Saturday 31 December 2022

राज्य निर्मिती


1. अरुणाचल प्रदेश 👉  20 फेब्रुवारी, 1987

2. असम 👉 जानेवारी  1947

3. आंध्र प्रदेश 👉 01 आक्टोबर 1953

4. उड़ीसा 👉 01 जानेवारी 1949

5. उत्तर प्रदेश 👉  26 जानेवारी  1950

6. उत्तराखंड 👉 01 नोव्हेंबर 2000

7. कर्नाटक 👉  नोव्हेंबर 1956 आणि 1973

8. केरळ 👉 1 नोव्हेंबर  1956

9. गुजरात 👉 1 मे 1960

10. गोवा 👉  30 मे 1987

11. छत्तीसगढ़ 👉  01 नोव्हेंबर 2000

12. जम्मू आणि काश्मीर 👉  26 जानेवारी  1950

13. झारखंड 👉 15 नोव्हेंबर  2000

14. तमिळनाडु 👉  26 जानेवारी  1950

15. तेलंगाना 👉  02 जून 2014

16. त्रिपुरा 👉  21 जनवरी 1972

17. नागालैंड 👉 01 डिसेंबर  1963

18. पंजाब  👉  01 नोव्हेंबर  1966

19. पश्चिम बंगाल 👉 01 नोव्हेंबर  1956

20. बिहार 👉   1947

21. मणिपुर 👉  21 जानेवारी  1972

22. मध्यप्रदेश 👉 01 नोव्हेंबर 1956

23. महाराष्ट्र 👉 1 मे 1960

24. मिझोरम 👉  20 फेब्रुवारी  1987

25. मेघालय 👉  21 जानेवारी  1972

26. राजस्थान 👉   1958

27. सिक्किम 👉  16 मे 1975

28. हरियाणा 👉  01 नोव्हेंबर  1966

29. हिमाचल प्रदेश 👉  25 जानेवारी  1971
__________

विषय : :- बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न



1)एक षटकोनाच्या शिरोबिंदूवर A,B,C,D,E,F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसलो आहेत.जर F आणि C यांनी जागा आपापसात बदलल्या तर  C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?


1)  B

2) E

3) F

4) D

    

✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ 


2) महेशचे वय राहुलच्या वयाच्या निमपट आहे.5 वर्षांनंतर राहुलचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल.त्याच्या वडिलांचे आजचे व य 55 वर्षे असेल तर महेशचे  आजचे वय किती असेल?


1)45

2)30

3)25

4)15


🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀


3) TRANSFER , RTRANSF, FRTRAN , NFRTR ____ ?


1) RNFR

2) RFRT 

3) RNFRT

4) FRTNR


✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

4)   एका सांकेतिक भाषेत जर CLUSTER   म्हणजे xOfHgVi तर CHERRY म्हणजे काय असेल?


1) xSuIia

2) XsVIiB

3)xSvIiB

4)xSViIA


📌📌📌📌📌📌📌📌📌📌



5) जर EARTH चा संकेत 30 782 असेल ALPHA चा  संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?

1) 508378

2) 503881 

3) 503871

4) 508318


🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮🔮

6). खाली दिलेल्या संकेतांचा क्रम अभ्यास करा .त्यावरून शब्दाचे सांकेतिक रुप पर्यायातून निवडा.


A      B.     C      D.     E ............

●.      ∆.    ®.   #.    *.  ..........


TABLE = ?


1)∆#*∆●

2)*●∆∆*

3)●##∆*

4)®●∆®*

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

7) एका सांकेतिक भाषेत RACER ही अक्षरे S(1) D(2)S अशी लिहली तर त्याच सांकेतिक भाषेत NUMBER  हा शब्द कसा लिहाल?

1) 4 5 N C 2 S

2) O V N C (2) S

3) O 5 N C 2 S

4) O V N C F S


✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

8)   आगगाडीला विमान म्हंटले,विमानाला जहाज म्हंटले ,जहाजाला समुद्र म्हंटले,समुद्राला रस्ता म्हंटले ,रस्त्याला सायकल म्हंटले , तर जहाज कोठे हाकारली जातील?

1) रस्ता 

2) समुद्र 

3) सायकल

4) विमान

💈💈💈💈💈💈💈💈💈💈

9)खालील प्रश्नमालीका पहा . प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

3, 10, 29, 66  ?


1)125

2) 126

3) 127

4)136


💈💈💈💈💈💈💈💈💈💈

10) एक जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार  असेल ?

1) सोमवार

2) मंगळवार

3) बुधवार 

4) गुरुवार


पृथ्वीची कक्षीय गती


◆ आपल्याला सूर्य क्रांतिवृत्तावरून (त्याच्या भासमान मार्गावरून) फिरत असल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वी सूर्याभोवती विवृत्ताकार (लंबगोलाकार) कक्षेत फिरत असते.


◆  या विवृत्ताची विकेंद्रता ०.०१६७४ व सरासरी त्रिज्या १.४९५ × १०८ किमी. असून पृथ्वीचा भ्रमणाक्ष व कक्षेचे प्रतल यांच्यात २३° २६'५९" इतका कोन आहे.


 ★ सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला  वर्ष म्हणतात. 


◆ ताऱ्यांचे वार्षिक पराशय (सूर्याऐवजी पृथ्वीवरून तारे पाहिल्याने त्यांच्या स्थानांत होणारा भासमान बदल) हा पृथ्वीच्या कक्षीय गतीचा पुरावा आहे.


◆  पृथ्वीची कक्षेमधील गती सेकंदाला २९.७६ किमी. असून पृथ्वी सूर्याजवळ आली असताना ही गती वाढते

◆ २ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून सर्वात जवळ (सु. १४.६ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे उपसूर्य बिंदूवर आणि २ जुलैच्या सुमारास सर्वात दूर (सु. १५.१ कोटी किमी. अंतरावर) म्हणजे अपसूर्य बिंदूवर असते.

◆  इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या कक्षेत दीर्घकालीन विक्षुब्धता येते व परिणामी कक्षेची विकेंद्रता बदलते (सध्या ती कमी होत आहे)


भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?


-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.


Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...