Monday 25 January 2021

Internet Speed मध्ये जगात अव्वल ठरला ‘हा’ मुस्लिम बहुल देश, तर भारताची रँकिंग मात्र घसरली



मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत भारताच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झालीये. मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये भारत 129 व्या स्थानावर आहे, तर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 क्रमांक आहे. तर, मुस्लिम बहुल देश कतारने मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये दोन स्थानांची झेप घेतलीये. त्यामुळे साउथ कोरिया आणि संयुक्त अरब अमिरातला मागे टाकून कतार जगातील सर्वात जास्त मोबाइल इंटरनेट स्पीड असलेला देश ठरलाय. तर, थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये जगात अव्वल ठरलाय.


▪️भारतातला सरासरी मोबाइल इंटरनेट स्पीड :-


स्पीड टेस्ड ग्लोबल इंडेक्स Ookla च्या रिपोर्टनुसार, भारताच्या मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या 13.51Mbps स्पीडच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात 4.4 टक्के घट झाली आणि 12.91Mbps इतका भारताचा स्पीड नोंदवण्यात आला. तर याच महिन्यात भारताच्या सरासरी अपलोड स्पीड मात्र 1.4 टक्क्यांनी वाढलाय. यामुळे अपलोड स्पीड 4.90Mbps वरुन वाढून 4.97Mbps झाला आहे.


177.52Mbps स्पीडसह कतार अव्वल :-


कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक 178.01Mbps नोंदवण्यात आला. कतारनंतर 177.52Mbps स्पीडसह UAE चा नंबर लागतो. या लिस्टमध्ये साउथ कोरिया तिसऱ्या, चीन चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे.


▪️फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा 65 वा क्रमांक :-


तर, फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 53.90Mbps नोंदवण्यात आला. या क्रमवारीत भारताचा 65 वा नंबर लागतो. डिसेंबर महिन्यातील भारताचा फिक्स्ड ब्रॉडबँड अपलोड स्पीड 50.75Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 52.02Mbps इतका होता. थायलंड फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत अव्वल ठरला. थायलंडचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 308.35Mbps होता. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर आणि हाँगकाँगचा क्रमांक आहे. तर, रोमानिया चौथ्या आणि स्विझर्लंड पाचव्या स्थानी आहे. जगाचा विचार केल्यास जागतिक सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड डिसेंबर महिन्यात 96.43Mbps होता, तर नोव्हेंबरमध्ये 91.96Mbps इतका होता. तर, अपलोडिंग ब्रॉडबँड स्पीड 49.44mbps वरुन 53.31Mbps झाला.

बायडेन यांचा ‘हा’ निर्णय लाखो भारतीयांचं स्वप्न करणार पूर्ण



अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा संभाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जो बायडेन यांनी भारतीयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीमध्ये (स्थलांतर धोरणांमध्ये) मोठे बदल करण्यास सुरुवात केलीय.


बायडेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर बोलताना एक नवीन कायदा तयार करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. या कायद्यामुळे एक कोटी १० लाख अप्रवासी नागरिकांना म्हणजेच कायमस्वरुपी अमेरिकेमध्ये स्थायिक होण्यासाठी गेलेल्या भारतीयांना स्थानिक म्हणून दर्जा मिळण्याबरोबरच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याच्या मार्गातील अनेक अडथळे दूर होणार आहेत.


यात लाखो भारतीयांचाही समावेश आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील कोट्यावधी अप्रवासी नागरिकांवर देश सोडून जाण्याची टांगती तलवार होती. मात्र अध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय रद्द केले असून त्यामध्ये या स्थलांतर धोरणांमधील बदलांचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाच्या या निर्णयामुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.


बायडेन यांनी जारी केलेल्या नवीन आदेशामुळे कायदेशीर कागदपत्र नसतानाही अमेरिकेत वास्तव्य करत असणाऱ्यांना फायदा होणार आहे. अमेरिकेमध्ये अशा लोकांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे. त्यापैकी पाच लाख नागरिक हे मूळचे भारतीय आहेत. बायडेन यांनी पहिल्याच दिवशी घेतलेला हा निर्णय ट्रम्प यांच्या धोरणांच्या अगदी उलट आहे.

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी


NEW EDUCATION POLICY 2020 


⭕️कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं 

नामकरण आता 

*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...


जाणून घेऊया :


*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.

३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :


— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...


— *५ वर्षे मूलभूत Fundamental :* 

१. नर्सरी            @ ४ वर्षे

२. जूनियर केजी @ ५ वर्षे

३. एसआर केजी @ ६ वर्षे

४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे

५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे


— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*

६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे

७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष

८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे


— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*

९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे

१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष

११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे


*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*

१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे

१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे

१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे

१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे


*ठळक वैशिष्ट्ये :*


— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.

महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची. 

*दहावी मंडळ रद्द. SSC*

*एमफिल MPhil देखील बंद असेल.*



— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*

 

— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*

आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.


— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.

 *शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...* 


— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच, 

*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,* 

*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर 

*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*


— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...


— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील. 


— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...

 दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...


— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये 

*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि 

*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*

समाविष्ट आहे... 

त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील. 

आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील. 

राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...


*सर्व सरकारी Government,*

*खासगी Private* आणि 

*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*

*Deemed University*

 समान नियम असतील...


— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...


— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...


— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...


— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...


— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...


 — सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

अंतनिर्मित (intrusive/plutonic) अग्निजन्य खडकांचे प्रकार



१) डाईक (dyke)

-भूगर्भातील तप्त लाव्हारस भूकवचामध्ये असलेल्या उभ्या भेगांमध्ये साचतो व तो थंड होऊन लांबवत खडकांची निर्मिती होते त्यास डाईक असे म्हणतात

-उदाहरणार्थ इंग्लंडच्या उत्तर भागात क्लिवलँड डाईक ज्याची उंची सुमारे दीडशे मीटर आहे


२) सिल (sill )व शीट

-जलजन्य किंवा रूपांतरित खडकांच्या आडव्या भेगेत लावारस येऊन साचतो व कालांतराने थंड होऊन खडकाची निर्मिती होते ते त्यास सील असे म्हणतात

-याच पातळ किंवा कमी जाडीच्या खडकास शीट असे म्हणतात


३) लॅकोलिथ(lacolith)

-भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ठिकाणी खडक घुमटासारखे वर उचलले जातात आणि निर्माण होणाऱ्या पोकळीमध्ये हे लाव्हारसाचे निक्षेपण होते हे आणि त्यापासून घुमटाकार खडक तयार होतात त्यास लकोलिथ असे म्हणतात

-याची निर्मिती ती जलजन्य खडकांमध्ये होते

-संयुक्त संस्थानातील उटाह राज्यातील लासाल पर्वत आणि हेनरी पर्वत ही प्रमुख उदाहरणे आहेत


४) लोपोलीथ

-जेव्हा लाव्हारस खोलगट किंवा उथळ भागात साचतो आणि कालांतराने थंड होऊन बशीच्या(saucer shaped) आकारासारखा आकार निर्माण होतो त्यास लोपोलिथ असे म्हणतात


५) फेकोलिथ(phacolith)

-भूगर्भातील खडकांना जेव्हा घडीचा आकार प्राप्त होतो तेव्हा अशा खडकांमध्ये अपनती आणि अभिनती असतात . तेथे लाव्हारसाचे निक्षेपण होऊन वलयाकार भूआकार निर्माण होतो त्यास फेकोलीथ असे म्हणतात


६) बेथोलिथ (batholith)

-पृथ्वीच्या भूगर्भामध्ये  तप्त लावारस वर येण्याचा प्रयत्न करतो , तेव्हा भूकवचामधील विस्तीर्ण व खोलगट पोकळीमध्ये लाव्हारसाचे निक्षेपण होते, येथे तयार होणाऱ्या विस्तीर्ण खडकाला batholith असे म्हणतात


खासगी कंपन्यांमार्फत सरकारची नोकरभरती


🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे,


🌀राज्य सरकारमधील विविध विभागांच्या नवीन नोकरभरतीसाठी 'महापोर्टल'मध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे, असे संकेत गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले आहेत.


🌀राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात करण्याचा महाविकास आघाडीचा मानस असून पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील साडेआठ हजार आणि पोलिस दलातील पाच हजार २९७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. 


🌀तथापि राज्य सरकार 'महापोर्टल'ऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करणार आहे. महापोर्टलअंतर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई महाआयटीकडे देण्यात आली होती. या कामासाठी मे. अॅपटेक लिमिटेड, मे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मे. जिंजर वेब्ज प्रा. लि., मे. मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड या चार कंपन्यांना राज्यातील आगामी मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील सरकारी विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट कच्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.याबाबतची पुढील कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून दिली आहे.

'महापोर्टल'च्या माध्यमातून होणाऱ्या नोकरभरतीला अनेकांनी विरोध केला होता. 


🌀तयामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करून राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या आता नवीन नोकरभरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे येथून पुढे पदभरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने घेतील.


🌀राज्यातील या भरतीप्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलिस दलात ५२९७ पदे आणि आरोग्य विभागात ८५०० अशी एकूण १३ हजार ८०० पदांची भरती अपेक्षित आहे. राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरती यातील आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यामुळे नवीन नोकरभरतीची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलावी, अशी मागणी काही मराठा संघटनांकडून होत आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, सर्व मुख्यमंत्री, MP, MLA सर्वांनाच दिली जाणार करोना लस; अशी आहे योजना



🌈दशामध्ये करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या अंमलबजावणीला १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलीय. मात्र आता दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केलं जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


🌈विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.


🌈सरकारने करोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यामध्ये सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना करोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.


🌈सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना करोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

अग्निदुर्घटनेनंतर सीरमने आज तीन देशांना पाठवला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा


🌸पण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे.


🌸दशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुण्यातील या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.


🌸अदर पूनावाला काय म्हणाले - सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.


🌸मतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत - पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला




🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला


🔰 ०१) कर्नाटक : ४२.५० गुण 

🔰 ०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण

🔰 ०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण 

🔰 ०४) तेलंगणा : ३३.२३ गुण 

🔰 ०५) केरळ : ३०.५८ गुण

🔰 ०६) हरयाणा : २५.८१ गुण 

🔰 ०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण

🔰 ०८) गुजरात : २३.६३ गुण 

🔰 ०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण

🔰 १०) पंजाब : २२.५४ गुण 

🔰 ११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण 

🔰 १२) राजस्थान : २०.८३ गुण 

🔰 १३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण  

🔰 १४) ओडिशा : १८.९४ गुण 

🔰 १५) झारखंड : १७.१२ गुण

🔰 १६) छत्तीसगड : १५.७७ गुण 

🔰 १७) बिहार : १४.४८ गुण .


👎 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .

भारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस



उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.


एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.


भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे.


दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील 

अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.


भारत सरकारकडून सीरमच्या 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ठाकरे सरकारची मोठी घोषणा


🌷राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.


🌷राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.


🌷दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा  करोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.


🌷कद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते


👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 

👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 

👤 हरुदय आर के : केरळ : कला 

👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 

👤 तनुज समादार : आसाम : कला 

👤 वनिश केईशम : मणिपूर : कला 

👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला 

👤 जयोती कुमारी : बिहार : साहस 

👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस 

👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस 

👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन

👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन

👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन

👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन

👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन

👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान

👤 आनंद : राजस्थान : विद्वान

👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान

👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान

👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान

👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम 

👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ 

👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ

👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ

👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ

👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ 

👤 खशी पटेल : गुजरात : खेळ

👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .

पून्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.

यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".

यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड


🔸यदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.


🔸दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. 


विज्ञानकथा पुस्तके

वामन परत न आला

अंतराळातील भस्मासुर

कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)

प्रेषित

व्हायरस

अभयारण्य

यक्षांची देणगी

टाइम मशीनची किमया

याला जीवन ऐसे नाव


इतर पुस्तके

आकाशाशी जडले नाते

विज्ञानाची गरुडझेप

गणितातील गमतीजमती

विश्वाची रचना

विज्ञानाचे रचयिते

नभात हसरे तारे

आदिवासी कल्याण मंत्रालयाचे ‘श्रमशक्ती’ व्यासपीठ



▪️कद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते गोव्याच्या पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.


🛑ठळक बाबी...


▪️सकेतस्थळ आधारित या व्यासपीठावर स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या विषयीची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माहिती उपलब्ध असणार.


▪️आकडेवारीतले अंतर दूर करण्यासाठी तसेच रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या शोधात असलेल्या स्थलांतरित कामगारांना सक्षम बनविण्यात व्यासपीठाची मदत होणार आहे.


▪️रोजगाराच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरक्षित आणि उत्पादनक्षम असावी याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची "श्रमसाथी" नामक एक मार्गदर्शन पुस्तिका देखील तयार केली आहे.


▪️गोव्यामध्ये विविध राज्यांतून गोव्यात येणाऱ्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी गोव्यात एक समर्पित ‘स्थलांतर कक्ष’ देखील उघडण्यात आले आहे. परप्रांतीय कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असे केंद्र उघडणारे गोवा हे भारतातले पहिले गंतव्यस्थान बनले आहे.

सवादुपिंड आणि त्याची कार्ये


👉सवादुपिंड ओटीपोटावर स्थित एक अवयव आहे. 


👉आपण खात असलेल्या अन्नाचे शरीरातील पेशींच्या इंधनात रुपांतर करण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


👉 सवादुपिंडात दोन मुख्य कार्ये असतात: एक एक्सोक्राइन फंक्शन जे पचन करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करते अंतःस्रावी कार्य.


👉👉सवादुपिंडाचे स्थान👉👉


👉सवादुपिंड पोटच्या मागे डाव्या ओटीपोटात स्थित आहे.


👉 ह लहान आतडे, यकृत आणि प्लीहासह इतर अवयवांनी वेढलेले आहे


👉. हे स्पंजदार आहे, सुमारे सहा ते दहा इंच लांबीचे आणि उदर ओलांडून आडवे वाढलेले सपाट नाशपाती किंवा माशासारखे आकार आहे.


👉सवादुपिंडाचा प्रमुख म्हटलेला रुंद भाग ओटीपोटाच्या मध्यभागी स्थित असतो. 


👉सवादुपिंडाचा मुख्य भाग अशा जंक्शनवर स्थित असतो जेथे पोट लहान आतड्याच्या पहिल्या भागाला मिळते.


👉 यथूनच पोट आतड्यांमधील अंशतः पचलेले अन्न रिक्त करते आणि स्वादुपिंड पाचन एंझाइम्स या सामग्रीमध्ये सोडतात.


👉सवादुपिंडाच्या मध्यवर्ती भागास मान किंवा शरीर म्हणतात.


👉पातळ शेवटला शेपटी म्हणतात आणि डाव्या बाजूला वाढवते.


👉सवादुपिंडाभोवतालच्या अनेक मोठ्या रक्तवाहिन्या, उच्च मेन्स्टेरिक धमनी, उच्च मेन्स्ट्रिक व्हेन, पोर्टल व्हेन आणि सेलिआक अक्सिस, स्वादुपिंड आणि इतर उदर अवयवांना रक्तपुरवठा करतात.




👉सभोवतालच्या जहाज आणि अवयवांसह स्वादुपिंड


👉बहुतेक सर्व स्वादुपिंडात (95%) एक्सोक्राइन टिशू असते जे पचन करण्यासाठी स्वादुपिंड एंझाइम तयार करते.


👉 उर्वरित ऊतकांमध्ये अंतःस्रावी पेशी असतात ज्याला लॅंगेरहॅन्सचे आयलेट्स म्हणतात. पेशींचे हे समूह द्राक्षेसारखे दिसतात आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे आणि स्वादुपिंडाच्या स्रावांचे नियमन करणारे हार्मोन्स तयार करतात.



Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...