१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तरः अहिल्यानगर
२) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
उत्तरः शेकरु
३) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे ?
उत्तरः दुसरा
४) महाराष्ट्राला किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?
उत्तर: ७२०
५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ?
उत्तरः गोदावरी
६) संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः धाराशिव
७) कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
उत्तरः नर्मदा
८) त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?
उत्तरः गोदावरी
९) सप्टेंबर १९४८ मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
उत्तरः ऑपरेशन पोलो
१०) कृष्णा नदीचे उगमस्थान ?
उत्तरः महाबळेश्वर
११) संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?
उत्तर: २३ फेब्रुवारी १८७६
१२) सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?
उत्तर: २११
१३) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तरः दहिसर
१४) जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तरः बुलढाणा
१५) अमरावती विभागात समाविष्ठ नसलेला जिल्हा ?
उत्तरः वर्धा
१६) राष्ट्रसंत ही पदवी.....यांच्याशी संबंधीत आहे ?
उत्तरः तुकडोजी महाराज
१७) कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे ?
उत्तरः गिरणा
१८) किर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या... यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
उत्तरः तुकडोजी महाराज
१९) कृष्णा, गोदावरी, भीमा, कावेरी यापैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ?
उत्तरः कावेरी
२०) राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?
उत्तरः जांभी
२१) कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ?
उत्तरः कोयना
२२) दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती ?
उत्तरः टेगूर मृदा
२३) बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?
उत्तरः उल्कापातामुळे
२४) चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?
उत्तरः डहाणू - घोलवड
२५) यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?.
उत्तरः अमरावती