Sunday 9 January 2022

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा;अभिनंदनासोबतच पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन, म्हणाले



🔰करोना आला, त्याने मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं नुकसान केलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना त्रास झाला, काही जण अगदी मरणाच्या दारातून परत आले. करोनाचं भयंकर रुप देशाने पाहिलं. आता या करोनाचं करायचं काय? असा प्रश्न प्रशासनासह सर्वांनाच पडला.


🔰काही काळ करोनाशी निःशस्त्र लढल्यानंतर लसीकरणाचं प्रभावी शस्त्र देशाच्या हातात पडलं आणि या शस्त्राने करोनाला हरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. या लढाईतला एक मोठा टप्पा देशाने आता पार केला आहे.


🔰दशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं आहे.


🔰पतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, लसीकरण आघाडीवर एक उल्लेखनीय दिवस! १५० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल आमच्या देशवासीयांचे अभिनंदन. आमच्या लसीकरण मोहिमेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...