आणि इतर सर्व मुख्य परीक्षा वर्णनात्मक/पारंपरिक पद्धतीने नवीन अभ्यासक्रमानुसार होतील.


कृषि सेवा, वन सेवा , यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा आणि विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील पदे जाहिरातीत आलेली नाहीत.


जागा ६७३ नाही. तर, राज्य सेवा २९५ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी १३० जागा, विद्युत अभियांत्रिकी १५ जागा, Assistant Commissioner and Food Safety Officer १९४  जागा आणि Inspector of Legal Metrology ३९ जागा अश्या पूर्णतः वेग वेगळ्या जागा आहेत 

 यातील ज्याला पात्र तेवढ्या जागा तुमच्यासाठी😃 आणि त्याचा जास्तीचा अभ्यासक्रम.

अर्ज प्रक्रिया 
Start Date : ०२ मार्च २०२३.
End Date : २२ मार्च २०२३.



🔰गेल्या काही वर्षांतील राज्यसेवा जागा

🔺2010 - 100
🔺2011 - 245
🔺2012 - 339
🔺2013 - 265
🔺2014 - 104
🔺2015 - 434
🔺2016 - 135
🔺2017 - 377
🔺2018 - 169
🔺2019 - 413
🔺2020 - 200
🔺2021 - 405
🔺2022 - 623 
🔺2023 - 295

पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘कोळंबी मेळा’ आयोजित केला.



▪️पंजाब सरकारने पहिला राज्यस्तरीय ‘प्रॉन फेअर’ (कोळंबी मेळा) आयोजित केला आहे. 


▪️हा “कोळंबी मेळा” किंवा कोळंबी मेळा हा राज्य सरकारचा कोळंबी शेतीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. 


▪️कोळंबी शेती ही मानवी वापरासाठी कोळंबी तयार करण्यासाठी सागरी किंवा गोड्या पाण्यात एक जलचर-आधारित क्रियाकलाप आहे. 


▪️2022-23 पर्यंत, नैऋत्य पंजाबमध्ये कोळंबी शेतीसाठी एकूण 1,212 एकर जमीन घेण्यात आली असून एकूण 2,413 टन कोळंबीचे उत्पादन झाले आहे.


❣️

चालू घडामोडी वनलायनर 24 February 2023


1. गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई यांनी नुकताच विधानसभेत 3.01 लाख कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण 23% जास्त आहे.



2. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, इंडोनेशियामध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र 99 किमी खोलीवर होते. हा भूकंप शक्तिशाली होता आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


3. जगभरात कांद्याची टंचाई वाढत आहे. मोरोक्कोपासून ते फिलीपिन्सपर्यंत सरकार त्यांच्या कांद्याच्या पुरवठ्याचे संरक्षण करत आहेत. मोरोक्को, तुर्कस्तान आणि कझाकिस्तानने कांद्याची वाढती मागणी आणि त्यांच्या मायदेशात वाढलेल्या किमतीमुळे त्यांची निर्यात थांबवली आहे.


4. हायड्रॉलिक बिघाडामुळे विमान केरळची राजधानी तिरुवनंतपुरमकडे वळवण्यात आले. टेकऑफ दरम्यान एअर इंडिया एक्स्प्रेसची शेपटी धावपट्टीवर आदळली. विमानात 182 प्रवासी होते आणि ते कालिकतहून दमामला जात होते.


5. Roscosmos ने अलीकडेच अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी रिकामे SOYUZ अंतराळयान प्रक्षेपित केले. Soyuz MS-22 कॅप्सूलमधून कूलंटची गळती सुरू झाल्याने तीन अंतराळवीर अंतराळात अडकले होते.


6. सुंदा सामुद्रधुनी पार केल्यानंतर, भारतीय पाणबुडी INS सिंधुकेसरी इंडोनेशियामध्ये दाखल झाली. इंडोनेशियामध्ये भारतीय पाणबुडी डॉकिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


7. चीनने अलीकडेच 333 दशलक्ष USD खर्चून Zhongxing-26 उपग्रह प्रक्षेपित केला. लाँग मार्च ३बी रॉकेटवर हे प्रक्षेपित करण्यात आले. विमान वाहतूक आणि जहाजाशी संबंधित कामकाजासाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा उपग्रहाचा मुख्य उद्देश आहे.


8. ॲग्रीकल्चर इनोव्हेशन मिशन फॉर क्लायमेट हा अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे. याची सुरुवात यूएई आणि यूएसए यांनी केली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भूक आणि हवामानातील बदलांना संबोधित करणे हा आहे.


9. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांनी नुकतेच मतदान केले. ठरावानुसार रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी सदस्यांची इच्छा होती.


10. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी हवामानाशी संबंधित वादांमुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला. #Prize


CAG GC मुर्मू यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून निवड.



🔹फिलीपिन्सची सर्वोच्च ऑडिट संस्था, ILO चे सध्याचे बाह्य लेखापरीक्षक, CAG द्वारे बदलले जातील.


🔸आयएलओने बाह्य लेखापरीक्षकाच्या नामनिर्देशनासाठी एक पॅनेल स्थापन केले आहे आणि सुपीरियर ऑडिट संस्थांकडून (एसएआय) प्रस्तावांची विनंती केली आहे असे सांगून कॅगने तपशील प्रदान केला.


🔹ILO ने तीन सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (भारत, कॅनडा आणि युनायटेड किंगडम) त्यांच्या तांत्रिक कौशल्य आणि इतर घटकांवर आधारित तांत्रिक सादरीकरणासाठी निवडल्या.

अमेरिकेने मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांना जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित




🔹अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 24 फेब्रुवारी 2023 रोजी व्यवसाय कार्यकारी अजय बंगा यांना जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून नामांकित केले.


🔸अजय बंगा यांची सध्या खाजगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


🔹मास्टरकार्ड आणि अमेरिकन रेड क्रॉस, क्राफ्ट फूड्स आणि डाऊ इंकच्या बोर्डवर वेगवेगळ्या भूमिका हाताळण्याचा त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त व्यवसायाचा अनुभव आहे.


जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.

  



◆ सिएटल सिटी कौन्सिलने वंश, धर्म आणि लिंग ओळख यांसारख्या गटांसह शहराच्या म्युनिसिपल कोडमधील संरक्षित वर्गांच्या यादीत जात जोडणारा अध्यादेश काढला. 


◆ जाती-आधारित भेदभावावर स्पष्ट बंदी घालणारे सिएटल हे पहिले यूएस शहर बनून इतिहास रचला.

परश्नसंच.


🅾️रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद


 🅾️आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती


🅾️परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग 


🅾️सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले


🅾️दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर


🅾️इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे


🅾️मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग


 🅾️निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे


🅾️महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक


🅾️आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई


🅾️हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी


🅾️भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले


 🅾️गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे


🅾️सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे 


🅾️एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे


🅾️परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग


 🅾️दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🅾️सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी


 🅾️शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)


🅾️ गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती
01.) आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
02.) आधुनिक भारताचे शिल्पकार- पंडित जवाहरलाल नेहरू.
03.) भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
04.) भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
05.) भारतीय असंतोषाचे जनक- लोकमान्य
06.) भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
07.) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
08.) भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
09.) भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10.) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11.) आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12.) स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक- लॉर्ड रिपन.
13.) भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14.) भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15.) भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16.) भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17.) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक- सॅम पित्रोदा.

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...