👉 कोल्हापूर संस्थान व शाहू महाराज
🔹२६ जुलै १९०२: कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी ५०% आरक्षणाची अधिसूचना जारी.🔹११ जानेवारी १९११: कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना. अध्यक्ष: भास्करराव जाधव, कार्यवाह: अण्णासाहेब लठ्ठे.
🔹शिवाजी वैदिक शाळा: मराठा पुरोहित (ब्राह्मणेतर वेदोक्त विधींसाठी) तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेली संस्था.
👉संस्थात्मक व राजकीय घडामोडी (Key Words)
🔹डेक्कन रयत असोसिएशन (१९१६, निपाणी): अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, सीताराम बोबडे. (उद्देश: मॉन्टेग्यु कमिशनसमोर ब्राह्मणेतरांच्या राजकीय मागण्या मांडणे).
👉 १९१९ चा कायदा (मॉन्टेग्यु-चेम्सफर्ड): मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात ब्राह्मणेतरांसाठी ७ जागा राखीव मंजूर.
👉ब्राह्मणेतर पक्ष (१९२०): अधिकृत स्थापना. प्रमुख नेते: वालचंद कोठारी, भास्करराव जाधव, जेधे-जवळकर.
👉भास्करराव जाधव: १९२४ मध्ये मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात शिक्षण व आरोग्य मंत्री (ब्राह्मणेतर पक्षाचे प्रतिनिधी).
👉जेधे-जवळकर पर्व (१९२० चे दशक): चळवळीला जहाल रूप. पुणे नगरपालिकेत 'टिळक स्मारका'ला अधिकृत विरोध.
👉वृत्तपत्रे, ग्रंथ आणि कोर्ट खटले (थेट जोड्या लावा/विधान तपासा)
🔹 'देशाचे शत्रू' (१९२५): दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेले पुस्तक. (टिळक व चिपळूणकरांच्या 'निबंधमाला'वर कडक टीका).
🔹पुणे कोर्ट खटला: 'देशाचे शत्रू' पुस्तकाविरुद्ध जेधे-जवळकरांवर अब्रुनुकसानीचा खटला. वकील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (त्यांनी जेधे-जवळकरांना निर्दोष सोडवले).
🔹दिनकरराव जवळकर यांचे इतर साहित्य: 'क्रांतीचे रणशिंग' (ग्रंथ), 'मजूर' (पत्रिका).
👉 चळवळीची वृत्तपत्रे व संपादक/संस्थापक:
🔹'विजयी मराठा': श्रीपतराव शिंदे (१९१९, पुणे - जहाल मुखपत्र).
🔹'जागृती': भगवंतराव पाळेकर (१९१७, बडोदा).
🔹'कैवारी' व 'तेज': दिनकरराव जवळकर (संपादक).
🔹 'हंटर': खंडोराव बागल (कोल्हापूर).
🔹 'प्रगती आणि जिनविजय': तात्यासाहेब हरी कोठारी.
👉चळवळीचे काँग्रेसीकरण
🔹१९३० ते १९३८: केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा