Sunday 10 March 2024

TCS_IBPS वर आधारित प्रश्नसंच


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर-  सोलापूर

2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर

3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून

4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761

5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947

6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट

7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा

8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद

9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी

10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता

11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा

12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग

13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए

14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर

15,) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ

16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च

18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार

19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड

20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर-  भ्रंशमूलक उद्रेक

21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी

22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3

23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज

24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड

25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड

26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी

27) मध्य रेल्वेचे मुख्यालय  कोठे आहे?
उत्तर- मुंबई

28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन

30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा

31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी

32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती

33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे

34) इन्डोसल्फान हे  कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक

35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर-  ल्युकेमिया

36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती

37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
उत्तर- तलाठी

38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर-  महात्मा गांधी

39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर

40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन

41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज

42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13

44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड

45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर

46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान

47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर

48)  ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया

49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर

50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान

51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका

52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर

53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र

54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
(मार्गदर्शक दशरथे सर): उत्तर- कावेरी

55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद

56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी

57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट

58) सन  1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी

59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा

60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस

61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
उत्तर- लोकमान्य टिळक

62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858

63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
उत्तर- 1909

64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
उत्तर- लॉर्ड आयर्विन

65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उत्तर- सविनय कायदेभंग

66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
उत्तर- दादाभाई नौरोजी

67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
उत्तर- 26 जानेवारी 1930

68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते
उत्तर- फाजलअली

70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
उत्तर- 3

71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार

72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
उत्तर- स्वर्णसिंह समिती

73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे? 
उत्तर- कलम 123

74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
उत्तर- 22

75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
उत्तर- 11

76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 3 डिसेंबर

77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
उत्तर- श्रीलंका

78) सुजय कशाशी संबंधित आहे?
उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग  व्हेसल

79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
उत्तर- ॲल्युमिनियम

80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
उत्तर- यकृत

81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
उत्तर- डेसिबल

82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
उत्तर- तुर्कस्तान

83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
उत्तर- 1991

84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी

90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
उत्तर- पुणे

99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

101) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

102) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

103) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

104) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

105) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

106) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

107) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?
उत्तर- कृष्णराव साबळे

108) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?
उत्तर- 1913

109) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

110) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

111) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

112) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

113) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

114) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

115) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

116) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

117) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

118) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

119) माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला?
उत्तर- 2005

120) अजंठा ,वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
उत्तर- औरंगाबाद

121) धुपगड -पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत?
उत्तर- सातपुडा

122) वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- जम्मू काश्मीर

123) संयुक्त राष्ट्र संघटनाचे (युनो) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

124) ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली?
उत्तर- सुरत

125) चलो जाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली?
उत्तर- 1942

126) महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहे?
: उत्तर- 36

127) दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर- चित्रपट

128) आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर- स्वामी दयानंद सरस्वती

129) गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते आहे?
उत्तर- लुंबिनी

130) भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे?
उत्तर- आरबीआय

131) ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळा बद्दल प्रसिद्ध आहे?
उत्तर- स्टीपल चेस

132) शहराचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर- महापौर

133) विंग्स ऑफ फायर (अग्निपंख) हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

उत्तर- डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

134) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे?
उत्तर- औरंगाबाद

135) महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर- 78

136) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?
उत्तर- पुणे

137) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
उत्तर- प्रवरानगर

138) भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

139) कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
उत्तर- औरंगाबाद

140) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- उत्तराखंड

141) साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
उत्तर- गोविंदाग्रज

142) राज्यसभेचा सभापती कोण असतो?
उत्तर- उपराष्ट्रपती

143) घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर- भारतीय संसद

144) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर- महादेव गोविंद रानडे

145) खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो?
उत्तर- ग्रामसेवक

146) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
उत्तर- 18

147) महाराष्ट्र राज्याच्या पोलिस प्रमुखांना काय म्हणतात?
उत्तर- पोलीस महासंचालक

148) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
उत्तर- संत रामदास

149) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- पुणे

150) ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?
उत्तर- साहित्य

151) महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

152) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

153) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

154) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

155) व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

156) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

157) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

158) चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

159) मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

160) ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

161) गाजर या वनस्पतीत कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते?
उत्तर- अ

162) मूत्रपिंडाचे विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते?
उत्तर- डायलीसिस

163) मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे?
उत्तर- इस्राईल

164) कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो?
उत्तर- पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट

165) कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरल ने तैनाती पद्धत आमलात आणली?
उत्तर- लॉर्ड वेलस्ली

166) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर- कायमचे स्थायी सभागृह

167) कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिलेले आहे?
उत्तर- अनुताई वाघ

168) भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- बंगरुळ

169) राष्ट्रीय महामार्ग 50 (NH -50 ) हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
उत्तर- पुणे-नाशिक

170) पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- हाॅकी

171) जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- जिनिव्हा

172) भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
उत्तर- आर्यभट्ट

173) सतीश कुमार शिवलिंगम हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग

174) फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
उत्तर- मार्क झुकेरबर्ग

175) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर- हेग

176) मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर- आर. के. नारायण

177) मुऱ्हा ही कोणत्या जनावराची जात आहे?
उत्तर- म्हैस

178) पेनिसीलीन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग

179) संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- फुटबॉल

180) चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
उत्तर- आंबा

181) भारत व चीन यांच्या दरम्यान च्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात?
उत्तर- मॅकमोहन लाईन

182) ईराण या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर- तेहरान

183) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?
उत्तर- 1 एप्रिल 1935

184) नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट मांजुली हे कोणत्या नदीवर व कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्य

185) नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
उत्तर- कृष्णा

186) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे?
उत्तर- थेम्स

187) मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे काय?
उत्तर- अस्तीबंध

188) बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?
उत्तर- अनुराग बासु

189) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
उत्तर- हिल्टन यंग कमीशन

190) ॲनाॅलाॅगचे चे डिजिटल व डिजिटलचे ॲनाॅलाॅग  कोणती प्रणाली करते?
उत्तर- मोडेम

191) तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते?
उत्तर- वाळलेला भोपळा

192) पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली?
उत्तर- सातपाटी

193) दाभोळ धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- जव्हार

194) यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
उत्तर- सर हेन्री व्हीवियन

195) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर- डहाणू

196) पालघर जिल्हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे?
उत्तर- 36 वा

197) पालघर जिल्ह्यास कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत?
उत्तर- ठाणे, नाशिक

198) पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- पोलीस उपमहानिरीक्षक

199) महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात?
उत्तर- उपविभागीय पोलिस अधिकारी

200) बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण?
उत्तर- व्यंकटेश माडगूळकर

201) संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते?
उत्तर- तुकाराम बोल्होबा आंबिले (मोरे)

202) सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर- सिमुक

203) चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर- हेमाद्री

204) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर- भाऊ महाजन

205) कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?
- प्लासी

राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

सह्याद्रि



पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. 

भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.


▪️भवैज्ञानिक इतिहास


सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.


ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे.


अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत. पश्र्चिम घाटाचा उत्तरेकडील गोव्यापर्यंतचा भाग प्रामुख्याने बेसाल्ट खडकांपासून तर त्याच्या दक्षिणेकडील विभाग गॅनाइट व पट्टिताश्म खडकांपासून बनलेला आहे. भूकवचात बेसाल्ट खडकाचे थर साधारण ३ किमी. खोलीपर्यंत आढळतात. चर्नोकाइट, खोंडेलाइट, लेप्टिनाइट, रूपांतरित पट्टिताश्म, स्फटिकमय चुनखडक, लोहखनिज, डोलेराइट व अ‍ॅनॉर्थाइट हे खडकही या भागात आढळतात. दक्षिणेकडील टेकडयांमध्ये अवशिष्ट जांभा खडक व बॉक्साइट खनिज आढळते.


▪️भविशेष


सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.


पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकाच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. पश्चिम उतारावर नदयांनी खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत. याच उताराच्या पायथ्यालगत कोकणची किनारपट्टी आहे. पूर्वेकडील उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन झालेला दिसतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे अनेक फाटे गेलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेव डोंगररांगा हे प्रमुख फाटे आहेत. पठारावरील नदयांचे हे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक तर दक्षिणेकडे कमी आढळते.

सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. येथपासून कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे संबोधले जात असावे. थळ घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे. सह्याद्री पर्वतश्रेणी बरीचशी सलग असली, तरी तिच्यात अधूनमधून अशा खिंडी व घाट आहेत.


सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी गिरिस्थाने वसली आहेत. कळसूबाई (१,६४६ मी.) हे महाराष्ट्रातील तसेच उत्तर सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. त्याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), हरिश्चंद्रगड (१,४२४ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत. सह्याद्री व त्याच्या वेगवेगळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, विशाळगड यांसारखे अनेक डोंगरी किल्ले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक यांदरम्यान गोवा खंड आहे. वाघेरी (१,०८५ मी.), सोंसोगड (१,१८६ मी.), मोरलेगड (१,०५४ मी.) ही गोव्यातील प्रमुख शिखरे आहेत.


सह्याद्रीच्या १६° उत्तर अक्षांश ते निलगिरी पर्वतापर्यंतच्या पर्वतीय प्रदेशाचा समावेश मध्य सह्याद्रीमध्ये करता येतो. यातील बराचसा भाग कर्नाटक राज्यात आहे. सह्याद्रीचा हा भाग अरबी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हा प्रदेश ओबडधोबड स्वरूपाचा असून घनदाट अरण्यांचा आहे. कर्नाटकातील सह्याद्रीची सरासरी उंची सु. ६०० ते १,००० मी. आहे. याचा पश्चिम उतार खडया चढणीचा व तुटलेल्या कडयांचा असून पूर्वेकडे गेलेले त्याचे फाटे म्हणजे अवशिष्ट पर्वताच्या रांगा आहेत.

म्हैसूरच्या आग्नेयीस बिलीगिरीरंजन श्रेणी असून ती शेवररॉय ( सेर्व्हरायन ) श्रेणीला मिळते. सह्याद्रीच्या येथील प्रमुख श्रेणीस काही स्थानिक नावे प्रचलित आहेत. पुष्पगिरी (१,७१४ मी.), ब्रह्मगिरी, व्हावूल माला (२,३३९मी.) ही येथील महत्त्वाची शिखरे आहेत. उंची व निसर्गसौंदर्य यांसाठी बाबा बुढण डोंगर (१,९२३ मी.), मल्लिआनिगिरी, कुद्रेमुख (१,८९४ मी.) प्रसिद्ध आहेत. नंदी व केमेनगुडी ही गिरीस्थाने आहेत. देवीमने, अगुंबे, शिराडी, चारमाडी इ. घाटमार्गांनी पठारी भाग किनारपट्टीशी जोडला गेला आहे. शरावती नदीवरील गिरसप्पा ( जोग ) धबधबा सह्याद्रीच्या याच भागात आहे.


तमिळनाडूच्या पश्चिम सीमेवर निलगिरी पर्वताचा अत्यंत जटिल असा प्रदेश आहे. निलगिरी पर्वतात उत्तर सह्याद्री, दक्षिण सह्याद्री व पूर्वघाट एकत्र येतात. या पर्वताची उंची २,००० मी.पेक्षा जास्त आहे. यातच दोडाबेट्टा (२,६३७ मी.) हे निलगिरीतील सर्वोच्च शिखर तर माकूर्ती (२,५५४ मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. ऊटकमंड हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण निलगिरी पर्वतातच आहे. निलगिरीच्या बहुतेक सर्व सीमा नैसर्गिक रीत्या भंग झालेल्या कडयांच्या आहेत.


पालघाट खिंडीमुळे पश्चिम घाटाची सलगता भंग पावली आहे. पालघाट खिंडीची रूंदी २४ किमी. व सस.पासून उंची ३०० मी. असून ही दोन समांतर विभंगांमधील खचदरी असावी. पालघाट खिंडीच्या दक्षिणेकडील सह्याद्रीचे पूर्व व पश्चिम हे दोन्ही उतार तीव्र व ओबडधोबड बनले आहेत. अन्नमलई ही दक्षिण सह्याद्रीतील प्रमुख पर्वतश्रेणी असून त्या श्रेणीतच अनाईमुडी (२,६९५ मी.) हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे.

अनाईमुडी या शृंगबिंदूपासून उत्तरेस अन्नमलई ( उंची १,८०० ते २,००० मी.), ईशान्येस पलनी (९०० ते १,२०० मी.) व दक्षिणेस कार्डमम्‌ (एलाचल) अशा तिन्ही दिशांना तीन डोंगररांगा-टेकडया गेलेल्या आहेत. कोडईकानल (२,१३५ मी.) हे प्रसिद्ध गिरिस्थान पलनी टेकडयांमध्ये आहे.


चेंबरा (२,१०० मी.), बांसुरा (२,०७३ मी.), वेल्लरीमाला (२,२०० मी.) व अगस्त्यमलई (१,८६८ मी.), महेंद्रगिरी ही केरळमधील प्रमुख शिखरे व मुन्नार, पानेमुडी, वेनाड ही थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळ व तमिळनाडू यांदरम्यानच्या वाहतुकीच्या दृष्टीने शेनकोटा खिंड विशेष महत्त्वाची असून या खिंडीच्या दक्षिणेस असलेल्या महेंद्रगिरीने (१,६५४ मी.) दक्षिण सह्याद्रीचा शेवट झालेला आहे.


पश्र्चिम घाट व अरबी समुद्र यांदरम्यान अरूंद असे किनारपट्टीचे मैदान आहे. उत्तरेकडील प्रामुख्याने महाराष्ट्रातील किनारपट्टीला कोकण तर साधारणत: गोव्याच्या दक्षिणेकडील किनारपट्टीस मलबारचा किनारा असे म्हटले जाते. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्यालगतच्या प्रदेशाला महाराष्ट्रात ‘ देश ’ तर कर्नाटकातील या प्रदेशास ‘ मलनाड ’ असे संबोधले जाते.


▪️नदया


भारतातील प्रमुख तीन जलविभाजकांपैकी पश्र्चिम घाट हा एक असून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी व अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदयांचा तो प्रमुख जलविभाजक आहे. तापी व नर्मदा या नदयांचा अपवाद वगळता भारतीय व्दिपकल्पावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या बहुतेक सर्वच प्रमुख पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या घाटमाथा प्रदेशात उगम पावतात. ही उगमस्थाने अरबी समुद्र किनाऱ्यापासून केवळ ५० ते ८० किमी.वर आहेत.


सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा,मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.


कर्नाटक राज्यातून वाहणाऱ्या घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनदयांचा उगम सह्याद्रीमध्येच आहे. घटप्रभेवरील गोकाकजवळील धबधबा सौंदर्य आणि विदयुत् निर्मितीकरिता प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम कर्नाटक राज्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडयांमध्ये तळकावेरी येथे झालेला आहे. शिम्शा, हेमवती, कब्बनी, भवानी या उपनदया सह्याद्रीत उगम पावतात.


तमिळनाडू राज्यातून पूर्वेकडे वाहणाऱ्या वैगई, चित्तार व तामपर्णी या नदयांचे उगमही पश्र्चिम घाटातच आहेत.


पश्र्चिम घाटात उगम पावणाऱ्या आणि पश्चिम किनारपट्टीवरून थोडेच अंतर वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या असंख्य पश्चिम वाहिनी नदया आहेत. पश्चिम वाहिनी नदया संख्येने बऱ्याच असल्या तरी प्रत्येकीचे खोरे तीव्र उताराचे पण मर्यादित आहे. पश्चिम किनारपट्टी अरूंद असल्याने येथील नदया लांबीने खूपच कमी आहेत. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरून वाहणाऱ्या दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नदया आहेत. गोव्यातील यापोरा, मांडवी, जुवारी, कर्नाटकातील काळी, गंगावळी, शरावती, बेडती, ताद्री व नेत्रावती तर केरळमधील बेपोर, पोन्नानी, चलाकुडी, पेरियार, कल्लदा या मुख्य पश्र्चिम वाहिनी नदया आहेत. यांपैकी पेरियार ही सर्वांत लांब (२२४ किमी.) नदी आहे.


सह्याद्रीची प्रपाती भूरचना असल्यामुळे तीव्र उतारावरून वेगाने वाहताना अनेक नदया कडयांवरून खाली कोसळत असतात. त्यामुळे त्यांच्या मार्गात अनेक प्रेक्षणीय धबधबे निर्माण झाले आहेत. उदा., कर्नाटकात शरावती नदीवरील जगप्रसिद्ध गिरसप्पा ( जोग ) धबधबा ( उंची २५३ मी.) आणि कावेरी नदीवरील प्रसिद्ध शिवसमुद्रम् धबधबा (९७ मी.). तीव्र उतारावरून वेगाने वाहणाऱ्या नदयांमुळे पश्र्चिम घाटात जलविद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अनेक आदर्श ठिकाणे आढळतात. संपूर्ण घाट परिसरात सु. ५० मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रात खोपोली येथे १९०० मध्ये बांधलेले धरण हे पश्चिम घाटातील सर्वांत आधीचे धरण आहे. जलविदयुत् निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोयना, कर्नाटकातील तुंगभद्रा, लिंगनमक्की, केरळमधील पेरांबीकुलम् ही धरणे विशेष महत्त्वाची आहेत. गिरसप्पा व शिवसमुद्रम् हे धबधबेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.


▪️हवामान


समुद्रसपाटीपासूनची उंची व समुद्रकिनाऱ्यापासूनचे अंतर यांनुसार पश्र्चिम घाटातील हवामानात तफावत आढळते. सामान्यपणे या भागातील हवामान आर्द्र व उष्णकटिबंधीय असून किनाऱ्याजवळ ते सौम्य स्वरूपाचे आढळते. उत्तरेकडील भागात १,५०० मी. उंचीपेक्षा अधिक तर दक्षिण भागात २,००० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे असते. आल्हाददायक हवामानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक थंड हवेची ठिकाणे निर्माण झाली आहेत. दक्षिण भागातील वार्षिक सरासरी तापमान २०° से. तर उत्तर भागात २४° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात काही ठिकाणी तापमान गोठणबिंदूपर्यंत खाली जाते.


बाष्पयुक्त नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांच्या मार्गात पश्र्चिम घाट येत असल्यामुळे त्या संपूर्ण प्रदेशात विशेषत: घाटमाथा आणि पश्र्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा भरपूर पाऊस पडतो. या भागात घनदाट वने असल्यामुळे सांद्रीभवनास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३०० ते ४०० सेंमी. असून काही ठिकाणी ते ९०० सेंमी.पर्यंत आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या महाबळेश्वर येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. आहे. पश्र्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत असल्याने तेथे पर्जन्यमान कमी कमी होत गेलेले आहे. दक्षिणेकडील पश्चिम घाट प्रदेशात पावसाळा दीर्घकाळ असतो.


▪️वने


पश्र्चिम घाट प्रदेशातील पर्जन्याच्या वितरणातील भिन्नतेनुसार विभिन्न प्रकारच्या वनस्पती आढळतात. २०० सेंमी.पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्र्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूवर उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित किंवा वर्षारण्ये, १५० ते २०० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम घाटाच्या पश्र्चिम बाजूस प्रामुख्याने आर्द्र, सदाहरित अरण्यांच्या पश्र्चिमेस उष्णकटिबंधीय निम-सदाहरित वने, १०० ते १५० सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या पूर्व उतारावर सदाहरित अरण्यांच्या पूर्वेस उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, तर पूर्वेकडील पायथ्यालगतच्या ७५ ते १२५ सेंमी. पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात.


सस.पासून  सु. ९०० ते १,८०० मी. उंचीच्या घाट प्रदेशात प्रामुख्याने महाबळेश्वर, निलगिरी व पलनी टेकडयांच्या परिसरात उपोष्ण कटिबंधीय रूंदपर्णी वने असून १,८०० मी.पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशात, प्रामुख्याने तमिळनाडू व केरळमधील पर्वतीय प्रदेशात, आर्द्र समशीतोष्ण कटिबंधीय वने आढळतात. केरळमधील सदाहरित वने व राष्ट्रीय उद्याने, केरळ व तमिळनाडूमधील वायनाड व मदुमलाई राष्ट्रीय उद्याने, हे पश्र्चिम घाटातील संरक्षित जंगलमय प्रदेश आहेत. पश्चिम घाटाचा संरक्षित ‘ वर्ल्ड हेरिटेज साइट ’मध्ये समावेश करावा अशी मागणी भारत सरकारने २००६ मध्ये ‘युनेस्को मॅब ’कडे केली आहे. अशा स्थळांमध्ये पुढीलप्रमाणे सात प्रमुख विभागांचा व त्यांतील वेगवेगळ्या उपविभागांचा समावेश असेल :


(१) अगस्त्यमलई विभाग : यात पुढील पाच उपविभागांचा समावेश असेल : तमिळनाडूमधील अगस्त्यमलई जीवावरणीय राखीव प्रदेश ( क्षेत्र ९०० चौ. किमी.); कालकाड मुदननुराई व्याघ राखीव प्रदेश (८०६ चौ. किमी.); केरळमधील नेय्यर, पेप्परा व शेंदूर्णे वन्यजीव अभयारण्य; त्यालगतचे आचेनकोइल, थेनमाला, कोन्नी, पुनालूर, तिरूअनंतपुरम् विभाग आणि अगस्त्य वनम् विशेष विभाग.


(२) पेरियार विभाग : यामध्ये सहा उपविभागांचा समावेश असेल : केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान व निसर्ग राखीव प्रदेश (७७७ चौ. किमी.), रन्नी, कोन्नी व आचनकोइल अरण्य विभाग. पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील प्रामुख्याने शुष्क अरण्यमय प्रदेशातील श्रीविल्लिपुत्तूर वन्यजीव अभयारण्य आणि तिरूनेलवेली अरण्य विभागातील राखीव जंगलांचा प्रदेश.


(३) अन्नमलई विभाग : यात सात उपविभागांचा अंतर्भाव असेल : तमिळनाडूमधील चिन्नर वन्यजीव अभयारण्य, एर्नाकुलम् राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), विस्तीर्ण अशा इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य प्रदेशात (९५८ चौ. किमी.) समाविष्ट असणारी इंदिरा गांधी गास हिल्स व करिअन शोला राष्ट्रीय उद्याने, पलनी हिल्स राष्ट्रीय उद्यान (७३७ चौ. किमी.), केरळमधील पेरांबीकुलम् वन्यजीव अभयारण्य (२८५ चौ. किमी.).


(४) निलगिरी विभाग : हा विभाग सु. ६,००० चौ. किमी.पेक्षाही अधिक क्षेत्रात विस्तारला आहे. यात सहा उपविभाग समाविष्ट असतील : केरळमधील निलगिरी जीवावरणीय राखीव प्रदेश आणि करिम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० चौ. किमी.), सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (९० चौ. किमी.), वायनाड वन्यजीव अभयारण्य (३४४ चौ. किमी.), तमिळनाडूमधील बंदीपूर (८७४ चौ. किमी.), माकूर्ती (७८ चौ. किमी.) व मदुमलाई (३२१ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने व न्यू अमरम्बलम् राखीव जंगल. हा विभाग अतिशय जटिल, सुरक्षित व जगातील एक वैशिष्टयपूर्ण अरण्यमय प्रदेश आहे. आशियाई हत्ती, वाघ, गवा व इतर अनेक दुर्मिळ प्राण्यांचे हे आश्रयस्थान आहे.


(५) तळकावेरी विभाग : यात सहा उपविभाग आहेत. कर्नाटकातील बह्मगिरी (१८१ चौ. किमी.), पुष्पगिरी (९३ चौ. किमी.) व तळकावेरी (१०५ चौ. किमी.) ही वन्यजीव अभयारण्ये, राजीव गांधी  राष्ट्रीय उद्यान ( नागरहोळे ३२१ चौ. किमी.) आणि केरळमधील अलाराम राखीव जंगल.


(६) कुद्रेमुख विभाग : यामध्ये कर्नाटकातील पाच उपविभाग येतात. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान(६०० चौ. किमी.), सोमेश्र्वर वन्यजीव अभयारण्य व सभोवतालची सोमेश्वर, अगुंबे व बाळहळ्ळी राखीव जंगले.


(७) सह्याद्री विभाग : यात महाराष्ट्रातील चार उपविभाग येतात. आन्शीप (३४० चौ. किमी.) व चांदोली (३१८ चौ. किमी.) ही राष्ट्रीय उद्याने. कोयना व राधानगरी ही वन्यजीव अभयारण्ये.


सह्याद्री हा जैवविविधतेचा एक खजिना आहे. तेथील सु. २,००० जातींच्या वनस्पतींचा औषधांसाठी वापर केला जातो. ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ’ने केलेल्या एका अभ्यासानुसार महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री प्रदेशात देवदेवतांच्या नावाने श्रद्धेने संरक्षित केलेल्या वनविभागांत १,६०० पेक्षा जास्त ‘देवराया ’ आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी, अभयारण्ये, राखीव व संरक्षित वने निर्माण करणे शक्य झाले आहे. येथील पर्यटनाची अनेक ठिकाणे आर्थिक क्षेत्रे असल्याने पश्र्चिम घाट विकसित होत आहे.


सह्याद्रीमुळे पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे नदयांच्या खोऱ्यांत जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची निर्मिती सुलभ झाली आहे. येथील जंगलांतून लाकूड व इतर अनेक वनोत्पादने तसेच दक्षिण सह्याद्रीतून चहा, कॉफी, रबर, मसाल्याचे पदार्थ इ. उत्पादने मिळतात. वाहतूक व व्यापाराच्या दृष्टीने पश्र्चिम घाटातील खिंडी व घाट महत्त्वाचे ठरले आहेत. अनेक कवींनी व लेखकांनी सह्याद्रीचे सौंदर्य वर्णिले आहे.


वायनाड अरण्याचा प्रदेश म्हणजे उत्तरेकडील व दक्षिणेकडील घाट प्रदेशाचा संक्रमण भाग आहे. दक्षिणेकडील भाग आर्द्र असल्याने तेथे वनस्पतींच्या असंख्य जाती आढळतात. केरळमध्ये या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे दाट अरण्ये आहेत. ‘ सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ’ हा भारतातील अतिशय महत्त्वाचा, विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांचा प्रदेश आहे. वृक्षतोडीमुळे उघडया पडलेल्या प्रदेशात गवताळ प्रदेशांची निर्मिती झालेली दिसते. मुख्यत: कर्नाटकातील पश्र्चिम घाट प्रदेश व निलगिरी पर्वतीय प्रदेशात असे विस्तृत गवताळ प्रदेश आहेत.

पूर्वी पश्र्चिम घाट प्रदेशात घनदाट अरण्ये होती. जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींना उदरनिर्वाहासाठी पुरेशा प्रमाणात फळे, कंदमुळे इ. सहज उपलब्ध होत असत. प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे सखल भागातील लोकांना अशा अरण्यमय भागात येऊन शेती करणे किंवा वसाहती स्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे जंगले सुरक्षित होती. परंतु ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर प्रामुख्याने मळ्यांच्या लागवडीसाठी व त्यानंतर इतर कारणांसाठी मोठया प्रमाणावर जंगलतोड केली गेली.


▪️जवविविधता


पारिस्थितीकीयदृष्टया पश्र्चिम घाटाला विशेष महत्त्व आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर अतिशय समृद्ध आहे. अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती येथे आढळतात. जगातील समृद्ध जैवविविधता असलेल्या प्रदेशात पश्चिम घाटाचा आठवा क्रमांक लागतो. पारिस्थितीकी वैज्ञानिक नॉर्मन मेअर्स यांच्या प्रयत्नांमुळे १९८८ मध्ये पश्र्चिम घाट परिसर पारिस्थितीकीयदृष्टया अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.


भारताच्या क्षेत्रफळाच्या केवळ ५% भूमी या प्रदेशाने व्यापली असली तरी भारतातील उच्च दर्जाच्या २७% वनस्पती ( सु. ४,००० ते १५,००० जाती ) येथे आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती केवळ याच प्रदेशात पाहावयास मिळतात. त्यामुळे या वनस्पती म्हणजे या प्रदेशाची वैशिष्टये बनली आहेत. सुमारे पाच हजारांवर फुलझाडांच्या जाती पश्र्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.


पश्र्चिम घाटातील पर्वतश्रेण्या म्हणजे असंख्य वन्य प्राण्यांची महत्त्वाची आश्रयस्थाने आहेत. या संपूर्ण परिसरात किमान १३९ सस्तन प्राण्यांच्या जाती, १७९ जल - स्थलचर ( उभयचर ) वर्गातील प्राण्यांच्या जाती व ५०८ पक्ष्यांच्या जाती आढळतात. त्यांपैकी सस्तन प्राण्यांच्या ७, उभयचर प्राण्यांच्या ८४ व पक्ष्यांच्या १६ जाती जगात अन्य कोठेही आढळत नाहीत. जगाच्या अन्य भागांतून नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या किमान ३२५ प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. येथील मोठया ठिपक्यांचे जंगली कस्तुरी मांजर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. येथे माकडांची संख्याही प्रचंड आहे. मोठया शेपटीच्या माकडांची संख्या सायलेंट व्हॅली व कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानांत सर्वाधिक आहे. विविध जातींच्या गोगलगाई, सरपटणारे प्राणी, वटवाघुळे, फुलपाखरे यांची संख्या प्रचंड आहे. एकटया केरळमधील पश्चिम घाट परिसरात सु. ६,००० जातींचे कीटक आहेत. फुलपाखरांचे ३३४ प्रकार येथे आढळतात. येथील प्रवाहांमधून विविधरंगी मासे पाहावयास मिळतात.


निलगिरी पर्वतीय प्रदेशात हत्ती, गवा, हरिण, चित्ता, अस्वल, सांबर, रानडुक्कर, वाघ इ. पाणी आढळतात. त्यांच्यासाठी मदुमलाई येथे अभयारण्य राखून ठेवलेले आहे. निलगिरी पर्वतात हत्तींची संख्या सर्वाधिक आहे; तसेच बह्मगिरी व पुष्पगिरी वन्यप्राणी अभयारण्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान व अन्नेकल राखीव जंगलात हत्तींची संख्या पुष्कळ आहे.


कर्नाटकातील पश्चिम घाट प्रदेशात सु. सहा हजारांवर हत्ती व देशातील १०% दुर्मिळ जातींचे वाघ आहेत ( सन २००४). देशातील सुंदरबन व्यतिरिक्त वाघांची संख्या अधिक असणारा पश्चिम घाटातील सलग अरण्यांचा प्रदेश कर्नाटक, तमिळनाडू व केरळमध्ये पसरला आहे. पश्चिम घाटात गवे मोठया प्रमाणात आढळतात. कर्नाटकातील बंदीपूर राष्ट्रीय अभयारण्य व नागरहोळे या दोन प्रदेशांत सु. पाच हजारांवर गवे आहेत. महाराष्ट्रात दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. निलगिरी लंगूर मोठया संख्येने कोडगू जंगलात आढळतात. भारतीय मंटजॅक हरणे भद्रा वन्यप्राणी अभयारण्यात तसेच चिकमगळूरच्या राखीव व्याघ प्रकल्प प्रदेशात मोठया संख्येने आहेत.


ब्राझीलमधील रिओ दे जानेरो येथे झालेल्या ‘ जागतिक वसुंधरा ’ परिषदेमध्ये (१९९२) पश्र्चिम घाटाची गणना जगातील अठरा अतिसंवेदनशील ( हॉटस्पॉट ) अशा पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे. भारत सरकारने येथील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यादृष्टीने दोन जीवावरणीय राखीव प्रदेश, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक वन्यप्राणी अभयारण्ये व राखीव जंगलांची घोषणा केली आहे.


हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव

🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे



📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे

📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात

📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.

📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते

🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰

  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर

  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक

  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा

  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
 
  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार

  🎇 तोरणा 1,404 मी पुणे

  Trick 👇👇
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆

  🌸 क  = कळसुबाई
  🌸 सा  = साल्हेर
  🌸 मी  = महाबळेश्वर
  🌸 हा   = हरिश्चंद्रगड
  🌸 स   =सप्तश्रृंगी
  🌸 तो   = तोरणा
  🌸 अ  =  अस्तंभा
  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर
  🌸 तिला =  तौला
  🌸 वि    = विराट
  🌸 चा    = चिखलदरा

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
-----------------------------

निजाम राजवटीची स्थापना


1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.


2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.


3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.


4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.


5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.


6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.


7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.


8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.


9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.


इंग्रज निजाम संबंध


1. निजामाच्या हाताखाली दक्षिणेतील सहा सुभे आणि त्यांतील कडप्पा, कुर्नूल, अर्काट, शिरे व सावनूर हा नबाबाचा प्रदेश होता. याशिवाय म्हैसूर, तंजावर संस्थांनाचे राजे त्याचे मांडलिक म्हणून समजले जात.


2. दक्षिणेत त्यास प्रथम मराठे नंतर इंग्रज, हैदर व टिपू हे प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचे बळ खच्ची करण्याकरिता निजामाने अनेक उपाय योजले; पण त्याच्या सर्व कारस्थानांना शह देणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशव्याने निजाम व दिल्लीकर मोगल यांचे संबंध तोडण्याचे प्रयत्न करुन निजामाच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविल्या.


3. १७४८ मध्ये निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर निजामशाहीत गोंधळ माजला. नवा निजाम नासिरजंग याच्याविरुद्ध त्याचा भाचा मुजफ्फरजंग याने बंड पुकारुन अर्काटच्या नबाबामार्फत फ्रेंचांशी संधान बांधले. या प्रकरणी झालेल्या लढायांत प्रथम नासिरजंग व नंतर मुजफ्फरजंग मारले जाऊन, नासिरजंगाचा भाऊ सलाबतजंग गादीवर आला सलाबतजंगाच्या दरबारी फ्रेंचांचे वर्चस्व वाढून उत्तर सरकार या नावाने ओळखला जाणारा प्रदेश फ्रेंच सैन्याच्या खर्चासाठी देण्यात आला.


4. १७५५ मध्ये इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध होऊन उत्तर सरकारचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला. हा ताबा कबूल करण्यात यावा आणि त्याबाबत कंपनीतर्फे काही ठराविक रक्कम निजामाला देण्यात यावी, अशी बोलणी करण्याकरिता इंग्रजांनी आपले दोन अधिकारी हैदराबादला सलाबतजंगाकडे पाठविले, हाच निजाम व इंग्रजांचा आलेला पहिला संबंध होय. सलाबतजंगाने इंग्रजांची मागणी मान्य केली व उत्तर सरकारचा प्रदेश कायमचा इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला.


5. सलाबतजंगाला गादीवरुन काढून त्याचा धाकटा भाऊ निजाम अली १७६२ मध्ये निजाम बनला. त्याने आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत हैदर अली व टिपू यांच्याशी झालेल्या युद्धांनंतर इंग्रजांशी पूर्ण सहकार्य करुन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.


6. १७९५ मध्ये निजाम अलीने मराठ्यांविरुद्ध इंग्रजांनी आपणास मदत करावी, अशी मागणी केली पण इंग्रजांनी निजामाची विनंती नाकारली. त्याचा परिणाम म्हणजेच खर्ड्याच्या लढाईत (१७९५) पराभूत होऊन निजामास मराठ्यांबरोबर नामुष्कीचा तह करावा लागला.


7. इंग्रजांनी या युद्धात आपल्याला मदत केली नाही, याचे वैषम्य वाटून निजामाने आपल्याकडे असलेल्या इंग्रजी सैन्याला परत पाठविले, पण स्वतःचा मुलगा अलीजाहने बंड केल्याने निजामास हे सैन्य परत बोलवावे लागले.


8. या काळात निजामाच्या सैन्यात फ्रेंचांचे बरेच वर्चस्व होते. पण १७९८ मध्ये फ्रेंच सेनापती मुसा रेमाँच्या मृत्यूनंतर हे सैन्य बरखास्त करावे, अशी इंग्रजांनी केलेली मागणी निजामाने मान्य केली. यामुळे फ्रेंचांची मक्तेदारी संपून निजामाच्या दरबारात इंग्रजांचे वर्चस्व वाढले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणच्या टिपूविरुद्धच्या लढाईत निजामाने इंग्रजांस मदत केली. लॉर्ड वेलस्लीने सुरु केलेल्या तैनाती फौजेच्या पद्धतीस निजाम बळी पडला.


9. १२ ऑक्टोबर १८०० मध्ये निजाम व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तह झाला. या तहान्वये निजामाच्या संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबाद येथे कायम ठेवण्यात आली. निजामाने भारतातातील कोणत्याही सत्ताधीशांबरोबर कसलाही संबंध ठेवणार नाही, असे कबूल केले.


10. इंग्रजी फौजेच्या खर्चाकरिता श्रीरंगपटणच्या लढाईत मिळालेले कडप्पा, कुर्नूल, अनंतपूर व बल्लारी हे जिल्हे निजामाने इंग्रजांना कायमचे दिले. त्यांच्या मोबदल्यात निजामाचे परचक्रापासून व राज्यातील बंडखोरीपासून रक्षण करण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतलीयावेळेपासून निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले.


11. ही घटना निजाम अलीचा मुलगा सिकंदरजाह, सरदार महिपतराव वगैरेंना आवडली नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारस्थाने व हैदराबाद राज्याविरुद्ध बंडे सुरु केली. १८०० ते १८५७ या काळातील सिकंदरजाह, रावरंभा निंबाळकर, महिपतराव वगैरेंची कारस्थाने, त्याचप्रमाणे निरनिराळ्या जमातींची व व्यक्तींची बंडे मुख्यतः इंग्रजी सैन्याने मोडून काढली.१८५७ च्या उठावात हैदराबादच्या जनतेने भाग घेतला, पण इंग्रज आणि सालारजंग यांनी या चळवळीचा बंदोबस्त करण्यात यश मिळविले.


12. १८५७ नंतरच्या काळात मुख्यतः निजाम व इंग्रजांविरुद्धच्या हैदराबादमधील जनतेच्या सनदशीर चळवळींचा समावेश होतो. त्यांत १८९२ मधील आर्यसमाजाची स्थापना, १९०५ मधील स्वदेशी चळवळ, १९१० मधील दहशतवाद्यांची कृत्ये, १९२१ मधील आंध्र महासभा व स्टेट रीफॉर्म्स असोसिएशनची स्थापना व १९३८ मधील काँग्रेस, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचा सत्याग्रह वगैरे महत्त्वाच्या घटना होत.


13. १८८० पासून हिंदी मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून इंग्रजांनी, निजाम व त्याचे अधिकारी यांच्या मनात, हैदराबादच्या राज्यास मोगली साम्राज्याचा अवशेष व मुसलमान संस्कृतीचे प्रतीक म्हणून विशिष्ट स्थान आहे, अशा प्रकारची कल्पना भरविली.


14. अर्थात त्यामुळेच पुढील राजकारणात निजामाने इंग्रजांना नुसतीच मदत केल

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान

🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

महाराष्ट्राचा इतिहास




*⭕️ मौर्य ते यादव ⭕️*

*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
________________________________

वडियार घराणे :: म्हैसूर

◾️राजधानी :- म्हैसूर, श्रीरंगपट्टण

◾️राष्ट्रप्रमुख:- पहिला राजा: यदुराय
(इ.स. १३९९-१४२३)

◾️अंतिम राजा: जयचामराज वडियार
(इ.स. १९४०-४७)

◾️सद्याचे  म्हैसूर शहराजवळ  इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले

◾️ सुरुवातीस विजयनगरच्या अध्यापत्याखाली होते

◾️पराक्रमी राजे:- पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार, यदुराय, जयचामराज

◾️1565 मध्ये विजयगनर साम्राज्य संपल्यावर म्हैसुर सार्वभौम झाले

◾️18 व्या शतकाच्या मध्यात म्हैसुरचा वारस लहान असल्याचा फायदा सेनापती हैदर अलीने घेतला

◾️हैदर ने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली

◾️संस्थानाचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी हैदर इंग्रजांबरोबर 2 युद्ध लढले

◾️हैदर नंतर टिपू सुलतान ही 2 युद्ध लढला

◾️ मात्र 1799 च्या वेलस्ली बरोबरच्या 4थ्या युद्धात पराभव झाला, टिपू मारला गेला

🔺 चौथ्या श्रीरंगपट्टणमच्या युध्दाने म्हैसुर घराणे मुळ राजा वडीयार यांना परत केले

चंद्रगुप्त पहिला ,चंद्रगुप्त मौर्य 

  चंद्रगुप्त पहिला -

 हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे.

☘  चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.

   चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .

☘   चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .

वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे.

तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई.

☘  लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला.

नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.

  चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे.

चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय  .

_____________________________

  चंद्रगुप्त मौर्य 

連  (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.

   मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.

連  चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..

_____________________________

   चंद्रगुप्त मौर्य .

जन्म

जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म

  राज्यकाल

नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली

हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला.

लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.

या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली.
ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला

दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही .
परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

चंद्रगुप्त मौर्य

🦚  (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.

🌷   मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो.

🦚  चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.खर याला कोठे ही पुरावे सापडले नाही आहे की चाणक्य होता..

🌺🌺   चंद्रगुप्त मौर्य  🌺🌺

जन्म

जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८ मध्ये जन्म

🌺  राज्यकाल

नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली

हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला.

या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला

दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

☘☘☘🍂🍂☘☘☘🍂🍂☘☘☘🍂☘☘

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ?

- अरगॉन.


०२) आंध्र प्रदेशचे विभाजन करून नवीन तयार केलेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०३) 'एरंडाचे गुऱ्हाळ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

- चिं.वि.जोशी.


०४) क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

- रणजीतसिंह.


०५) रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात ?

- ल्युकेमिया. 


०१) ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात ?

- अमृत महोत्सव.


०२) सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच पर्वतशिखर कोणते?

- अस्तंभा.


०३) राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?

- अंजीर.


०४) जगप्रसिद्ध ताजमहल ही वास्तू कोणी बांधली ?

- शहाजहान.


०५) जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?

- पॅसिफिक महासागर.(प्रशांत महासागर)



०१) शरीरास सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते ?

 - कॅल्शियम. 


०२) मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करतात ?

- कल्ले.


०३) 'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?

- राजीव गांधी.


०४) कोणता रंग उष्णता जास्त आकर्षित करतो ?

 - काळा.


०५) दिवसा वनस्पती कोणता वायू  सोडतात ?

- ऑक्सिजन.


०१) 'कर्नाळा' हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- रायगड.


०२) शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख कोण होते ?

- बहिर्जी नाईक.


०३) भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता ?

- आर्यभट्ट.


०५) पी.व्ही. सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?

- बॅडमिंटन.


०१) पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

- सियाल.


०२) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ?

- आंबोली.


०३) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ?

- गडचिरोली.


०४) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

- अथेन्स.


०५) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

- गॅमा.


०१) संगणक (काॅम्प्युटर) चा शोध कोणी लावला ?

- चार्ल्स बॅबेज.


०२) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) लोकसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

- ५ वर्ष. 


०४) भारतात वनाखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) ऑलिंपिक ध्वज सर्वप्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आला ?

- १९२०.(बेल्जियम)


०१) 'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?

- महात्मा गांधी.


०२) भूदान चळवळ कोणी सुरू केली ?

- विनोबा भावे. 


०३) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०४) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी काशीवरून कोणाला बोलावले होते ?

- गागाभट्ट.


०१) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?

- १६०० साली.


॰२) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?

- देवनागरी.


०३) पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?

- १८९६.(ग्रीस)


०४) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

- आमदार.


०५) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त    कोणत्या राज्यात होतो ?

- अरुणाचल प्रदेश. 


०१) 'द वॉल'असे कोणत्या क्रिकेटपटूस म्हटले जाते ?

- राहुल द्रविड.


०२) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणास म्हणतात ?

- केशवसुत.


०३) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे आहे ?

 - लोझान.(स्वित्झर्लंड)


०४) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- ६ वर्ष.


०५) भारतात १८५३ साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवाशी कोण होते ?

- नाना शंकरशेठ.



०१) मोरारजी देसाई यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- अभयघाट.( दिल्ली )


०२) नवीन ५०० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- लाल किल्ला.( दिल्ली )


०३) युरोपचे क्रिडांगण कोणत्या देशास म्हणतात ?

- स्वित्झर्लंड.


०४) भारतातील सर्वांत मोठे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०५) बेटी बचाओ,बेटी पढाओ योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २२ जानेवारी २०१५



०१) भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

- दहा वर्षांनी.


०२) भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?

- गुजरात.


०३) तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

- दिल्ली.


०४) देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

- गुजरात व महाराष्ट्र.


०५) भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

- छोटा नागपूर.



०१) MCS चे संक्षिप्त रूप काय आहे ?

- मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स.


०२) त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी वाहत जाते ?

- गोदावरी.


०३) PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे ?

- प्रक्षेपण यान.


०४) शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

- दुग्ध व्यवसाय.


०५) रिकी पाँटिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- क्रिकेट.


०१) चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- वशिष्ठ.


 ०२) सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- पॅराजलतरण.


०३) स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

- ब्युटेन.


०४) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०५) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया



०१) कोणते नाटक बघितल्यानंतर प्रभावित होऊन गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला ?

- राजा हरिश्चंद्र. 


०२) सर्वाधिक नोबेल पारितोषिक मिळविणारा देश कोणता ?

- अमेरिका.


०३) एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकणारा प्राणी कोणता ?

- सरडा.


०४) कठीण पाणी मृदू करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

- सोडियम कार्बोनेट. 


०५) ग्रामसभेत कुणाकुणाचा समावेश होतो ?

- गावातील सर्व प्रौढ मतदारांचा.


०१) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- जम्मू काश्मीर. 


०२) 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०३) रक्तगट कोणी शोधून काढले ?

- कार्ल लँडस्टेनर.


०४) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?

- लोकमान्य टिळक.


०५) पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

- जोनास साल्क.



०१) आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?

- धारावी.(मुंबई)


०२) भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?

- मुंबई.


०३) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?

- नागपूर.


०४) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

- राज्यपाल.


०५) जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?

- सरदार वल्लभभाई पटेल.(गुजरात )



०१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय ?

- मिशेल ओबामा.


०२) मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे ?

- ऍ आणि ऑ.


०३) गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते ?

- शिक्षक दिन.(५ सप्टेंबर)


०५) उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला ?

- चार्ल्स डार्विन.(इंग्लैड)



०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.(कर्नाटक)


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ?

- १५ ऑगस्ट १९४७.


०२) 'आद्य क्रांतिकारक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- वासुदेव बळवंत फडके.


०३) संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केव्हा करण्यात आली ?

- १९२९.


०४) माळढोक पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सोलापूर.


०५) अण्णा हजारे यांचे मूळ गाव कोणते आहे ?

- राळेगणसिद्धी.(अहमदनगर)


०१) महाबळेश्वरचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- स्ट्रॉबेरी.


०२) 'कथकली' हा कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

- केरळ.


०३) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?

- लुंबिनी.(नेपाळ)


०४) घोड्याच्या निवार्‍याला काय म्हणतात ?

- तबेला.


०५) जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?

- मौसिनराम.


०१) भारतातील संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य कोणते आहे ?

- केरळ. 


०२) 'चला जाणूया नदीला' या अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली ?

- १५ ऑक्टोबर २०२२.


०३) भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

- नवी दिल्ली.


०४) असहकार चळवळ कोणी सुरू केली ?

- महात्मा गांधी.


०५) भारतात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत ?

- उत्तरप्रदेश.


०१) नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल झालेल्या व्यक्तीचे नाव काय ?

- रमेश बैस.


०२) रोजगार हमी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

-  महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेची कार्यकारी समिति कोणती आहे ?

- ग्रामपंचायत.


०४) भारत छोडो आंदोलनाचा ठराव कोणी मांडला ?

- महात्मा गांधी.


०५) महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय केव्हापासून पेपरलेस होणार आहेत ?

- १ एप्रिल २०२३.


०१) भारताचा पहिला नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- भारताचे राष्ट्रपती.


०२) वनस्पती कोणत्या प्रकारचे वायू शोषून घेतात ?

- कार्बन डायऑक्साइड.


०३) चंद्रावर चालणाऱ्या पहिल्या माणसाचे नाव काय ?

- नील आर्मस्ट्रॉंग.


०४) जगातील सर्वात घनदाट जंगलाचे नाव सांगा ?

- अ‍ॅमेझॉन रेन फॉरेस्ट.


०५) जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाचे नाव काय ?

- तिबेट.


०१) महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- राजघाट.( दिल्ली )


०२) नवीन १०० रु.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- राणी की वाव.( गुजरात )


०३) कांगारूचा देश कोणत्या देशास म्हणतात ?

- ऑस्ट्रेलिया.


०४) भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?

- थर वाळवंट.( राजस्थान )


०५) स्वच्छ भारत मिशन योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २ ऑक्टोबर २०१४


०१) शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कधी केली ?

- १६४६.


०२) राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होती ?

- प्रतिभाताई पाटील.


०३) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?

- गंगापूर.(नाशिक)


०४) ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

- मुख्य कार्यकारी अधिकारी.(CEO)


०५) भारतात डमडम हे विमानतळ कोठे आहे ?

- कोलकाता 


०१) जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

- चीनची भिंत.(२४१५ किमी)


०२) कोणताही हिंदी चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होतो ?

- शुक्रवारी.


०३) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?

- ग्रामसेवक.


०४) गावात शांतता व सुव्यवस्था  राखण्याचे कार्य कोण करतो ?

- पोलीस पाटील.


०५) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०१) फेसबुकचा शोध कोणी लावला ?

- मार्क झुकेरबर्ग.


०२) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते ?

- मुंबई.(१९७२)


०३) सासवडचे कोणते फळ प्रसिद्ध आहे ?

- सीताफळ.


०४) मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

- चेन्नई.


०५) आधुनिक भारताचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 

महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप - २५ मध्ये स्थान मिळविणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ?

- पी.व्ही.सिंधू.


०२) भारत सरकारने भूकंपग्रस्त देशात बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी कशाची घोषणा केली ?

- ऑपरेशन दोस्त. 


०३) राजस्थानच्या वाळवंटाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मरुस्थळ.


०४) डेसिबल या एककाने काय मोजतात ?

- ध्वनीची तीव्रता.


०५) आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?

- भोपाळ.


०१) इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- शक्तीस्थळ.( दिल्ली )


०२) नवीन ५० रू.चे नोटेवर कशाचे चित्र आहे ?

- हम्पी रथ.( कर्नाटक )


०३) काळे खंड कोणत्या देशास म्हणतात ?

- आफ्रिका.


०४) भारतातील सर्वांत मोठा घुमट कोणता ?

- गोल घुमट.(विजापूर)


०५) मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरूवात केव्हा झाली ?

- २५ डिसेंबर २०१४.


०१) ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे ?

- तुकडोजी महाराज.


०२) भारतातील सर्वात प्रथम I.C.S. अधिकारी व्यक्ती कोण होते ?

- सत्येन्द्रनाथ टागोर.


०३) भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता ?

- परमवीर चक्र.


०४) जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती ?

- महाभारत काव्य.


०५) स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात ?

- १५०० फुट खोल.


०१) भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?

- इंडियन एअरलाइन्स.


०२) भारतात चारमिनार कोठे आहे ?

- हैद्राबाद.


०३) गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- गांधीनगर. 


०४) इंडिया गेट कोठे आहे ?

- दिल्ली. 


०५) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?

- अनंत.


०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?

- गॅलिलिओ गॅलिली.


०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?

- अलेक्झांडर पार्क्स.


०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

- फुलटोचा.


०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?

- MH.


०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?

- दादर.(मुंबई)


०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- नानज अभयारण्य,सोलापूर. 


०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

- दक्षिण आफ्रिका.


०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?

- लिथियम.


०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?

- कुतुबुद्दीन ऐबक.


०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?

- पाकिस्तान.


०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?

- महर्षि धोंडो केशव कर्वे.


०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जीनिव्हा.


०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?

- ड्यूटी,ऑनर,करेज.


०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?

- अमेरिका.


०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?

- जीव - रासायनिक.


०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?

- फेदम.


०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?

- कोपर्निकस.


०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

- टेंपिंग.



०१) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?

- पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.


०२) साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

- अहमदनगर.


०३) मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?

- आठ.


०४) १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?

- शिव जयंती उत्सव.


०५) इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

- कवितालेखन,साहित्यलेखन.


०१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?

- जैसलमेर,राजस्थान.


०२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?

- हिंदुस्थान का दिल धडका दो.


०३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?

- राळेगण सिद्धी.


०४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?

- २२ नोव्हेंबर १९९५.


०५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?

- रियासी जिल्हा,जम्मू काश्मीर.


०१) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

- कुलाबा.


०२) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

- १८९७.


०३) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

- बराकपूर.


०४) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

- मिनामाटा.


०५) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

- ॲडम स्मिथ.


०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

 - ५ जून.


०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

- ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- पुणे.


०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- गोंदिया.


०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

- कचारगड.(गोंदिया)


०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.


०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.


०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.


०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.


०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर. 


०२) सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता ?

- नेपच्यून.


०३) सूर्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह किती आहेत ?

- आठ.


०४) 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' हे झेंडा गीत कोणी लिहिले ?

- शामलाल गुप्ता.


०५) सिग्नल चा शोध कोणी लावला ?

- गॅरेट मॉर्गन.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)


०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?

- महात्मा गांधी.


०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

- केरळ,सिंगभुम.(झारखंड)


०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

- सात.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?

- केवळ एक.


०२) इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?

- लिथियम.


०३) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?

- रोहीत शर्मा.


०४) संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?

- ॲटोनियो गुटेरेस.


०५) १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?

- उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी.


०१) गोल घुमट कुठे आहे ?

- विजापूर.


०२) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- कोल्हापूर.


०३) जैन साहित्याला काय म्हणतात ?

- आगम.


०४) कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०५) तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरून तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?

- ताम्रपट.


०१) भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?

- राजस्थान.


०२) वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?

- राष्ट्रकूट.


०३)  मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?

- लिओनार्दो दा विंची.


०४) वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?

- पोर्तुगीज.


०५) तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?

- कृष्णदेवराय.(विजयनगर)


०१) भारतीय सभागृहाचे नाव काय आहे ?

- संसद.


०२) जागतिक कामगार संघटनेची स्थापना केव्हा झाली ?

- १९४६ साली.


०३) आवाजाची तीव्रता कशामधे मोजतात ?

- डेसिबल.


०४) भारतीय अवकाश यान उड्डाण केंद्र कोठे आहे ?

- श्रीहरिकोटा.


०५) तांबे व जस्त यांच्या मिश्रनातुन काय बनते ?

- पितळ.


०१) समाजस्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले ?

- र.धो.कर्वे.


०२) शरीरातील फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होते ?

- वाढ खुंटते.


०३) मानवी किडणीत कोणता खडा आढळतो ?

- कॅल्शियम ऑक्सोलेट.


०४) कागद बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?

- बांबू.


०५) लाल बहादूर शास्त्री अकॅडमी कोठे आहे ?

 - नाशिक.


०१) राज्यसभेतील सभासदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- सहा वर्ष.


०२) मेंढ़ीच्या केसापासून काय बनविले जाते ?

- लोकरी.


०३) भारतातील कमी साक्षरतेचे राज्य कोणते ?

- बिहार.


०४) इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?

- दिल्ली.


०५) गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे ?

- मुंबई.


०१)  'काका' या नावाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध असणारा अभिनेता कोणता?

- राजेश खन्ना.


०२) आर.के.लक्ष्मण हे कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

- व्यंगचित्रकार.


०३) भारताचा "मॅक्झिम गॉर्की" असा गौरव कोणत्या महान साहित्यिकाचा केला जातो ?

- अण्णाभाऊ साठे.


०४) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- ताराबाई शिंदे.


०५) 'सुपर मॉम' या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?

- मेरी कोम.


०१) कोणाच्या घोड्याचे नाव चेतक असे होते ?

- महाराणा प्रताप.


०२) कोणत्या पक्षाला 'शांतीदूत' असे म्हटले जाते ?

- कबूतर.


०३) एका वर्षात कमाल किती व्यक्तींना भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो ?

- तीन.


०४) 'लोकनायक' असे कोणास म्हटले जाते ?

- जयप्रकाश नारायण.  


०५) महात्मा गांधी यांचा वध कोणी केला ?

- नथुराम गोडसे.


०१) राजीव गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- विरभूमी.


०२) कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

- रशिया 


०३) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलमआरा.


०४) आसाम राज्याची राजधानी कोणती आहे ?

- दिसपूर.


०५) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरूवात कोणी केली ?

- कुशाण.


०१) रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

- विसावे.


०२) राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

- रेखा शर्मा.


०३) जगातील सर्वाधिक डाळ व विशेषता तूरडाळ सेवन करणारा देश कोणता ?

- भारत.


०४) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले ?

- शिंदे गट.


०५) पृथ्वीवरील सर्वात मोठा सजीव प्राणी कोणता ?

- देवमासा.(व्हेल)


०१) 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

- बंकिमचंद्र चटर्जी.


०२) 'शाळा' कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

- मिलिंद बोकील. 


०३) गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?

- जातक कथा.


०४) कोणत्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले जाते ?

 - रौलेट कायदा.


०५) बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?

- सरदार वल्लभभाई पटेल.


०१) आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण ?

- ह.ना.आपटे.


०२) जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

- ७ एप्रिल.


०३) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते ?

- आंध्रप्रदेश.


०४) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?

- अंतरा मेहता.


०५) जम्मू काश्मीर मध्ये ३७० हे कलम केव्हा हटवले ?

- ०५.०८.२०१९.


०१) बिहार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

 - करम ही धरम.


०२) भारतातील सर्वांत मोठे पात्र असलेली नदी कोणती आहे ?

- ब्रम्हपुत्रा.


०३) केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र कोठे आहे ?

- सांगोला.(महाराष्ट्र)


०४) मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली आहे ?

- दादोबा पांडूरंग तर्खडकर.


०५) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

- दिल्ली.


०१) चौधरी चरणसिंह यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

- किसान घाट.


०२) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

- ११ मे.


०३) भारतातील सर्वांत पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?

- ताजमहल.(मुंबई)


०४) अरूणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?

- इटानगर.


०५) मौर्य घराण्याचा शेवटच्या राजाचे नाव काय होते ?

- बृहद्रथ.


०१) विभक्ति' हा शब्द कोणत्या विभागातील आहे ?

- व्याकरण विभाग.


०२) उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?

- लातूर.


०३) परभणी जिल्ह्यात कोणते  विद्यापीठ आहे ?

- मराठवाड़ा कृषी विद्यापीठ.


०४) भारतात कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्रियांचे प्रमाण अधिक आहे ?

- केरळ.


०५) गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?

- राम गणेश गडकरी.


०१) ३५ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन केव्हा पार पडले ?

- ११ ते १२ मार्च २०२३.


०२) एअरो इंडिया शो - २०२३ चे ब्रीदवाक्य काय होते ?

- अब्जावधी संधीकडे नेणारी धावपट्टी. 


०३) 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचा प्रारंभ कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आला ?

- चंद्रपूर.


०४) जीवनसत्त्व ब - १ चे रासायनिक नाव काय आहे ?

- थायमिन.


०५) महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहे ?

- सुधीर मुनगंटीवार.


०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली ?

- सातारा.


०२) UPI चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Unified Payments Interface.


०३) भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना कधी झाली होती ?

- १९८०.


०४) महाराष्ट्रात बस सेवा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली ?

- पुणे ते अहमदनगर.(१९४८)


०५) स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ?

- अष्टप्रधान मंडळ.


०१) वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात ?

- हरितद्रव्य.


०२) संगणकीय भाषेत MB म्हणजे काय ?

- मेगा बाईट.


०३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

- सुरवंट.


०४) कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय ?

- स्पाईडर.


०५) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते ?

- तेलंगणा.


०१) 'दी प्राॅब्लेम ऑफ रूपी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) निरूपयोगी तांबड्या पेशींचे विघटन कोठे होते ?

- प्लिहा.


०३) महार रेजिमेंटचे आदर्श वाक्य काय आहे ?

- यश सिद्धी.


०४) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

- राजा राममोहन राॅय.


०५) शरीरातील सर्वांत लहान हाड कोणते ?

- स्टेप्स.(कानाचे हाड़)


०१) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे ?

- एकनाथ शिंदे.


०२) गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?

- तामिळनाडू.


०३) स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- पंडित जवाहरलाल नेहरू.


०४) देहू ही महाराष्ट्रातील कोणत्या थोर संताची कर्मभूमी आहे ?

- संत तुकाराम.


०५) संगणक बंद करण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

- शट डाऊन.


०१) 'हरित मुख्यमंत्री' म्हणून कोण ओळखले जातात ?

- शिवराजसिंह चौहान,मुख्यमंत्री मध्यप्रदेश.


०२) लिव्हिंग हेरिटेजचा मान मिळवणारे जगातील पहिले विद्यापीठ कोणते ?

- विश्वभारती विद्यापीठ.


०३) नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

- बी.व्ही.आर.सुब्रमण्यम.


०४) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन व शिवराई.


०५) जीवनसत्त्व ब - ३ चे रासायनिक नाव काय आहे ?

- नायसिन.


०१) अष्टविनायकापैकी थेऊरच्या गणपतीचे नाव काय आहे ?

- चिंतामणी.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) आग्रा शहर कोणी तयार केले आहेत ?

- सिकंदर लोदी.


०४) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते ?

- अवंतिका.


०५) चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता ?

- एडिस इजिप्ती.


०१) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?

- जायकवाडी.(पैठण)


०२) खजुराहो येथील प्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत ?

- मध्यप्रदेश.


०३) भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?

- जामा मशीद.(दिल्ली) 


०४) 'मॉर्निंग स्टार' असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?

- शुक्र.


०५) पाण्याचा गोठणबिंदू किती असतो ?

- ०° (शून्य अंश सेल्शिअस)


०१) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली ?

- कोलकाता.


०२) हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते ?

- लिंबू.


०३) पहिल्या भारतीय पाणबुडीचे नाव काय आहे ?

- कलवरी.


०४) परमवीरचक्र मिळविणाऱ्या पहिल्या  व्यक्तीचे नाव ?

- मेजर सोमनाथ शर्मा.


०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?

- अहमदनगर.


०१) राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे होते ?

- राष्ट्रपती.


०२) भुईमूग या पिकाचे सर्वांधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- गुजरात.


०३) जागतिक शेतकी प्रदर्शन दिल्ली येथे कोणी भरविले ?

- डाॅ.पंजाबराव देशमुख.


०४) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?

- डाॅ.होमी भाभा.


०५) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?

- भुईमूग.


०१) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

- पहिला.


०२) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?

- हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.


०३) भारताची राजधानी कोणती आहे ?

- नवी दिल्ली.


०४) भारताचे प्रवेशद्वार कोणते ?

- गेट वे ऑफ इंडिया.


०५) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?

- शेती.


०१)आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?

- गलगंड.


०२) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?

- २४.


०३) निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने होतात ?

- ७२.


०४) युनिव्हर्सल डोनर (सर्वयोग्य दाता) असे कोणत्या रक्तगटास म्हणतात ?

- ओ.


०५) भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात ?

- १७.


०१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे ?

- बावीस.


०२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण ?

- लॉर्ड माउंटबॅटन.


०३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?  

 - हॉकि.


०४) नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण ?

- रविंद्रनाथ टागोर.


०५) भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?

- कमळ.


०१) महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता ?

 - हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

- जिनिव्हा.


०२) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात ?

- मेजर ध्यानचंद.


०३) आहारातील 'ड' जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण कोणते ?

- निद्रानाश.


०४) मैग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

- Mg.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१) सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

- चादरीसाठी.


०२) तुळजाभवानी मातेचे मंदीर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- उस्मानाबाद.


०३) रेणुका मातेचे मंदीर कोठे आहे ?

- माहूर.


०४) महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते ?

- मुख्य सचिव. 


०५) लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात ?

- ३६६ दिवस.


०१) औरंगाबाद आता कोणत्या नविन नावाने ओळखले जाणार आहे ?

- छत्रपती संभाजीनगर.


०२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

- सईबाई.


०३) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

- १ मे १९६०.


०४) जीवनसत्त्व ब - ७ चे रासायनिक नाव काय आहे ?

- बायोटिन.


०५) भारतातील सर्वात विकसित शहर कोणते आहे ?

- बंगलोर.



०१) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला ? 

- प्रमोद चौगुले.


०२) भारतात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा कोणती ?

- मराठी.


०३) 'पक्ष्यांचा राजा' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?

- गरूड.


०४) जीवनसत्त्व 'के' चे रासायनिक नाव काय आहे ?

- फायलोक्विनोन 


०५) शिवरायांचे बालपण कुठे गेले ?

- पुणे.



०१) कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?

- लोह.


०२) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?

- कोलकाता.


०३) लहान बाळाला दिली जाणारी बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते ?

- क्षयरोग.


०४) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रात आंधळेपणा हा रोग होतो ?

- अ जीवनसत्व.


०५) राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे ?

- बंकिमचंद्र चटर्जी.



०१) धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते ?

- सोने.


०२) मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती ?

- चंद्रगुप्त मौर्य.


०३) हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे ?

- महानदी.


०४) पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत ?

- पाच.


०५) पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप (खंड) आहेत ?

- सात.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...