Thursday 21 May 2020

भारतीय रेल्वेने बनवले 12000 अश्वशक्तीचे सर्वात शक्तिशाली इंजिन.

🔰बिहारमधल्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड (MELPL) या कारखान्यात 12000 अश्वशक्ती क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेल्वे इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे.

🔰या इंजिनाची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून या इंजिनाचे 18 मे 2020 रोजी पहिल्यांदा व्यवसायिक पातळीवर यशस्वी संचालन करण्यात आले.

🔰या निर्मितीनंतर स्वदेशामध्ये उच्च अश्वशक्तिच्या इंजिनाची निर्मिती करणाऱ्या सहा प्रतिष्ठित देशांच्या समूहामध्ये आता भारतही सहभागी झाला आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचे संचालन भारताने केले आहे.

🔴इंजिनची वैशिष्ट्ये...

🔰या इंजिनाला ‘WAG12 क्रमांक 60027’ असे नाव आणि नंबर देण्यात आला आहे.

🔰या मालवाहू गाडीला एकूण 118 वाघिणी जोडण्यात आल्या होत्या. पूर्व रेल्वेच्या धनबाद विभागातून लांबपल्ल्याची ही मालवाहू गाडी पहिल्यांदा धावली.

🔰या मालवाहू गाडीने देहरी ऑन-सोन, गढवा रोड या मार्गावरून बरवाडीहपर्यंत प्रवास केला.

🔰नव्याने तयार करण्यात आलेले इंजिन अत्याधुनिक IGBT आधारित असून 3-फेज ड्राइव्ह आणि 9000 किलोवॅट (12000 अश्वशक्ती) ऊर्जा क्षमतेचे इलेक्ट्रिक इंजिन आहे. हे इंजिन 706 kN क्षमतेच्या जास्तीज जास्त संकर्षणासाठी सक्षम आहे.

🔰22.5 टनांचे एक्सल लोडचे दोन बो-बो डिझाइनचे इंजिन 120 किमी प्रतितास वेगाने 25 टनांपर्यंत उन्नत करता येणार आहेत. या इंजिनाचा वापर ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’साठी करण्यात येणार असल्यामुळे आगामी काळात कोळसा मालवाहतुकीच्या दृष्टीने हे इंजिन महत्वाचे ठरणार आहे.

🔰या इंजिनामध्ये बसविण्यात आलेल्या सॉफ्टवेअर आणि अँटेनामुळे GPSच्या मदतीने आणि मायक्रोव्हेव लिंक माध्यमातून इंजिनाच्या प्रवासावर थेट वेळेत नजर ठेवता येणार आहे.

🔰भारतीय रेल्वेने देशभरामध्ये माल वाहतूक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड या कंपनी बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. त्याच्या अंतर्गत येत्या 11 वर्षांत 800 अत्याधुनिक 12000 अश्वशक्ती क्षमतेची इलेक्ट्रिक फ्रेट इंजिनांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला 2018 साली प्रारंभ झाला.

🔰या अश्वशक्ती इंजिनामुळे मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग वाढणार आहे. त्याचबरोबर देशभरामध्ये पहिल्यापेक्षा अधिक वेगाने, सुरक्षित आणि मोठ्या वजनी मालगाड्यांची वाहतूक होवू शकणार आहे आणि त्यामुळे अत्याधिक वापर होणाऱ्या रेल्वे रूळांवर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...