Saturday 2 October 2021

नाबार्ड

✔️भूमिका :-

🔸नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.

२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.

🔸नाबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:

🔸ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.

🔸पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.

🔸को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित

🔸सुरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.

🔸ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.

🔸ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.

🔸नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.

🔸हे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.

🔸हे ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.

🔸हे संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.

🔸नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.

44वी घटनादुरुस्ती 1978

1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

हृदय (Heart)

❣स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

❣वजन - पुरुष – ३४० ग्रॅम्स स्त्री – २५५ ग्रॅम्स

❣कार्य - हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.

❣हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.

❣हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

❣हृदयाची रचना - मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये

१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.

❣अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात.

❣ वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात.

❣खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

🔰 व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🔰 भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🔰 खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🔰 बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🔰 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🔰 संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🔰 आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🔰 खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🔰 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 🔰 उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

❤️कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

🔰पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

❤️नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

🔰औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

❤️अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

🔰नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे


1) भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी.

2) शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

3) सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

4) सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

5) केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

6) स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

7) पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

8) सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

9) कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.

10) मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.
वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

11) राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

12) मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

13) केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

14) केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

संविधान सभा

◆ 9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

◆ 11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

◆ 13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

◆ 22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

◆ 25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

◆ 22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

◆ 24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

◆ 29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

◆ 26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

◆ 24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

◆ 26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

🍁

सामाजिक संघटना व संस्थापक

👉रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे
👉पंडिता रमाबाई – शारदासदन-मुंबई,
👉मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
👉गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज
👉कर्मवीर भाऊराव पाटील – रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
👉महात्मा गांधी – हरिजन सेवक संघ
👉महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
👉डॉ. शिवाजीराव पटवर्धन – जगदंबा कुष्ठ निवास.
👉डॉ. आत्माराम पांडुरंग – प्रार्थना समाज.

भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

महाराष्ट्रातील महत्वाचे घाट TRICKS

🌍👇

1)कसारा घाट=मुंबई-नाशिक(मुन्ना कसा आहेस)

2)बोरघाट = मुंबई-पुणे (ती पुन्हा मुंबई ला बोर झाली)

3)कुंभार्ली घाट= कराड-चिपळूण(कुंभा चिपकला)

4)आंबा घाट = रत्नागिरी - कोल्हापूर(आंबा कोर)

5)फोंडा घाट= कोल्हापूर-पणजी(कोल्ह्याला पण फोडता येते)

6)हनुमंते घाट=कोल्हापूर-कुडाळ(कोल्हा म्हणते कुदा)

7)दिवा घाट= बारामती-पुणे(बापुचा दिवा)

8)खंबाटकी घाट=पुणे -सातारा(खांबाला पुसा)
              

👉समान नावाचे तालुके👇

   1)कर्जत- अहमदनगर व रायगड
      (अहमद राय वर कर्ज झालं.)

   2)खेड-- रत्नागिरी व पुणे
      ( पुरात्न खेड वाहून गेले,)

   3)कारंजा-- वर्धा व वाशीम
      ( वा वा काय मस्त आहे ...कारंजा)
 
   4)मालेगाव--नाशिक व वाशीम
      (नवा माल)

   5)नांदगाव--नाशिक व अमरावती
       ( अण्णा च नाद)

   6) कळंब--यवतमाळ व उस्मानाबाद
       (यवतमाळचा ऊस काळा)

    7)सेलू-- परभणी व वर्धा
        (पर्वा नाही त्याला सेलूची)

👉...महत्वाचे घाट क्रमाने👇

1)थळ घाट

2) माळशेज घाट

3)बोर घाट

4)  कुंभार्ली घाट

5) आंबा घाट

6) फोंडा घाट

7) आंबोली घाट

👉Tricks__" थळ माळावर बोर झाला म्हणून कुंभ हा आंबा फोडतो आंबोलीत"......✍️
●●●●●

𝐌𝐏𝐒𝐂 𝐋𝐈𝐕𝐄 𝐓𝐄𝐒𝐓 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒


1) खालीलपैकी कोणता अपारंपारिक ऊर्जास्त्रोत आहे ?
1) वायू (हवा)    2) सूर्य     
3) समुद्री लाटा   4) वरील सर्व

उत्तर :- 4 ✅✅

2) खालीलपैकी कार्बनचे अस्फटीक रूप कोणते ?
अ) ग्रॅफाईट    ब) फुलेरीन्स   
क) काजळी   ड) चारकोल
1) फक्त अ           2) फक्त ड   
3) फक्त क व ड    4) फक्त ब व ड

उत्तर :- 3 ✅✅

3) खालील विधानांचा विचार करा.
   अ) सोडिअम व पोटॅशियम याव्दारे शरीरामध्ये सोडिअम पोटॅशियम पंप चालवला जातो.
   ब) सोडिअम व पोटॅशियममुळे शरीरातील pH नियंत्रित केला जातो.
   क) त्यामुळे शरीर द्रवाचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवला जातो.
1) अ सत्य    2) अ, ब सत्य   
3) ब सत्य    4) सर्व सत्य

उत्तर :- 4 ✅✅

4) अयोग्य विधान निवडा.
  1) सूर्य हा ऊर्जेचा स्वच्छ स्त्रोत मानला जातो.
  2) सौर ऊर्जा घटामध्ये सिलिकॉनचा तुकडा वापरतात.
  3) सौर घट बनविण्यासाठी अर्धवाहकाचा उपयोग करीत नाही.
  4) आधुनिक काळातील सौर घट सेलेनिअमपासून बनवितात.

उत्तर :- 3 ✅✅

5) ज्या मूलद्रव्याचे भौतिक गुणधर्म सारखे नसतात मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात अशा गुणधर्माला ................ म्हणतात.
1) समभारीके    2) समस्थानिके   
3) अपरूपता    4) 1 व 2

उत्तर :- 3 ✅✅
___________________________

1)कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
(A) 1 दशलक्ष डॉलर
(B) 4 दशलक्ष डॉलर.  √
(C) 3 दशलक्ष डॉलर
(D) 5 दशलक्ष डॉलर

2)भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) दक्षिण आफ्रिका
(C) अर्मेनिया.  √
(D) न्युझीलँड

3)शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो?
(A) 1 मार्च.  √
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 29 फेब्रुवारी

4)मार्च 2020 या महिन्यात भारत सरकारने UNESCOच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी किती स्थळांचे नामांकन दिले?
(A) 1
(B) 3
(C) 2.  √
(D) 5

5)कोणत्या व्यक्तीची मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली?
(A) मुकेश अंबानी
(B) रतन टाटा.  √
(C) सी. रमेशचंद्र
(D) राघव राजपुरोहित

6)राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला गेला?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020. √
(D) 1 मार्च 2020

7)केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
(A) 7 वा
(B) 8 वा
(C) 9 वा
(D) 11 वा.  √

8)‘केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019’ राज्यसभेत चर्चेसाठी कधी मांडले गेले?
(A) 29 फेब्रुवारी 2020
(B) 3 मार्च 2020
(C) 28 फेब्रुवारी 2020
(D) 2 मार्च 2020.  √

9)जुन्या आयफोन संचांचा वेग कमी केल्याचा आरोपाखाली दाखल केलेला खटला निकाली काढण्यासाठी अॅपल कंपनीने किती रक्कम देण्याचे मान्य केले?
(A) 600 दशलक्ष डॉलर
(B) 300 दशलक्ष डॉलर
(C) 200 दशलक्ष डॉलर
(D) 500 दशलक्ष डॉलर.  √

10)सौदी अरबचे ‘प्रीमियम नागरिकत्व’ मिळविणारा पहिला भारतीय कोण आहे?
(A) फारुख अब्दुल्ला
(B) ख्वाजा अब्दुल घानी
(C) गुलाम मोहम्मद अब्दुल खादर
(D) युसुफ अली.  √

प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.
1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल
2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √
3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी
4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल

प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.
अ. पृथ्वीचे परीभ्रमण
ब. पृथ्वीचे परिवलन
क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे   
ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे

1) अ,ब
2) ब, क, ड
3) सर्व कारणीभुत घटक   √
4) अ,ब व क

प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.
अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह

1) अ,ब, क
2) अ, ब, ड
3) अ,ब,ड √
4) वरील सर्व

प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.
अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.
ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.
क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.

1) अ,क
2) अ
3) अ,ब
4) वरील सर्व. √

प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.
अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी
इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच
उ. भुस्तंभ

1) सर्व योग्य
2) सर्व अयोग्य
3) क, ड, इ, ई, उ
4) इ, ई.  √

प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.
अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.
ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.
क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.

1) अ
2) ब
3) क
4) यापैकी नाही.  √

प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?
अ. ऑस्टे्रलिया
ब. नामिबिया
क. ब्राझिल
ड. चिली

1) अ,ब,क
2) ब व क
3) अ,ब, क
4) सर्व योग्य.  √

प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.
अ. छोटा नागपूर
ब.माळवा
क. बुंदेलखंड
ड. बाघेलखंड

1) ब,क,ड,अ.  √
2) क,ब,ड,अ
3) अ,क,ड,ब
4) ब,क,अ,ड

प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)
अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.
ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.
क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची
आहे.

1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) सर्व योग्य.  √

प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.

1. चिरोली  
2. गरमसूर
3. गाळणा
4. मुदखेड

.      अ     ब      क    ड
1)    3     4      2     1.  √
2)    3     4      1     2
3)    1     2      3     4
4)    1     2      4     3

प्रश्न1४) कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे?
उत्तर :- युरोप✅✅

प्रश्न15) कोणत्या विद्यापीठातील अभियंत्यांनी आत्तापर्यंतचा सर्वात शुभ्र पांढरा रंग तयार केला?
उत्तर :-  पर्ड्यू विद्यापीठ✅✅

प्रश्न16) कोणता देश भारताला ‘S-400 SA-21 ग्रोवलर’ नामक हवाई संरक्षण प्रणाली देणार आहे?
उत्तर :- रशिया✅✅

प्रश्न17) कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी देयकावर बंदी घातली आहे?
उत्तर :- टर्की✅✅

प्रश्न18) अमेरिकेच्या ‘यूएस ट्रेझरी रिपोर्ट’ या अहवालानुसार, भारताला _ याच्या अंतर्गत ठेवले गेले आहे.
उत्तर :- मॉनिटरिंग लिस्ट✅✅

प्रश्न19) कोणत्या दिवशी ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ पाळला जातो?
उत्तर :- 17 एप्रिल✅✅

प्रश्न20) कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेतले तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले?
उत्तर :- विनेश फोगाट✅✅

प्रश्न21) कोणत्या मंत्रालयाने ‘लिंगभाव संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते?
उत्तर :-  ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

प्रश्न22) खालीलपैकी कोणत्या नदीवर रोपॅक्स जेट्टी प्रकल्प उभारला जाईल?
उत्तर :- धमरा नदी✅✅

प्रश्न23) कोणती संस्था ‘स्पेशल ड्रॉइंग राइट्स’ नावाची पूरक परकीय चलन साठा मालमत्ता सांभाळते?
उत्तर :-  आंतरराष्ट्रीय चलनन✅✅

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...