Thursday, 21 May 2020

प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था.


(Primary Agricultural Credit Co-Operatives)

🅾प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.

🧩स्थापना -

🅾गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.

🧩कार्ये -

🅾ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते.

🧩भांडवल उभारणी -

🅾स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली.

🧩विस्तार -

🅾भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या.

🧩महाराष्ट्रातील विस्तार -

🅾31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना.

🅾 ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.

🅾 सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.

🅾 राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.

🅾त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर  इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.

🅾 कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Railway.

🅾डलहोसीने 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरु केली

🅾 हि रेल्वे सिंध, साहीब, सुलतान या इंजिनांनी आेढली

🅾 या रेल्वेने पहिल़्यांदा प्रवासाचा मान जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला

🅾 भारतात रेल्वे मार्गांची उभारणी ब्रिटिश भांडवलदारांनी व भारतातील ब्रिटिश सरकारने केली

🅾रेल्वे मार्ग बांधण्यासाठी ब्रिटिश भांडवलदारांनी 350 कोटी रुपये गुंतवले, त्यावर सरकारने 5 टक्के व्याज दिले.

🅾1869 पर्यंत 6 हजार किमी रेल्वेमार्ग उभारला

🅾 1905 पर्यंत 45 हजार किमी रेल्वेमार्ग बांधले

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋

पीएम ई विद्या’: विद्यार्थ्यांना डिजीटल/ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवा उपक्रम.

🅾आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाच्या अंतर्गत वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 17 मे 2020 रोजी प्रोत्साहन निधीच्या अंतिम भागातल्या घोषणा केल्या.

🅾टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, याची खातरजमा सरकारने केली आहे.

🅾सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, हे लक्षात घेत ‘स्वयम प्रभा’ DTH वाहिन्यांवरून शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

🅾तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने ‘पीएम ई विद्या’ हा डिजीटल/ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून लाभ घेता येईल, असा कार्यक्रम तात्काळ सुरू केला जाणार आहे.

🅾‘पीएम ई विद्या’ अंतर्गत कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्टचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे. दिव्यांग बालकांसाठी विशेष डिजीटल साहित्य उपलब्ध करून दिले जाणार.

🅾30 मे 2020 पर्यंत 100 अग्रणी विद्यापीठांना ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतातील सर्वात लांब.

1.भारतातील सर्वात लांब नदी -
🅾 गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण -
🅾हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा

3.भारतातील सर्वात लांब बोगदा -
🅾 जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी -
🅾अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग-
🅾जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल -
🅾सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता -
🅾पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग-
🅾दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल -
🅾हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
🅾 सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे.

  🧩भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आत्मचरित्र-कादंबर्‍या-नाटके-पुस्तके.

🅾अॅडव्हान्टेज इंडिया फ्रॉम चॅलेंग्ज टू अपॉर्च्युनिटी हे ए.पी.के. अब्दुल कलाम यांनी सृजनपालसिंह यांच्यासोबत लिहिलेले शेवटचे पुस्तक आहे.

1. नाटके - यातनाघर, वासनाकांड, वाडा चिरेबंदी, युगांत
🅾लेखक - महेश एलकुंचवार

2. पुस्तक - स्मिता पाटील अ ब्रिफ इनकंडेसन्स
🅾लेखिका - मैथिली राव.

3. पुस्तक - ड्रिमिंग बिग : माय जर्नी टू कनेक्ट इंडिया
🅾लेखक - भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोडा

4. पुस्तक - वाचणार्‍याची रोजनिशी
🅾लेखक - विक्रम सेठ

5. कादंबरी - फायर ऑन द माऊंटन
🅾लेखिका - अनिता देसाई

6. आत्मचरित्र - जिहाद
🅾लेखक - हुसेन जमादार (कोल्हापूर)

7. कादंबरी - पारखा
🅾लेखक - एस.एल. भैरप्पा

8. पुस्तक - टर्न ऑफ द टॉरटॉईज
🅾लेखक - टी.एन. निनान

9. पुस्तके - जिगसॉ, मोहनमाया
🅾लेखक - रामदास भटकळ

10. आत्मचरित्र - इडली, ऑर्किड आणि मी
🅾लेखक - प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत

11. पुस्तके - प्रकाशवाटा, रानमित्र
🅾लेखक - डॉ. प्रकाश आमटे

12. पुस्तक - द ग्रेट इंडियन डायट
🅾लेखिका - अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

99 वी घटनादुरूस्ती.

🅾ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)

 🅾वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.

🅾 राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.
 ही घटनादुरूस्ती National Judicial AppointmentCommission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.

🅾 ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

🅾 ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.

🅾  124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

🧩 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🅾चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

🧩 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🅾 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.. गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🅾 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

🧩 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🅾 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🅾या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🅾या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

🅾13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.. या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

नदी बद्दल माहिती

💠 💠जलाशय/धरण💠 💠

🅾भाटघर:-येसाजी कंक

🅾पानशेत:-तानाजी सागर

🅾वरसगाव:-वीर बाजी पासलकर

🅾माणिकडोह:-शहाजी सागर

🅾उजनी:-यशवंत सागर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠नदी व धरण💠 💠

🅾तापी-हातनूर

🅾गिरणा:-चनकापूर व दहिगाव

🅾काटेपूर्णा:-महान

🅾पांझरा:-सय्यद

🅾बुराई:-फोफर

🅾गोमती:-सुसरी

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠नदी काठ शहरे💠 💠

🅾तापी-भुसावळ सारंगखेडा

🅾गिरणा:-मालेगाव जळगाव

🅾पांझरा:-धुळे

🅾बुराई:-सिंदखेडराजा

🅾गोमाई:-शहादा प्रकाशे

🅾बोरी:-अमळनेर

🅾मास:-शेगाव

🅾मोरणा:-अकोला

🅾नळगंगा:-मलकापूर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠संगम स्थळ💠 💠

🅾कपिलेश्वर:-तापी-पांझरा

🅾प्रकाशे:-तापी-गोमती

🅾चांगदेव:-तापी-पूर्णा

🅾सिंदखेडराजा:-तापी-बुरई

🅾रायरेश्वर:-तापी-गिरणा

🅾रामतीर्थ:-पूर्णा-चंद्रभागा

🅾अंकुरा:-पूर्णा-मोरणा

🅾मालेगाव:-गिरणा-मोसम

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान.


🅾मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

🅾पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

🅾राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५)

🅾कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३)

🅾भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

🅾शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

🅾यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक

🅾महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

🅾डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९)

🅾उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

🅾कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८)

🅾स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

🅾महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Latest post

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे. ◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...