Friday 29 December 2023

चालू घडामोडी :- 29 डिसेंबर 2023

◆ अयोध्या रेल्वे स्टेशन चे नाव बदलून "अयोध्या धाम" नाव देण्यात आले आहे.

◆ केंद्रीय अद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी नियुक्ती होणाऱ्या नीना सिंह या पहिल्या महिला आहेत.

◆ देशातील एकूण विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र राज्याचा वाटा 30 टक्के आहे.

◆ प्रसिध्द तमिळ अभिनेते आणि नेते विजयकांत यांचे निधन झाले. ते DMDK राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते.

◆ युएई ची राजधानी अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

◆ इस्रो कृष्णविवर चा अभ्यास करण्यासाठी एक्स्पो SAT मोहीमीचे प्रक्षेपण करणार आहे.

◆ इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुख पदी राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव-2024 नाशिक येथे होणार आहे.

◆ प्रबीर मजुमदार यांचे निधन झाले. ते फुटबॉल खेळाशी संबंधित होते.

◆ देशातील पहिला मध महोत्सव-2024 महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.

◆ कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी CS राजन यांची निवड झाली आहे.

◆ 2018 ते 2022 या काळातल्या आकडेवारीनुसार जगभरातल्या शस्त्रास्त्र निर्यातीत सर्वात मोठा वाटा(40%) अमेरिकेचा आहे.

◆ अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत सौदी अरेबिया आणि जपान.

◆ इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाचे प्रमुख अनिश दयाल सिंह यांची केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी नियुक्ती झाली.

◆ IPS अधिकारी नीना सिंह यांची CISF च्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

◆ नीना सिंग या राजस्थान केडरमधील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत.

◆ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर एक राज्य असल्याचा दावा केला आहे.

◆ राज्यात एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात 01 लाख 83 हजार 924 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली असून, परदेशी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती ही महाराष्ट्राला आहे.

◆ केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी.

◆ अयोध्या विमानतळ आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार आहे.

◆ भारत आणि रशिया यांनी कुडनकुलम अणु प्रकल्प युनिट्ससाठी करार केला.

◆ RBI ने परकीय चलन सेवा वाढवण्यासाठी फॉरेक्स करस्पॉन्डंट स्कीमचे अनावरण केले.

◆ भारतीय कुस्तीपटू पूजा धांडा या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुशोभित झालेली ऍथलीट हिला नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ने तीन ठिकाणी अयशस्वी झाल्यामुळे एका वर्षासाठी निलंबित केले आहे.

◆ चॅट जीपीटी च्या धर्तीवर देशात भारत जीपीटी तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

◆ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण च्या कार्यकारी अध्यक्ष पदी संजीव खन्ना यांची नियुक्ती झाली आहे.

━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...