२६ ऑगस्ट २०२६

प्रकाश (Light)



🔶 प्रकाशाचे स्वरूप व गुणधर्म

🔹 प्रकाशाचे स्वरूप: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंग (Electromagnetic Wave) आहे.

 🔸 निर्वातामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो (3 x 10^8 m/sec).

 🔸 प्रकाशाचे संक्रमण नेहमी सरळ रेषेत होते.

🔶 परावर्तन (Reflection of Light)

🔹 नियम:
 🔸 आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
 🔸 आपाती कोन (i) = परावर्तन कोन (r).
  🔹 आरशांचे प्रकार व उपयोग:

 🔸 समतल आरसा: प्रतिमा आभासी, सुलट आणि वस्तूच्या आकाराची असते.

 🔸 बहिर्वक्र आरसा: प्रतिमा नेहमी लहान, सुलट आणि आभासी.
   ▫️ उपयोग: वाहनांचे साइड मिरर, रस्ते वळणावरील आरसे.

 🔸 अंतर्वक्र आरसा: प्रतिमा वास्तव आणि उलटी (फोकसच्या बाहेर असताना).
   ▫️ उपयोग: दाढीचा आरसा, डॉक्टरांचे हेड मिरर, सोलर कुकर, टॉर्च, हेडलाईट्स.

🔶 अपवर्तन (Refraction of Light)

🔹 नियम: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचे विचलन होते.

🔹 परिणाम:
 🔸 पाण्यात अंशतः बुडवलेली पेन्सिल वाकडी दिसणे.
 🔸 स्विमिंग पूलचा तळ वर आल्यासारखा वाटणे.
 🔸 ताऱ्यांचे लुकलुकणे (वातावरणीय अपवर्तन).

 🔸 सूर्यास्त व सूर्योदयाच्या वेळी सूर्य क्षितिजावर दिसणे.

🔶 मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा: तुलना

🔹 कार्यपद्धती: मानवी डोळा आणि डिजिटल कॅमेरा यांची रचना बऱ्याच अंशी सारखी असते.

🔸 बाहुली (Pupil) = कॅमेरा अपर्चर (Aperture): प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करतात.

 🔸 डोळ्यातील भिंग (Lens) = कॅमेरा लेन्स: वस्तूवर प्रकाश केंद्रित करतात.

🔸 दृष्टीपटल (Retina) = कॅमेरा सेन्सर (Sensor/Film): प्रतिमा तयार करतात.

🔸 डोळ्याचे स्नायू = कॅमेरा फोकसिंग मेकॅनिझम: प्रतिमा स्पष्ट करण्यासाठी ॲडजस्ट होतात.

🔶 दृष्टीदोष व भिंगांचा वापर

🔹 निकटदृष्टिता (Myopia):
 
🔸 दोष: जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे स्पष्ट दिसत नाही.
 
🔸 निराकरण: 'अंतर्वक्र' (Concave) भिंगाचा वापर.

   🔹 दूरदृष्टिता (Hypermetropia):

🔸 दोष: लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे स्पष्ट दिसत नाही.

🔸 निराकरण: 'बहिर्वक्र' (Convex)
 भिंगाचा वापर.

   🔹 इतर दोष:

🔸 जरादूरदृष्टीता : द्विनाभी (Bifocal) भिंगाचा वापर.

🔸 दृष्टीवैषम्य (Astigmatism): नलाकार (Cylindrical) भिंगाचा वापर.

🔶 प्रकाश विकिरण (Scattering) व अपस्करण (Dispersion)

🔹 विकिरण (Scattering):

🔸 आकाशाचा निळा रंग: रेले विकिरण (Rayleigh Scattering).

🔸 सूर्यास्त/सूर्योदयी सूर्य लाल दिसणे (कमी लांबीचे तरंग विखरून जातात).

   🔹 अपस्करण (Dispersion):
 
🔸 पांढरा प्रकाश सात रंगांत विभागणे.
 
🔸 ता-ना-पि-हि-पा-जा-पा (VIBGYOR):
  
▫️ सर्वाधिक विचलन: जांभळा (Violet) रंग.
   
▫️ सर्वात कमी विचलन: तांबडा (Red) रंग.

🔶 पूर्ण आंतरिक परावर्तन (Total Internal Reflection)

🔹 अटी: प्रकाश घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असावा.

🔹 उदाहरणे

 🔸 मृगजळ 

 🔸 हिऱ्याचे चमकणे.

  🔸 ऑप्टिकल फायबर (Optical Fiber) मध्ये माहितीचे वहन.

🔶 महत्त्वाच्या संकल्पना 
 
🔸 प्रकाशाचे अस्तित्व: प्रकाश हा फोटॉन्स (Photons) चा बनलेला असतो.
 
🔸 प्रकाश वर्ष (Light Year): अंतराचे एकक (9.46 x 10^15 मीटर).
 
🔸 रंग ओळखणे: वस्तूचा रंग ती वस्तू कोणत्या रंगाच्या लहरींचे परावर्तन करते यावर ठरतो.
 
🔸 शुभ्र प्रकाश: काचेच्या लॅन्समधून जाताना प्रकाशाचा वेग कमी होतो.
 
🔸 माध्यमाचा अपवर्तनांक: (Refractive Index) - माध्यमात प्रकाशाचा वेग कमी होण्याचे प्रमाण.
 
🔸 भिंगांचे सामर्थ्य: भिंगांचे सामर्थ्य हे डायऑप्टर (Dioptre) मध्ये मोजले जाते.

♦️ भारतीय शास्त्रज्ञ आणि प्रकाश (Light)

🔶 सर सी. व्ही. रामन (Sir C. V. Raman):

🔹 रामन परिणाम :

🔸 शोध: १९२८ मध्ये त्यांनी प्रकाशाच्या विकिरणाबाबत (Scattering of Light) एक क्रांतिक शोध लावला, ज्याला 'रामन इफेक्ट' म्हणतात.

🔸 सिद्धांत: जेव्हा प्रकाशाचा किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून प्रवास करतो, तेव्हा त्यातील रेणूंमुळे प्रकाशाच्या स्वरूपात बदल होतो आणि त्याचे विकिरण होते.

🔸 महत्त्व: या शोधामुळे रेणूंच्या रचनेचा अभ्यास करणे सोपे झाले.

🔸 पुरस्कार: १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई आणि भारतीय शास्त्रज्ञ होते.

🔸 राष्ट्रीय विज्ञान दिन: त्यांच्या या महान शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा