03 June 2025

हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन

  हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन



1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

--------------------------------------------


मोहनदास करमचंद गांधी


 

 (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)

हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

 रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.
 सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

❇️महात्मा गांधी : विकिपीडिया ❇️

जन्म:
ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू:
जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, 

भारतचळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:

अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार:

टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo

प्रमुख स्मारके:राजघाट

धर्म:हिंदू

प्रभाव:लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी:कस्तुरबा गांधी

अपत्ये:हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास

तलाठी विशेष

१) सर्वनामाचा प्रकार ओळखा : पुस्तके कोणी नेली ?

अ) पुरुषवाचक सर्वनाम

ब) दर्शक सर्वनाम

क) सामान्य सर्वनाम 

ड) प्रश्नार्थक सर्वनाम

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

२) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

अ) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो 

ब) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो 

क) सावित्रीबाईचे सर्व काम आटोपले होते 

ड) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

३) कोण, काय, कधी, कोणाला ? ही सर्वनामे सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

अ) दर्शक सर्वनामे

ब) संबंधी सर्वनामे

क) प्रश्नार्थक सर्वनामे

ड) आत्मवाचक सर्वनामे

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

४) दर्शक सर्वनामे कोणती ?

अ) कोण, कोणी, कोणाला, काय, किती

ब) मी, आम्ही, आपण, स्वतः

क) हा - जो, ही - ती, हे - ते

ड) शाब्बास, वाहवा, अरेरे, अरे बापरे 

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

५) मोपला उठाव कुठे घडून आला ?

अ) तेलंगाना

ब) मलबार

क) मराठवाडा

ड) बंगाल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

६) अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?

अ) मृदुला साराभाई

ब) ना. म. जोशी

क) व्ही. व्ही. गिरी 

ड) मो. क. गांधी

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

७) खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?

अ) वि. दा. सावरकर

ब) रासबिहारी बोस

क) लोकमान्य टिळक

ड) सुभाषचंद्र बोस

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

८) चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?

अ) गोवळकोंड्याचा किल्ला

ब) ग्वाल्हेरचा किल्ला

क) शिवनेरी किल्ला

ड) अहमदनगरचा किल्ला

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

९) अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात

ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत

क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात

ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१०) पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?

अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत

ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते 

क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

११) पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?

अ) चंद्रग्रहण

ब) क्षितीज

क) सूर्यग्रहण

ड) यापैकी नाही

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

१२) जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?

अ) गुरुत्वबलात बदल

ब) त्रिज्येत बदल

क) वजनात बदल

ड) वस्तुमानात बदल

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१३) सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?

अ) राष्ट्रपती

ब) सभापती

क) पंतप्रधान

ड) नागरिक

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१४) अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?

अ) कलम ३५५

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६६

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

१५) राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) दोन्ही

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१६) मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?

अ) भाग २

ब) भाग ३

क) भाग ४

ड) भाग ६

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१७) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?

अ) रॉय बुचर

ब) सॅम माणकेशो

क) जनरल थोरात

ड) के. एम. करिअप्पा

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१८) डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?

अ) पाणबुडी विरोधी नौका

ब) युद्धनौका

क) क्षेपणास्त्र वाहू नौका

ड) गस्तीनौका

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

१९) जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?

अ) नेहरू सेतू

ब) राम सेतू

क) इंदिरा गांधी सेतू

ड) अटल सेतू

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

२०) INS कदमत ची निर्मिती कोणामार्फत करण्यात आली ?

अ) माझगाव डॉक

ब) कोचीन शिप बिल्डर्स

क) JNPT

ड) GRSI

================


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले : 🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


  🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश


🏀 भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सराव प्रश्न

1कोणती सरकारी संस्था ‘पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री’ याची स्थापना करीत आहे?

(A) वित्त मंत्रालय

(B) भारतीय रिझर्व्ह बँक🌷🌷

(C) भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ

(D) यापैकी नाही


2)कोणत्या बॅडमिंटनपटूने ‘सारलोरलक्स ओपन बॅडमिंटन 2018’ ही क्रिडास्पर्धा जिंकली?

(A) लिन डॅन

(B) राजीव औस्पेह

(C) शुभंकर डे🌷🌷

(D) अर्जुन सिंग


3)कोणत्या टेनिसपटूने ‘2018 पॅरीस मास्टर्स’ स्पर्धेत एकेरीचे जेतेपद जिंकले?

(A) राफेल नडाल

(B) रॉजर फेडरर

(C) अँडी मरे

(D) कॅरेन खचानोव्ह🌷🌷


4)कोणत्या शहरात ‘सार्वजनिक अधिग्रहण व स्पर्धा कायदा' या विषयासंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली?

(A) दिल्ली🌷🌷

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) हैदराबाद


5)नोव्हेंबर-18 मध्ये, प्रथम विश्वयुद्धादरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ कोणत्या यूरोपीय देशात स्मारक उभारण्यात आले?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन🌷🌷

(D) इटली


6)कोणाला भारतीय नौदलाच्या साहसी जलप्रवासाचे (circumnavigation adventures) जनक म्हणून ओळखले जात असे?

(A) अर्जुन सिंग

(B) सॅम मानेकशॉ

(C) के. एम. करिअप्पा

(D) मनोहर प्रल्हाद आवटी🌷🌷


7)नोव्हेंबर-18 मध्ये, आफ्रिकेमधील कोणत्या देशाला भारताने US$350 दशलक्षपर्यंत पतमर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली?

(A) झिम्बाब्वे🌷🌷

(B) दक्षिण आफ्रिका

(C) केनिया

(D) इजिप्त


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 



1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?


⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?


⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


⚪️ खान बहादूर खान

⚫️ कवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?


⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?


⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?


अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.


ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?


अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?


स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?


पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?


⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?


⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर

1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला 

"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

  नेताजी सुभाषचंद्र बोस

      

जन्म : २३ जानेवारी, १८९७

     (कटक, ओडिशा, भारत)

अपघाती निधन : १८ ऑगस्ट
                     १९४५ (वय ४८)

            ( तैहोको, तैवान)

टोपणनाव : नेताजी
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना :
              अखिल भारतीय काँग्रेस
              फॉरवर्ड ब्लॉक
              आझाद हिंद फौज

प्रमुख स्मारके : पोर्ट ब्लेर येथील
                       स्मारक
धर्म : हिंदू
पत्नी : एमिली शेंकल
अपत्ये : अनिता बोस फफ
आवाहन : तुम मुझे खून दो,
               मै तुम्हे आझादी दूँगा !

                   हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
              १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
             नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.

👨‍👩‍👧 जन्म व कौटुंबिक जीवन

               सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते.
             जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.
          प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते.
       प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे नववे अपत्य व पाचवे पुत्र होते.
            आपल्या सर्व भावांपैकी सुभाषना शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.

🎓 शिक्षण व विद्यार्थी जीवन

लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली.
                वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.
             महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषने महाविद्यालयात संप पुकारला होता.
               १९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.

🇮🇳 स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य
          १९३९च्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनासाठी उपस्थित बोस.छायाचित्र:टोनी मित्रा
कोलकात्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या सुभाषची, दासबाबूंबरोबर काम करण्याची इच्छा होती. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
           रविंद्रनाथ ठाकूर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन नामक वास्तु मध्ये वास्तव्य करत. तेथे जुलै २०, १९२१ रोजी महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.
               गांधींजीनी देखिल कोलकत्याला जाऊन दास बाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू कोलकात्त्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.

           १९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
              लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंसह, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लिगची स्थापना केली. १९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
               १९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
            जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.

🏛 कारावास
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
         १९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.
                  नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.
                 मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर ि सितारमैय्या ह्यांची निवड केली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली.
          सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत १५८० मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना १३७७ मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी २०३ मतांनी ही निवडणूक जिंकली.
      पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या १४ पैकी १२ सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.
          १९३९ सालचे वार्षिक काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही.
                 अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्‍न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. अखेर, एप्रिल २९, १९३९ रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

🎓 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.
                  दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.
परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.
          १९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.
              १९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.

🗽  युरोपातील वास्तव्य

१९३३ पासून १९३६ पर्यंत सुभाषबाबूंचे युरोप मध्ये वास्तव्य होते.
          युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटली चे नेते मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. आयर्लंड चे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.
                सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्‍नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.
              पुढे सुभाषबाबू युरोप मध्ये विठ्ठलभाई पटेल ह्यांना भेटले. विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले.
               विठ्ठलभाई पटेलांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.
         १९३४ साली सुभाषबाबूंना त्यांचे वडील मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावरच त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.

📿 हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद

१९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे ५१वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत ५१ बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले.
                   ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.
             आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सुभाषबाबूंनी योजना आयोग स्थापना केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली.
           १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.

🥊 काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
          १९३८ साली गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवातही केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.
             १९३९ मध्ये जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजी आता ते नको होते.
🏃🏽 नजरकैदेतून पलायन

नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. जानेवारी १६, १९४१ रोजी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.
              काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्‍न केला. इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओर्लांदो मात्सुता नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

👬 नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट

बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. जर्मन सरकारचे एक मंत्री ॲडम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.
             अखेर मार्च २९, १९४२ रोजी, सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते ॲडॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
           काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.
               शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. त्यामुळे मार्च ८, १९४३ रोजी, जर्मनीतील कील बंदरात, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पादांग बंदरात घेऊन आली.

💎 पूर्व आशियातील वास्तव्य

पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
             नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.
              ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. ते स्वतः ह्या सरकारचे राष्ट्रपति, पंतप्रधान व युद्धमंत्री बनले. ह्या सरकारला एकूण नऊ देशांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले.
              आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.
             पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.
               द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी  नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली.
            आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.
          जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.

⌛ बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी

दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.
            ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.
            ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.
               अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.
               स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, १९५६ आणि १९७७ मध्ये दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.
                  १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५ साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.
             ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.
        सुभाषचंद्र बोसांशी संबंधित शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या.२०१५ सालच्या शेवटी त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या आहेत.

🏅 भारतरत्‍न पुरस्कार

१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्दे

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला.
सुभाषबाबू १९२० मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
नेताजींनी १९४० मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.
नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.
सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.
आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.
सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.
आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.
१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

📕 चरित्रे

अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-

गरुडझेप (कादंबरी, वि.स. वाळिंबे)
जयहिंद आझाद हिंद (कादंबरी, वि.स. वाळिंबे)
नेताजी (वि.स. वाळिंबे)
नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)
नेताजींचे सीमोल्लंघन (एस.एम. जोशी)
नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)
No Secrets (अनुज धर)
महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)

📚 **नेताजींवरील अन्य पुस्तके* *

नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)
नेहरू व बोस (मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी; मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)
          🇮🇳 **जयहिंद** 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏
                

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...