Small Family_- Click Here
Fitnees Certificate_- Click Here
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
वॉरन हेिस्टग (१७७४ ते १७८५) :
* वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते.
* वॉरन हेिस्टगने भारतात आर्थिक, व्यापारिक व न्यायिक सुधारणा केल्या.
* १७७२ मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठोके जास्त बोली लावणाऱ्याना १ वर्षांसाठी दिले.
* वॉरन हेिस्टगने मीठ, सुपारी, तंबाखूव्यतिरिक्त व्यापारावर २.५% कर लावला.
* वॉरन हेिस्टगने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर एलिहाज इम्पेची यांची नियुक्ती केली. * नंदकुमार खटला : १७७५ मधील नंदकुमार हत्या खटल्यात वॉरन हेिस्टगचा संबंध.
* रेग्युलेटीन अॅक्ट, १७७३ : यानुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.
* १७७८ मध्ये आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली.
* वॉरन हेिस्टगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.
लॉर्ड कॉर्नवॉलिस (१७८६ ते १७९३) :
* १७८६ मध्ये कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
* न्यायालयीन सुधारणा :
कॉर्नवॉलिसने सत्ता कलेक्टरांच्या हातात केंद्रित केली. १७८६ ला कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. १७९० मध्ये फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जिल्हा फौजदारी न्यायालय समाप्त करण्यात आले. त्याजागी ५ फिरती न्यायालये सुरू करण्यात आली. प्रांतिक न्यायालयाची स्थापना कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पटणा या ठिकाणी कॉर्नवॉलिसच्या काळात झाली.
* कॉर्नवॉलिस संहिता –
– अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर कॉर्नवॉलिसची संहिता आधारित आहे.
– त्याने कर व न्यायपद्धती विभाजित केली.
– त्याने कलेक्टरकडेच पूर्वीचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार होते ते काढून त्याकडे फक्त कर अधिकार शिल्लक ठेवले.
– जिल्हा सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नेमणूक केली.
– भारतात त्याने कायद्यांच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला.
– कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली ही पाश्चिमात्य न्याय संकल्पना व समतेच्या तत्त्वांवर आधारित होती.
* पोलीस सुधारणा-
– त्याने पोलिसांना जास्त वेतन द्यावयाचे ठरवले.
– खुनी व्यक्ती व चोरांना पकडल्यास खास पुरस्कार जाहीर केला.
– जमीनदारांकडून पोलीस अधिकार काढून घेण्यात आले.
* कर सुधारणा –
– १७८७ मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना राजस्व भागात विभाजित केले. त्यावर कलेक्टरची नियुक्ती केली.
* कायम धारा सुधारणा (Permanent Settlement of Land) :
– त्या दृष्टीने त्याने प्रचलित भूमिका, जमीन पट्टा देणे याचा अभ्यास केला व त्यानुसार त्याने जॉन शोर, जेम्स गड्र यांच्याशी चर्चा करून त्याने जमीनदारी व्यवस्था स्थायी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला.
– या सुधारणेमुळे कंपनीला बरेचसे फायदे झाले.
* नागरी प्रशासनाचा पाया वॉरन हेिस्टगने घातला, तर त्याचा विकास कॉर्नवॉलिसने केला.
लॉर्ड वेलस्ली (१७९८ ते १८०५) :
– १७९८ मध्ये जॉन शोअरनंतर वेलस्ली गव्हर्नर जनरल झाला.
– त्याने भारतीय राजकीय स्थितीचा फायदा घेऊन कंपनीचे साम्राज्य हे ध्येय समोर ठेवले. त्याने सरळ युद्धनीतीचा अवलंब केला.
* तनाती फौज :
– भारतीय राज्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तनाती फौजेचा स्वीकार केला.
– तनाची फौजेचा खऱ्या अर्थाने प्रणेता डुप्ले हा होता. कारण की, वेलस्लीच्या आधी त्याने ही पद्धत सुरू केली होती.
– वेलस्ली हा साहाय्यक प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे.
– या पद्धतीनुसार भारतीय रियायतीबरोबर वेलस्लीने करार करून साम्राज्य दृढ करून साहाय्यक प्रणालीला जन्म दिला.
– ही प्रणाली चार अवस्थांवर अवलंबून होती. सन्य बाळगणे, मदत देणे, खर्च घेणे व बरखास्ती.
हैदराबादच्या निजामाने १७९८ मध्ये,
म्हैसूरने १७९९ मध्ये,
अवध १८०१ मध्ये,
पेशवा १८०२ मध्ये या करारावर सह्या केल्या.
– त्याच्या काळात चतुर्थ इंग्रज – म्हैसूर युद्ध (१७९९)- टिपू सुलतानाचा मृत्यू झाला. (४ मे, १७९९).
लॉर्ड मिंटो १८०७ ते १८१३) :
– १८०९ मध्ये रणजितसिंहांशी लॉर्ड मिंटोने करार केला.
– लॉर्ड मिंटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले.
– १८१३ – चार्टर अॅक्ट : या कायद्यानुसार कंपनी प्रशासनाला एक लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले. या कायद्याने भारतातील व्यापारावरील कंपनीचा एकाधिकार काढून घेण्यात आला. (फक्त चहाचा व्यापार व चीनबरोबरचा व्यापार वगळता).
लॉर्ड हेिस्टग (१८१३ ते १८२३) –
– लॉर्ड मिंटोनंतर लॉर्ड हेिस्टग हा गव्हर्नर जनरल बनला.
– लॉर्ड हेिस्टग हा अहस्तकक्षेप निधीचा पुरस्कर्ता होता. पण लॉर्ड हेिस्टगला हस्तक्षेप निधी स्वीकारावा लागला.
– त्याच्या काळात नेपाळबरोबर युद्ध झाले. (नेपाळ आंग्ल युद्ध १८१४ ते १८१६ या काळात झाले.) हे युद्ध १८१६ ला सगौली कराराने समाप्त झाले.
– तृतीय मराठा-इंग्रज युद्ध (१८१७ ते १८१८) – या युद्धामुळे पेशवा पद समाप्त झाले. १३ जून १८१८ रोजी पुण्याचा तह, पेशवा बाजीराव दुसरा याला कानपूरजवळील विठूर येथे पाठविण्यात आले व उर्वरित आयुष्य कंपनीच्या पेन्शनवर जगून तेथेच त्यांचा मृत्यू झाला.
– यांच्या काळात रयत थॉमस मुन्रोने मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली.
– ज्या पद्धतीत शेतकरी हा भूमी स्वामी होता तो सरळ सरकारला कर द्यायचा.
– लॉर्ड हेिस्टगने वृत्तपत्रांना प्रथमत: स्वतंत्रता प्रदान केली. पण पुढे अटी लादल्या.
– त्याने वृत्तपत्रांवरील प्रसिद्धिपूर्वक नियंत्रण काढून घेतले.
लॉर्ड विल्यम बेंटिंग (१८२८ ते १८३५)
– लॉर्ड बेंटिंग हा सुधारणावादी होता.
– त्याला नेपोलियन विरुद्ध लढायचा अनुभव होता.
– सतीप्रतिबंधक कायदा, १८२९ – बेंटिंगच्या आधी कोणत्याही गव्हर्नर जनरलने सामाजिक प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले नाही. बेंटिगने मात्र सतीप्रथा व शिशुवध बंद करून सामाजिक सुधारणा केल्या.
– राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी बेंटिंगला साथ दिली.
– १८३० मध्ये मुंबई व मद्रास प्रेसिडेन्सी क्षेत्रात सतीप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला.
– त्याने ठगांचादेखील बंदोबस्त केला.
– वृत्तपत्रांबाबत त्याने उदार धोरण ठेवले.
* शिक्षण सुधारणा –
– त्याने सार्वजनिक शिक्षण समिती नेमली.
– बेंटिंगने मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले.
– त्यानुसार उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजीची भाषा स्वीकारण्यात आली.
– बेंटिंगने १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली.
– त्याच्याच काळात चार्टर अॅक्ट, १८३३ हा संमत झाला.
सर चार्ल्स मेटकाफ (१८३५ ते ३६) –
– बेंटिंगनंतर हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झाला.
– त्याने भारतीय वृत्तपत्रांवरील बंदी उठवली. म्हणून त्याला गव्हर्नर जनरल पदावरून दूर केले.
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६) :
– १८४८ मध्ये लॉर्ड हर्डिंगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला.
– डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धांतासाठी विशेष ओळखला जातो.
– डलहौसीच्या मते, संस्थाने तीन प्रकारची होती- स्वतंत्र व कर न देणारी संस्थाने, मोगल/पेशवाअधीन असणारी पण ईस्ट इंडिया कंपनीला कर देणारी संस्थाने, इंग्रजांच्या मदतीने बनलेले अथवा पुनर्जीवित झालेली संस्थाने.
– डलहौसीने या संस्थानांना दत्तक पुत्र घेण्यास अनुमती दिली. पण दत्तक पुत्र हा गादीस वारस मानण्यास नकार दिला.
– त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तक पुत्र वारसा नेमल्यास मान्यता नाकारली.
– डलहौसीने या सिद्धांतानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.
– लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.
– लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम भागात झाला.
– लॉर्ड डलहौसीने सन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.
– १८५३ मध्ये प्रथम रेल्वे ठाणे ते मुंबई येथे सुरू करण्यात आली.
– भारतात पोस्ट स्टॅम्पचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला.
– त्याच्या काळात भारतात रेल्वे लाइनचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.
– लॉर्ड डलहौसीला भारतात विद्युत तारेचा प्रारंभकर्ता असे म्हणतात.
– लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.
– १८५४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.
– १८५४ चा वुडचा खलिता – त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षा योजना बनविण्यात आली. यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्रा चार्टा असे म्हणतात. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे, अशी शिफारस करण्यात आली.
– त्याच्या काळात विधवा विवाहासंदर्भात विडो रिमॅरेज अॅक्ट, १८५६ ला संमत करण्यात आला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.
लॉर्ड कॅिनग (१८५६ ते १८६२) :
– १८६२ मध्ये भारत प्रशासन कायद्यानुसार गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय या किताबाचा पहिला मानकरी ठरला.
– १८५८ चा उठाव कॅिनगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्याने केले.
– राणीचा जाहीरनामा (पंतप्रधान डर्बीनी तयार केला.) लॉर्ड कॅिनगने १ नोव्हेंबर,
– १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखविला.
– कॅिनगने १८६१ च्या पोलीस खात्यात सुधारणा केल्या.
– पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (आयजी) जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (एसपी) तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इ.च्या नेमणुका केल्या.
– कॅिनगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६०मध्ये लागू केली.
– १८६२पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. इ.स. १८६१ मध्ये इंडियन हाय कोर्ट अॅक्ट संमत झाला.
– कॅिनगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या.
– उत्तर भारतासाठी अलाहाबाद येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली.
– १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या साहाय्याने कॅिनगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली.
– १८६१ च्या दुष्काळ चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली िहदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅिनगने नेमला.
– कॅिनग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त प्रथम व्हाइसरॉय (व्हॉइस ऑफ रॉय – राजा/राणीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी/ आवाज) होय. १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अॅक्ट) पास झाला.
– याच काळात इंडियन सिव्हिल सíव्हसेस परीक्षा सुरू झाल्या.
– इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली.
जन्म - १४ नोव्हेंबर १७९४–
मृत्यू -१७ फेब्रुवारी १८८१
एकोणिसाव्या शतकातील एक महाराष्ट्रीय क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहुजीबुआ, लहुजी वस्ताद या नावांनीही ते परिचित होते आणि त्यांचे घराणे ‘ राऊत’ या नावाने ख्यातनाम होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी-पेठ (ता. पुरंदर) येथे राघोजी व विठाबाई या दांपत्यापोटी झाला. साळवे हे पराक्रमी घराणे असून छ. शिवाजी महाराजांनी लहुमांग यांस (लहुजींचे आजोबा) ‘राऊत’ ही पदवी देऊन पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली होती. लहुजींचे वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख होते, शिवाय शस्त्रागारखात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. खडकीच्या युद्घात पेशवाईचा अस्त झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या लढाईत मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याविरुद्घ लढताना ते धारातीर्थी पडले. ते पाहून लहुजींनी आजन्म ब्रह्मचारी राहून मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा द्दढनिश्चय केला. त्यांनी पुण्यातील गंजपेठेत व्यायामशाळा (तालीम) सुरु केली (१८२३), शिवाय शस्त्रास्त्रांच्या गुप्त प्रशिक्षणासाठी गुलटेकडी परिसरातील निर्जन, दाट झाडीमध्ये जागा निवडली.
महात्मा जोतीराव फुले व त्यांचे गोवंडे, परांजपे हे मित्र, वासुदेव बळवंत फडके, आप्पासाहेब भांडारकर, विठोबा गुठाळ वगैरेंना मल्लविद्येबरोबरच शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण लहुजींनी दिले. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि पुणे प्रांतातील तत्कालीन बंडखोर व दरोडेखोर मांग, रामोशी, भटके-विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करुन स्वातंत्र्याचे बीज या बेडर माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला. त्या सुमारास सत्तू नाईक याची टोळी दरोडेखोरीत अग्रेसर होती. त्याचेही मन वळवून त्याला क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वासुदेव फडके यांना मदत करण्याचे आवाहन केले. अठराशे सत्तावनच्या उठावात लहुजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील झाले होते. त्यांना फाशी वा जन्मठेप अशा कठोर शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावल्या. लहुजींपासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली.
लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलितोद्घारात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्घ झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. फुले यांच्या शैक्षणिक कार्यास लहुजींनी भक्कमपणे मदत केली. फुले यांच्या मिरवणुकीत, सभेत वा कार्यक्रमात लहुजी आपल्या तालीमबाज शिष्यांसह हजेरी लावीत. वृद्घापकाळाने त्यांचे पुणे येथे निधन झाले.
🔸१) धान्य दळण्याची 'जाती' बनविण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?
- रत्नागिरी
🔹२) पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
- शहाजीसागर
🔸३) पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे १९२८ मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर .... याचे नाव देण्यात आले होते.
- लॉईड
🔹४) राज्यात.... येथे 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' चे कार्यालय आहे.
- पुणे
🔸५) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र १९९७ पासून राज्यात कार्यरत आहे. कोठे ?
- मांजरी (पुणे)
🔸१) 'उत्तर रामचरित', 'मालती-माधव' यांसारख्या अजरामर नाट्यकृतींचा कर्ता भवभूतीचे जन्मस्थळ म्हणून कोणत्या स्थळाचा उल्लेख कराल ?
- पद्मपूर (गोंदिया)
🔹२) वर्धा व पैनगंगा यांच्या संगमाजवळ वसलेले चंद्रपूर जिल्ह्यातील गाव ....
- वढा
🔸३) चंद्रपूर जिल्ह्यातील 'चंद्रपूर' हे जिल्ह्याचे ठिकाण .... या नदीकाठी वसले आहे.
- इरई
🔹४) एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण .... या जिल्ह्यात राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा जास्त म्हणजे ७० टक्क्यांहून अधिक इतके आहे.
- गडचिरोली
🔸५) लोहखनिजाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध असलेली गडचिरोली जिल्ह्यामधील स्थळे .... ही होत.
- देऊळगाव, सुरजागड व भामरागड
🔸१) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे .... हे क्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सह्य पर्वतराजीत वसले आहे.
- भीमाशंकर
🔹२) भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय .... यांना दिले जाते.
- नाना फडणवीस
🔸३) पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरी हा किल्ला .... या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे.
- सातवाहन
🔹४) छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले 'वढू' हे ठिकाण पुणे जिल्ह्यात .... या तालुक्यात आहे.
- शिरूर
🔸५) ज्वारी, सिट्रोनेला, मका, करडई, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी 'निंबकर कृषी अनुसंधान संस्था' .... येथे कार्यरत आहे.
- फलटण(सातारा)
🔸१) इ. स. १९४६ मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात 'आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट' म्हणून ख्यातनाम झालेली
संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?
- पुणे
🔹२) इ. स. १९७४ मध्ये स्थापन झालेली 'वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट' राज्यात कोठे आहे?
- मांजरी (पुणे)
🔸३) पुण्यातील शनिवारवाडा बांधण्याचे श्रेय कोणत्या पेशव्यास द्यावे लागेल?
- पहिला बाजीराव पेशवा *
🔹४) पुण्याजवळ .... येथे 'स्व. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान' विकसित होत आहे.
- हिंजेवाडी
🔸५) इ. स. पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या .... येथून घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते.
- नाणे घाट
🔸१) अलीकडील काळात सांगली जिल्ह्यात द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग नव्याने विकसित होत आहे. सांगली जिल्ह्यातील .... हे गाव मनुके उत्पादनात विशेष अग्रेसर आहे.
- तासगाव
🔹२) केंद्रीय रेशीम मंडळांतर्गत रेशीम किड्यांच्या अंडीपुंजांचे निमिर्ती केंद्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोठे?
- गडहिंग्लज
🔸३) कोल्हापूर जिल्ह्यातील 'पन्हाळा' हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा ..... याने बांधला, असे म्हणतात.
- दुसरा भोज
🔹४) गोवा राज्याच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या ..... तालुक्यात तिल्लारी नदीवर 'तिल्लारी' हा जलविद्युत प्रकल्प उभा राहिला आहे.
- चंदगड
🔸५) उत्तर सोलापूरमधील ......येथे माळढोक पक्षी अभयारण्य आहे.
- नान्नज
🔸1) स्वातंत्र्यपूर्व काळात .... यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १० ऑगस्ट, १९२८ रोजी सादर केलेला अहवाल म्हणजे वस्तुत: देशाच्या राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडाच होता, असे म्हणता येईल.
-पंडित मोतीलाल नेहरू
🔹2)भारताची घटना तयार करण्यासाठी लागलेला एकूण कालावधी ....
-२ वर्षे ११ महिने १८ दिवस
🔸3)भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली?
-प्रांतिक कायदे मंडळांनी
🔹4)....अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली.
-त्रिमंत्री योजना, १९४६
🔸5)भारतातील घटनादुरुस्ती पद्धती.... घटनेवर आधारित आहे.
-दक्षिण आफ्रिकेच्या
🔸१) सन १८७८ मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या .... या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल .
- गॉथिक
🔹२) आता 'छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस' म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेल्या रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते ?
- एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स
🔸३) मुंबई उपनगर जिल्ह्यातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) .... नावाने ओळखला जातो.
- अली यावर जंग मार्ग
🔹४) मुंबई उपनगरातून जाणाऱ्या ..... महामार्गास 'वसंतराव नाईक महामार्ग' म्हणून ओळखले जाते.
- पूर्व द्रुतगती महामार्ग (इस्टर्न एक्स्प्रेस हायवे )
🔸५) मुंबई येथील 'ऑगस्ट क्रांती मैदान' पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते ?
- गवालिया टैंक मैदान
1. मुघल सत्तेचे सर्व बादशाह कसे लक्षात ठेवाल.
क्लूप्त्या : BHAJI SABJI FOR MAA SHAB
B = बाबर
H = हुंमायू
A = सम्राट अकबर
J = जहांगीर
S = शहाजहान
A = औरंगजेब
B = बहादुरशहा पहिला
J = जाहांदरशहा
FOR = फारुख्शियार
M = मुहम्मद शाह
A = अहमदशाह
A = आलमगीर
SH = शाह आलम
A = अकबर दुसरा
B = बहादूर शाह जफर
2. हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके
क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'
शि – शिमला
म – मसुरी
नैना – नैनिताल
दिली – दार्जीलिंग
आभार आमीर सैय्यद
3. क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल
क्लूप्त्या : एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.
'वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग'
va = वा = Vatican City ०.४४. स्के किमी. ( युरोप )
mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप
na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर
tu = तू = Tuvala २६.०० स्के किमी. द. प्र . म .
sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप
li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप
m = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.
st =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन
ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर
se = से = Seychelles , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर
4. भारताची वैमानिकविरहित विमाने लक्षात कशी ठेवाल.
क्लूप्त्या : 'लक्षाने निशाना साधत रुस्तामचे दोन नेत्र फोडले.'
लक्षाने - लक्ष
निशाना- निशांत
रुस्तामचे दोन रुस्तम -१
रुस्तम -२
नेत्र
5. बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा
क्लूप्त्या : “मैत्री आमिप”
मै = मेघालय
त्री = त्रिपुरा
आ = आसाम
मि = मिझोरम
प =पश्चिम बंगाल.
फोर्ट विल्यम(बंगाल) प्रांताचे गव्हर्नर्स, 1773–1833
कारकीर्द सुरु :- 20 ऑक्टोबर 1773(originally joined on 28 एप्रिल 1772)
नियुकी कोणी केली :- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
कार्यकाल समाप्त :- 1 फेब्रुवारी 1785
❇️ कार्यकाळातील घटना ❇️
• रेग्युलेटिंग अॅक्ट, १७७३
• बंगाल सर्वोच्च परीषद
• बंगाल एशियाटिक सोसायटी
• शाह आलम दुसरा या मुघल सम्राटाचे पेन्शन बंद केले.
• बंगालमध्ये द्विदल राज्यपद्धती थांबवली.
• जॉनथन डंकन द्वारा नवीन संस्कृत शाळा
• टांकसाळ मुर्शिदाबाद वरून कोलकाताला हलवली.
• बंगाल गॅझेट - 1780 पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध
• कलेक्टर पदाची निर्मिती
• महाभियोगाचा खटला चालविण्यात आलेला पहिला गव्हर्नर जनरल.
• पहिले आंग्ल मराठा युद्ध (1775–82)
• दूसरे आंग्ल म्हैसूर युद्ध (1780–84 )
• पहिले रोहिला युद्ध 1773–1774
• दुसरा रोहिला उठाव 1779
• फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली 1774
• जमीन वस्तीवर प्रयोग.(1772-पाच वर्षांचा तोडगा,1776 मध्ये 1 वर्षात बदलला)
• भगवद गीतेचे इंग्रजीत भाषांतर चार्ल्स विकिन्सन
१७६४ मध्ये मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई म्हणजेच बक्सरची लढाई होय.
तर बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते (1765 ला क्लाइव्ह पुन्हा बंगालचा गव्हर्नर झाला होता हे इथे लक्षत घ्या).
त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.ह्या तहानुसार खालील अटींवर शुजाला त्याचे राज्य परत देण्यात आले.
अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शह आलम याला परत द्यावेत.युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत
काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा.
अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी.
▶️ कर_घटनेचे नाव_वर्ष विशेष
*1) प्लासीची लढाई*
1757 सिराज उधौला व इंग्रज
*2) भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498*
वास्को-द-गामा
*3) वसईचा तह 1802*
इंगज व पेशवे
*4) बस्कारची लढाई*
1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
*5) सालबाईचा तह*
1782 इंग्रज व मराठे
*6) तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818*
दुसर्या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट
*7) अलाहाबादचा तह*
1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
*8) तैनाती फौज (सुरवात) 1797*
गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
*9) दुहेरी राज्यव्यवस्था 1765*
रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
*10) रेग्युलेटिंग अॅक्ट 1773*-
बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.
*11) सतीबंदीचा कायदा*
1829 बेटिंग
*12) भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835*
लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
*13) रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853*
लॉर्ड डलहौसी
*14) भारतातील पहिली कापड गिरणी*
1853-54 काउसजी
*15) पहिली ताग गिरणी 1855*
बंगालमधील रिश्रा
*16) विधवा पुनर्विवाह कायदा 1856*
लॉर्ड डलहौसी
*17) विद्यापीठांची स्थापना 1857*
मुंबई,मद्रास,कोलकाता
*18) 1857 चा कायदा*
1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
*19) राणीचा जाहिरनामा*
1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
*20) वुडचा खलिता 1854*
वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
*21) 1861 चा कायदा*
1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी.
*22) दख्खनचे दंगे 1875*
महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
*23) शेतकर्याचा उठाव 1763 ते 1857*
बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला
*24) हिंदी शिपायांचा उठाव 1806*
वेल्लोर येथे झाला
*25) हिंदी शिपायांचा उठाव 1824*
बराकपूर
*26) उमाजी नाईकांना फाशी*
1832
*27) संस्थाने खालसा*
1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)
*28) मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी केव्हा झाडली?*
29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
*29) 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857*
'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
*30) भिल्लाचा उठाव 1857*
खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
*31) गोंड जमातीचा उठाव*
- ओडिशा
*32) संथाळांचा उठाव*
- बिहार
*33) रामोशांचा उठाव*
- उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
*34) गडकर्याचा उठाव*
- कोल्हापूर
*35) कोळी व भिल्लाचा उठाव*
- महाराष्ट्र
*36) 1857 च्या उठावाचे नेतृत्व*
- बहादुरशाह
*37) भारतातील पहिली कामगार संघटना 1890*
नारायण मेघाजी लोखंडे
*38) स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882*
लॉर्ड रिपन
*39) हंटर कमिशन 1882*
भारतीय शिक्षणविषयक आयोग
*40) भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली ?*
1878 लॉर्ड लिटन
*41) भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली?*
1882 लॉर्ड रिपन
👉 कर घटनेचे नाव वर्ष विशेष
👉 1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज
👉 2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा
👉 3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे
👉 4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज
👉 5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे
👉 6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट
👉 7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी
👉 8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी
👉 9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)
👉 10. रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला ;गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला.
👉 11. सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग
👉 12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले
👉 13. रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी
👉 14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी
👉 15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा
👉 16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी
👉 17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता
👉 18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती
👉 19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला
👉 20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात
👉 21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी
👉 22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन
👉 23. शेतकर्याचा उठाव 1763 ते 1857 बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>
👉 24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला
👉 25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर
👉 26. उमाजी नाईकांना फाशी 1832
👉 27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)
👉 28. मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत
👉 29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू
👉 30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली
👉 31. गोंड जमातीचा उठाव - ओडिशा
👉 32. संथाळांचा उठाव - बिहार
👇 33. रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली
👉 34. गडकर्याचा उठाव - कोल्हापूर
👉 35. कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र
👉 36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह
👉 37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे
👉 38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन
👉 39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग
👉 40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन
👉 41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन .
📚 परकीय आक्रमणे 👇 👇 👇 👇 👇 👇
👉 भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.
👉 पराचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.
👉 भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.
इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण
👉 मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.
👉 भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
👉 या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.
अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326)
👉 गरीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
👉 सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.
👉 मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
👉 भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
👉 सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.
◆ S&P ग्लोबल कॉपरिट सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये हिंदुस्थान झिंक पहिल्या क्रमांकावर.
◆ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या SC आणि ST विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणारी नवीन सामाजिक कल्याण योजना "योगश्री" लाँच केली.
◆ शिरशदू मुखोपाध्याय ध्याय यांना कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित.
◆ दहाव्या व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.
◆ 2024 ट्रिपॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये दुबईने सर्वोच्च सन्मान मिळवला.
◆ दुबई हे सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे जागतिक गंतव्य स्थान मिळवणारे पहिले शहर ठरले आहे.
◆ Genesys International चे 3D डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म अयोध्या नकाशा म्हणून निवडले.
◆ जागतिक आरोग्य संघटनेने, पारंपरिक औषधे मॉडयूल 2 आयसीडी-11 ची सुरुवात केली.
◆ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या रेडिओ शोचे नाव 'नई सोच नई कहानी' करण्यात आले आहे.
◆ केंद्र सरकारच्या स्वच्छसर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मन्स स्टेट'चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...