Current Affairs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Current Affairs लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४ मार्च २०२६

सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त


◾️भारतातील पहिले 100% साक्षर राज्य :- केरळ

◾️भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य :- सिक्कीम

◾️प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य :- त्रिपुरा

◾️जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य :- उत्तराखड

◾️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य :- दिल्ली

◾️जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य :- हिमाचल प्रदेश

◾️भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य :- प. बंगाल

◾️मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य :- सिक्किम

◾️GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- आसाम

◾️राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- तेलंगणा

◾️'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य :- सिक्किम

◾️निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य :- पंजाब

◾️सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य :- केरळ

◾️कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य :- हरियाणा

◾️पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य :- पंजाब

◾️सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य :- मध्य प्रदेश

◾️ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️भारतातील पहिले ई-न्यायालय :- हैद्राबाद उच्च न्यायालय

◾️ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य :- गुजरात

◾️जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :-मेघालय

◾️पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य :- तेलंगणा

◾️भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य :- महाराष्ट्र

१२ मार्च २०२६

भारताच्या विभाजनाबद्दल माहिती


भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा


 1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.

 2) 1904 मध्ये नेपाळ

 3) 1906 मध्ये भूतान

 4) 1907 मध्ये तिबेट

 5) 1935 मध्ये श्रीलंका

 6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.

 आणि ...

 7) 1947 मध्ये पाकिस्तान




 अखंड भारताची फाळणी:

पुर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

 1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.

 वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:


 1) श्रीलंका:


 ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.

श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते.

सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले.  सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. 

सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.  श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.


 2) अफगाणिस्तान:

 अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते.

अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.

महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे.

कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता.

कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते.

तो भारताचा एक भाग होता.

1876   मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.  करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.


 3) म्यानमार (बर्मा):

म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते.

1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.

प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.


 4) नेपाळ:

 नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.

भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे.

1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.

नेपाळमध्ये 81 टक्के हिंदू आणि 9% बौद्ध आहेत.


सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.

1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.


 5) थायलंड:


 थायलंडला 1393 पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.

अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.

आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.


 6) कंबोडिया:


कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे,

हा अखंड भारताचा भाग होता.

भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले.

येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे.

राष्ट्रभाषा संस्कृत होती.

कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.


जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.  मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.

अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.


 7) व्हिएतनाम:

 व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.

अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील.

येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची.

लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.


 8) मलेशिया:

 मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.

 हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.

मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत.

मलय देशात शैव धर्म पाळला जात होता.

देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची.

येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.


 9) इंडोनेशिया:

इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे.

दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश .

तेथे हिंदू राजांचे राज्य होते.

सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.


सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?

- गुरुमुखी.


०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?

- पृथ्वी आणि शुक्र.


०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?

- पारा.


०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?

- तानाजी मालुसरे.


०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?

- पाण्यात.


०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

- कर्नाळा.

 

०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?

- कोयना.


०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

- ६ जानेवारी. 

 

०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

- शुक्र.


०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?

- लाल ग्रह.


०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?

- फातिमा बिबी.

     

०२)भारतातील  पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?

- प्रांजल पाटील.


०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?

- कोलकाता.


०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?

- २४.


०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?

- पाच टक्के.


०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?

- २००९.


०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- स्वामी विवेकानंद.


०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?

 - फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)


०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Intensive Care Unit.


०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बॉक्सिंग. 


०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलम आरा.


 ०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?

- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)


०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?

- १९५४.


 ०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Know Your Customer.


०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सिंधुदुर्ग.


०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.


०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.


०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.


०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.


💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?

🎈मॅकुलन.


💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

🎈मिलींद बोकील.


💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?

🎈गुजरात.


💐 मंडो नृत्‍य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈गोवा.


💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈मुंबई.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

 - आशिया.


०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?

- ११२.


०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

- उत्तर प्रदेश.


०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

- तामिळनाडू.


०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

- नैऋत्य मोसमी वारे.


०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?

- मिर्झापूर.


०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?

- प्रतल.


०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?

- मांडीत. 


०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?

- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)


०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- यमुना. 


०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

- हडप्पा. 


०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- तामिळनाडू.


०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया. 


०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- शरयू. 


०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?

- सरन्यायाधीश.


०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?

- २१ टक्के.


०२) मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती ?

- १४.


०३)  कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?

- मलेरिया.


०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?

- ३३.


०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

- पॅरिस.


०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?

 - C-DAC.


०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?

- १९५६.


०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?

- पोखरण.


०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?

- संवेग.


०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

- हवामानशास्त्र.


०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?

- भुईमूग.


०२) 'रुपया'  हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?

- शेरशहा सुरी.


०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?

- महात्मा फुले.


०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

- संसदेला.


०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?

- गहू.


०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?

- अहिराणी. 


०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?

- इंडिया गेट.


०३) भारताचे  राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?

- सत्यमेव जयते. 


०४)  चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?

- नायट्रोजन. 


०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- नाईल.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

२५ फेब्रुवारी २०२६

२०१४ नंतर मोदी सरकारच्या प्रमुख योजना


अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com

🔷 १. आर्थिक समावेशन, बँकिंग आणि विमा क्षेत्र

➤ प्रधानमंत्री जन-धन योजना – २०१४

➤ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – २०१५

➤ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – २०१५

➤ अटल पेंशन योजना – २०१५

➤ प्रधानमंत्री मुद्रा योजना – २०१५

➤ स्टॅंड-अप इंडिया योजना – २०१६

➤ पीएम स्वनिधी योजना – २०२०

➤ प्रधानमंत्री सूक्ष्म उद्यम विकास योजना – २०१६

➤ प्रधानमंत्री श्रमिक सेतु योजना – २०२१

➤ पीएम गरीब कल्याण योजना – २०२०

➤ डिजिटल पेमेंट मिशन – २०१६

➤ जनसुरक्षा अभियान – २०१७

➤ प्रधानमंत्री वय वंदना योजना – २०१७

➤ प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजना – २०१९

➤ ई-रुपी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म – २०२१


🔷 २. ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा

➤ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – II टप्पा – २०१५

➤ प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – २०१६

➤ दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना – २०१५

➤ सौभाग्य योजना (सर्वांसाठी वीज) – २०१७

➤ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – २०१५

➤ जल जीवन मिशन – २०१९

➤ मिशन अंत्योदय – २०१७

➤ राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान – 2011

➤ प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान – २०१७

➤ हर घर नल मिशन – २०१९

➤ प्रधानमंत्री ग्रामीण विकास फंड – २०१८

➤ प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना – २०१५

➤ उज्ज्वला योजना (ग्रामीण महिलांसाठी गॅस कनेक्शन) – २०१६

➤ प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार गारंटी सुधार मोहीम – २०१८


🔷 ३. शहरी विकास व गृहनिर्माण

➤ स्मार्ट सिटी मिशन – २०१५

➤ प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – २०१५

➤ अटल मिशन फॉर रेजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) – २०१५

➤ स्वच्छ भारत अभियान (शहरी) – २०१४

➤ सबका घर योजना – २०१८

➤ शहरी क्लस्टर विकास योजना – २०१७

➤ राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान – २०१६

➤ शहरी जीवन उपार्जन मिशन (NULM) – २०१५

➤ ग्रीन सिटी मिशन – २०१९


🔷 ४. कृषी व शेतकरी कल्याण

➤ प्रधानमंत्री फसल विमा योजना – २०१६

➤ प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना – २०१९

➤ प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – २०१५

➤ नॅशनल गोकुल मिशन – २०१४

➤ सॉयल हेल्थ कार्ड योजना – २०१५

➤ कृषक समृद्धी योजना – २०१८

➤ ई-नाम (National Agriculture Market) – २०१६

➤ पीएम किसान मानधन योजना – २०१९

➤ हर खेत को पानी योजना – २०१६

➤ कृषी पायाभूत गुंतवणूक निधी – २०२०

➤ परंपरागत कृषी विकास योजना – २०१५

➤ नीम कोटेड युरिया योजना – २०१५

➤ किसान ड्रोन योजना – २०२२

➤ ग्रीन एनर्जी बायो एथेनॉल मिशन – २०१८

➤ पशुपालन विकास योजना – २०१७


🔷 ५. आरोग्य, पोषण आणि स्वच्छता

➤ आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – २०१८

➤ स्वच्छ भारत मिशन – २०१४

➤ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – २०१७

➤ पोषण अभियान – २०१८

➤ मिशन इंद्रधनुष – २०१४

➤ प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान – २०१६

➤ राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन – २०२०

➤ ई-संजीवनी टेलिमेडिसिन सेवा – २०२०

➤ प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना – २०१६

➤ मिशन सक्ती (महिला व बाल सुरक्षा) – २०२१

➤ प्रधानमंत्री औषध योजना – २०१५

➤ आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन – २०२१


🔷 ६. शिक्षण, कौशल्य व रोजगार

➤ प्रधानमंत्री कौशल विकास योजना – २०१५

➤ राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०

➤ पीएम ई-विद्या कार्यक्रम – २०२०

➤ राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रचार योजना – २०१६

➤ स्टार्टअप इंडिया – २०१६

➤ स्किल इंडिया मिशन – २०१५

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ प्रधानमंत्री युवाशक्ति अभियान – २०२२

➤ शिक्षण संकल्प २०२१ – २०२१

➤ मिशन कर्मयोगी – २०२०

➤ पीएम रोझगार प्रोत्साहन योजना – २०१७

➤ आत्मनिर्भर भारत रोजगार योजना – २०२०


🔷 ७. महिला व बाल विकास

➤ बेटी बचाओ, बेटी पढाओ – २०१५

➤ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना – २०१७

➤ उज्ज्वला योजना – २०१६

➤ मिशन शक्‍ती – २०२१

➤ महिला ई-हाट – २०१६

➤ स्वाधार गृह योजना – २०१५

➤ वन स्टॉप सेंटर योजना – २०१५

➤ राष्ट्रीय बाल संरक्षण योजना – २०१६

➤ पोषण ट्रॅकर योजना – २०२०


🔷 ८. पर्यावरण, ऊर्जा आणि हवामान

➤ उजाला योजना (एलईडी वितरण) – २०१५

➤ राष्ट्रीय सौर मिशन – २०१५

➤ ग्रीन इंडिया मिशन – २०१६

➤ ऊर्जा संरक्षण अभियान – २०१७

➤ जल शक्ति अभियान – २०१९

➤ राष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा निधी – २०१५

➤ अमृत सरोवर अभियान – २०२२

➤ हायड्रोजन मिशन इंडिया – २०२१

➤ नॅशनल बायोगॅस मिशन – २०१८


🔷 ९. उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान

➤ मेक इन इंडिया – २०१४

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ स्टार्टअप इंडिया – २०१६

➤ आत्मनिर्भर भारत अभियान – २०२०

➤ राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण – २०२२

➤ सेमीकंडक्टर मिशन – २०२१

➤ उत्पादन प्रोत्साहन योजना (PLI Scheme) – २०२०

➤ भारतमाला परियोजना – २०१७

➤ सागरमाला प्रकल्प – २०१५

➤ GATI SHAKTI राष्ट्रीय मास्टर प्लॅन – २०२१

➤ Make in India 2.0 – २०२१


🔷 १०. सामाजिक सुरक्षा व कल्याण

➤ प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना – २०२०

➤ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना – २०१९

➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम – 1995

➤ पीएम ट्रायबल उद्यम मिशन – २०२२

➤ वन धन योजना – २०१८

➤ ई-श्रम पोर्टल – २०२१

➤ दिव्यांगजन सशक्तीकरण योजना – २०१५

➤ राष्ट्रीय वृद्धजन सन्मान योजना – २०१७

➤ अनाथ बाल सहाय योजना – २०२१


🔷 ११. पायाभूत सुविधा व वाहतूक

➤ भारतमाला परियोजना – २०१७

➤ सागरमाला प्रकल्प – २०१५

➤ UDAN योजना – २०१६

➤ स्मार्ट पोर्ट्स इंडिया प्रकल्प – २०१८

➤ राष्ट्रीय महामार्ग ग्रिड योजना – २०१९

➤ रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन मिशन – २०१८

➤ एक भारत श्रेष्ठ भारत अभियान – २०१५

➤ गती शक्ती योजना – २०२१

➤ प्रधानमंत्री गतिशक्ति राष्ट्रीय मास्टर प्लॅन – २०२१


🔷 १२. डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक शासन

➤ डिजिटल इंडिया – २०१५

➤ ई-गव्हर्नन्स मिशन मोड प्रकल्प – २०१६

➤ गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) – २०१६

➤ मिशन कर्मयोगी – २०२०

➤ ई-ऑफिस प्रकल्प – २०१८

➤ जनसुविधा केंद्र – २०१५

➤ ई-कोर्ट मिशन – २०१७

➤ पीएम गती शक्ती पोर्टल – २०२१


🔷 १३. राष्ट्रीय सुरक्षा आणि सीमाविकास

➤ भारतमाला आणि सीमावर्ती रस्ते योजना – २०१७

➤ राष्ट्रीय संरक्षण उद्योग धोरण – २०१८

➤ राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण – २०२०

➤ डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन – २०१८

➤ मिशन रक्षा आत्मनिर्भरता – २०२०


🔷 १४. विशेष प्रादेशिक व सामाजिक योजनाः

➤ उत्तर-पूर्व विकास योजना – २०१६

➤ आकांक्षी जिल्हा कार्यक्रम – २०१८

➤ आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम – २०२३

➤ मिशन अंत्योदय – २०१७

➤ डेस्टिनेशन नॉर्थ-ईस्ट – २०१९

➤ प्रधानमंत्री विकास योजना (PM-VIKAS) – २०२३

➤ मिशन मोड शेड्युल्ड ट्रायब विकास – २०२२

१६ डिसेंबर २०२५

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2025)



 📰 संगीता बरुआ पिशारोटी – PCI च्या पहिल्या महिला अध्यक्ष

ऐतिहासिक निवड: 14 डिसेंबर 2025 रोजी प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

महत्व: 1957 मध्ये स्थापन झालेल्या PCI च्या 68 वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष; भारतीय पत्रकारितेतील महिला नेतृत्वासाठी मैलाचा दगड.

निवडणूक निकाल: 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकांत 21 पैकी 21 जागांवर त्यांच्या गटाचा निर्विवाद विजय.

अनुभव: 2024 मध्ये PCI च्या उपाध्यक्ष.

सन्मान: 2017 – रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.

लेखन: “Assam: The Accord, The Discord” – असम करार व ईशान्य भारतावरील अभ्यासपूर्ण पुस्तक.


2️⃣ 💰 DBS बँक – जागतिक बँकिंगमधील अव्वल कामगिरी

पुरस्कार: Global Bank of the Year 2025.

पुरस्कार देणारे: The Banker मासिक (Financial Times Group).

पुनरावृत्ती: 2018, 2021 नंतर तिसऱ्यांदा हा सन्मान.

स्पर्धा: जगभरातील 294 बँकांचा सहभाग.

ओळख: डिजिटल बँकिंग, नवकल्पना, ग्रीन फायनान्स व आर्थिक स्थैर्य.

पूर्ण नाव: Development Bank of Singapore (DBS).

मुख्यालय: सिंगापूर 🇸🇬.


3️⃣ 🇦🇹 ऑस्ट्रियाचा सामाजिक निर्णय – शाळांमध्ये हेडस्कार्फ बंदी

निर्णय: 14 वर्षांखालील मुलींना सार्वजनिक व खाजगी शाळांमध्ये हेडस्कार्फ (हिजाब) परिधान करण्यास बंदी.

मंजुरी: 11 डिसेंबर 2025 रोजी संसदेत.

अंमलबजावणी: सप्टेंबर 2026 पासून.

उद्देश: मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व लिंग समानतेला प्रोत्साहन.

परिस्थिती: युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता, एकात्मता व धार्मिक प्रतीकांवरील धोरणांवर चर्चा.

पार्श्वभूमी: 2019 मधील तत्सम कायदा नंतर रद्द.


4️⃣ 🗺️ Yellow Line – इस्रायल व गाझामधील नवीन सीमारेषा

नाव: Yellow Line (यलो लाईन) 🟡.

स्थान: इस्रायल 🇮🇱 – गाझा (पॅलेस्टाईन).

स्वरूप: उत्तर–दक्षिण दिशेने जाणारी काल्पनिक विभाजक रेषा.

संदर्भ: ऑक्टोबर 2025 च्या युद्धविराम कराराचा भाग.

घोषणा: 8 डिसेंबर 2025 – इस्रायली लष्करप्रमुख.

महत्व: भू-राजकीय बदल व सुरक्षा (Buffer Zone) व्यवस्थापनाचे प्रतीक.


📌 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा (स्पर्धा परीक्षांसाठी)

ड्युरंड लाईन: पाकिस्तान – अफगाणिस्तान

रेडक्लिफ लाईन: भारत – पाकिस्तान

मॅकमोहन लाईन: भारत – चीन

24 वी समांतर रेषा: भारत – पाकिस्तान (1965 युद्धबंदी/कच्छ संदर्भ)

LOC (Line of Control): भारत – पाकिस्तान

LAC (Line of Actual Control): भारत – चीन

38 वी समांतर रेषा: उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया

१३ डिसेंबर २०२५

महत्वाचे भारतातील पहिले व्यक्ती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


→ भारताचे पहिले राष्ट्रपती: 

राजेंद्र प्रसाद 


→ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : 

प्रतिभाताई पाटील


→ भारताचे पहिले उपराष्ट्रपती :

सर्वपल्ली राधाकृष्णन


→ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : 

व्योमेश चंद्र बॅनर्जी


→ भारताचे पहिले सरन्यायाधीश : 

एच जे कानिया


→ भारताचे पहिले पंतप्रधान : 

जवाहरलाल नेहरू


→ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : 

इंदिरा गांधी


→ भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : 

सुकुमार सेन


→ भारताचे पहिले व्हाईसरॉय : 

लॉर्ड कॅनिंग


→ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : 

लॉर्ड विल्यम बेंटिक


→ भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : 

सरोजिनी नायडू


→ पहिल्या महिला मुख्यमंत्री : 

सुचेता कृपलानी


→ लोकसभेचे पहिले सभापती : 

जी.व्ही.मावळणकर


→ भारताचे पहिले गृहमंत्री : 

सरदार  वल्लभभाई पटेल


→ भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : 

पिनाकी चंद्र घोष


→ भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : 

निर्मला सीताराम


→ देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला :

सिरीमाओ भंडारनायके

०९ डिसेंबर २०२५

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



2025 मध्ये :

1.मालदीवच्या शाहिना अली 

2.फिलीपिन्सच्या फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा आहेत.

3. एज्युकेट गर्ल्स (भारत )


एज्युकेट गर्ल्स 


हा पुरस्कार मिळवणारी महिलांची पहिली भारतीय संस्था ठरली.


या संस्थेची स्थापना 2007 मध्ये राजस्थान या ठिकाणी करण्यात आली तिचे संस्थापक सफिना हुसेन हे आहेत.


या संस्थेने 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणारा प्रगती नावाचा मुक्त शिक्षण उपक्रम सुरू केला आहे.


सफिना हुसेन 


1997 ते 2004 पर्यंत त्या सन फ्रान्सिस मधील चाइल्ड फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल च्या कार्यकारी संचालक होत्या


2001 ते 2002 पर्यंत त्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एक्सचेंजच्या बोर्डवर होत्या.


2005 मध्ये इंडिया स्टडी अब्रॉड सेंटर सुरू केले 2005 मध्ये त्या भारतात परतल्या आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या शालेय मुलींच्या शिक्षणासाठी काम करू लागले.


2007 मध्ये त्यांनी  एज्युकेशन गर्ल्स नावाची एक एनजीओ स्थापन केली.


2017 ते 2023 पर्यंत त्या चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन च्या स्वतंत्र सल्लागार होत्या.


2020 मध्ये ती लॉरियल पॅरिसच्या सल्लागार मंडळात सामील झाले.


2018 मध्ये त्या इंडिया लीडर्स फॉर सोशल सेक्टर च्या सल्लागार परिषदेची  सदस्य बनली.


2023 मध्ये त्या इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट च्या सल्लागार परिषदेची सदस्य बनली.


७ नोव्हेंबर 2025 रोजी सफिनाच्या एनजीओने एज्युकेट गर्ल्स ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.



रॅमन मॅगसेसे पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना रॉकफेलर ब्रदर्स फंड न्यूयॉर्क व फिलिपाईन्स सरकार मिळून 1957 मध्ये स्थापन केले.


याला आशियाचा नोबेल म्हणून ओळखले जाते.


पहिले भारतीय विजेते आचार्य विनोबा भावे.


दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी रॅमन मॅगसे यांच्या जयंती निमित्त मनिला येथे हा पुरस्कार प्रदान केला जातो.


हा पुरस्कार फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो.

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुश्ताक यांना त्यांच्या Heart Lamp या लघुकथा संग्रहाला मिळाला आहे तर अनुवादक पुरस्कार दीपा बस्ती यांना मिळाला आहे.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या दुसऱ्या भारतीय ठरल्यात यापूर्वी गीतांजली श्री यांना टॉम ऑफ सॅड- 2022 यासाठी मिळाला.


कन्नड भाषेतील पुस्तकाला पहिल्यांदाच बुकर पुरस्कार मिळाला.


हा पुरस्कार जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे.


दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत.


बानू मुश्ताक 


त्यांचा जन्म 3 एप्रिल 1948 रोजी हसन,कर्नाटक या ठिकाणी झाला.


बंगळूर मध्ये ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम केले.


त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.


2024 मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कारही मिळाला आहे.


त्यांच्या करीनागारगाळू या कथेवर आधारित प्रसिद्ध कन्नड चित्रपट हसीना तयार झाला आहे.


लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना 2004 ला झाली असून सुरुवात 2005 मध्ये झाली.


2016 पासून दरवर्षी दिला जातो त्यापूर्वी दर दोन वर्षांनी दिला जायचा.


2023: जॉर्जी गोस्पोडिनोव्ह (बल्गेरिया )- Time Shelter.


2024: जेनी एरपेनबेक (जर्मनी )- Kairos

71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹त्याची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी केली असून याचे वितरण 23 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आले.


🔹भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मार्फत दिले जाते.


◽️पुरस्कार विजेत्यांची यादी:


🔹२०२३ च्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा 23 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली.


🔹पुरस्कारांसाठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत ३३२ प्रवेशिका, नॉन-फीचर चित्रपटांमध्ये ११५, २७ पुस्तके आणि १६ समीक्षकांचे अर्ज आले.


🔹७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th fail  सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


🔹'फ्लॉवरिंग मॅन' ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला तर 'गॉड व्हल्चर अँड ह्युमन' ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. दोन्ही चित्रपटांना त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


🔹शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12th fail) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शारुख खानचा हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा तिचा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹ज्येष्ठ अभिनेते विजयराघवन आणि मुथुपेटाई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.



🔹सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट: 12 th Fail


🔹सर्वोत्तम दिग्दर्शन: सुदीप्तो सेन - द केरळ स्टोरी


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान ( जवान ), विक्रांत मॅसी ( १२ वी नापास )


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी - श्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे.


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजयराघवन ( पुक्कलम ), मुथुपेट्टाई भास्कर ( पार्किंग )


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: उर्वशी ( उलोझुक्कू ), जानकी बोडीवाला ( वश )


🔹सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट :श्यामची आई.


🔹सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : नाळ 2



🔹दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: आत्मपॅम्फ्लेट.


पद्मश्री

 पद्मश्री 113 व्यक्तींना देण्यात आले असून त्यातील महत्त्वाचे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व कोण कोण आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो ते पाहूया :


1. अच्युत रामचंद्र पालव- कला 

2.श्रीमती अरुंधती भट्टाचार्य- व्यापार व उद्योग 

3.अशोक लक्ष्मण सराफ- कला 

4. श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे -कला 

5. चैत्रम देवचंद्र पवार -सामाजिक कार्य

6.श्रीमती जसपिंदर नरुला- कला

7.मारुती भुजंगराव चितमपल्ली- साहित्य व शिक्षण 

8.राणेद्र भानू मुजुमदार -कला  

9.श्री सुभाष खेतुलाल शर्मा- शेती  

10.वासुदेव कामत- कला 

11.विलास डांगरे -औषध .



इतर पद्मश्री विजेते :

हरविंदर सिंग पद्मश्री प्राप्त पहिला पॅरा तिरंदास ठरले.

क्रीडा क्षेत्रातील काही व्यक्तिमत्व 

सत्यपाल सिंह- पॅराॲथिक्स प्रशिक्षक

आर. अश्विन - क्रिकेट 

आय.एम. विजयन -फुटबॉल.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

09 डिसेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

१. ११ वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) २०२५ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? – हरियाणा


२. खालीलपैकी कोणाला पहिला FIFA शांतता पुरस्कार मिळाला आहे? – डोनाल्ड ट्रम्प


३. ९६ व्या वर्षी निधन झालेले फ्रँक गेहरी कोण होते? – आर्किटेक्ट


४. भारतीय सैन्याने त्यांची वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आणि सेमिनार, इन्नो-योधा २०२५ कोणत्या शहरात आयोजित केले होते? – नवी दिल्ली


५. खालीलपैकी कोणत्या महान भारतीयाची ६९ वी पुण्यतिथी ६ डिसेंबर २०२५ रोजी साजरी करण्यात आली? – डॉ. बी.आर. आंबेडकर


६. नीती आयोग आणि आयबीएमने कोणत्या वर्षापर्यंत भारताला टॉप ३ क्वांटम इकॉनॉमी बनवण्यासाठी रोडमॅप जारी केला आहे? – २०४७


७. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – बिहार


८. भारत आणि कोणत्या देशाने राजस्थानमध्ये हरिमौ शक्ती लष्करी सराव आयोजित केला होता? – मलेशिया


९. भारताने कोणत्या देशासोबत RELOS लॉजिस्टिक्स सपोर्ट करारावर स्वाक्षरी केली आहे? – रशिया


१०. शेतीमध्ये सौरऊर्जेच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? – महाराष्ट्र


११. जेरुसलेम मास्टर्स २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले? – अर्जुन एरिगाईसी

०१ डिसेंबर २०२५

कंबाईन परीक्षेच्या दृष्टीन काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या ☑️


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

महत्वाच्या Conference Of The Parties (COP) परिषदा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶 COP म्हणजे काय

➤ Climate Change संदर्भातील UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) अंतर्गत होणारी सर्वोच्च वार्षिक परिषद


➤ उद्देश : हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान वित्त, तंत्रज्ञान हस्तांतरण, अनुकूलन व शमन उपाय ठरविणे


🔶 COP 27 – 2022 | शर्म अल शेख, इजिप्त 🇪🇬

➤ विकसनशील देशांसाठी Loss and Damage Fund स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

➤ हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाईवर भर

➤ अनुकूलन (Adaptation) बाबींवर विशेष लक्ष


🔶 COP 28 – 2023 | दुबई, संयुक्त अरब अमीरात 🇦🇪

➤ पहिला Global Stocktake पूर्ण – पॅरिस करार अंमलबजावणीचा सामूहिक आढावा

➤ Fossil fuels पासून transition away करण्याची सामूहिक मान्यता

➤ नवीकरणीय ऊर्जेचा वापर तिप्पट करण्याचा जागतिक ठराव


🔶 COP 29 – 2024 | बाकू, अझरबैजान 🇦🇿

➤ Climate Finance हा मुख्य अजेंडा

➤ 2025 नंतरसाठी नवीन वित्तीय उद्दिष्ट (New Collective Quantified Goal – NCQG) ठरवणे

➤ विकसनशील देशांसाठी निधी उपलब्धतेवर चर्चा


🔶 COP 30 – 2025 | बेलेम, ब्राझील 🇧🇷

➤ Amazon Rainforest संरक्षणावर केंद्रित चर्चा

➤ NDCs च्या (Nationally Determined Contributions) अद्ययावतीकरणाचा टप्पा

➤ जैवविविधता व हवामान बदल यांचा समन्वय


🔶 COP 31 – 2026 | अंताल्या, तुर्की 🇹🇷

➤ पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन

➤ 1.5°C लक्ष्य साध्य करण्यासाठी दीर्घकालीन रोडमॅप

➤ विकसनशील–विकसित देशांमधील जबाबदारी वाटपावर भर

30 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. सीबीएसईने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून कोणत्या वर्गांसाठी 'कौशल्य शिक्षण' अनिवार्य केले आहे? – इयत्ता ६ ते ८


२. एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस कोणासोबत सुरू केले? – दिल्ली पोलिस


३. ७२ व्या वर्षी निधन झालेले अरुणाचलम वेल्लायन कोण होते? – उद्योगपती


४. ल्यूक लिटलर कोणत्या खेळात जगातील सर्वात तरुण क्रमांक १ खेळाडू बनला? – डार्ट्स


५. ३४ व्या वर्षी निधन झालेले हुमेन सागर कोण होते? – ओडिया गायक


६. जगात पहिल्यांदाच गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग निर्मूलन दिन कधी साजरा करण्यात आला? – १७ नोव्हेंबर


७. पोर्तुगालमध्ये आयोजित WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप २०२५ कोणी जिंकली? – भारत


८. खनिज विकासाला चालना देण्यासाठी चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात होणार आहे? – जम्मू आणि काश्मीर


९. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो? – २६ नोव्हेंबर


१०. इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा नाईटहूड मिळवणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे? – १७


११. पिलिया मलेनाडू नावाच्या जंपिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली? – कर्नाटक


१२. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले? – युनायटेड स्टेट्स


१३. जगात पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या विमानतळावर वायफाय ७ लाँच करण्यात आले? – ओमान


१४. चंद्रावर पहिल्यांदाच कोणत्या देशाने लहान आयर्न ऑक्साईड क्रिस्टल्स शोधले? – चीन


१५. खालीलपैकी कोणी एटीपी फायनल्स २०२५ चा किताब जिंकला? – जॅनिक सिन्नर

ोव्हेंबर - चालू घडामोडी 🔴


--------------------------------------


01) भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरण-XIX पिथोरागड येथे सुरू करण्यात आला आहे ? 

👉  नेपाळ



02) आयसीसी T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अ‍म्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

👉  रोहित शर्मा



03) कोणत्या राज्यात पोलावरम, मार्कपुरम आणि मदनपल्ले असे तीन नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत ? 

👉  आंध्र प्रदेश


04) 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान म्हणून कोणत्या शहराची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे ?

👉  अहमदाबाद



05) बहुचर्चित हेली गुब्बी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ? 

👉  इथिओपिया



06) कुमारी कमला यांचे वयाच्या 91व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्या खालीलपैकी कोणत्या मार्शल आर्ट्स नृत्याशी संबंधित होत्या ? 

👉  भरतनाट्यम


07) कोणत्या राज्यात पाणी सुरक्षा, तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी रायथन्ना मीकोसम नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ? 

👉  आंध्र प्रदेश


08) डॉ. वर्गीस कुरियन हे कोणत्या क्रांतीचे जनक होते, ज्यांची 104वी जयंती 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली ? 

👉  श्वेत क्रांती


09) भारत आणि कोणत्या देशामधील संरक्षण कराराअंतर्गत, हॅमर स्मार्ट शस्त्रे भारतात तयार केली जातील ? 

👉  फ्रान्स



10) जगातील सर्वात बलवान महिला 2025 चा किताब कोणी जिंकला ?

👉  जेमी बुकर



11) 53व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

👉  अ‍ना मॅक्सवेल मार्टिन



12) कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक रायफल/पिस्तूल अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले ? 

👉  तिसरे



━━━━━━━━━━━━━━━━

२३ नोव्हेंबर २०२५

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


01) थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला ? 

उत्तर  👉  फातिमा बॉश



02) भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ? 

उत्तर  👉  गज लोक



03) ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ? 

उत्तर 👉  09



04) इंडिया पोस्टने कोणत्या आयआयटीमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड-थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे ? 

उत्तर  👉  आयआयटी दिल्ली



05) अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे ?  

उत्तर  👉  संयुक्त अरब अमिराती



06) प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट २०२५ कुठे आयोजित करण्यात आले होते ? 

उत्तर  👉  नवी दिल्ली



07) खालीलपैकी कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लूप्रिंटचे अनावरण केले ? 

उत्तर  👉  कर्नाटक



08) अलिकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर  👉  अमित अग्रवाल



09) सरयू वेलपुला कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत ? 

उत्तर  👉  26व्या



10) केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर  👉  संदीप प्रधान



11) 2026 च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (ITHF) वर्गात कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर  👉  रॉजर फेडरर


01) नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

👉  दहाव्यांदा 



02) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले ?

👉  सुवर्णपदक 



03) पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉  विवेक सिंगला 



04) कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे 'ओमेन' नावाचा ड्रोन विकसित केला आहे ‌?

👉  अमेरिका आणि युएई 



05) सूनापुर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे, हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत ?

👉  ओडिसा 



06) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले ?

👉  नवी दिल्ली


07) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?

👉  सिक्कीम 



08) दरवर्षी 'जागतिक दूरदर्शन दिवस' कधी साजरा करण्यात येतो ?

👉  21 नोव्हेंबर


01) भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

👉  पराग जैन



02) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

👉  महाराष्ट्र



03) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली ? 

👉  नवी दिल्ली



04) पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले ? 

👉  गोदरेज एरोस्पेस



05) भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले ? 

👉  गुवाहाटी



06) भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला ? 

👉  फ्रान्स



07) जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे ? 

👉  सिंगापूर



08) 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ? 

👉  सिक्कीम



09) 98व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या ? 

👉  अभिनेत्री



10) पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना 2025 - 26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ? 

👉  ओडिशा


काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔷 सोनाली मिश्रा – रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक


🔷 डॉ. अजय कुमार – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष


🔷 भानू प्रताप शर्मा – वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) अध्यक्ष


🔷 उमा कांजीलाल – IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू


🔷 अभिजात शेठ – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अध्यक्ष


🔷 एस. महेंद्र देव – पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष


🔷 ॲनालेना बेयरबॉक – संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील प्रमुख


🔷 डॉ. जेनिफर सिमन्स – सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष


🔷 दीपक बागला – NITI Aayog – Atal Innovation Mission संचालक


🔷 साहिल किनी – Reserve Bank Innovation Hub मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 नितीन गुप्ता – राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) अध्यक्ष


🔷 राजेश कुमार – महाराष्ट्र मुख्य सचिव


🔷 क्रिस्टी कोव्हेंट्री – IOC (International Olympic Committee) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष


🔷 अनुराधा ठाकूर – आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव


🔷 संजोग गुप्ता – ICC (International Cricket Council) मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 सुनील जयवंत कदम – SEBI कार्यकारी संचालक


🔷 केशवन रामचंद्रन – RBI कार्यकारी संचालक

२१ नोव्हेंबर २०२५

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

१७ नोव्हेंबर २०२५

राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू झाला.

➤ हा कार्यक्रम भारतातील सर्वात गरीब व असुरक्षित नागरिकांना अधिकार-आधारित सामाजिक सुरक्षा देण्याचा संकल्प आहे.

➤ अंमलबजावणी — ग्रामीण विकास मंत्रालय

➤ योजना — पूर्णपणे केंद्र पुरस्कृत, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमध्ये लागू.


🔹️उद्दिष्टे 🎯

➤ मूलभूत सामाजिक सुरक्षा व उत्पन्न संरक्षण

▪️ गरीब रेषेखालील वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती व कुटुंबप्रमुख मृत झालेल्या कुटुंबांचे संरक्षण.

➤ समावेशक वाढ प्रोत्साहन

▪️ ‘No one left behind’ या तत्त्वानुसार सामाजिक संरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे.

➤ धोरण निर्देशक तत्वांची अंमलबजावणी

▪️ कलम 41, 42, 47 अंतर्गत सामाजिक सहाय्याची राज्याची जबाबदारी प्रत्यक्षात आणणे.

➤ प्रमाण

▪️ सध्या 3.09 कोटी लाभार्थी — जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक.


🔸️NSAP अंतर्गत पाच उप-योजना 🧩

🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) 👴

➤ 60–79 वर्षे: ₹200/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)

➤ राज्य पुरवणी (टॉप-अप): ₹50 ते ₹5700/महिना

➤ सरासरी एकूण पेन्शन: सुमारे ₹1100 (अनेक राज्यांमध्ये)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना (IGNWPS) 👩‍🦳

➤ 40–79 वर्षांच्या विधवा: ₹300/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना (IGNDPS) ♿️

➤ 18–79 वर्षे, गंभीर/बहुविकलांग: ₹300/महिना

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना


🔹️राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS) ⚰️

➤ BPL कुटुंबातील 18–59 वर्षांच्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूवर

➤ ₹20,000 एकरकमी सहाय्य


🔹️अन्नपूर्णा योजना 🌾

➤ IGNOAPS साठी पात्र पण पेन्शन न मिळणारे वृद्ध

➤ 10 किलो अन्नधान्य/महिना – मोफत


🔹️महत्त्व व सामाजिक-आर्थिक परिणाम 🌍

➤ उत्पन्न सुरक्षा

▪️ 3.09 कोटी लाभार्थ्यांना नियमित आर्थिक आधार

➤ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)

▪️ वेळेवर, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पेमेंट

➤ आर्थिक समावेशन

▪️ लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी एकत्रीकरण

➤ SDGs मध्ये योगदान

▪️ SDG 1 – No Poverty

▪️ SDG 2 – Zero Hunger

▪️ SDG 10 – Reduced Inequality


🔹️आव्हाने ⚠️

➤ केंद्राकडील पेन्शन रक्कम अत्यल्प

▪️ महागाईनुसार वाढ होत नाही

➤ दस्तऐवजांचा अभाव

▪️ अनेक विधवा व दिव्यांग लाभार्थी ओळख प्रक्रियेतून वंचित

➤ राज्यांच्या टॉप-अपवर अवलंबित्व

▪️ राज्यागणिक पेन्शनमध्ये मोठी तफावत


🔹️निष्कर्ष 🔍

➤ NSAP हा आर्थिक सुरक्षा (पेन्शन), अन्न सुरक्षा (अन्नपूर्णा) आणि डिजिटल शासन (DBT + Aadhaar + PFMS) यांचा परस्परपूरक संगम आहे.

➤ वृद्ध, विधवा, दिव्यांग व गरीब कुटुंबांना वेळीच, सन्मानपूर्वक आणि लक्षित सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

01) FIDE शतरंज विश्वचषक 2025 उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

👉  गोवा



02) भारतातील पहिले ‘Women’s Wellness on Wheels’ वाहन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?

👉 तमिळनाडू



03) युनेस्को आणि भारताने कोणत्या देशात ‘TVET Initiative’ सुरू केली आहे ?

👉 दक्षिण सूडान



04) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो ?

👉 17 नोव्हेंबर 


05) "सहकारी कुंभ 2025" चे उद्घाटन कोणी केले ?

👉 अमित शाह


06)18व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत ‘सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन प्रणाली’ पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला ?

👉 चेन्नई



07) भारताच्या सहकार्याने बांधलेले ‘हनीमाधू विमानतळ’ कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले ?

👉 मालदीव


08) 'मालाबार-2025' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात भारताचे प्रतिनिधित्व कोणते जहाज करणार आहे ?

👉 INS सह्याद्री


09) सी-डॉट आणि आयआयटी गांधीनगर यांनी कोणत्या क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी भागीदारी केली ?

👉 सायबर सुरक्षा व दूरसंचार



10) 2026 एशियाई युवा तिरंदाजी स्पर्धेची मेजबानी कोणता देश करणार आहे ?

👉 यूएइ


11) AU Small Finance Bank ने महिलांसाठी कोणती नवी योजना सुरू केली आहे ?

👉 M Circle



12) जनजातीय - केंद्रित जीनोम अनुक्रमण परियोजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

👉 गुजरात



13) बीएसएफच्या कोणत्या ट्रॅकर डॉगला राष्ट्रीय वीरता पुरस्कार देण्यात आला ?

👉 बबीता



14) 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटनेत 08 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे ?

👉 दिल्ली

 

15) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

👉 "अनिल जग्गी"


16) 2025 च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीत भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे ?

👉 मुंबई

 

17) भारताचा 90वा ग्रँडमास्टर कोण ठरला ?

👉  इलामपार्थी ए. आर.


18) “वॉटरशेड फेस्टिव्हल” या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित झाली ?

👉 गुंटूर (आंध्र प्रदेश)


 

19) नोव्हाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्याच्या कारकीर्दीतील कितवा ATP टूर-लेव्हल किताब जिंकला ?

👉 101 वा


20) कोणत्या देशात 300 वर्षे जुना "कार्तिक नृत्य महोत्सव" आयोजीत करण्यात आला आहे  ?

👉 नेपाळ

 

21) दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

👉 11 नोव्हेंबर

  

22) अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या, स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे ?

👉 वायुपुत्र


23) नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा देश कोणता ?

👉 ऑस्ट्रेलिया


24) हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडला कोणता दर्जा प्रदान करण्यात आला ?

👉  मिनी रत्न श्रेणी-I



25) हरित हायड्रोजन परिषद 11-12 नोव्हेंबर दरम्यान कुठे झाली ?

👉  श्रीलंका


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

१४ नोव्हेंबर २०२५

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Global Multidimensional Poverty Index – MPI)

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1) मूलभूत माहिती

➤ जाहीर करणाऱ्या संस्था : UNDPOPHI

➤ सुरुवात : २०१०

➤ उद्देश : उत्पन्नापलीकडे जाऊन दारिद्र्याचे बहुआयामी स्वरूप मोजणे


2) आयाम व निर्देशांक

➤ एकूण ३ आयाम व १० निर्देशांक

▪️आरोग्य

➤ पोषण

➤ बाल मर्त्यता

▪️शिक्षण

➤ पूर्ण केलेली शालेय वर्षे

➤ शाळेतील हजेरी

▪️जीवनमान (Standard of Living)

➤ स्वयंपाक इंधन

➤ स्वच्छता

➤ पिण्याचे पाणी

➤ निवासाची गुणवत्ता

➤ वीज

➤ संपत्ती


3) MPI स्कोअरचे वर्गीकरण

➤ 1% – 20% : No to Less Poverty

➤ 20% – 33.33% : असुरक्षित (Vulnerable)

➤ 33.33% – 50% : बहुआयामी गरीब

➤ 50% पेक्षा जास्त : तीव्र बहुआयामी गरीब