Sunday 26 December 2021

WHO म्हणतंय, “Omicron वेगाने पसरतोय, लसीकरण पूर्ण झालेल्यांबरोबरच करोना होऊन गेलेल्यांना.

🔰करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.


🔰डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.


🔰टरेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.


🔰कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे.

मराठा आरक्षण ते पेगॅसस प्रकरणी चौकशी; वाचा देशातील न्यायालयांनी दिलेले सर्वोच्च निर्णय.



🔰२०२१ हे वर्ष कोविड-१९ साथीच्या कठोर निर्बंधात सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढे जात राहिले आहे. मात्र करोनाच्या आलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. लोक फक्त नवीन परिस्थितीशी जुळवून घेत आहे. मात्र २०२१ हे वर्ष एका गोष्टी थांबवू शकलेले नाही ते म्हणजे भारताची न्यायव्यवस्था.


🔰दशाच्या विविध न्यायालयांमध्ये व्हर्च्युअन सुनावण्या पार पडल्याचे पाहायला मिळाले आहे. न्यायालयांनी या वर्षी भारताच्या कायदेशीर परिदृश्याला आकार देणारे काही महत्त्वपूर्ण बदल देखील चिन्हांकित केले आहेत. त्यामुळे २०२१ वर्ष संपत असताना, काही सर्वात महत्त्वाच्या निर्णयांवर एक नजर टाकूया.


🔰मबई उच्च न्यायालयाने (नागपूर खंडपीठ) १८ नोव्हेंबर रोजी दिलेला ‘स्किन टू स्किन’ हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला असेल तरच तो लैंगिक अत्याचार ठरतो. कपडय़ांवरून शरीराची चाचपणी करणे म्हणजे लैंगिक अत्याचार होत नाही, या उच्च न्यायालयाच्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Omicron: देशात पुन्हा एकदा लॉकडाउन.



🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून यामधील १०४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.


🔰महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.


🔰करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.


🔴“देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका”🔴


🔰भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.


🔰“ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असं ते म्हणाले आहेत.

32 वर्षांनंतर ‘INS खुकरी’ जहाज सेवेतून निवृत्त



🔰भारतीय नौसेनेतील INS खुकरी ही स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्र युद्धनौका देशसेवेच्या गौरवास्पद 32 वर्षांनंतर 23 डिसेंबर 2021 रोजी सेवेतून निवृत्त झाली. 


🔰विशाखापट्टणम येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘खुकरी’ जहाजावरचा राष्ट्रीय ध्वज, नौदल एनसाईन आणि डीकमिशनिंग पॅनेट सूर्यास्ताला खाली झुकवून निरोप देण्यात आला. 


🌼ठळक बाबी 


🔰23 ऑगस्ट 1989 रोजी मझगाव गोदीने ‘खुकरी’ जहाजाची बांधणी केली होती. पश्चिम आणि पूर्व ताफ्याचा जहाज भाग होते. मुंबईत या नौकेचा सेवेत समावेश केला. कमांडर संजीव भसीन हे जहाजाचे पहिले कमांडिंग अधिकारी होते.

आपल्या सेवा काळात INS खुकरी जहाजावर 28 कमांडिंग अधिकारी होते आणि जहाजाने 6,44,897 सागरी मैलांचा प्रवास पूर्ण केला आहे.

भारतीय लष्कराच्या गोरखा ब्रिगेडशी ही नौका संलग्न होती.

बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी



🔰माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  १२ वीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणींचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड व राज्य मंडळाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने निवेदनाद्वारे  केली आहे.


🔰भगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के व सचिव प्रा. युवराज खुळे यांनी ही माहिती दिली. निवेदनात म्हंटले,की १२ वी साठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. मागील १८ वर्षांपासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यंदा तो अचानक दुपारच्या सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


🔰पपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ-दुपार अशी पेपरची वेळ निश्चित करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी. जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी ठेवावेत, जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.


उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यूची घोषणा; लग्नातील उपस्थितीवरही बंधनं; महाराष्ट्रात काय निर्णय होणार



🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून पूर्वकाळजी घेण्याचे तसंच गरज पडल्यास निर्बंध लावण्याची सूचना केली आहे.


🔰दशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ३४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिस्मसपासून उत्तर प्रदेशात याची अमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेशात २५ डिसेंबरपासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.


🔰याशिवाय योगी आदित्यनाथ सरकारने लग्नामधील उपस्थितीवरही बंधनं आणली आहेत. लग्नात २०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय कार्यक्रमांमध्ये करोनासंबंधी नियमांचं कठोर पालन करावं लागेल असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट सांगितलं आहे. नाईट कर्फ्यू लागल्यानंतर लोकांना रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा नसेल.


ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध



🔰संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.


🔰लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.


🔰इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.


🔰उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.


🔰वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.


🔰याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.


SAIL ला 'गोल्डन पीकॉक एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अ‍ॅवॉर्ड' २०२१ जाहीर

 

'स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Ltd. - SAIL)' पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत प्रतिष्ठीत 'गोल्डन पीकॉक एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट अ‍ॅवॉर्ड (Golden Peacock Environment Management Award)' २०२१ प्रदान करण्यात आला आहे. 

 

🧲 ठळक मुद्दे 

 

१९९८ सालापासून पर्यावरण व्यवस्थापनात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल संस्थांना सदर पुरस्कार दिला जातो. 

 

SAIL बाबत महत्वपूर्ण माहिती 


अर्थ: SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होय. 

 

सध्याचे अध्यक्ष: सोमा मोंडल सध्या SAIL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 

 

मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे SAIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. 

 

स्थापना वर्ष: १९५४ साली SAIL ची स्थापना करण्यात आली होती. 

 

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना



🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?

- चंपारण्य 


🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?

- अहमदाबाद गिरणी लढा 


🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?

- खेडा सत्याग्रह


🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?

- असहकार चळवळ


🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?

- 1906 रोजी नाताळ येथे


🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?

- यंग इंडिया 


🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?

- साबरमती


🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?

- 1924 चे बेळगाव अधिवेशन


🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?

- सविनय कायदेभंग चळवळ


🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी

पुरस्कार



● रॅमन मॅगसेसे पुरस्कार 


- फिलीपाईन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो.

- हा पुरस्कार प्रत्येक वर्षी 31 ऑगस्टला फिलीपींसची राजधानी मनीला येथे एका औपचारिक समारोहात प्रदान केला जातो. 

- हा पुरस्कार आशिया खंडाचा नोबेल म्हणून ओळखला जातो. 

- या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील राॅफेलर भावंडांनी केली आहे. 

- 2009 पासून पुरस्कार सहा प्रकारात सरकारी सेवा, समाजकार्य, साहित्य, पत्रकारिता, शांतता, अंतरराष्ट्रीय संबंध इ. क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. 

- 2021 चा 63 वा पुरस्कार आहे. 


● आतापर्यंतचे भारतीय पुरस्कारार्थी


- विनोबा भावे (नेतृत्व 1958): पहिले भारतीय

- चिंतामण देशमुख (शासकीय सेवा 1959)

- अमिताभ चौधरी (पत्रकारिता 1961): पहिले पत्रकार

- मदर तेरेसा (शांतता 1962): पहिली भारतीय महिला 

- अंशू गुप्ता & संजीव चतुर्वेदी (स्थलांतरितांचे नेतृत्व 2015)

- बेझवाडा विल्सन (मानवी हक्क 2016)

- टी. एम. कृष्णा (कर्नाटक संगीत 2016)

- भरत वटवाणी ( प्रतिष्ठेसह आरोग्य स्वच्छता काम 2018)

- सोनम वांगचुक (समुदाय विकासासाठी शिक्षण 2018)

- रविश कुमार (पत्रकारिता 2019): दुसरे पत्रकार, पुरस्कार प्राप्त सहावे पत्रकार


● 2021 चे पुरस्कारार्थी


- बांग्लादेशचे फिरदौसी कादरी (वैक्सीन शास्त्रज्ञ)

- पाकिस्तानचे मुहम्मद अमजद साकिब (माइक्रोफाइनेंसमध्ये) 

- फिलिपीनचे रॉबर्टो बैलोन (फिशर आणि सामुदायिक पर्यावरणवादी)

- संयुक्त राज्य अमेरिकाचे स्टीवन मुंसी (मानव अधिकार कार्यकर्त्ता)

- वॉचडॉक (शोध पत्रकारितेसंबंधी इंडोनेशियाई समूह)

‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021



‘सुशासन सप्ताह’: 20-25 डिसेंबर 2021

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, परराष्ट्र मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या सहकार्याने कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग (DARPG) याच्या पुढाकाराने 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 या काळात देशात ‘सुशासन सप्ताह’ पाळण्यात येत आहे.


सुशासन सप्ताहानिमित्त उत्तम प्रशासनाच्या कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी 'प्रशासन गांव की ओर' अर्थात 'प्रशासन चालले गावांकडे' या मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणु-ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते 20 डिसेंबर 2021 रोजी झाला.


'प्रशासन गांव की ओर' या मोहिमेद्वारे, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी सर्व जिल्हे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक राष्ट्रीय चळवळ चालवली जाणार आहे.


सातशेपेक्षा अधिक जिल्हाधिकारी 'प्रशासन गांव की ओर' उपक्रमात सहभागी होतील आणि आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात तहसील / पंचायत समितीच्या मुख्यालयांना भेटी देतील. लोकांच्या तक्रारींचे वेळेवर निवारण व्हावे आणि त्यांना सेवा प्रदान करण्याची पद्धत अधिक सुधारावी, या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला आहे. 

दुसरी गोलमेज परिषद



७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.


ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.


 पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली. 


परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.


 गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1✔️राष्ट्रीय हरित लवाद (NGT) हे एक .....................आहे.
अ) घटनात्मक    ब) वैधानिक    क) अर्धन्यायिक     ड) नियामक

2✔️..................... या शहरात ‘बायो एशिया समिट २०२०’ आयोजित केली गेली.
अ) बंगळुरू   ब) मुंबई   क) हैदराबाद   ड) दिल्ली

3✔️..................... या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद २०२०’ आयोजित केली गेली.
अ) चेन्नई          ब) भोपाळ          क) रायपूर          ड) नवी दिल्ली

4✔️फेब्रुवारी २०२० मध्ये  ..................... या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड २०२०’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्‍घाटन केले.
अ) दुबई       ब) मस्कत         क) आबुधाबी        ड) दमास्कस

5✔️.....................या शहरात ६५ वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२०’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अ) पणजी     ब) शिमला    क) गुवाहाटी    ड) मुंबई

6✔️..................... या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
अ) चेन्नई        ब) बंगळुरू       क) कोची        ड) हैदराबाद

7✔️कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
अ) काशी महाकाल एक्सप्रेस     ब) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
क) महाकाल एक्सप्रेस             ड) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस

8✔️‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB)’ प्रयोगशाळा .....................या शहरात आहे
अ) नवी दिल्ली        ब) पुणे         क) कोलकता      ड) शिमला

9✔️जानेवारी-फेब्रुवारी २०२० या काळात चर्चेत असलेले ‘ग्रॉस रेव्हेन्यू (GR)’, ‘अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)’ आणि ‘लायसेन्स फी (LF)’ हे शब्द .....................याच्याशी संबंधित आहेत.
अ) परकीय चलन               ब) सकल राष्ट्रीय उत्पन्न
क) दूरसंचार क्षेत्र                ड) कंपनीच्या जमाखर्चाचा लेखा जोखा

10✔️.....................या शहरात दहावी ‘जागतिक पेट्रोकोल परिषद’ आयोजित करण्यात आली.
अ) पुणे             ब) लखनौ                क) नोएडा           ड) नवी दिल्ली

11✔️कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?
अ) जपान            ब) अमेरिका          क) ब्रिटन             ड) रशिया

12✔️..................... या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
अ) कानपूर - लखनौ              ब) अहमदाबाद - मुंबई
क) मुंबई - पुणे                      ड) दिल्ली - अमृतसर

13✔️कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?
अ) केरळ          ब) महाराष्ट्र            क) तामिळनाडू          ड) पंजाब

14✔️‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी  ..................... यांनी लिहिली आहे.
अ) धीरेन तिवारी        ब) विक्रम सेठ      क) किरण देसाई        ड) शोभा डे

15 ✔️‘MOSAiC अभियान’  .....................याच्याशी संबंधित आहे.
अ) आर्क्टिक हवामान          ब) उष्णकटिबंधीय हवामान
क) सुदूर संवेदी                   ड) भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)

16✔️‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’  .....................या शहरात आहे.
अ) मुंबई                 ब) हैदराबाद              क) पुणे                ड) पणजी

17✔️‘घाऊक किंमत निर्देशांक’ (WPI) याच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
(१) सध्या, WPI याच्यासाठी आधारभूत वर्ष २००४-०५ हे आहे.
(२) हे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून प्रकाशित केले जाते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
अ) केवळ (१)                            ब) केवळ (२)  
क) (२) आणि (२) दोन्ही              ड) (१), (२) दोन्ही नाही

18✔️‘पॉलीक्रॅक’ तंत्रज्ञान  ..................... याच्याशी संबंधित आहे.
अ) कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती      ब) पेट्रोलियम पदार्थांची निर्मिती
क) ब्लॉकचेन तंत्रज्ञान                  ड) 3-D तंत्रज्ञान

19✔️शैलेश नायक समिती कशाशी संबंधित आहे?
अ) कावेरी पाणी तंटा                 ब) कर सुधारणा
क) किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र        ड) विमा क्षेत्रातली सुधारणा

उत्तर : १) ब   २) क  ३) ड  ४) अ  ५) क   ६) ब  ७) अ  ८) अ  ९) क  १०) ड  ११) ब  १२) क  १३) ब  १४) अ  १५) अ  १६) क  १७) ड  १८) अ  १९) क

30 पोलीस भरती प्रश्नसंच

Q1. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली?
✅. - रवींद्र नाथ टागोर

Q2. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
✅.  - लॉर्ड डफरीन

Q3. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते?
✅.  - महात्मा गांधी

Q4. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
✅.  - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर

Q5. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत.
✅.  - युगांतर

Q6. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती?
✅.  - महात्मा गांधी

Q7. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता?
✅.  - लॉर्ड लिटन

Q8. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते?
✅.  - पंडित नेहरू

Q9. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले?
✅.  - 1953

Q10. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
✅.  - व्ही. के. कृष्ण मेनन

Q11. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले?
✅. -  रेसलिंग (wrestling)

Q12. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ?
✅ B-  महाराष्ट्र व गुजरात

Q13. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ?
✅.  - सविनय कायदेभंग चळवळ

Q14. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length)
✅. - NH7

Q15. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती?
✅. - ललित कला अकादमी

Q16. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे ?
✅. - विजय मल्ला

Q17. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
✅. - 1989

Q18. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात?
✅.  - गोवा

Q19. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे?
✅.  - सुकन्या

Q20. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते?
✅. - शालीमार गार्डन

Q21. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्‍या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते?
✅.  - गेलापॅगोस

Q22. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्‍या संचार नियमांना काय म्हटले जाते?
✅. - प्रोटोकॉल

Q23. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो?
✅. - दसरा

Q24. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते?
✅.  - विजय अमृतराज

Q25. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे?
✅. - आंध्र प्रदेश

Q26. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती?
✅. - नर्मदा

Q27. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे?
✅.  - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट

Q28. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
✅.  - कर्नाटक

Q29. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते?
✅. - भरतनाट्यम

Q30. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे?
✅.  - अरुणाचल प्रदेश

अर्थशास्त्र प्रश्नसंच

खालील पैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा सूचक आर्थिक नियोजनावर भर देण्यात आला?

1. चौथी योजना
2. सातवी योजना
3. आठवी योजना✅✅✅
4. अकरावी योजना

अयोग्य विधान ओळखा

1. सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना - 1997✅✅✅
2. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना - 2000
3. जननी सुरक्षा योजना - 2005
4. मध्यान्ह भोजन योजना - 1995

India's economic planning in its broader setting या प्रबंधात सरकती योजनेबद्दल माहिती कोणी मांडली

1. प्रा रॅगनर
2. मोरारजी देसाई
3. गुन्नार मिरडल✅✅✅
4. प्रा डी टी लकडावाला

खालील पैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारत-पाक युद्ध झालेले आहेत

अ) तिसरी                       
ब) चौथी
क) आठवी                     
ड) नववी

1. अ, ब, क
2. ब, क, ड
3. अ, ब, ड✅✅✅
4. वरील सर्व

खालील पैकी कोणते पोलाद कारखाने चौथ्या पंचवार्षिक योजनेत स्थापन करण्यात आले

अ) विजयनगर                  
ब) विशाखापट्टणम
क) बोकारो                       
ड) सालेम

1. अ, क✅✅✅
2. ब, क
3. क, ड
4. ब, ड

पोलीस भरती प्रश्नसंच

MTDC चा अर्थ काय?

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.

A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही

पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.

A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच

मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.

A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅

‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.

A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात

आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.

A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल

भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर

I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?

A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया

अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन

‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅

‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.

A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅

भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर

अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?

A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅

‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे

कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?

A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅

हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा

‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे

‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.

A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट

क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?

A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅

जाणून घ्या - भारतीय वित्तीय व्यवस्था

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

व्यापार्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –

वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

1. भारतीय नाणे बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

2. भारतीय भांडवल बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या – LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स – UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात.

भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

भारतीय बँक व्यवसायाची रचना –

भारतीय बँक-व्यवसायाचे वर्गीकरण खालील दोन भागांमध्ये करण्यात येते.

1. असंघटित बँक व्यवसाय

यामध्ये सावकार व सराफी पेढीवाले यांचा समावेश होतो.

उदा. भारतात पूर्वीपासून कर्ज व्यवहार करणारे महाजन, सेठ, श्रेष्ठ, शेट्टी, चेट्टियार, सराफ इ.

RBI ने सावकार व सराफ पेढीवाल्यांना संघटित क्षेत्रात आणण्याचे बरेच प्रयत्न केले असतांना सुद्धा ते या क्षेत्राचा पूर्ण हिस्सा बनू शकले नाही.

2. संघटित बँक व्यवसाय

संघटित क्षेत्र हे RBI च्या नियंत्रणाखाली असून त्यात सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

भारतीय नियोजन आयोग

   भारतीय नियोजन आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे आहे.

◾️भारतीय नियोजन आयोग जबाबदाऱ्य

देशातील संसाधनांचा अभ्यास करणे.

या संसाधनांचा प्रभावी आणि संतुलित वापर करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.

प्राथमिक गरजा समजून घेणे, आणि योजनांसाठी संसाधने पुरविणे.

योजना व्यवस्थित चालवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री पुरविणे.

योजनांच्या प्रगतीचा नियमित काळाने आढावा घेणे.

आर्थिक विकासात बाधा टाकणाऱ्या गोष्टी शोधणे.

◾️भारतीय नियोजन आयोग इतिहास◾️

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना इ.स. १९३८ मध्ये भारताची सार्वभौमत्वाकडे वाटचाल करणारी पहिली प्राथमिक स्वरूपातील अर्थयोजना तयार केली. तिचा मसुदा मेघनाथ सहा यांनी तयार केला. ब्रिटीश सरकारनेही अधिकृतरीत्या एक योजना मंडळ स्थापन केले या मंडळाने १९४४ ते १९४६ मध्ये काम केले. उद्योगपती आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी १९४४ मध्ये स्वतंत्रपणे तीन विकास योजना तयार केल्या.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रुप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ.स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाची व्युत्पत्ती भारताच्या घटनेत किंवा संविधानात नसली तरी ती भारत सरकारची एक संस्था आहे.

शेतीच्या विकासावर जोर देणारी पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये प्रकाशित करण्यात आली आणि त्यानंतरच्या दोन पंचवार्षिक योजना १९६५ पर्यंत तयार करण्यात आल्या. भारत पाक युद्धामुळे त्यात खंड पडला. सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ, रुपयाचे अवमूल्यन, एकंदर वाढलेली महागाई आणि संसाधनांचा क्षय यामुळे नियोजन प्रक्रियेत अडथळे आले आणि १९६६ ते १९६९ मधील तीन वार्षिक योजनांनंतर, चौथी पंचवार्षिक योजना १९६९ मध्ये तयार करण्यात आली.

केंद्रातील राजकीय परिस्थितीत सारख्या होणाऱ्या बदलांमुळे आठवी योजना १९९० मध्ये तयार होऊ शकली नाही आणि १९९०-९१ व १९९१-९२ ला वार्षिक योजना तयार करण्यात आल्या. आठवी योजना शेवटी १९९२ मध्ये रचनात्मक बदल नीतीच्या प्रारंभानंतर तयार करण्यात आली.

पहिल्या आठ योजनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील मुलभूत आणि अवजड उद्योगांमध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यावर भर होता, पण १९९७ च्या नवव्या योजनेनंतर, सार्वजनिक क्षेत्रावरील जोर कमी होऊन नियोजनाबद्दलचा विचार ते फक्त सूचक स्वरूपाचेच असावे असा बनला.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...