२६ ऑगस्ट २०२६

१८५७ चा उठाव, वृत्तपत्रे, टपाल व रेल्वे

👉सातारा उठाव: रंगो बापूजी गुप्ते (छत्रपतींचे वकील) यांनी रामूशी, कोळी व मांग यांना एकत्र करून साताऱ्यात उठाव घडवला.


👉खानदेश उठाव: भिल्लांचे नेतृत्व काजसिंग (कजारसिंग) यांनी केले. सरकारी खजिना लुटला. अंबापाणी लढाईत भिल्ल महिलांचा सहभाग होता.

👉कोल्हापूर उठाव: ६ डिसेंबर १८५७ रोजी झाला, याचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले.

👉पेठ नाशिक उठाव: नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव यांनी केले, इंग्रजांनी त्यांना नंतर फाशी दिली.

👉मुधोळ उठाव: बेरड जमातीचा इंग्रजांच्या निःशस्त्रीकरण कायद्याविरुद्ध उठाव.

👉कोल्हापूर: रामजी शिरसाट (लष्करी छावणी बंड).

👉नरगुंद: बाबासाहेब भावे.

👉सावंतवाडी: फोंड सावंत, अण्णाजी फडणवीस.

👉दर्पण वृत्तपत्र : (६ जानेवारी १८३२ व १८४० बंद):
🔹६ जानेवारी = 'पत्रकार दिन'.
🔹बाळशास्त्री जांभेकर. हे द्विभाषिक होते (डावीकडे इंग्रजी आणि उजवीकडे मराठी स्तंभ).
🔹दिग्दर्शन (१८४०): बाळशास्त्री जांभेकर (पहिले मराठी मासिक)

👉प्रभाकर वृत्तपत्र: भाऊ महाजन (गोविंद कुंटे). यात लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध झाली.

👉ज्ञानोदय वृत्तपत्र (१८४२): ख्रिश्चन मिशनरी. १८४२ मध्ये आशियाचा नकाशा छापला. १८५३ मध्ये रेल्वे सुरू झाल्यावर तिचा उल्लेख 'चाकांचा मसोबा' असा केला.

👉केसरी (मराठी): पहिले संपादक - गो. ग. आगरकर.
👉मराठा (इंग्रजी): पहिले संपादक - लो. टिळक.

👉सुधारक वृत्तपत्र (१८८८): गो. ग. आगरकर. इंग्रजी संपादन ना. गोखले आणि मराठी संपादन स्वतः आगरकर करत होते.

👉भाऊ महाजन (गोविंद कुंटे): 🔹'प्रभाकर' (लोकहितवादींची १०८ शतपत्रे प्रसिद्ध, फ्रेंच राज्यक्रांतीचे समर्थन);
🔹'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन'

👉बाबा पदमनजी: 'अरुणोदय' (१८६६), ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरचे अनुभव, समाजसुधारणा.

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर: 'मूकनायक' (१९२० - शाहू महाराजांची मदत, संत तुकारामांचे अभंग); 'बहिष्कृत भारत' (१९२७ - संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या).

👉कृष्णराव भालेकर: 'दीनबंधू' (१८७७ - सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र, कामगार-शेतकऱ्यांचे पहिले वृत्तपत्र).

👉 'इंदुप्रकाश' (विष्णुशास्त्री पंडित - विधवा विवाहाला पाठिंबा).

👉 'ज्ञानप्रकाश' (कृष्णाजी रानडे - पुण्याचे पहिले दैनिक);

👉नेटिव्ह ओपिनियन' (विश्वनाथ मांडलिक - इंग्रजी वृत्तपत्र).

✅रेल्वे सुरुवात: १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी बोरीबंदर ते ठाणे (३४ किमी) दरम्यान पहिली रेल्वे धावली. यात ४०० प्रवासी होते आणि हा लॉर्ड डलहौसीचा काळ होता.

✅रेल्वे कंपनी: ग्रेट इंडियन पेनिनसुला (GIP) कंपनीने हा रेल्वे मार्ग लष्करी व व्यापारी हेतूने तयार केला होता.

✅पहिली तार (Telegraph) सेवा: कलकत्ता ते आग्रा (लॉर्ड डलहौसी).

✅१७९९ चा सेन्सॉरशिप ॲक्ट (लॉर्ड वेलस्ली): वृत्तपत्रांवर पहिल्यांदा सेन्सॉरशिप (पूर्व-तपासणी) लादली.
संपादक, मुद्रक (Printer) आणि मालकाचे नाव वृत्तपत्रावर छापणे बंधनकारक केले.

👉१८२३ चा परवाना नियम/लायसन्सिंग रेग्युलेशन (जॉन्सन):
🔹विनापरवाना वृत्तपत्र सुरू केल्यास ४०० रुपये दंड किंवा तुरुंगवासाची तरतूद.
🔹या कायद्यामुळे राजा राममोहन रॉय यांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले होते.(PYQ)

👉१८३५ का मेटकाफ ॲक्ट (लॉर्ड मेटकाफ):
🔹१८२३ चे जाचक नियम रद्द केले आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले.
🔹लॉर्ड मेटकाफ यांना 'भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तीदाता' (Liberator of Indian Press) म्हटले जाते.(PYQ)

👉१८७८ चा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट / देशी वृत्तपत्र कायदा (लॉर्ड लिटन):
🔹मुख्य उद्देश: केवळ देशी (भारतीय) भाषांमधील वृत्तपत्रांची गळचेपी करणे (इंग्रजी वृत्तपत्रांना हा कायदा लागू नव्हता).
🔹याला 'गॅगिंग ॲक्ट' (तोंड दाबणारा कायदा) असेही म्हणतात.
🔹या कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी 'अमृता बाजार पत्रिका' हे रातोरात बंगालीतून इंग्रजी वृत्तपत्र बनले.(PYQ)
🔹सोमप्रकाश: या कायद्यांतर्गत कारवाई झालेले पहिले वृत्तपत्र
🔹लॉर्ड रिपन यांनी १८८२ मध्ये हा जाचक कायदा रद्द केला.(PYQ)


👉१९०८ न्यूजपेपर ॲक्ट (लॉर्ड मिंटो):
🔹क्रांतिकारक विचार दडपण्यासाठी; सरकारविरोधी मजकुरावर थेट छापखाना (Press) जप्ती;
🔹'केसरी' व 'काळ' वर कारवाया.

१८५७ उठाव: केंद्र, नेतृत्व आणि दडपणारा अधिकारी ( PYQ Facts)

👉दिल्ली: बहादूरशहा जफर व वख्त खान (लष्करी नेतृत्व) - दडपणारे अधिकारी: जॉन निकोल्सन व हडसन.


👉कानपूर: नानासाहेब पेशवे व तात्या टोपे (सेनापती) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉लखनौ (अवध): बेगम हजरत महल (व मुलगा बिरजिस काद्र) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉झाशी / ग्वाल्हेर: राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे - दडपणारा अधिकारी: कॅप्टन ह्यू रोज (लक्ष्मीबाईंना 'उठावातील एकमेव मर्द' म्हटले).

👉बिहार (जगदीशपूर): कुंवर सिंग (८० वर्षांचे जमींदार/बिहारचे सिंह) व अमर सिंग - दडपणारे अधिकारी: विल्यम टेलर व व्हिन्सेंट आयर.

👉इलाहाबाद व बनारस: लियाकत अली - दडपणारा अधिकारी: कर्नल नील .

👉बरेली (रुहेलखंड): खान बहादूर खान - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल.

👉फैझाबाद: मौलवी अहमदउल्ला (इंग्रजांचे ५०,००० चे बक्षीस) - दडपणारा अधिकारी: कॅम्पबेल / जगन्नाथ सिंग (फितूर राजा).

🟣इतर महत्त्वाचे थेट वन-लायनर फॅक्ट्स

🔹तात्या टोपे: मूळ नाव रामचंद्र पांडुरंग येवलकर, गनिमी काव्याने लढले, मित्र मानसिंग च्या फितुरीमुळे शिवपुरी येथे फाशी.

📌नियोजित विरुद्ध प्रत्यक्ष तारीख:
नियोजित तारीख ३१ मे १८५७ - प्रत्यक्ष सुरुवात १० मे १८५७ (मेरठ छावणी).
🔹प्रतीके व गव्हर्नर: उठावाचे प्रतीक लाल कमळ आणि चपाती;
🔹उठावाच्या वेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग.

आर्थिक नियोजनाची पार्श्वभूमी (स्वातंत्र्यपूर्व काळ)

👉१९३४: सर मो. विश्वेश्वरय्या -
🔹'Planned Economy for India' पुस्तक
🔹नियोजनाचा १ ला आराखडा, १० वर्षांत उत्पन्न दुप्पट करणे.

👉१९३८: राष्ट्रीय नियोजन समिती (NPC) - हरिपूरा अधिवेशन,
🔹घोषणा: सुभाषचंद्र बोस,
🔹अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू,
🔹सचिव: के. टी. शहा.

👉१९४४: मुंबई योजना - ८ प्रमुख उद्योगपती
🔹१५ वर्षांची योजना, जड उद्योगांवर भर.

👉१९४४: गांधीवादी योजना - श्रीमन नारायण अग्रवाल
🔹कुटीर उद्योग व शेतीचे विकेंद्रीकरण.

👉१९४५: जनता योजना - एम. एन. रॉय
🔹१० वर्षांची योजना, ग्राहक वस्तू व शेतीचे राष्ट्रीयीकरण.

👉१९५०: सर्वोदय योजना -
🔹जयप्रकाश नारायण (गांधीजी व विनोबा भावेंच्या विचारांवर आधारित).

♦️ संस्थात्मक पार्श्वभूमी

👉नियोजन मंडळ: १५ मार्च १९५० (के. सी. नियोगी समिती शिफारस).
🔹गैर-घटनात्मक व गैर-वैधानिक संस्था.
🔹अध्यक्ष: पंतप्रधान.

👉राष्ट्रीय विकास परिषद (NDC): ६ ऑगस्ट १९५२.
🔹मुख्य कार्य: पंचवार्षिक योजनांच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देणे.

👉नीती आयोग (NITI): १ जानेवारी २०१५ (नियोजन मंडळाच्या जागी).
🔹तत्त्वज्ञान: सहकारात्मक संघराज्य (Cooperative Federalism) आणि 'बॉटम-अप' दृष्टिकोन.

 

पंचवार्षिक योजना (PYQ BASED FACTS)

👉१ ली योजना (१९५१-५६):

🔹हॅरॉड-डोमार प्रतिमान
🔹भर: शेती (यशस्वी योजना )
🔹उपाध्यक्ष: गुलझारीलाल नंदा
🔹कार्यक्रम: समुदाय विकास कार्यक्रम (२ ऑक्टो १९५२).

👉२ री योजना (१९५६-६१):
🔹महालनोबिस प्रतिमान
🔹भर: जड उद्योग
🔹पोलाद प्रकल्प: भिलाई, रुरकेला, दुर्गापूर
🔹खादी व ग्रामोद्योग आयोग (१९५६).

👉३ री योजना (१९६१-६६):
🔹चक्रवर्ती व महालनोबिस प्रतिमान
📌 सर्वात अपयशी योजना (युद्ध व दुष्काळामुळे)
🔹 कृषी किंमत आयोग (१९६५).

👉योजना सुटी (१९६६-६९):
☘️हरित क्रांतीची सुरुवात (१९६६-६७),
🔹रुपयाचे अवमूल्यन (१९६६).

👉४ थी योजना (१९६९-७४):
🔹अशोक रुद्र व अलोन मॅन प्रतिमान
🔹 भर: स्थैर्यासाठी वाढ
🔹१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९६९)
🔹 MRTP कायदा (१९६९).

👉५ वी योजना (१९७४-७९):
🔹डी. पी. धर प्रतिमान
🔹घोषणा: 'गरिबी हटाव' (यापूर्वी १९७१ च्या निवडणुका दरम्यान देखील घोषणा दिली होती)
📌जनता सरकारने १ वर्ष आधी बंद केली .
🔹२० कलमी कार्यक्रम (१९७५)
🔹RRB स्थापना (१९७५)
🔹उपाध्यक्ष: पी. एन. हक्सर.

👉सरकती योजना (Rolling Plan):
🔹१९७८-८० (जनता सरकार).

👉६ वी योजना (१९८०-८५):
🔹भर: दारिद्र्य निर्मूलन व रोजगार
🔹६ बँकांचे राष्ट्रीयीकरण (१९८०)
🔹 NABARD स्थापना (१९८२)
🔹IRDP (१९८०).

👉७ वी योजना (१९८५-९०):
🔹ब्रह्मानंद व वकील प्रतिमान
🔹घोषणा: 'अन्न, काम आणि उत्पादकता'
🔹 जवाहर रोजगार योजना (१९८९)
🔹सेबी स्थापना (१९८८).

👉८ वी योजना (१९९२-९७):
🔹जॉन मिलर प्रतिमान
🔹मानवी संसाधन विकास
⭐️सर्वात यशस्वी योजना (६.८%)
🔹माध्यान्ह भोजन (१९९५)
🔹उपाध्यक्ष: प्रणव मुखर्जी.

👉९ वी योजना (१९९७-२००२):
🔹स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (१९९९)
🔹 अंत्योदय अन्न योजना (२०००).

👉१० वी योजना (२००२-०७):
🔹पहिल्यांदा राज्यानिहाय लक्ष्य निश्चिती
🔹नरेगा कायदा (२००५).

👉११ वी योजना (२००७-१२):
🔹जलद व अधिक समावेशक वृद्धी
🔹शिक्षण हक्क कायदा (२००९)
🔹उपाध्यक्ष: माँटेक सिंग अहलुवालिया.

👉१२ वी योजना (२०१२-१७):
🔹जलद, अधिक समावेशक आणि शाश्वत वृद्धी'.

📌खर्च कल:
🔹 १ ल्या योजनेत सर्वाधिक खर्च 'शेती'वर.
🔹६ व्या योजनेपासून पुढे सर्वाधिक खर्च 'ऊर्जा' आणि 'सामाजिक सेवां'वर.

ब्राह्मणेतर चळवळ ( Prediction)

👉 कोल्हापूर संस्थान व शाहू महाराज

🔹२६ जुलै १९०२: कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षणाची अधिसूचना जारी.
🔹११ जानेवारी १९११: कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना. अध्यक्ष: भास्करराव जाधव, कार्यवाह: अण्णासाहेब लठ्ठे.
🔹शिवाजी वैदिक शाळा: मराठा पुरोहित (ब्राह्मणेतर वेदोक्त विधींसाठी) तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली संस्था.

👉संस्थात्मक व राजकीय घडामोडी (Key Words)
🔹डेक्कन रयत असोसिएशन (१९१६, निपाणी): अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, सीताराम बोबडे. (उद्देश: मॉन्टेग्यु कमिशनसमोर ब्राह्मणेतरांच्या राजकीय मागण्या मांडणे).

👉 १९१९ चा कायदा (मॉन्टेग्यु-चेम्सफर्ड): मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतरांसाठी ७ जागा राखीव मंजूर.

👉ब्राह्मणेतर पक्ष (१९२०): अधिकृत स्थापना. प्रमुख नेते: वालचंद कोठारी, भास्करराव जाधव, जेधे-जवळकर.

👉भास्करराव जाधव: १९२४ मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात शिक्षण व आरोग्य मंत्री (ब्राह्मणेतर पक्षाचे प्रतिनिधी).

👉जेधे-जवळकर पर्व (१९२० चे दशक): चळवळीला जहाल रूप. पुणे नगरपालिकेत 'टिळक स्मारका'ला अधिकृत विरोध.

👉वृत्तपत्रे, ग्रंथ आणि कोर्ट खटले (थेट जोड्या लावा/विधान तपासा)

🔹 'देशाचे शत्रू' (१९२५): दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले पुस्तक. (टिळक व चिपळूणकरांच्या 'निबंधमाला'वर कडक टीका).

🔹पुणे कोर्ट खटला: 'देशाचे शत्रू' पुस्तकाविरुद्ध जेधे-जवळकरांवर अब्रुनुकसानीचा खटला. वकील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (त्यांनी जेधे-जवळकरांना निर्दोष सोडवले).

🔹दिनकरराव जवळकर यांचे इतर साहित्य: 'क्रांतीचे रणशिंग' (ग्रंथ), 'मजूर' (पत्रिका).

👉 चळवळीची वृत्तपत्रे व संपादक/संस्थापक:

🔹'विजयी मराठा': श्रीपतराव शिंदे (१९१९, पुणे - जहाल मुखपत्र).

🔹'जागृती': भगवंतराव पाळेकर (१९१७, बडोदा).

🔹'कैवारी' व 'तेज': दिनकरराव जवळकर (संपादक).

🔹 'हंटर': खंडोराव बागल (कोल्हापूर).

🔹 'प्रगती आणि जिनविजय': तात्यासाहेब हरी कोठारी.

👉चळवळीचे काँग्रेसीकरण
🔹१९३० ते १९३८: केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.

शेतकरी चळवळी (Prediction)

👉 नील उठाव (१८५९-६०)

🔹 नील उठाव नेतृत्व: दिगंबर बिस्वास आणि विष्णू बिस्वास (नदिया जिल्हा, बंगाल).
🔹नील दर्पण नाटक: दीनबंधू मित्र (शेतकऱ्यांच्या शोषणाचे चित्रण).
हिंदू पेट्रियटचे संपादक हरिश्चंद्र मुखर्जी यांनी या उठावाला वर्तमानपत्रातून मोठे समर्थन दिले.

👉पाबना शेतकरी बंड (१८७३):
🔹(बंगाल).
🔹नेतृत्व: ईशानचंद्र रॉय आणि शंभू पाल.
🔹घोषणा: 'आम्हाला केवळ महाराणीचे रयत व्हायचे आहे'.

👉 दख्खनचे दंगे (१८७५)
🔹तात्कालिक कारण: शिरूर (पुणे) येथील काळूराम मारवाडी या सावकाराने शेतकरी बाबा साहेब निमकर यांच्या घराची जप्ती आणली.
🔹उठावाची सुरुवात: मे १८७५, सुपे (पुणे). दंग्यांचा प्रसार पुणे आणि अहमदनगर या दोन मुख्य जिल्ह्यांत झाला.
🔹दंग्यांचे स्वरूप: मारवाडी आणि गुजराती सावकारांचे गहाणखत व दस्तऐवज (कर्जबाजारीपणाचे पुरावे) जाळणे.
🔹 Deccan Riots Commission: दंग्यांच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने नियुक्त केला.
🔹डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट्स रिलीफ ऍक्ट: १८७९ मध्ये मंजूर (सावकारांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करण्यासाठी).

♦️उत्तर भारतातील शेतकरी चळवळी (१९२०-१९३० चा दशक)

👉उत्तर प्रदेश किसान सभा (१९१८): गौरीशंकर मिश्रा, इंद्रनारायण द्विवेदी आणि मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली.

👉अवध किसान सभा (१७ ऑक्टोबर १९२०): बाबा रामचंद्र (मूळचे महाराष्ट्र-ग्वाल्हेरचे, खरे नाव रामचंद्र श्रीधर परांजपे). प्रतापगढ येथे स्थापना.

👉 एका चळवळ (१९२१-२२): मदारी पाशी आणि सहरेव (उत्तर प्रदेश). मुख्य कारण: ठरलेल्या खेड्यांच्या भाड्यापेक्षा ५०% जास्त बेकायदेशीर कर वसुली करणे.

👉तेभागा चळवळ (१९४६-४७): बंगाल. मुख्य मागणी: एकूण उत्पादनाचा २/३ (तेभागा) हिस्सा कुळांना मिळावा आणि जमीनदारांना फक्त १/३ हिस्सा मिळावा. नेतृत्व: कंपाराम सिंह आणि भवन सिंह.

👉बारडोली सत्याग्रह (१९२८)
🔹 मुख्य कारण: मुंबई सरकारने बारडोली तालुक्यात जमीन महसुलात २२% वाढ केली होती.
🔹नेतृत्व: वल्लभभाई पटेल (महात्मा गांधींच्या सल्ल्याने नेतृत्व स्वीकारले).
🔹सरदार पदवी: सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर बारडोलीच्या महिलांच्या वतीने भक्तीबा यांनी वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी दिली.

👉मॅक्सवेल-ब्रूमफिल्ड समिती: या सत्याग्रहाच्या दबावामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने महसूल वाढ २२% वरून ६.०३% पर्यंत कमी केली.

👉पहिली महाराष्ट्र प्रांतिक किसान परिषद (१९३६): जळगाव जिल्ह्यातील टिटवे येथे भरली. अध्यक्ष: कमलादेवी चट्टोपाध्याय.

👉वारली शेतकरी उठाव (१९४५-१९४७)
🔹क्षेत्र: ठाणे जिल्हा
🔹नेतृत्व: शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर (महाराष्ट्र प्रांतिक किसान सभा).
🔹मुख्य कारण: वेठबिगारी,कुळांची होणारी बेकायदेशीर हकालपट्टी.
🔹गोदावरी परुळेकर यांचे पुस्तक: 'जेव्हा माणूस जागा होतो' (या पुस्तकात या संपूर्ण शेतकरी लढ्याचे ऐतिहासिक वर्णन आहे)

👉बिहार प्रांतिक किसान सभा (१९२९): स्वामी सहजानंद सरस्वती यांनी स्थापना केली.

👉अखिल भारतीय किसान सभा: स्थापना ११ एप्रिल १९३६ (लखनौ). अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती, सचिव: प्रा. एन. जी. रंगा.

👉फैजपूर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर १९३६): जळगाव (महाराष्ट्र). अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू.
🔹काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन. येथेच अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन भरले आणि काँग्रेसने आपला पहिला अधिकृत 'कृषी कार्यक्रम' मंजूर केला.

👉'किसान' जाहीरनामा: १९३६ च्या इंदूर अधिवेशनात प्रा. एन. जी. रंगा यांनी शेतकऱ्यांचा जाहीरनामा तयार केला.

कामगार चळवळ (Prediction)

🌿सुरुवातीचे प्रयत्न


👉१८७५: सोराबजी शापूरजी बंगाली — बालकामगार शोषणाविरुद्ध पहिला आवाज (मुंबई).
१८७७: नागपूर एम्प्रेस मिल — भारतातील कामगारांचा पहिला तात्पुरता संप.

👉नारायण मेघाजी लोखंडे (भारतातील कामगार चळवळीचे जनक):
🔹१८९०: बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन (पहिली कामगार संघटना).
🔹१८८०: दीनबंधू वृत्तपत्र मुंबईतून चालवले (कामगारांचे पहिले मुखपत्र).
🔹१० जून १८९०: रविवारी पगारी सुट्टी मंजूर करून घेतली.
🔹१८९३: ब्रिटिश शासनाकडून 'रावबहादूर' पदवी.

फॅक्टरी कायदे

👉१ ला फॅक्टरी ऍक्ट (१८८१):
🔹लॉर्ड रिपन
🔹७ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, ७ ते १२ वर्षांच्या मुलांना ९ तास काम.

👉२ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११):
🔹लॉर्ड लॅन्सडाऊन
🔹शिफारस: लेथब्रिज कमिशन
🔹९ वर्षांखालील मुलांना कामावर बंदी, महिलांसाठी ११ तास काम, रविवारी पगारी सुट्टी.

👉३ रा फॅक्टरी ऍक्ट (१९११): लॉर्ड हार्डींज
🔹पुरुषांसाठी कामाचे तास १२ निश्चित.

📌 महत्त्वाच्या संघटना व नेते (१९१८-१९३६)
👉मद्रास लेबर युनियन (१९१८): बी. पी. वाडिया — पहिली नोंदणीकृत ट्रेड युनियन.

👉अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन (१९२०): महात्मा गांधी व अनुसूया साराभाई (मजूर महाजन संघ) — विश्वस्त पद्धत

👉ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC - आयटक):
🔹स्थापना: ३१ ऑक्टोबर १९२० (मुंबई).
🔹पहिले अध्यक्ष: लाला लजपतराय उपाध्यक्ष: जोसेफ बॅप्टिस्टा
🔹सचिव: दिवाण चमनलाल.

👉सोशल सर्व्हिस लीग (१९११): ना. म. जोशी (मुंबई).

👉ट्रेड युनियन ऍक्ट (१९२६): कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा.

👉 स्वतंत्र मजूर पक्ष : १९३६ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

⚒️कम्युनिस्ट प्रभाव

👉गिरणी कामगार युनियन (१९२८): एस. ए. डांगे (लाल बावटा).

👉कामगार वृत्तपत्रे:
🔹'क्रान्ती' (मराठी) आणि 'द सोशॅलिस्ट' (इंग्रजी) — एस. ए. डांगे.

🔹कम्युनिस्टांशी संबंधित खटले: कानपूर कट खटला (१९२४) व मेरठ कट खटला (१९२९).

👉आयटक (AITUC) मधील फूट व वर्ष:
🔹१९२९ (नागपूर अधिवेशन): अध्यक्ष जवाहरलाल नेहरू.
🔹ना. म. जोशी बाहेर पडले, त्यांनी 'इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन' (ITUF) स्थापन केली.

👉१९३१ (कलकत्ता अधिवेशन): कम्युनिस्टांनी वेगळे होऊन 'रेड ट्रेड युनियन काँग्रेस' (RTUC) स्थापन केली.

पैसा आणि चलन व्यवस्था

👉पैशाचे प्रकार आणि उत्क्रांती:


🔷 वस्तू पैसा: सुरुवातीच्या काळात वस्तूच्या बदल्यात वस्तू .

🔷 धातू पैसा : सोने, चांदी, तांबे यांची नाणी. गाडगीळ समितीनुसार यात अंतर्गत मूल्य असते.

🔷 कागदी पैसा : प्रतिनिधी, परिवर्तनीय आणि आताचा अपरिवर्तनीय कागदी पैसा.

🔷 पत पैसा : चेक (धनादेश), डिमांड ड्राफ्ट, जे कायद्याने स्वीकारणे बंधनकारक नसते.

🔷 प्लॅस्टिक मनी: क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड.

🔷 डिजिटल मनी:- क्रिप्टो ETC ( BLOCK CHAIN आधारित)

👉 महत्त्वाचे संकल्पनात्मक मुद्दे (PYQ):

🔹 विधीग्राह्य पैसा (Legal Tender): कायद्यानुसार स्वीकारणे बंधनकारक असलेला पैसा.

🔹 मर्यादित विधीग्राह्य: ५० पैशांची नाणी (एका वेळी कमाल २५ रुपयांपर्यंतच देता येतात).

🔹अमर्यादित विधीग्राह्य: ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००, ₹५०० च्या नोटा.

🔷 आदेश पैसा (Fiat Money): देशाच्या केंद्र सरकारच्या किंवा आरबीआयच्या आदेशाने जारी केलेला सर्व पैसा (यात अंतर्गत मूल्य नसून केवळ विश्वास असतो).

👉 जे. एम. केन्स :
🔷केन्स यांच्या मते लोक स्वतःकडे रोख पैसा ३ मुख्य कारणांसाठी बाळगतात:

१. व्यवहार हेतू : दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी.

२. सावधानता हेतू : भविष्यातील आणीबाणी किंवा आजारपणासाठी.

३. सट्टा हेतू (Speculative Motive): भविष्यात नफा कमवण्यासाठी / शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी.
🔷 पुस्तक: 'The General Theory of Employment, Interest and Money
🔹या पुस्तकाने आधुनिक समष्टी अर्थशास्त्राचा - Macroeconomics पाया रचला.
🔷 केन्सप्रणीत विचार: १९२९ च्या जागतिक महामंदीनंतर केन्स यांनी मांडले की, मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने स्वतः बाजारात पैसा ओतून सार्वजनिक खर्च वाढवला पाहिजे.

👉भारतातील चलनाची छपाई आणि नाणी निर्मिती:

🔷 नोटांची छपाई :
🔹 ₹२ आणि त्यावरील सर्व नोटांवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी असते.
🔹आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २२ नुसार आरबीआयला नोटा काढण्याचा एकाधिकार आहे.

🔷 ₹१ ची नोट आणि सर्व नाणी:
🔹केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जातात.
🔹₹१ च्या नोटेवर 'वित्त सचिव' यांची स्वाक्षरी असते (PYQ).

🔷 किमान राखीव प्रणाली (Minimum Reserve System - 1957):
🔹आरबीआयला नवीन नोटा छापण्यासाठी एकूण ₹२०५ कोटींचे राखीव मूल्य ठेवावे लागते.
🔹 यामध्ये किमान ₹११५ कोटींचे सोने आणि ₹९० कोटींची परकीय चलन/रोखे असणे बंधनकारक आहे (PYQ).

👉 नोटा छपाई कारखाने (Mints & Presses):
🔷 नाणी टांकसाळी (Mints): मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा (४ ठिकाणी).
🔷 नोटा छपाई प्रेस: नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि साळबोनी (पश्चिम बंगाल).

👉 नोटांचा कागद आणि शाई कारखाने:
🔷 Security Paper Mill (SPM): होशंगाबाद (मध्य प्रदेश) — येथे चलनी नोटा आणि स्टँपसाठी लागणारा विशेष सुरक्षेचा कागद बनवला जातो (PYQ).
🔷 Bank Note Paper Mill (BNPM): म्हैसूर (कर्नाटक) — आरबीआय आणि केंद्र सरकारचा संयुक्त उपक्रम.
🔷 सुरक्षा शाई कारखाना (Ink): देवास (मध्य प्रदेश) — नोटांवर वापरली जाणारी विशेष शाई (Intaglio Ink) येथे बनते.

✅चलन पुरवठ्याची मापे:

🔹देशातील पैशाचा साठा (M-Money stock) मोजण्यासाठी एम. सी. घोष (1977) आणि डॉ. वाय. व्ही. रेड्डी (1998) यांच्या शिफारसींनुसार खालील संकल्पना वापरल्या जातात👇

👉 M0 (पायाभूत पैसा / उच्च क्षमतेचा पैसा - Reserve Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + आरबीआयकडील बँकांच्या ठेवी + आरबीआयकडील इतर ठेवी. (हा पतनिर्मितीचा पाया असतो).

👉 M1 (संकुचित पैसा - Narrow Money):
🔷 लोकांजवळील चलनी नोटा व नाणी + बँकांमधील मागणी ठेवी (Demand Deposits - जसे की चालू आणि बचत ठेवी) + आरबीआयकडील इतर ठेवी.

👉 M2:
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी + बँकांनी विकलेल्या चालू ठेवींचे पैसे.
(१९७७ च्या घोष गटानुसार यात 'पोस्ट ऑफिस बचत ठेवी' होत्या, परंतु १९९८ च्या रेड्डी गटानुसार आंतरराष्ट्रीय पद्धतीशी सुसंगत बदल करण्यात आले आहेत).

👉 M3 (व्यापक पैसा / विस्तृत पैसा - Broad Money) — ( PYQ):
🔷 M1 + बँकांमधील १ वर्षावरील मुदत ठेवी (Time/Term Deposits) + बँकांची मागणी ठेव व मुदत कर्जे.
🔷 नोंद: देशातील एकूण चलन पुरवठा आणि बँकांची पतनिर्मिती क्षमता मोजण्यासाठी मुख्यत्वे M3 चाच वापर केला जातो.

♦️रुपयाचे अवमूल्यन (DEVALUATION OF RUPEE)

🔷 अवमूल्यन म्हणजे काय ?:
🌱जेव्हा एखादे देश आपल्या चलनाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत स्वतःहून कमी करते.
🔹हा निर्णय सरकार/मध्यवर्ती बँक घेते.

पद्म पुरस्कार : थोडक्यात परीक्षाभिमुख माहिती

📌ऐतिहासिक पार्श्वभूमी व फॅक्ट्स


🔹 स्थापना: १९५४ (१९७७ ते १९८० आणि १९९३ ते १९९७ या काळात तात्पुरते स्थगित).
🔹 नोडल मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय.
🔹 घोषणा: दरवर्षी २५ जानेवारी (प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या).
👉 नियम व तरतुदी:
🔹 कमाल मर्यादा: एका वर्षात जास्तीत जास्त १२० पुरस्कार (मरणोत्तर आणि परदेशी व्यक्ती वगळून).
🔹 नागरी सेवा नियम: सरकारी कर्मचारी (PSU वगळून) पदावर कार्यरत असताना या पुरस्कारांसाठी पात्र नसतात.
🔹 मानधन व पदवी: पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद १८(१) नुसार हा पुरस्कार नावासोबत पदवी म्हणून वापरण्यास सक्त मनाई आहे.

📌पद्म पुरस्कार २०२६: मुख्य आकडेवारी
🔹 एकूण पुरस्कार: १३१
🔹 पद्मविभूषण: ०५
🔹 पद्मभूषण: १३
🔹 पद्मश्री: ११३
🔹 महिला विजेत्या: १९
🔹 मरणोत्तर विजेते: १६

📌 पद्मविभूषण २०२६ (एकूण ५ विजेते)
१. श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर)
🔹 कला (चित्रपट) | महाराष्ट्र

२. श्री के. टी. थॉमस
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी SC न्यायाधीश) | केरळ

३. सुश्री एन. राजम
🔹कला (व्हायोलिन वादक) | उत्तर प्रदेश

४. श्री पी. नारायणन
🔹साहित्य आणि शिक्षण | केरळ

५. श्री V. S. अच्युतानंदन (मरणोत्तर)
🔹 सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | केरळ

📌 महाराष्ट्र: सर्व १५ विजेते

👉 पद्मविभूषण (०१)
🔹 श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) | कला (चित्रपट)

👉 पद्मभूषण (०३)
🔹 सुश्री अलका याज्ञिक | कला (पार्श्वगायन)

🔹 श्री उदय कोटक | व्यापार व उद्योग (कोटक महिंद्रा बँक)

🔹 श्री पीयूष पांडे (मरणोत्तर) | कला (जाहिरात क्षेत्र)

👉 पद्मश्री (११)
🔹 श्री रोहित शर्मा | क्रीडा (क्रिकेट)

🔹 डॉ. आर्मिडा फर्नांडिस | वैद्यकीय (सायन हॉस्पिटल - पहिली ह्युमन मिल्क बँक)

🔹 श्री रघुवीर तुकाराम खेडकर | कला (तमाशा लोककला - अहमदनगर)

🔹 श्री श्रीरंग देवाबा लाड | कृषी (कापूस - दादा लाड तंत्रज्ञान - परभणी)

🔹 श्री अशोक खाडे | व्यापार आणि उद्योग (दास ऑफशॉअर - DICCI)

🔹 श्री सत्यनारायण नुवाल | व्यापार आणि उद्योग (सौर ऊर्जा व संरक्षण दारूगोळा - नागपूर)

🔹 श्री जनार्दन बापुराव बोथे | सामाजिक कार्य (जलसंधारण व ग्रामीण विकास)

🔹 प्रा. जुझर वासी | विज्ञान आणि अभियांत्रिकी (सेमीकंडक्टर संशोधन - IIT)

🔹 श्री भिकल्या लाडक्या धिंदा | कला (वारली लोककला - पालघर)

🔹 श्री सतीश शाह (मरणोत्तर) | कला (चित्रपट व अभिनय)

🔹 श्री माधवराव रंगनाथन | कला (संगीत आणि नाट्य)

📌 राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पद्मभूषण विजेते

🔹 श्री मम्मुटी | कला (चित्रपट) | केरळ

🔹✅ श्री भगतसिंग कोश्यारी | सार्वजनिक व्यवहार (माजी राज्यपाल) | उत्तराखंड

🔹 श्री शिबू सोरेन (मरणोत्तर) | सार्वजनिक व्यवहार (माजी मुख्यमंत्री) | झारखंड

🔹 श्री विजय अमृतराज | क्रीडा (टेनिस) | अमेरिका (NRI)

🔹 डॉ. नोरी दत्तात्रेयुडू | वैद्यकीय (कर्करोग तज्ज्ञ) | अमेरिका (NRI )


👉तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा मंजुरी देण्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले.

भारतातील आर्थिक सुधारणा (LPG धोरण १९९१)

👉 आर्थिक सुधारणांची पार्श्वभूमी व संकट कालखंड:


🔷 मुख्य कारणे: परकीय चलनाचा साठा कमालीचा घटला
🔹फक्त १.१ अब्ज डॉलर्स - २ आठवडे पुरेल इतकाच
🔹 राजकोषीय तूट ८.४% वर.

🔷 तात्कालिक कारण: गल्फ युद्धामुळे (आखाती युद्ध) खनिज तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ.

🔷 सोने गहाण व्यवहार: IMF आणि जागतिक बँकेकडून ७ अब्ज डॉलर्स कर्जासाठी सोने गहाण (४७ टन सोने 'बँक ऑफ इंग्लंड' कडे + २० टन सोने 'युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड' कडे).

👉 नवीन आर्थिक धोरणाची घोषणा:

🔷 अधिकृत तारीख: २४ जुलै १९९१ (तत्कालीन पंतप्रधान: पी. व्ही. नरसिंह राव, अर्थमंत्री: डॉ. मनमोहन सिंग).

🔷 प्रतिमान नाव: 'राव-मनमोहन मॉडेल'.

🔷 मुख्य उद्दिष्ट: लायसन्स राज (परवाना राज) संपवणे व अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करणे.

👉 उदारीकरण (Liberalization) व परवाना सद्यस्थिती:

🔷 औद्योगिक परवाना मुक्ती: सुरुवातीला १८ उद्योग सोडून सर्व उद्योगांचे परवाने रद्द.

🔷 परवाना सक्तीचे सध्याचे ५ उद्योग: १) इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस व संरक्षण साहित्य
२) औद्योगिक स्फोटके
३) घातक रसायने
४) तंबाखू, सिगारेट व सिगार
५) अल्कोहोलयुक्त पेये (दारू).

🔷 परकीय गुंतवणूक: विशिष्ट उद्योगांमध्ये ५१% पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) स्वयंचलित मंजुरी.

🔷 एमआरटीपी (MRTP 1969) कायदा: रद्द करून 'स्पर्धा कायदा २००२' संमत
🔹पूर्ण अंमलबजावणी: २००९ पासून, कंपन्यांच्या मालमत्तेची मर्यादा संपुष्टात.

👉 खाजगीकरण (Privatization) व सार्वजनिक क्षेत्र सुधारणा:

🔷 निर्गुंतवणूक :
🔹सुधारणांसाठी रंगराजन समिती(१९९३).
🔹जी. व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग (१९९६).

🔷 सरकारी क्षेत्राचे संकोचन: सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव उद्योगांची संख्या १७ वरून थेट ८ वर आणली.

🔷 सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव सध्याचे २ उद्योग:
१) अणुऊर्जा (Atomic Energy)
२) रेल्वे ऑपरेशन्स (रेल्वे वाहतूक).

🔷 स्वायत्तता योजना:
सरकारी कंपन्यांना वित्तीय स्वायत्ततेसाठी १९९७ मध्ये 'नवरत्न' आणि 'मिनीरत्न' दर्जा देण्यास सुरुवात (महारत्न दर्जा: २०१० पासून).

👉 जागतिकीकरण (Globalization) व परकीय चलन सुधारणा:

🔷 रुपयाचे अवमूल्यन (१९९१):
जुलै १९९१ मध्ये दोन टप्प्यांत (१ जुलै आणि ३ जुलै) एकूण १८.५% ते २०% अवमूल्यन.

🔷 रुपयाची परिवर्तनीयता: मार्च १९९३ मध्ये व्यापार खात्यावर आणि ऑगस्ट १९९४ मध्ये चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय (कलम ८ नुसार).

🔷 सीमाशुल्क कपात: आयात कर कमाल ३००% वरून टप्प्याटप्प्याने कमी केला.

🔷 फेरा ऐवजी फेमा: विदेशी चलन नियमन कायदा (FERA 1973) बदलून विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA 1999) आणला (लागू: १ जून २००० पासून).

👉 वित्तीय, बँकिंग व कर सुधारणा समित्या:

🔷 नरसिंहम समिती १ (१९९१): एसएलआर (SLR) ३८.५% वरून २५% वर
🔹 सीआरआर (CRR) १५% वरून १०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.


🔷 नरसिंहम समिती २ (१९९८):
बँकिंग क्षेत्रात भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR) ९% करणे व बुडीत कर्जांसाठी मालमत्ता पुनर्रचना कंपन्या (ARC) स्थापन करण्याची शिफारस.

🔷 राजा चेलय्या समिती (१९९१-९३): आयकराचे कमाल दर ३०% आणि कंपनी कराचे दर ४०% पर्यंत कमी करण्याची शिफारस.

🔷 सेवा कर (Service Tax) सुरुवात: राजा चेलय्या समितीच्या शिफारशीनुसार १९९४-९५ मध्ये पहिल्यांदा फक्त ३ सेवांवर (टेलीफोन, विमा, स्टॉक ब्रोकर) ५% दराने लागू.

✅ कंबाइन पूर्व परीक्षेत आर्थिक सुधारणा व १९९१ च्या धोरणावर दरवर्षी १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

असहकार चळवळ (१९२०-१९२२)

 पार्श्वभूमी व ठराव:


🔷 विशेष अधिवेशन: सप्टेंबर १९२०, कलकत्ता (अध्यक्ष: लाला लजपत राय) – असहकाराचा प्रस्ताव मांडला.

🔷 वार्षिक अधिवेशन: डिसेंबर १९२०, नागपूर (अध्यक्ष: सी. विजयराघवाचारीआर) –
🔹असहकाराच्या कराराला अंतिम मंजुरी. (हा ठराव चित्तरंजन दास यांनी मांडला).

👉 महाराष्ट्रातील विशेष योगदान:

🔷 टिळक स्वराज्य फंड: चळवळीसाठी १ कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट होते.

🔹 महाराष्ट्रातून या फंडासाठी मोठा निधी गोळा झाला.

🔷 परकीय कापडाची होळी: मुंबईत परकीय कापडाची मोठी होळी करण्यात आली.

🔷 दारूबंदी आंदोलन: पुणे आणि मुंबईत दारूच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात मोर्चे व निदर्शने झाली.

🔷 विद्यापीठ स्थापना: राष्ट्रीय शिक्षणाचा भाग म्हणून पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (१९२१) ची स्थापना झाली.

👉 महत्त्वाच्या घटना व शेवट:

🔷 मुळशी सत्याग्रह (१९२१): सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली टाटा कंपनीच्या धरणाविरुद्ध महाराष्ट्रात समांतर शेतकरी आंदोलन सुरू झाले.

🔷 प्रिन्स ऑफ वेल्सचे आगमन: नोव्हेंबर १९२१ मध्ये मुंबईत आगमन झाल्यावर प्रचंड हरताळ पाळण्यात आला.
🔹 यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात दंगल व हिंसाचार झाला.

🔷 चौरी-चौरा घटना: ५ फेब्रुवारी १९२२ (उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा) – २२ पोलिसांना जिवंत जाळले.

🔷 चळवळ मागे: १२ फेब्रुवारी १९२२ रोजी बारडोली येथील बैठकीत गांधीजींनी चळवळ स्थगित केली.

🔴 सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-१९३४)

👉 प्रारंभ (दांडी यात्रा):
🔷 कालावधी: १२ मार्च १९३० ते ५ एप्रिल १९३० (एकूण २४ दिवस, २४१ मैल अंतर).
🔷 सहभागी: गांधीजींसोबत ७८ अनुयायी होते.
🔹 यात महाराष्ट्रातून अवंतिकाबाई गोखले आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
🔷 कायदा मोडला: ६ एप्रिल १९३० रोजी दांडी येथे मीठाचा कायदा मोडला.

👉 महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र आणि सत्याग्रह :

🔷 १) वडाळा सत्याग्रह (मुंबई):
🔹 १६ एप्रिल १९३० पासून सुरुवात. १६ मे आणि १ जून रोजीचे मोर्चे सर्वात मोठे होते.
🔹 नेतृत्व: अवंतिकाबाई गोखले, कमलादेवी चट्टोपाध्याय, के. एफ. नरिमन.

🔷 २) शिरोडा सत्याग्रह (रत्नागिरी/सिंधुदुर्ग):
🔹 १२ मे १९३० रोजी मीठाचा पाडाव केला.
🔹 नेतृत्व: डॉ. आठल्ये, अप्पासाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन.

🔷 ३) धारासणा सत्याग्रह (गुजरात - महाराष्ट्राशी जोडलेला):
🔹 नेतृत्व: सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मणिलाल गांधी.
🔹 महाराष्ट्रातून कॅप्टन लक्ष्मीपती आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. अमेरिकन पत्रकार वेब मिलर याने येथील अमानुष लाठीहल्ल्याचे वर्णन केले.

🔷 ४) सोलापूरचा उठाव (मार्शल लॉ):
🔹 गांधीजींच्या अटकेनंतर (५ मे) सोलापूरमध्ये गिरणी कामगारांचा प्रचंड उद्रेक झाला. ९ ते १६ मे दरम्यान सोलापूरवर जनतेचे नियंत्रण होते.

🔹 ४ हुतात्मे (फाशी):
मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, आणि श्रीकिसन सारडा.

🔷 ५) महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह (मीठ उपलब्ध नसलेल्या भागात):

🔹 पुसद (यवतमाळ): १० जुलै १९३०
नेतृत्व: लोकनायक बापूजी अणे (आरक्षित जंगलातील गवत कापून कायदा मोडला).

🔹 बिळाशी (सांगली): १८ जुलै १९३० – येथे तिरंगा फडकवण्यासाठी मोठा संघर्ष झाला (राजू आणि नाना या बालकांचे योगदान).

🔹 चिरनेर (रायगड): २५ सप्टेंबर १९३० – येथे पोलिसांच्या गोळीबारात अनेक जण हुतात्मे झाले (उदा. नागू सयाजी जाधव).

🔹 इतर प्रमुख केंद्र: संगमनेर व अकोले (अहमदनगर), कळवण (नाशिक).

👉 चळवळीचा शेवट:
🔷 गांधी-आयर्विन करार: ५ मार्च १९३१ (या करारानुसार पहिली चळवळ स्थगित करून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले).

🔷 दुसरा टप्पा: परिषद अपयशी ठरल्याने जानेवारी १९३२ मध्ये चळवळ पुन्हा सुरू झाली, पण ती कमजोर पडली आणि मे १९३४ मध्ये पूर्णपणे मागे घेण्यात आली.

✅वर असहकार चळवळ व सविनय कायदेभंग चळवळ याविषयी महाराष्ट्र तसेच भारतातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या टाकल्या आहेत याबाहेर प्रश्न जाण्याची शक्यता खूपच कमी आहे..
✅इतकं केलं तरी तुम्हाला नक्की मार्क्स पडतील..

व्यापारतोल (BOT) व व्यवहारतोल (BOP)

 🔷 व्यापारतोल (BOT)

🔸 फक्त दृश्य (वस्तू) आयात-निर्यातीचा समावेश.
🔸 भारताचा व्यापारतोल ऐतिहासिकदृष्ट्या नेहमी तुटीचा असतो.

​🔷 व्यवहारतोल (BOP)
🔸 दृश्य + अदृश्य (सेवा, रेमिटन्सेस) अशा सर्व आर्थिक व्यवहारांचा समावेश.
🔸 देशाचा उर्वरित जगासोबतचा एकूण वार्षिक आर्थिक हिशोब.
🔸 लेखांकन दृष्टिकोनातून हा नेहमी संतुलित असतो.

​🔷 चालू खाते (Current Account)
🔸 वस्तू व्यापार (नेहमी तुटीचा).
🔸 सेवा व्यापार (सॉफ्टवेअर, पर्यटन - नेहमी आधिक्याचा).
🔸 एकतर्फी हस्तांतरण (Remittances/भेटवस्तू).
🔸 भारतात एकूण चालू खात्यावर नेहमी चालू खाते तूट (CAD) आढळते.

​🔷 भांडवली खाते (Capital Account)
🔸 परकीय गुंतवणूक (FDI, FPI).
🔸 परकीय कर्ज (ECB).
🔸 बँकिंग भांडवल.
🔸 भारतात हे खाते सहसा आधिक्यात असते, जे चालू खात्याची तूट भरून काढते.

​🔷 रुपया परिवर्तनीयता (Convertibility)
🔸 चालू खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय (१००%) आहे (ऑगस्ट १९९४ पासून).
🔸 भांडवली खात्यावर रुपया अजूनही अंशतः परिवर्तनीय आहे.

​🔷 परीक्षाभिमुख महत्वपूर्ण समित्या
🔸 तारापोर समिती १ (१९९७): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेसाठी.
🔸 तारापोर समिती २ (२००६): भांडवली खात्यावरील रुपया परिवर्तनीयतेचे पुढील टप्पे ठरवण्यासाठी.
🔸 सी. रंगराजन समिती (१९९३): व्यवहारतोल व्यवस्थापन आणि परकीय चलन साठ्यासाठी.

​🔷 परकीय चलन साठा (Forex Reserve) घटक
🔸 १. परकीय चलन मालमत्ता (FCA - याचा वाटा सर्वाधिक असतो).
🔸 २. सोने (Gold).
🔸 ३. विशेष उचल अधिकार (SDR).
🔸 ४. आयएमएफ (IMF) मधील राखीव साठा.

​🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 परकीय चलन साठा (मे २०२६)
🔻 एकूण साठा: आरबीआयच्या आकडेवारीनुसार ६८८.८९ अब्ज डॉलर.
🔻 जागतिक क्रमांक: भारत सध्या जगात ४ थ्या स्थानावर आहे.
🔻 अव्वल देश: १ ला: चीन, २ रा: जपान, ३ रा: स्विट्झर्लंड.

​🔸 चालू खाते तूट (आर्थिक वर्ष २०२५-२६)
🔻 एकूण प्रमाण: आरबीआयच्या अहवालानुसार भारताची चालू खाते तूट (CAD) एकूण जीडीपीच्या १.३% आहे.

​🔸 रेमिटन्सेस (जागतिक बँक अहवाल २०२४-२०२५)
🔻 जागतिक क्रमांक: परदेशातून मायदेशात पैसे पाठवण्यात भारत जगात १ ल्या क्रमांकावर कायम आहे.
🔻 मुख्य स्रोत: भारताला सर्वाधिक रेमिटन्सेस युएई (UAE) कडून प्राप्त होतात.

​🔸 रुपया घसरण नियंत्रण (मे २०२६)
🔻 नीचांक: डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९६.९६ चा नीचांक गाठला.
🔻 आरबीआय उपाययोजना: रुपया स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय थेट स्पॉट मार्केटमध्ये डॉलर्सची विक्री करत आहे.

परकीय व्यापार व व्यापार धोरण

🔷 प्रमुख भागीदार व वस्तू (आर्थिक वर्ष २०२४-२५)

🔸 निर्यात देश: १. अमेरिका, २. युएई, ३. नेदरलँड्स.
🔸 आयात देश: १. चीन, २. अमेरिका, ३. युएई.
🔸 निर्यात वस्तू: Petroleum उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, औषधे.
🔸 आयात वस्तू: कच्चे तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, सोने.

🔷 परकीय व्यापार धोरण (FTP) इतिहास व बदल

🔸 EXIM धोरण (१९९२-९७): आर्थिक सुधारणांनंतरचे पहिले ५ वर्षांचे धोरण;
आयातीचे उदारीकरण व परवाने कमी केले.

🔸 FTP (२००४-०९): EXIM चे नाव बदलून फॉरेन ट्रेड पॉलिसी (FTP) केले.
'विशेष कृषी उपज योजना' सुरू.

🔸 FTP (२०१५-२०): MEIS (वस्तू निर्यात) व SEIS (सेवा निर्यात) योजना सुरू.
(कोविडमुळे मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ).

🔸 नवीन FTP (२०२३ पासून लागू): १ एप्रिल २०२३ पासून लागू. विशेष म्हणजे हे कालबद्ध नाही.

🔸 FTP २०२३ लक्ष्य: २०३० पर्यंत भारताची एकूण निर्यात २ ट्रिलियन डॉलर
(१ ट्रिलियन वस्तू + १ ट्रिलियन सेवा) करणे.

🔸 मुख्य सुधारणा: रुपयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांना मंजुरी.
📌'टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स' (TEE) मध्ये नवीन ४ शहरे (फरीदाबाद, मिर्षापूर, मुरादाबाद, वाराणसी) समाविष्ट करून एकूण संख्या ३९ झाली.

🔸 नवीन योजना: MEIS ऐवजी RoDTEP (उत्पादनांवरील शुल्क व करांची सूट) योजना लागू.

🔷 चालू घडामोडी व अद्ययावत डेटा

🔸 जागतिक व्यापारातील वाटा (डब्ल्यूटीओ अहवाल २०२५)
🔻 वस्तू निर्यात: जागतिक वस्तू निर्यातीत भारताचा वाटा २.२% आहे.
🔻 सेवा निर्यात: जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा ४.६% आहे.

🔸 रुपया व्यापार करार (२०२५-२०२६)
🔻 नवीन विस्तार: रशिया आणि युएई नंतर आता आणखी ५ मित्र देशांसोबत रुपयामध्ये व्यापाराला मंजुरी दिली आहे.
🔻 बँक खाती: या व्यवहारांसाठी विशेष 'व्होस्ट्रो खाती' सुरू करण्यात आली आहेत.

गोलमेज परिषद व संबंधित घटना

🔷 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३०)

🔸 मुख्य वैशिष्ट्य: काँग्रेसचा पूर्ण बहिष्कार.
🔸 अध्यक्ष: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड.
🔸 अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व: डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

🔸 इतर प्रमुख प्रतिनिधी:
🔻 मुस्लिम लीग: बॅ. जिन्ना, आगाखान.
🔻 उदारमतवादी: तेजबहादूर सप्रू, चिंतातमणी.
🔻 संस्थानिक: सयाजीराव गायकवाड (बडोदा), मिर्झा इस्माईल (मैसूर), जयसिंग राजे (अलवार).

🔷 गांधी-इर्विन करार (५ मार्च १९३१)
🔸 मुख्य परिणाम: सविनय कायदेभंग आंदोलन तात्पुरते स्थगित.
🔸 काँग्रेस सहमती: दुसऱ्या परिषदेत सहभागी होण्यास मंजुरी.

🔷 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर १९३१)
🔸 काँग्रेस प्रतिनिधित्व: महात्मा गांधी उपस्थित (एस. एस. राजपुताना जहाजाने प्रवास).
🔸 इतर क्षेत्रांचे स्वतंत्र प्रतिनिधी:
🔻 महिला: सरोजिनी नायडू, बेगम जहाँआरा शाहनवाज.
🔻 राष्ट्रवादी पक्ष: मदनमोहन मालवीय.
🔻 उद्योग क्षेत्र: घनश्यामदास बिर्ला.

🔸 निकाल: स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याने गांधीजी अपयशी ठरून परतले.
🔸 गांधीजींचे वक्तव्य: "मी रिकाम्या हाताने परतलो असलो, तरी माझ्या देशाचा ध्वज खाली पडू दिला नाही."

🔷 जातीय निवाडा (१६ ऑगस्ट १९३२)
🔸 घोषणा: ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्याकडून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर.
🔸 गांधीजींची प्रतिक्रिया: या निवाड्याविरोधात २० सप्टेंबर १९३२ रोजी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू.

🔷 पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२)
🔸 ठिकाण व व्यक्ती: गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा जेलमध्ये.
🔸 मुख्य मध्यस्थ: मदनमोहन मालवीय, सी. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, बॅ. मुकुंदराव जयकर.
🔸 स्वाक्षऱ्या: गांधीजींच्या वतीने मदनमोहन मालवीय यांनी तर दलित वर्गाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
🔸 जागांमधील बदल: स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा पद्धत मान्य.
🔻 प्रांतीय कायदेमंडळ: जागा ७१ वरून १४८ करण्यात आल्या.
🔻 मध्यवर्ती कायदेमंडळ: दलित वर्गासाठी १८% जागा राखीव.

🔷 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर १९३२)
🔸 बहिष्कार: काँग्रेस आणि ब्रिटनच्या 'लेबर पार्टी'चा (मजूर पक्ष) पूर्ण बहिष्कार.
🔸 विशेष नोंद: तिन्ही परिषदांना उपस्थित असणारे प्रमुख नेते - डॉ. बी. आर. आंबेडकर आणि तेज बहादूर सप्रू.
🔸 परिषदेच्या विचारमंथनातून मार्च १९३३ मध्ये 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध, ज्याच्या आधारावर पुढे '१९३५ चा भारत सरकार कायदा' तयार झाला.

चलेजाव आंदोलन / छोडो भारत आंदोलन (१९४२)

🔷 ठराव व मंजुरी


🔸 वर्धा बैठक (१४ जुलै १९४२): 'भारत छोडो' चा मूळ मसुदा मांडला.

🔸 मुंबई अधिवेशन (७ ऑगस्ट १९४२): गवालिया टँक मैदानावर ठराव मंजूर.

🔻 अध्यक्ष: मौलाना अबुल कलाम आझाद.

🔻 मांडणारे / अनुमोदक: जवाहरलाल नेहरू / वल्लभभाई पटेल.



🔷 आंदोलन सुरुवात व घोषणा

🔸 ८ ऑगस्ट १९४२: गांधीजींचा "करेंगे या मरेंगे" (Do or Die) ऐतिहासिक नारा.

🔸 ९ ऑगस्ट १९४२: ब्रिटीशांचे 'ऑपरेशन झिरो अवर';
सर्व प्रमुख नेत्यांना अटक.

🔻 गांधीजी: आगाखान पैलेस (पुणे)
नेहरू: अहमदनगर किल्ला.



🔷 भूमिगत चळवळ

🔸 प्रमुख नेते: डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण.

🔸 आझाद रेडिओ (मुंबई): उषा मेहता यांनी चालवले; लोहियांचे नियमित भाषण.

🔻 तंत्रज्ञ: विठ्ठलभाई झवेरी आणि नरिमन प्रिंटर.



🔷 प्रतिसरकार (महाराष्ट्र विशेष - सातारा)

🔸 स्थापना: क्रांतीसिंह नाना पाटील यांचे 'पत्री सरकार' (१९४३-४६).

🔸 कार्यपद्धती: ग्रामीण भागात कायदा राखण्यासाठी 'न्यायदान मंडळे' (लोकन्यायालय).

🔸 समाजसुधारणा: गावोगावी दारूबंदी, हुंडाबंदी आणि कमी खर्चाचे 'गांधी विवाह'.



🔷 आंदोलनातील प्रमुख सेना व दले

🔸 तुफान सेना (सातारा): जी. डी. बापू लाड व नाना पाटील; ब्रिटीश रेल्वे व खजिना लुटणे मुख्य कार्य.

🔸 विद्युत वाहिनी (बंगाल): सतीशचंद्र सामंत; तामलुक प्रतिसरकारचे अधिकृत सशस्त्र दल.

🔸 आझाद दस्ता (नेपाळ): जयप्रकाश नारायण; जंगलातून गनिमी काव्याने ब्रिटीश दळणवळण विस्कळीत केले.

🔸 वानर व मांजर सेना: लहान मुले (वानर) व मुलींचे (मांजर) दल; भूमिगत नेत्यांना संदेश व अन्न पुरवणे.

🔸 राष्ट्र सेवा दल (महाराष्ट्र): साने गुरुजी व एस. एम. जोशी; तरुणांना आंदोलनासाठी संघटित केले.



🔷 इतर भागातील प्रतिसरकारे

🔸 १. बलिया (उत्तर प्रदेश): चित्तू पांडे (देशातील पहिले प्रतिसरकार - १ आठवडा).

🔸 २. तामलुक (बंगाल): 'जातीय सरकार' (चक्रीवादळात मदत व समांतर प्रशासन).

🔸 ३. ताल्चेर (ओडिशा): देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेले प्रतिसरकार.

वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)

🔷 पार्श्वभूमी


🔸 मुख्य कारण: ब्रिटीश सरकारच्या 'ऑगस्ट ऑफर'ला विरोध करणे.

🔸 मुख्य उद्देश: महायुद्धात भारतीयांची सक्तीची संमती नाही हे दर्शवणे.

🔸 अधिकृत सुरुवात: १५ ऑक्टोबर १९४०.


🔷 प्रमुख सत्याग्रही (क्रमानुसार)

🔸 १. पहिले सत्याग्रही: आचार्य विनोबा भावे.

🔻 ठिकाण: पावनार आश्रम (वर्धा) येथून १७ ऑक्टोबर १९४० ला सुरुवात.

🔻 परिणाम: युद्धविरोधी भाषणामुळे ३ महिन्यांची अटक.

🔸 २. दुसरे सत्याग्रही: पंडित जवाहरलाल नेहरू.

🔻 परिणाम: ब्रिटीश सरकारकडून ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा.

🔸 ३. तिसरे सत्याग्रही: ब्रह्मदत्त (आश्रमातील संन्यासी).


🔸 ४. चौथे सत्याग्रही: मौलाना अबुल कलाम आझाद.


🔷 आंदोलनाचे स्वरूप व रणनीती

🔸 सत्याग्रह पद्धत: सामूहिक ऐवजी केवळ गांधीजींनी निवडलेले व्यक्तीच वैयक्तिक पातळीवर आंदोलन करणार.

🔸 ब्रिटीश कारवाई: आंदोलन दाबण्यासाठी वृत्तपत्रांवर 'सेन्सॉरशिप' (बातम्यांवर बंदी) लागू.

🔸 दुसरा टप्पा (१९४१): 'सलोखा सत्याग्रह' सुरू करून हजारो कार्यकर्त्यांनी सामूहिक अटक करून घेतली.

🔸 महाराष्ट्र विशेष योगदान:


🔻 बॉम्बे प्रांत सत्याग्रहींच्या संख्येत देशात अग्रस्थानी.

🔻 महाराष्ट्रातून ३,५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची अटक.

🔸 अधिकृत घोषणा: "युद्धात ब्रिटीशांना पैशाची किंवा माणसांची मदत करू नका."

🔸 पर्यायी नाव: सत्याग्रही दिल्लीकडे कूच करत असल्याने 'दिल्ली चलो आंदोलन' म्हणूनही प्रसिद्ध.

🔸 समाप्ती: डिसेंबर १९४१ मध्ये जपानच्या युद्धप्रवेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे गांधीजींनी आंदोलन मागे घेतले.

सामाजिक व धार्मिक सुधारणा


🔸 राजा राममोहन रॉय (ब्रह्म समाज - १८२८):
🔹 १८२९: सती बंदी कायदा (लॉर्ड बेंटिकच्या मदतीने).
🔹 १८३३: मृत्यू (ब्रिस्टल, इंग्लंड).
🔹 'भारतीय प्रबोधनाचे जनक' व 'आधुनिक भारताचे निर्माते'.

🔸 महात्मा जोतीराव फुले (सत्यशोधक समाज - २४ सप्टेंबर १८७३):
🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.
🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्रास पाठिंबा.
🔹 मुख्य उद्दिष्ट: शोषितांचे शिक्षण व त्यांना हक्क मिळवून देणे.

🔸 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:
🔹 १९२४: 'बहिष्कृत हितकारिणी सभा' स्थापना.
🔹 १९२७: महाडचा सत्याग्रह (चवदार तळे).
🔹 १९३६: 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना.

🔸 महत्त्वाच्या संस्था व व्यक्ती:
👉 प्रार्थना समाज (१८६७): डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे (विधवा पुनर्विवाह व शिक्षणावर भर).
👉 आर्य समाज (१८७५): स्वामी दयानंद सरस्वती ('वेदांकडे परत चला' हा नारा).
👉 रामकृष्ण मिशन (१८९७): स्वामी विवेकानंद (मानवसेवा हीच ईश्वरसेवा).
👉 थियोसोफिकल सोसायटी: ॲनी बेझंट (भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी कार्य).

🔸 महाराष्ट्रातील समाजसुधारक:
🔹 गोपाळ गणेश आगरकर: 'केसरी'चे पहिले संपादक, 'सुधारक' साप्ताहिक (सामाजिक सुधारणेस प्राधान्य).
🔹 महर्षी धोंडो केशव कर्वे: १८९९ मध्ये 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी', १९१६ मध्ये 'पहिले महिला विद्यापीठ'.
🔹 महारषी विठ्ठल रामजी शिंदे: १९०६ मध्ये 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन'ची स्थापना.

महात्मा जोतीराव फुले व सत्यशोधक समाज व संबंधित व्यक्ती..


🔸 महात्मा जोतीराव फुले:

🔹 जन्म: ११ एप्रिल १८२७, पुणे.

🔹 १८४८: भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा (पुणे).

🔹 १८६३: बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापना.

🔹 १८७३: 'सत्यशोधक समाज' स्थापना (उद्दिष्ट: शूद्रातिशूद्रांना हक्क मिळवून देणे).

🔹 १८७३: 'गुलामगिरी' ग्रंथ प्रकाशित.

🔹 १८८८: 'महात्मा' पदवी (रावबहादूर वडेकरांच्या हस्ते).

🔸 सावित्रीबाई फुले:

🔹 भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका.

🔹 १८५२: 'मुलिनाठी' (मुलींची पहिली शाळा) - वेताळ पेठेत.

🔹 काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर हे साहित्य.

🔹 विधवा केशवपनाची पद्धत बंद पाडण्यासाठी नाभिकांचा संप घडवून आणला.

🔸 नारायण मेघाजी लोखंडे (कामगार चळवळीचे जनक):

🔹 १८८०: 'दीनबंधू' वृत्तपत्राचे संपादक.

🔹 १८९०: 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' (पहिली कामगार संघटना) स्थापना.

🔹 कामगारांना रविवारी सुटी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान.

🔹 १८९५: 'राव बहादूर' पदवी.

🔸 कृष्णराव भालेकर:

🔹 सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते.

🔹 १८७७: 'दीनबंधू' साप्ताहिकाची सुरुवात केली (सत्यशोधक समाजाचे मुखपत्र).

🔹 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी 'दीनबंधू सार्वजनिक सभा' स्थापन केली.

🔹 महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रसार ग्रामीण भागात करण्यात मोठा वाटा.

प्रकाश (Light)



🔶 प्रकाशाचे स्वरूप व गुणधर्म

🔹 प्रकाशाचे स्वरूप: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Wave) आहे.

 🔸 निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो (3 x 10^8 m/sec).

 🔸 प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेत होते.

🔶 परावर्तन (Reflection of Light)

🔹 नियम:
 🔸 आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
 🔸 आपाती कोन (i) = परावर्तन कोन (r).
  🔹 आरशांचे प्रकार व उपयोग:

 🔸 समतल आरसा: प्रतिमा आभासी, सुलट आणि वस्तूच्या आकाराची असते.

 🔸 बहिर्वक्र आरसा: प्रतिमा नेहमी लहान, सुलट आणि आभासी.
   ▫️ उपयोग: वाहनांचे साइड मिरर, रस्ते वळणावरील आरसे.

 🔸 अंतर्वक्र आरसा: प्रतिमा वास्तव आणि उलटी (फोकसच्या बाहेर असताना).
   ▫️ उपयोग: दाढीचा आरसा, डॉक्टरांचे हेड मिरर, सोलर कुकर, टॉर्च, हेडलाईट्स.

🔶 अपवर्तन (Refraction of Light)

🔹 नियम: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचे विचलन होते.

🔹 परिणाम:
 🔸 पाण्यात अंशतः बुडवलेली पेन्सिल वाकडी दिसणे.
 🔸 स्विमिंग पूलचा तळ वर आल्यासारखा वाटणे.
 🔸 ताऱ्यांचे लुकलुकणे (वातावरणीय अपवर्तन).

 🔸 सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी सूर्य क्षितिजावर दिसणे.

🔶 मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा: तुलना

🔹 कार्यपद्धती: मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा यांची रचना बऱ्याच अंशी सारखी असते.

🔸 बाहुली (Pupil) = कॅमेरा अपर्चर (Aperture): प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करतात.

 🔸 डोळ्यातील भिंग (Lens) = कॅमेरा लेन्स: वस्तूवर प्रकाश केंद्रित करतात.

🔸 दृष्टीपटल (Retina) = कॅमेरा सेन्सर (Sensor/Film): प्रतिमा तयार करतात.

🔸 डोळ्याचे स्नायू = कॅमेरा फोकसिंग मेकॅनिझम: प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी ॲडजस्ट होतात.

🔶 दृष्टीदोष व भिंगांचा वापर

🔹 निकटदृष्टिता (Myopia):
 
🔸 दोष: जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे स्पष्ट दिसत नाही.
 
🔸 निराकरण: 'अंतर्वक्र' (Concave) भिंगाचा वापर.

   🔹 दूरदृष्टिता (Hypermetropia):

🔸 दोष: लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे स्पष्ट दिसत नाही.

🔸 निराकरण: 'बहिर्वक्र' (Convex)
 भिंगाचा वापर.

   🔹 इतर दोष:

🔸 जरादूरदृष्टीता : द्विनाभी (Bifocal) भिंगाचा वापर.

🔸 दृष्टीवैषम्य (Astigmatism): नलाकार (Cylindrical) भिंगाचा वापर.

🔶 प्रकाश विकिरण (Scattering) व अपस्करण (Dispersion)

🔹 विकिरण (Scattering):

🔸 आकाशाचा निळा रंग: रेले विकिरण (Rayleigh Scattering).

🔸 सूर्यास्त/सूर्योदयी सूर्य लाल दिसणे (कमी लांबीचे तरंग विखरून जातात).

   🔹 अपस्करण (Dispersion):
 
🔸 पांढरा प्रकाश सात रंगांत विभागणे.
 
🔸 ता-ना-पि-हि-पा-जा-पा (VIBGYOR):
  
▫️ सर्वाधिक विचलन: जांभळा (Violet) रंग.
   
▫️ सर्वात कमी विचलन: तांबडा (Red) रंग.

🔶 पूर्ण आंतरिक परावर्तन (Total Internal Reflection)

🔹 अटी: प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असावा.

🔹 उदाहरणे

 🔸 मृगजळ 

 🔸 हिऱ्याचे चमकणे.

  🔸 ऑप्टिकल फायबर (Optical Fiber) मध्ये माहितीचे वहन.

🔶 महत्त्वाच्या संकल्पना 
 
🔸 प्रकाशाचे अस्तित्व: प्रकाश हा फोटॉन्स (Photons) चा बनलेला असतो.
 
🔸 प्रकाश वर्ष (Light Year): अंतराचे एकक (9.46 x 10^15 मीटर).
 
🔸 रंग ओळखणे: वस्तूचा रंग ती वस्तू कोणत्या रंगाच्या लहरींचे परावर्तन करते यावर ठरतो.
 
🔸 शुभ्र प्रकाश: काचेच्या लॅन्समधून जाताना प्रकाशाचा वेग कमी होतो.
 
🔸 माध्यमाचा अपवर्तनांक: (Refractive Index) - माध्यमात प्रकाशाचा वेग कमी होण्याचे प्रमाण.
 
🔸 भिंगांचे सामर्थ्य: भिंगांचे सामर्थ्य हे डायऑप्टर (Dioptre) मध्ये मोजले जाते.

♦️ भारतीय शास्त्रज्ञ आणि प्रकाश (Light)

🔶 सर सी. व्ही. रामन (Sir C. V. Raman):

🔹 रामन परिणाम :

🔸 शोध: १९२८ मध्ये त्यांनी प्रकाशाच्या विकिरणाबाबत (Scattering of Light) एक क्रांतिक शोध लावला, ज्याला 'रामन इफेक्ट' म्हणतात.

🔸 सिद्धांत: जेव्हा प्रकाशाचा किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा त्यातील रेणूंमुळे प्रकाशाच्या स्वरूपात बदल होतो आणि त्याचे विकिरण होते.

🔸 महत्त्व: या शोधामुळे रेणूंच्या रचनेचा अभ्यास करणे सोपे झाले.

🔸 पुरस्कार: १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई आणि भारतीय शास्त्रज्ञ होते.

🔸 राष्ट्रीय विज्ञान दिन: त्यांच्या या महान शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.