Monday 13 July 2020

विज्ञान - शोध व संशोधक


◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी

◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो

◾️ विजेचा दिवा - एडिसन

◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

◾️ सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ सायकल - मॅकमिलन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन

◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर

◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन

◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
____________________________________

देशाच्या सीमा सुरक्षित - देसवाल यांचा निर्वाळा.

🔰गुरगाव : देशाची सर्व भूमी सुरक्षा दलांच्या ताब्यात सुरक्षित आहे, असा निर्वाळा इंडो-तिबेट सीमा पोलिस दल व सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एस. एस देसवाल यांनी दिला आहे.

🔰भारत व चीन या देशांत पूर्व लडाखमधून माघारीबाबत मतैक्य झाले असून गेले सात आठवडे सुरू असलेला पेच मिटला असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्व लडाखमधील पेच प्रसंगाबाबत विचारले असता देसवाल यांनी सांगितले, की देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. मग ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तर कुठलीही सीमा असो कुठेही धोका नाही. कारण आपली सुरक्षा दले सक्रिय, सक्षम व समर्पितपणे काम करीत आहेत. आमचे सुरक्षा जवान देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास समर्थ आहेत.

🔰प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर इंडो तिबेट सीमा पोलिसांचे आणखी जवान तैनात करण्यात आले आहेत काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की गरजेनुसार जवान  तैनात करण्यात येत आहेत. लष्कर व सीमा सुरक्षा दलांचे मनोबल उंचावलेले आहे. आमची सुरक्षा दले सतर्क आहेत.

जागतिक मुत्सद्दीगिरी (कुटनीती) निर्देशांक 2019 (Global Diplomacy Index)


● निर्देशांक जारी करणारी संस्था - Lowy Institute, Sydney

● जगातील राष्ट्रांत कोणत्या देशाचे परकीय संबंधाबाबतचे जाळे जास्त मजबूत याबाबत आकडेवारी

● एकूण 61 राष्ट्रांचा निर्देशांक काढला जातो.

● जगातील देशांत राजकीय दूतावास (Embassy), Consulate (वाणिज्य दूतावास) यांच्या संख्येवरून निर्देशांक काढण्यात आलेला आहे.

● जगात सर्वाधिक Embassy व Consulate असणारे प्रथम 5 देश

1. चीन - 276
2. अमेरिका - 273
3. फ्रांस - 267
4. जपान - 247
5. रशिया - 242

★भारत 61 देशांच्या यादीत 12 व्या स्थानी (177 - 123 राजकीय दूतावास व 54 वाणिज्यिक दूतावास)
-----------------------------------------

आजच्या प्रश्नांची उत्तरे


      

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी भूखंडावरील अतिक्रमण रोखण्याच्या हेतूने BLUIS प्रणालीचे अनावरण केले?

(A) नवीन पटनायक✅✅
(B) विजय रुपाणी
(C) अरविंद केजरीवाल
(D) उद्धव ठाकरे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦'योट्टा NM1' हे आशियातले सर्वात मोठे आणि जगातले द्वितीय क्रमांकाचे सर्वात मोठे _ आहे.

(A) कोठार
(B) सह-कार्यस्थळ
(C) डेटा सेंटर✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦सुरक्षासंबंधी सर्व अडचणींचे निराकरण केल्यानंतर ‘गुगल प्लस’ या व्यासपीठाचे नाव बदलून _ असे ठेवले गेले आहे.

(A) गुगल करंट्स✅✅
(B) गुगल मंत्रा
(C) गुगल अल्फाबेट
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦__________ हे 'महावीर: ए सोल्जर व्हू नेव्हर डाइड' या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहेत.

(A) व्ही. के. सिंग
(B) के. श्रीकुमार आणि रूपा कुमार✅✅
(C) पद्मनाभन
(D) दिपा अलेक्झांडर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या व्यक्तीच्या हस्ते ‘ASEEM’ व्यासपीठाचे अनावरण केले गेले?

(A) संतोष कुमार गंगवार
(B) डॉ. महेंद्र नाथ पांडे✅✅
(C) रवी शंकर प्रसाद
(D) यापैकी नाही

1] भारतमंत्री हे नवे पद केव्हा तयार करण्यात आले ?

1] 1860
2] 1858
3] 1857
4] 1856

Correct answer 2] 1858

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2) मार्च 1923 साली स्वराज्य पक्षाचे पहिले अधिवेशन कुठे घेण्यात आले ?

1] अलाहाबाद
2] गया
3] पाटणा
4] लखनौ
Correct answer 1] अलाहाबाद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3) बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शक नावाचे मासिक कोणत्या साली सुरु केले ?

1] 1835
2] 1932
3] 1832
4] 1840
Correct answer 4] 1840

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4) 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना कोणी केली ?

1] महात्मा गांधी
2] महात्मा फुले
3] शाहू महाराज
4] डॉ आंबेडकर

Correct answer 4] डॉ आंबेडकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5) डॉ पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते ?

1] मुळे
2] कदम
3] घाटगे
4] भोसले

Correct answer 2] कदम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6) अवकाशात सोडण्यात आलेल्या सर्वात पहिल्या उपग्रहाचे नाव काय ?

1] मीर
2] स्फुटनिक
3] TUBSAT
4] भास्कराचार्य

Correct answer 2] स्फुटनिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7) प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय ?

1] शिवसागर
2] जायकवाडी
3] प्रवरा डॅम
4] विल्सन डॅम

Correct answer 4] विल्सन डॅम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8) सूर्यग्रहन नेहमी _ लाच होत असते.

1] अमावस्या
2] पौर्णिमा
3] सोमवती अमावस्या
4] कोजागिरी पौर्णिमा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9) नवीन राज्याची निर्मिती , त्याचे क्षेत्र सीमा व नाव यात फेरबदल करण्यासाठी घटनेतील ___ हे कलम आहे ?

1] कलम 2
2] कलम 1
3] कलम 3
4] कलम 4
Correct answer 3] कलम 3

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

1] घोलवण
2] श्रीरामपूर
3] भारघर
4] गंगापूर

Correct answer 4] गंगापूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦ब्राझील देशाच्या पहिल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे नाव ओळखा.

(A) अॅमेझोनिया-1✅✅
(B) ऑफेक
(C) स्रोस-1
(D) एरियल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी चीनने _ या नावाने एका दळणवळण उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

(A) CZ-2A
(B) एपस्टार-6D✅✅
(C) हैयांग-1D
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦9 जुलै 2020 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी  राज्यातल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या 6 पुलांचे उद्घाटन केले.

(A) अरुणाचल प्रदेश
(B) सिक्किम
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) उत्तराखंड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) _ सोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

(A) भारतीय रिझर्व्ह बँक
(B) भारतीय रोखे व विनिमय मंडळ✅✅
(C) इन्फोसिस
(D) टाटा कन्सलटंन्सी सर्व्हिसेस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦________ यासंबंधी संयुक्तपणे संशोधन करण्यासाठी CSIR-IGIB संस्थेनी आयआयटी अल्युमनी कौन्सिल सोबत एक करार केला.

(A) गोवर
(B) कोविड-19✅✅
(C) रोसोला
(D) देवी

तुकाराम मुंढेंना दणका; स्मार्ट सिटीच्या CEO पदावरून हटवले.


◾️नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूर स्मार्ट सिटी सीईओपदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. महेश मोरोने यांना प्रभारी सीईओपद देण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश मोरोने काम पाहतील. पुढील काही दिवसांत पूर्ण वेळ सीईओ नेमण्यासाठी जाहिरात काढली जाणार आहे.

◾️नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजपातर्फे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी सुरू आहेत.

◾️शुक्रवारी, १० जून रोजी जवळपास तीन तासांपेक्षा जास्त काळ नागपूर स्मार्ट सिटी संचालक मंडळाची झंझावाती बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, एनआयटी चेअरमन उपस्थित होते. चोख पोलीस बंदोबस्तात ही बैठक पार पडली.

◾️तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे संचालकपद आणि सीईओपद बळकवल्याचा आरोप आजच्या बैठकीत सिद्ध झाल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

आजपर्यंतचे निवडणूक आयुक्त

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. आत्तापर्यंत खालील आयुक्तांनी राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पद संभाळले आहे.

💁‍♂️ *नाव आणि कार्यकाळ* :

● श्री. डि. एन. चौधरी (26 मार्च1994 ते 25 मार्च1999)

● श्री. वाय. एल. राजवाडे (15 जून 1999 ते 14 जून 2004)

● श्री. नन्दलाल (15 जून 2004  ते 14 जून 2009)

● श्रीमती नीला सत्यनारायण (07 जुलै 2009 ते 06 जुलै 2014)

● श्री.जगेश्वर सहारिया (05 सप्टेंबर 2014 ते आजपर्यंत)

General Knowledge

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?
: ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?
: मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?
: मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?
: केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?
: तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?
: सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?
: परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?
: चांगी विमानतळ

● कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भारतातली कोणती संस्था भाग घेणार आहे?
: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● कोरोना विषाणू विषयक SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या आभासी शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?
: रशिया

● 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अ‍ॅसेसमेंट, 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: खाद्यान्न व कृषी संघटना

● असा कोणता देश आहे ज्याने त्याच्या राजधानीतल्या रस्त्याचे नाव ‘रेहॉव्ह टॅगोर’ असे ठेवले?
: इस्त्राईल

● भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: व्ही. विद्यावती

● ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ (CDC) ही संस्था कोणत्या देशात आहे?
:  संयुक्त राज्ये अमेरिका

● बेरोजगारांना नोकरी मिळण्यासाठी कोणत्या राज्याने 'होप' हे संकेतस्थळ कार्यरत केले?
: उत्तराखंड

● जागतिक 'एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020' अहवाल कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक आर्थिक मंच

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
: बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
: बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
: म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
: कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
: इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
: बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
: डॉ. हर्ष वर्धन

अमेरिका, ब्रिटन, चीनला मागे टाकून करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी


📌संपूर्ण जगाला करोना व्हायरसने त्रस्त करुन सोडले आहे. या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.

📌रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.

📌स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज देण्यात येणार आहे असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

📌रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.

📌"करोना व्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत" असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोना व्हायरसला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.

📌सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोना रोखणारी लस विकसित करण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे.

📌मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे हाच या चाचणीमागचा हेतू आणि तो साध्य झाला आहे असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोना व्हायरसवर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...