Sunday 9 January 2022

सिंधुताई सपकाळ


🔸जन्म : 14 नोव्हेंबर 1948 , वर्धा , महाराष्ट्र 

🔹मृत्यू :- 4  जानेवारी 2022 ,  गॅलेक्सी हॉस्पिटल , पुणे , महाराष्ट्र , (वय- 73 )

🔸इतर नावे : माई ( साक्षर आई)✅

🔹जोडीदार : श्रीहरी सपकाळ

🔸मुले : 4 (जैविक)
            1500+ दत्तक✅

🔹एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात.

🔸 सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे. 

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸पुरस्कार :

▪️२०२१ - सामाजिक कार्य श्रेणीतील पद्मश्री ✅

▪️2017 - भारताच्या राष्ट्रपतींकडून  नारी शक्ती पुरस्कार

▪️2014 – अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार 

▪️2013 - सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा

▪️2010 – अहिल्याबाई होळकर पुरस्कार ,  महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिला 

▪️2008 – लोकसत्ता या दैनिक मराठी वृत्तपत्राद्वारे दिला जाणारा वुमन ऑफ द इयर पुरस्कार

▪️सह्याद्री हिरकणी पुरस्कार

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖

देशातील पहिले पेपरलेस न्यायालय


🔸केरळ उच्च न्यायालय 01 जानेवारी 2022 रोजी देशातील पहिले पेपरलेस न्यायालय आहे.

🔹सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. 

🔸केरळ उच्च न्यायालयाने ई-फायलिंग, पेपरलेस कोर्ट आणि ई-ऑफिसच्या सुविधांसह आभासी कार्यालय प्रकल्प सुरू केला आहे. 

🔹म्हणजेच आता हायकोर्टात दाखल होणारी केस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार आहे.

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी

🔸भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेला अंदमान, निकोबार बेटांवरील जागृत झाल्याची चिन्हे आहेत.

🔹 या ज्वालामुखीच्या तोंडातून राख बाहेर पडते.

🔸यापूर्वी १९९१ मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाला होता, अशी माहिती येथील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थतर्फे (एनआयओ) देण्यात आली.

🔹पोर्ट ब्लेअरपासून १४० किलोमीटर ईशान्येला बॅरेन बेटांवर हा ज्वालामुखी आहे. ✅

🔹सुमारे १५० वर्षे निद्रिस्त अवस्थेत राहिल्यानंतर १९९१ मध्ये तो जागृत झाला होता, अशी माहिती एनआयओच्या वतीने देण्यात आली.

भारत-चीन सीमासंघर्षादरम्यान लडाखमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या तलावावर चीन बांधतंय नवा पूल



🔰पर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (LAC) भागाच्या बाजूने पायाभूत सुविधांची उभारणी सुरू ठेवून, चीन पॅंगॉन्ग त्सोवर एक नवीन पूल बांधत आहे जो उत्तर आणि दक्षिण किनार्‍या दरम्यान तलावाच्या, आणि LAC च्या जवळ अधिक वेगाने सैन्य तैनात करण्यासाठी अतिरिक्त संधी प्रदान करेल.


🔰इडियन एक्सप्रेसच्या सूत्रांनी सांगितले की तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर ८ च्या पूर्वेला २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर पूल बांधला जात आहे.


🔰भारत म्हणतो की फिंगर ८ LAC दर्शवितो. पुलाचे ठिकाण रुतोग काउंटीमधील खुर्नाक किल्ल्याच्या पूर्वेस आहे जेथे पीपल्स लिबरेशन आर्मीचे सीमावर्ती तळ आहेत. खुर्नाक किल्ल्यावर एक फ्रंटियर डिफेन्स कंपनी आहे आणि बनमोझांग येथे पूर्वेला एक वॉटर स्क्वाड्रन आहे.


🔰म २०२० मध्ये लष्करी अडथळे सुरू झाल्यापासून, भारत आणि चीनने केवळ विद्यमान पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीच काम केले नाही, तर संपूर्ण सीमारेषेवर अनेक नवीन रस्ते, पूल, लँडिंग स्ट्रिप देखील बांधले आहेत. पेंगॉन्ग त्सो, एक एंडोरहिक सरोवर, १३५ किमी लांब आहे, ज्यापैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीन जिथे नवीन पूल बांधत आहे त्याच्या अगदी जवळ असलेला खुर्नाक किल्ला, बुमेरांग आकाराच्या तलावाच्या जवळ आहे.

फ्रान्समध्ये आढळला करोनाचा नवीन प्रकार; तब्बल ४६ म्युटेशन झाल्याची तज्ज्ञांची माहिती.



🔰जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून अनेक नवनवीन व्हेरिएंट समोर येऊ लागले आहेत. ओमायक्रॉननंतर डेल्मिक्रॉन आणि फ्लोरोना या व्हेरिएंटचे रुग्ण देखील आढळत आहेत. त्यातच आता आणखी एक व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. फ्रान्समध्ये करोनाचा एक नवीन व्हेरिएंट आढळला असून तो तब्बल ४६ वेळा उत्परीवर्तीत (म्युटेट) झाला आहे. या नवीन व्हेरिएंटला संशोधकांना ‘आयएचयू’ असं नाव दिलंय.


🔰फरान्सच्या मारसैल मध्ये करोनाचा ‘आयएचयू’ हा नवा प्रकार सापडला असून त्याचे १२ रुग्ण आढळले आहेत. लागण झालेले सर्वजण हे आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते, अशी माहिती डेली मेलने दिलीय. फ्रान्समध्ये सध्या करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यातच हा नवा प्रकार सापडल्यानने चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. करोनाच्या आयएचयू या प्रकाराचा पहिला रुग्ण १० डिसेंबरला आढळला होता.


🔰आयएचयू व्हेरिएंट अन्य देशांमध्ये पसरला आहे की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिएंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करणार आहे. आयएचयूचा शोध लावणार्‍या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट जास्त घातक असून शकतो आणि याच्यावर लसीचा परिमाण होण्याची शक्यता कमी आहे.

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद



🔰करोना, विशेषत: ओमायक्रॉन उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे तसेच स्वयंअर्थसहित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. या काळात वर्ग आणि परीक्षा फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील.


🔰महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच राहील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. करोनाचा उद्रेक आणि विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षांबाबतही चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून जनतेश संवाद साधताना स्पष्ट केले. 


🔰करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळांपाठोपाठ महाविद्यालये बंद करण्याबाबत मंगळवारी कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत केल्यावर सामंत यांनी निर्णय जाहीर केला.  विद्यार्थी हा केंद्रिबदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला



1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला


2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान


3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला


4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.


5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला


6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली


7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला


9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला


11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.


12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे


13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.


14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू


15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश


16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला


17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

2021-2022 च्या पुढील परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न



01. देव समाजाची स्थापना कोणी केली?

सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री


02. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे?

नर्मदा


03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

1664 इ.स


04. इंग्रजांनी भारतातील पहिले बंदर कोणत्या राज्यात बनवले?

मद्रास (चेन्नई)


05. 73 व्या घटनात्मक कायद्याने भारतीय संविधानात कोणते वेळापत्रक समाविष्ट केले आहे?

अकरावी अनुसूची


06. हरित क्रांतीचे जनक कोण?

 नॉर्मन बोरलॉग


०७. पँथेरा टायग्रिसचे वैज्ञानिक नाव काय आहे?

वाघ


08. उत्पन्न आणि उपभोग कशाशी संबंधित आहेत? अगदी प्रमाणात


०९. ग्राहक संरक्षण कायदा कधी संमत झाला?

1986 मध्ये


10. फेनचा स्थानिक वारा कुठे आहे?

 स्वित्झर्लंड


11. ग्रेट बॅरियर रीप कोणत्या किनाऱ्यावर आहे?

पूर्व ऑस्ट्रेलिया


१२. कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे दीपगृह मानले जाते?

स्ट्रॉम्बोली


13. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली?

1939


14. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली?

राजा राममोहन रॉय


१५. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो?

 क्रीडा प्रशिक्षणासाठी


कायमची बंदी घालणाऱ्या Twitter ला डोनाल्ड ट्रम्प यांचं सडेतोड प्रत्युत्तर; तयार केला नवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म.


🔰अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) हे त्यांचं नवं अ‍ॅप फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार आहे.


🔰२१ फेब्रुवारीपासून ‘ट्रुथ सोशल’ अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध असेल. हे अ‍ॅप ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) द्वारे बनवले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवीन मीडिया कंपनी अमेरिकेचे माजी रिपब्लिकन डेव्हिन नुनेस यांच्या नेतृत्वाखाली आहे.


🔰टरुथ सोशल अ‍ॅप हे ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसारखंच दिसत आहे. प्रोफाइल पेज जवळजवळ ट्विटर अ‍ॅपसारखे दिसत आहे आणि पोस्टमध्ये प्रत्युत्तरे, रीट्विट्स, पसंती आणि शेअरिंगसाठी चिन्हे दिसत आहेत.


🔰जयांनी माझ्यावर बंदी घातली अशा बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मीडिया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकी अध्यक्ष शांत बसले आहेत, अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी त्यावेळी केली होती.

पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने - थोड्याच दिवसात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा.


🔰बीसीसीआयने यावर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. तर हरमनप्रीत कौरला संघाची उपकर्णधार बनवण्यात आले आहे.


🔰भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ६ मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे. हा १५ सदस्यीय संघ विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना ११ फेब्रुवारीला होईल.


🔰वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताचा दुसरा सामना १० मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध, १२ मार्च रोजी वेस्ट इंडिज आणि चौथा सामना १६ मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारतीय महिला संघ १९ मार्च रोजी ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका २२ आणि २७ मार्चला भिडणार आहेत. २०२२ च्या महिला विश्वचषकाची सुरुवात ४ मार्च रोजी यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने होईल.


🔰३१ दिवसांत एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत. ८ संघांमध्ये विश्वविजेता होण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेतील सर्व सामने न्यूझीलंडमधील ६ शहरांमध्ये ऑकलंड, ख्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, वेलिंग्टन आणि तौरंगा येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थानांवर आधारित विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान असताना न्यूझीलंडने या स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा;अभिनंदनासोबतच पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन, म्हणाले



🔰करोना आला, त्याने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान केलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना त्रास झाला, काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचं भयंकर रुप देशाने पाहिलं. आता या करोनाचं करायचं काय? असा प्रश्न प्रशासनासह सर्वांनाच पडला.


🔰काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडलं आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.


🔰दशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे.


🔰पतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.


पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या नोंदी जतनाचे आदेश; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात याचिका



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ जानेवारीच्या पंजाब दौऱ्याशी संबंधित सर्व नोंदी त्वरित सुरक्षित जतन करून ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांना शुक्रवारी दिले.


🔰पजाब सरकार, पंजाब पोलीस, एसपीजी आणि अन्य केंद्रीय तसेच राज्यस्तरीय संस्थांनी संबंधित नोंदी जतन करण्यासाठी महानिबंधकांना सहकार्य करून आवश्यक ती मदत करावी, असे निर्देश सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिले.


🔰या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला होणार असून तोपर्यंत पंतप्रधानांच्या भेटीशी संबंधित सुरक्षा उपायांमध्ये राहिलेल्या त्रुटींबाबत चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्यांचे काम थांबवण्यात यावे, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पंजाब सरकारला दिले. मोदी यांच्या पंजाब.


🔰दौऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळलेल्या कथित सुरक्षा त्रुटींबाबत सखोल चौकशीच्या मागणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुरक्षा त्रुटीच्या या प्रकरणात केंद्राने ‘‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’’ असण्याची शंका व्यक्त करून तपासात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सहभागी

‘नीट-पीजी’ला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण कायम



🔰सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इतर मागासवर्गासाठी २७ टक्के आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण कायम ठेवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या (नीट-पीजी २०२१) समुपदेशनास (काऊन्र्सिंलग) अंतरिम परवानगी दिली. प्रवेश प्रक्रियेसाठी ‘तातडीची गरज’ म्हणून हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


🔰सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. ‘नीट-पीजी’मध्ये ओबीसींना २७ टक्के, आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला १० टक्के आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याच्या आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाच्या निकषाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आर्थिक दुर्बल घटक निश्चित करण्यासाठी आठ लाख रुपये वार्षिक  उत्पन्नाचा निकष लागू करण्याबाबतच्या मुद्द्यावर खंडपीठाने गेले दोन दिवस सुनावणी घेतली. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीची बाब म्हणून शुक्रवारी न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.


🔰२९ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिशीनुसार अखिल भारतीय जागांमध्ये (कोटा) ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाच्या आधारावर नीट-पीजी २०२१ आणि नीट-यूजी २०२१ (पदवीपूर्व)बाबत समुपदेशन करण्यात यावे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्या, याचिकांची अंतिम सुनावणी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.


🔰सन २०२१-२२च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी केंद्र सरकार आणि वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) २९ जुलै २०२१ रोजी नोटीस प्रसिद्ध केली होती. तीत ओबीसींसाठी २७ टक्के, तर आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. या नोटिशीला दोन डॉक्टरांनी आव्हान दिले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला आरक्षण द्यायचे असेल तर अडीच लाखांची उत्पन्नमर्यादा घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

फिशवाले : भारतातील पहिले ई-फिश मार्केट



आसामचे पर्यावरण, वने, मत्स्यपालन उद्योग मंत्री परिमल शुक्ला यांच्या हस्ते भारतातील पहिले ई-फिश मार्केट सुविधा उपलब्ध करून देणारे 'फिशवाले' हे मोबाईल अप्लिकेशन ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरु करण्यात आले.


 हे अप्लिकेशन 'ॲक्का ब्लू ग्लोबल अक्वाकल्चर सोल्यूशन्स प्रा.लि.'ने राज्याच्या मत्स्यपालन  विभागाबरोबर विकसित केले आहे. मत्स्य उद्योग क्षेत्रातील विक्रेता आणि ग्राहक या दोन्हींसाठी हे अप्लिकेशन उपयोगी आहे. 


विक्रेता मत्स्यपालन शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही मध्यस्थाशिवाय योग्य किमतीला विकणे शक्य होणार आहे.

जगात सर्वात जास्त शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत आता निर्यातही करणार, ‘ब्रह्मोस’ फिलिपिन्सला देण्याबाबत लवकरच करार होणार



जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे.


लढाऊ विमाने, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.


यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.


फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.

रोगांचे वर्गीकरण


🌸 संसर्गजन्य


💉 इन्फ्लुएंजा,

💉 कषय, 

💉 नायटा, 

💉 अमांश,

 💉 घटसर्प,

💉 पोलियो.


🌸 असंसर्गजन्य

   

💉 मधुमेह (डायबिटीस),

💉  कर्करोग.


🌸 विषाणूंपासून होणारे


💉 दवी, 

💉 इन्फ्ल्युएंझा, 

💉 पोलिओ, 

💉 कांजिण्या,

💉  काला आजार, 

💉 जपनीज एन्सेफेलाइटिस


🌸 जिवाणूंपासून होणारे 


💉 कष्ठरोग, 

💉 कॉलरा (पटकी),

💉  नयूमोनिया, 

💉 कषय (टी. बी.)


🌸 दुषित पाण्यापासून 


💉 कॉलरा, 

💉 विषमज्वर, 

💉 अतिसार, 

💉 कावीळ,

💉  जत इत्यादी.


🌸 हवेतून पसरणारे


💉 सर्दी, 

💉इन्फ्ल्यूएंझा, 

💉घटसर्प, 

💉कषय.


🌸 कीटकांमार्फत पसणारे 


💉अतिसार

💉अमांश, 

💉पटकी

💉 मलेरिया,

💉 हत्तीरोग,

 💉 नारू,

💉 पलेग


🌸 कवकांपासून होणारे


💉गजकर्ण, 

💉चिखल्या.

हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले एलपीजी सक्षम आणि धूरमुक्त राज्य बनले



🔸हिमाचल प्रदेश हे पहिले एलपीजी सक्षम करणारे, तसेच, धूरमुक्त राज्य बनले आहे. 


🔹 महिलांना घरातील प्रदूषणापासून  मुक्ती मिळवण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजना आणली. 


🔹गरामीण भागातील महिलांना मदत करण्यासाठी ग्रहिणी सुविधा योजना सुरू करण्यात आली.


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🟠मख्यमंत्री गृहिणी सुविधा योजना:


🔹 सरुवात  :26 मे 2018 


🔸 उद्देश  :पर्यावरण संवर्धनासाठी गॅस कनेक्शन नसलेल्या कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन देणे.


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :


🔸हिमाचल प्रदेश राजधानी: शिमला (उन्हाळा), धर्मशाला (हिवाळा);


🔹हिमाचल प्रदेशचे राज्यपाल : राजेंद्र आर्लेकर;


🔸हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री : जय राम ठाकूर.


NASA

🔸नाव :  National Aeronautics and Space Administration


🔹सक्षेप : नासा


🔸सथापना : 29 जुलै 1958 ; (63 वर्षांपूर्वी)


🔹पर्ववर्ती एजन्सी : एरोनॉटिक्स राष्ट्रीय सल्लागार समिती (1915-1958) 


🔸परकार : अंतराळ संस्था


🔹अधिकार क्षेत्र : युनायटेड स्टेट्स फेडरल सरकार


🔸मख्यालय : वॉशिंग्टन, डीसी


🔹बोध वाक्य : सर्वांच्या हितासाठी 


🔸परशासक : बिल नेल्सन


🔹उपप्रशासक : पामेला मेलरॉय


🔸मालक  : संयुक्त राष्ट्र


🔹कर्मचारी  : १७,३७३ (२०२०) 


मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

नक्की वाचा :- महत्त्वाच्या संस्था



1. G7 [Group of 7]

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


2. BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


3. Asian Development Bank [ADB]

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव



5. ASEAN [Association of South East Asian Nation]

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


8. IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Vic

महिलांच्या सुरक्षेसाठीच्या सुधारित शक्ती विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळाची मंजुरी.


📛महिलांच्या सुरक्षेसाठीच्या सुधारित शक्ती विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळाची मंजुरी 

विधीमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात 24 डिसेंबर 2021 रोजी महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती अधिनियम’ या कायद्याच्या संयुक्त समितीच्या सुधारित प्रस्तावाला दोन्ही सभागृहातून एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. 


📛आता “शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र दुरुस्ती) विधयेक 2020” राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर राज्यात सुधारित शक्ती कायदा लागू केला जाईल.


⚠️ठळक नोंदी  ...


📛बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात दुरुस्ती करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. 

विधेयकात बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड करण्यासंदर्भातही तरतूद आहे.


📛महिलेविरुद्ध अत्याचाराच्या घटनांमध्ये 21 दिवसात आरोपपत्र दाखल करुन आरोपींना कठोर शिक्षा देण्याबाबत विधेयकात नमूद करण्यात आले आहे.


📛विधेयकावर, महिलेवरील ॲसीड हल्ला गुन्ह्यात आजन्म कारावास, द्रव्यदंडातून महिलेवर उपचार करण्यात येणार. 


📛महिलेच्या विनयभंग प्रकरणी नवीन कलम 354(ड) प्रस्तावित करण्यात आले आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात 376 या कलमामध्ये दुरुस्ती करून मृत्युदंड देखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे.


📛लगिक अपराधांच्या बाबतीत 30 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना


राजश्री योजना : राजस्थान 


कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


लाडली : दिल्ली व हरियाणा


मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


ममता योजना : गोवा 


सरस्वती योजना : छत्तीसगढ


माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

 

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...