Saturday 30 December 2023

चालू घडामोडी :- 30 डिसेंबर 2023

◆ मॅग्नस कार्लसनने 2023 FIDE वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकली.

◆ ऑगस्ट 2023 मध्ये, मॅग्नस कार्लसनने भारतीय ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रग्नानंदाचा पराभव करून FIDE विश्वचषक विजेतेपद जिंकले.

◆ वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2012 पासून सुरू झाली आहे.

◆ मॅग्नस कार्लसनने विक्रमी पाचव्यांदा जागतिक वेगवान बुद्धिबळाचा मुकुट पटकावला.

◆ मॅग्नस कार्लसनने 5 रॅपिड टायटल्स, 6 ब्लिट्झ टायटल्स आणि 5 क्लासिकल टायटल्ससह एकूण 16 वर्ल्ड चॅम्पियनशिप टायटल्स जिंकले आहेत.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

◆ इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारतातील पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

◆ RBI ने ICICI Pru म्युच्युअल फंडाच्या फेडरल बँक, RBL बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतील भागभांडवल खरेदीला मान्यता दिली.

◆ लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय परिषदेने (AC), जम्मू आणि काश्मीर पंचायती राज कायदा, 1989 मधील महत्त्वपूर्ण बदलांना अलीकडेच मान्यता दिली.

◆ UAE कडून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने प्रथमच रुपयाचे पेमेंट केले.

◆ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्थानक येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे  'जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' चा आज शुभारंभ करण्यात आला.

◆ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ आयपीएस रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक आहेत.

◆ संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नितीश कुमार यांची निवड झाली आहे.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा अकोला येथे पार पडल्या आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रिय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत हरियाणा राज्याने सात सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ आसाम राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे.

◆ उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने अमित शहा यांच्या उपस्थीत केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे.

◆ उल्फा ही संघटना 1979 वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे.

◆ झारखंड राज्यात 50 व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे.

◆ भारताचे श्रीलंका देशातील उच्चायुक्त म्हणुन संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या या ठिकाणावरून 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करणार आहेत.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथुन उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेस मध्ये महाराष्ट्र राज्यातील "जालना ते मुंबई" या वंदे भारत एक्सप्रेस चा सामावेश आहे.

◆ केंद्र सरकारने सुकन्या समृध्दी योजनेच्या सध्याच्या व्याजदरात 8 टक्क्या वरून 8.20 टक्के वाढ केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ महाराष्ट्र शासन पुढील पाच वर्षात मिशन ड्रोन प्रकल्प अंतर्गत 12 जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करणार आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यातील 116 बाजार समित्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ कमांडर डोंग जुन यांची चीन या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ Why Bharat Matters या पुस्तकाचे लेखक एस.जयशंकर हे आहेत.

◆ SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम जपान या देशाची आहे.

◆ भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश 01 जानेवारी 2024 पासून स्वीकारणार आहेत.

━━

31 December 2023 Current Affairs in Marathi



📘National

▪️स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना हरित हायड्रोजन धोरण-2023 धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

▪️तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, भारत सरकारने भारत ब्रँड नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला आहे.

▪️आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या डेटावरून आयुष्मान भारत योजनेच्या यशामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येते, एकूण आयुष्मान कार्डांपैकी सुमारे 49% महिलांनी कार्डस बनवले आहेत.

▪️माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) पक्षात प्रवेश केला आहे.

📔Economics

▪️भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ICICI बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकाना देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका (D-SIBs -Domestic Systemically Important Banks) म्हणून जाहीर केले आहे.

📕Technology

▪️इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

▪️इस्रोने आखलेल्या भारताच्या या मोहिमेला XPoSat मिशन नाव देण्यात आले आहे.

▪️सीएनएन बिझनेसच्या ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून सत्या नडेला यांची निवड झाली आहे.

📗Sports

2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच स्क्वॅश खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

📒 Awards

अलीकडेच IPS अधिकारी ‘नीना सिंह’ यांची CISF च्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

📙Other

नुकतेच जर्मनचे प्रसिद्ध राजकारणी वुल्फगँग शॅकेबल यांचे 81 व्या वर्षी निधन झाले.


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...