१८ ऑक्टोबर २०२६

चालू घडामोडी :- 17 ऑक्टोबर 2026


◆ आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 2026 ची थीम "Safe Homes for All" (सर्वांसाठी सुरक्षित घरे) ही आहे.

◆ अमरावतीचे डॉ. प्रसाद वाडेगावकर यांची उत्तराखंडमधील डेहराडून येथील स्वामी राम हिमालयन विद्यापीठाचे (SRHU) कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे.

◆ भारताचे माजी राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांच्या "Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles" या आत्मचरित्राचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

◆ उत्तराखंड सरकारने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा, पान मसाला आणि इतर खाद्यपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर संपूर्ण राज्यात एक वर्षासाठी बंदी घातली आहे.

◆ केरळ राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी 'केरळम ज्येष्ठ नागरिक (काळजी आणि अधिकारांचे संरक्षण) विधेयक, 2026' सादर केले आहे.

◆ भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी बहुउद्देशीय जहाज 'INS समर्थक' हे आहे. [हे जहाज लार्सन अँड टुब्रो लिमिटेड (L&T) च्या कट्टुपल्ली (चेन्नई) येथील शिपयार्डमध्ये बांधण्यात आले आहे.]

◆ केरळमधील कोल्लम येथे भारतातील पहिला 'रेड लिस्ट असेसमेंट ऑफ इकोसिस्टम' (RLE) प्रकल्प अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे.

◆ हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे ई-गव्हर्नन्स सुधारणांवरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

◆ भारतीय समाजसेविका आणि SEWA (Self Employed Women's Association) संस्थेच्या संचालक रीमा नानावटी यांना वॉशिंग्टन येथे "Hillary Rodham Clinton Award 2026" देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ "सुखना पाणथळ क्षेत्र" हे चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील पहिले 'रामसर स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

◆ जकार्ता (इंडोनेशिया) येथील भारतीय दूतावासाने लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी 'Dewi' (देवी) नावाचा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित डिजिटल अवतार लाँच केला आहे.

◆ भारत सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची तपासणी करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नीती (NITI) आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━