Sunday 26 December 2021

बारावी वेळापत्रकात बदल करण्याची राज्य भूगोल परिषदेची मागणी



🔰माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने  १२ वीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणींचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड व राज्य मंडळाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने निवेदनाद्वारे  केली आहे.


🔰भगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के व सचिव प्रा. युवराज खुळे यांनी ही माहिती दिली. निवेदनात म्हंटले,की १२ वी साठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. मागील १८ वर्षांपासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यंदा तो अचानक दुपारच्या सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


🔰पपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ-दुपार अशी पेपरची वेळ निश्चित करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी. जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी ठेवावेत, जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...