Wednesday 7 July 2021

Online Test Series

राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश


👤 पी के मिश्रा : छत्तीसगड उच्च न्यायालय


👤 राजेश बिंदल : कोलकता उच्च न्यायालय


👤 सजय यादव : अलाहाबाद उच्च न्यायालय


👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 


👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय

यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

 

स्पर्धेमध्ये कसे सहभागी व्हाल?

✅मोबाईल किंवा कॅमेऱ्याचा वापर करून  वक्तृत्व स्पर्धेचा एक व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा.

✅व्हिडीओ 7798653068 या WhatsApp नंबरवर किंवा yashacharajmarg@gmail.com या E-mail वर  पाठवा.

✅व्हिडीओ पाठवण्याचा कालावधी 15 जुलै  2021 ते  5 ऑगस्ट 2021

✅15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त व्हिडीओ आमच्या YouTube channel वर अपलोड केले जातील.



स्पर्धेच्या अटी व नियम

✅वक्तृत्व स्पर्धा

गट क्र. १ – पहिली ते चौथी 
गट क्र. २ – पाचवी ते नववी 
गट क्र. ३ – खुला गट

विषय :
  1. माझ्या स्वप्नातील भारत 
  2. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 
  3. माझा आवडता समाजसुधारक 

प्रत्येक गटातून खालीलप्रमाणे क्रमांक काढण्यात येतील.
1. प्रथम क्रमांक- 1
2. द्वितीय क्रमांक -1
3. तृतीय क्रमांक -1
4. उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक - 5


✅मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचा वापर करू शकता.

✅व्हिडीओच्या सुरुवातीला स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व स्पर्धेचे नाव ( यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ) सांगावे. खुल्या गटासाठी नाव ,पत्ता व स्पर्धेचे नाव सांगावे .

✅व्हिडीओ २ ते ५ मिनिटांचा असावा. वेळ जास्त झाला तरी चालेल पण कमी नको. गट क्र. १ साठी वेळेचे  बंधन नाही. पाच मिनिटापेक्षा जास्त वेळेचा व्हिडीओ असेल तर परीक्षणासाठी ५ मिनिटेच धरली जातील.

✅खुल्या गटासाठी वयाचे बंधन नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी होऊ शकतात.

✅सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र pdf स्वरुपात देण्यात येईल. 100 views पूर्ण होणाऱ्या स्पर्धकांना offline  प्रमाणपत्राची प्रिंट  पाठवली जाईल.

✅views चे गुण ठरवताना व्हिडीओची लांबी पण लक्षात घेतली जाईल. उदा. दोन स्पर्धकांचे समान views असतील तर ज्या स्पर्धकाचा व्हिडीओ जास्त वेळेचा असेल त्याला जास्त गुण मिळतील.

✅व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट आहे . सर्व व्हिडिओ आमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केले जातील.


व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना घ्यावयाची काळजी

✅मोबाईल वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर मोबाईल आडवा धरा. मोबाईल आडवा धरून व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यामुळे युट्युब वर व्हिडिओ अपलोड करणे व पाहणे सोपे होते.

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना  बॅकग्राऊंड ला अनावश्यक आवाज होणार नाही याची काळजी घ्या.

✅स्पर्धकांचा आवाज  स्पष्ट व मोठा  ऐकू येईल या पद्धतीने रेकॉर्डिंग करा.

✅स्पर्धेचा व्हिडिओ सलग असावा. तुकडे तुकडे जोडून एडिट केलेला व्हिडिओ स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना प्रकाश योजनेकडे लक्ष द्या. योग्य प्रकाशामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. रेकॉर्डिंग करताना स्पर्धकाच्या दोन्ही बाजूला समान उजेड राहील याची काळजी घ्या. 

✅हा व्हिडीओ युट्युब ला अपलोड केल्यानंतर आपण आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडीओ आकर्षक होईल अशा पद्धतीने रेकॉर्ड करा

✅शक्‍यतो बॅकग्राऊंड एकाच रंगाचे असावे

✅शक्य झाले तर घराच्या बाहेर ही रेकॉर्ड करू शकता पण उन्हामध्ये रेकॉर्डिंग करू नका

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना स्पर्धकाच्या मागे घरातील अनावश्यक गोष्टी दिसणार नाहीत याची काळजी घ्या.

✅रिकॉर्डिंग शक्यतो दिवसा करावे. रात्रीच्या वेळी प्रकाश कमी असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही

✅रेकॉर्डिंग करत असताना मोबाईल स्थिर ठेवा. हलू देऊ नका

✅आपले उच्चार स्पष्ट असावेत. घाई करू नये. घाईगडबडीत बोलल्यामुळे तुम्ही काय बोलताय हे प्रेक्षकांना कळत नाही त्यामुळे तुमचा व्हिडिओ चांगला असेल तरीही प्रेक्षक पाहत नाहीत.

✅व्हिडिओच्या सुरवातीला स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व स्पर्धेचे नाव  स्पष्ट आवाजामध्ये सांगावे.

✅खुल्या गटातील स्पर्धकांनी आपले नाव  स्पर्धेचे नाव व थोडक्यात पत्ता सांगावा

✅व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याअगोदर चांगली प्रॅक्टिस करून मगच व्हिडिओ रेकॉर्डिंग करा

✅आपला व्हिडीओ दर्जेदार होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.


यशाचा राजमार्ग राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2021 चा निकाल कसा तयार केला जाणार आहे?


1️⃣ गुरुवार दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आपण आपला व्हिडीओ share करून व्हिडिओचे views वाढवू शकता.

2️⃣ रविवार  दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी या स्पर्धेचा निकाल आमच्या यशाचा राजमार्ग  Youtube chanel व website  वर घोषित केला जाईल. 

3️⃣निकालाची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवली जाईल व परीक्षकांचा निकाल हा अंतिम असेल 


 अधिक माहितीसाठी  7798653068 या क्रमांकावर संपर्क साधावा.






Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...